मि गवळ्याचं पोर.

मि गवळ्याचं पोर. Lord Krishna is one of the most loved and revered Gods in the Hindu religion. He is regarded as the eighth incarnation of Lord Vishnu born as human in ‘Dwa

The word, “Krishna” means, “one who is always in the transport of joy”. It also means “Black”. Lord Krishna was named so because of his dark complexion. Krishna is known by many other names according to the characteristics he had and the feats he accomplished. He is known as “Makhan Chor” as he was fond of makhan (butter) and used to steal it with his friends. The incident of lifting Govardhan Mou

ntain to save the people from rain made him famous as Girdhari. Also known as Banwari - the one staying in the groves of Vrindavan.

 # copiedतो उध्वस्त जीव म्हणाला "१० ला दोन..."  मी म्हंटलं, "नाही, १० ला एकच..." हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार...
10/12/2020

# copied
तो उध्वस्त जीव म्हणाला "१० ला दोन..."
मी म्हंटलं, "नाही, १० ला एकच..."

हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा उन्हातान्हात रापलेला चेहरा बघा... चेहऱ्यावरील रेषा बघा... आणि डोळ्यांतील ते करुण भावही बघा....
आपोआप त्याची दशा लक्षात येईल... काल सकाळी, फक्त ५ रूपयांच्या ताज्या, करकरीत, देशी वाण असलेल्या तांदूळश्याच्या पेंडीचे मी मुद्दाम १० रूपये देवू केल्यानंतर आनंद, दुःख, यातना, कौतुक आणि आश्चर्य असे मिश्र भाव त्याला लपवता आलेच नाहीत... आणि डोळ्यांत सुध्दा हलकेच पाणी तरळलं... रात्रंदिवस काबाडकष्ट उपसणारे ते हात..! तेच हात जोडले त्या जीवाने मला... खरंतर मी त्याचे पायच धरायला हवे होते... अहो, आपल्या पिढ्यान् पिढ्यांवर उपकार करत आलाय तो... त्याच्या चेहऱ्यावरील एकच क्षणाचा का असेना पण, तो आनंद बघून मला समाधान वाटले... बघून शेजारचा बागवान भाजी विक्रेता म्हणाला, "आपने नेक काम किया..." मी त्याला म्हंटलं, अरे हे एवढेच आणि नेक...? नाही, त्याच्यासमोर शून्यच आहे सगळे..."

शेतकऱ्यांची परिस्थिती खरोखर खूपच अवघड आहे... आणि फक्त शेतकऱ्यांचीच ती आहे... आपला अन्नदाता म्हणतो आपण त्याला... त्याने नाही पिकवलं तर काय खाणार ? रोज उठून खून पडातील अन्नासाठी... मार्च/एप्रिल/मे च्या लॉकडाऊन मुळे आख्ख्या घरादाराने, 24/24 तास राबून, तयार केलेला माल, अगदी ऐनवेळी शेतकऱ्यांना कुठेही पाठवता आला नाही... ते कष्टाचे सोने तसेच्या तसेच शेतातच कुजले, नासून गेले... पोटच्या नुकत्याच जन्मलेल्या लेकराने मान टाकावी अशा अत्यंत विमनस्क अवस्थेत शेतकरी त्या सोन्याकडे बघून टिपं गाळण्याशिवाय काहीही करू शकला नाही... आणि जे शेतकरी माल पाठवू शकत होते, त्यांना तो माल अक्षरशः कवडीमोलाने द्यावा लागला... इतके की, घरी माघारी परतण्यासाठी गाडीभाड्याला त्याकडे पैसा नसायचा... जसं काही इतरांना पुरवण्यासाठीच फक्त आख्खं घरदार रात्रंदिवस राबलंय....

जून महिन्यात पाऊस वेळेवर पडला म्हणून पुन्हा एकदा नव्या दमाने बिचाऱ्याने पुन्हा पेरणी केली तर, 80% बियाणेच बोगस निघाली... झाली का कुणाला अटक या बोगस बियाणे प्रकरणात ??? अरे, शेतकऱ्यांशी, म्हणजेच आपल्या अन्नदात्याशीच ही गद्दारी ???
एक दिवस नक्कीच उपाशी मरणार आहोत आपण.... आपली लायकीच ती आहे... असतील कुणी पैसेवाले, तर काय नाण्यांची उसळ आणि नोटांची भाकरी खाणार आहात का ???

जुलै आणि आॕगस्ट महिन्यात तशाही परिस्थितीत कशाबशा केलेल्या पेरणीमुळे जे उगवले, तेही तेव्हा पाऊसच नंतर न आल्याने पावसा अभावी करपायला लागले... अहो किती पिळवणूक चारी बाजूंनी त्या दीनवाण्या कष्टकरी जीवाची....!!! काय करायचे या जीवाचे ? या #शापित जीवाने अन्न-धान्य पिकवायचे तरी कसे....? यांना खरंचंच कुणीच वाली नाही का आजही ???

सप्टेंबर जरा बरा गेला तोच, आॕक्टोबर मध्ये प्रचंड पावसाने सगळीकडे पूर आले, आणि जोमात वाढलेली उभी पिके आडवी होऊन शिवारासकट वाहून गेली... खरंचंच माझ्याकडे या दीनवाण्या जातीसाठी लिहायला आता शब्दच उरलेले नाहीत.... मी निःशब्द झालेय.....
जगात कुठलीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली की, मरतो, खपतो, संपतो फक्त अन्नदाता ! वाईट आहे हे...अतिशय वाईट आहे...

खरिप हातचा गेलाच होता... रब्बी अर्धाआधिक गेला... काही जमिनीत आजही पेरण्या करता येत नाहीयेत... डाळी, कडधान्ये, तेलबिया, कापूस महाग होणार... आणि त्यावर तयार होणारी उत्पादनेही महाग होऊन, एक दुष्टचक्रच तयार होणार... ज्यात फक्त सामान्य जनता आणि बळीराजा भरडून निघतात....

आत्महत्या उगाचच होत नाहीत... कुणाला आपला जीव प्यारा नसतो...?
कुणीतरी काहीतरी करायला हवेय या हातांसाठी... जास्त देवू नकात, त्याला नकोच आहे जास्त काही... पण भावही करू नकात... भाव पाडून मागू नकात... एवढेच सांगणे आहे...
🙏🏼

साभार- शिल्पा गावडे

05/11/2020

👌👌👌🙏🙏🙏We will help them to celebrate Diwali

25/10/2020

☘️☘️☘️☘️
🌱🌱🌱🌱
*दसरा*
*सणाच्या*
*आपणास*
*हार्दिक*
*शुभेच्छा!*
🌱🌱🌱🌱
☘️☘️☘️☘️

20/09/2020

समजून घ्या कोरोना काय आहे ते...🙏🙏

🙏💐 राधे राधे 💐🙏
11/08/2020

🙏💐 राधे राधे 💐🙏

💐🙏 जय श्री कृष्ण 🙏💐        💐 राधे राधे 💐
11/08/2020

💐🙏 जय श्री कृष्ण 🙏💐
💐 राधे राधे 💐

Plz don't do this to people🙏🙏🙏
05/08/2020

Plz don't do this to people🙏🙏🙏

21/07/2020

# Indian Education System.. #

अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईलकोरोना एक कॉमन कोल्ड कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. कॉमन कोल्ड म्हणजे साधा सर्दीच...
19/07/2020

अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईल

कोरोना एक कॉमन कोल्ड


कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. कॉमन कोल्ड म्हणजे साधा सर्दीचा आजार! अनेक ग्रंथामध्ये त्याची ओळख कॉमन कोल्ड या नावाखालीच दिलेली आहे. हा आजार आतापर्यंत अनेकांना कितीतरी वेळा होऊन गेलेला असेल. आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल.

हे मी माझ्या मनाचे सांगित नाही. पद्मश्री डॉ. रमण खंडेलवाल यांची गेल्या चार दिवसापूर्वी माझावर मुलाखत घेतली होती. ते याच क्षेत्रात काम करतात. त्यांनी कोरोना विषयी खूप छान तथ्यात्मक माहिती सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या व्हायरसची जरी लागण झाली तरी 80 टक्के लोकांना काहीच लक्षणे दिसत नाहीत. तो आजार येतो आणि चार-सहा दिवसांमध्ये आपोआप निघूनही जातो. 15 टक्के लोकांना सामान्य उपचारांची गरज भासते. तेही साध्या उपचाराने बरे होऊ शकतात.

पाच टक्के लोकांच्या बाबतीत मात्र कॉम्प्लेक्स निर्माण होऊ शकतो. पण हे पाच टक्के लोक म्हणजे जे वयोवृद्ध आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती अगदी मामुली आहे, ज्यांना डायबिटीस, हृदयविकार, टी.बी. किंवा तत्सम स्वरूपाचा पूर्वीचाच कुठला तरी आजार आहे. अशा लोकांपैकी काही लोक मरू शकतात. हे आहे कोरोनाचे सत्य. म्हणजे सुमारे 95 टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता जवळ जवळ नगण्य आहे. साध्या उपचारानेही तो बरा होऊ शकतो.

कोरोनाचा प्रसार

कोरोनाचा प्रसार हवेतून होत नाही. त्यामुळे आपण एकटे असताना किंवा आपल्या आसपास काही फुटांवर कोणी माणूस नसताना तोंडाला मास्क बांधणे अवैज्ञानिक आहे. कोरोनाचा आकार आहे, शंभर नॅनोमिटर. आणि आपल्या फडक्याची छिद्रे किती मोठी असतात, आपणास माहीत आहेच. मित्रांनो! आपण नव्हतो, तेव्हाही लाखो व्हायरस होते आणि आपण नसल्यानंतरही व्हायरस राहाणार आहेत.

या विश्वातील सर्व प्रकारचे पशू, पक्षी, प्राणी, किटक, जिवाणू, विषाणू हे सर्व निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याबरोबरच आपणास आपले जीवन जगायचे आहे. या जगात सुमारे 2 लाख 30 हजार प्रकारचे व्हायरस आहेत. आपण त्यांना टाळू शकत नाही. तर आपण स्वतःला अधिक सामर्थ्यशाली, शक्तीशाली बनवावे लागते. त्याच्या काही पद्धती आहेत.

डर का माहोल

अनेक प्रकारच्या रोगांने मृत्यूचा आकडा पाहिला तर कोरोनापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मात्र कोरोनाने झालेल्या मृत्यूचा स्फोट केला जातोय. जगात कुठेही कोणी कोरोनाने मेले तर लाखो-कोट्यवधी माध्यमांतून त्याची बातमी जगभर पसरवली जातेय. त्यातून एक फार मोठी भिती जनमानसामध्ये पसरली आहे. मरणाच्या बातम्या पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत. चांगले झालेल्या लोकांचे आकडे फोकस करून सांगितले जात नाहीत.

भीतीचे परिणाम

पूर्वी येऊन गेलेल्या साथीवर अनेक मानसशास्त्रज्ञांनी समाजातील लोकांचे सर्व्हे केले तेव्हा लक्षात असे आले की प्लेग, देवी वगैरे आजारांनी मेलेल्या लोकांपेक्षा नुसत्या भीतीने मेलेल्या लोकांची संख्या जास्त होती! कुठल्याही साथीला, आजाराला, परिस्थितीला सामोरे जायचे असते. भ्यायचे नसते. पूर्ण शक्तिनिशी त्याचा मुकाबला करायचा असतो. यातच माणसाचे मनुष्यपण आहे. पण आज जास्तीत जास्त भीतीचे वातावरण पसरवण्याचे काम जणू काय मुद्दाम केले जातेय असे वाटायला लागते. त्याच्या ब्रेकिंक न्यूजचा विषय बनवला गेलाय. सामान्य माणसाला इतर गोष्टींची माहिती नसल्याने भीतीने ते अगदी गांगरून जातात. ही भीती का पसरवली जातेय, त्याचे कारण आहे.

डर का व्यापार

जितकी भीत मोठी तितका मोठा व्यापार करता येतो. हे व्यापार कोण करतं, हे आजपर्यंतच्या इतिहासाने पुनःपुन्हा दाखवून दिलेले आहे. या जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ जर कुठली असेल तर ती आहे, (हेल्थ इंडस्ट्री)आरोग्यसेवा व्यवसाय.

सत्ता आणि सत्य

विज्ञान हे सत्यावर आणि तथ्यावर चालत असते आणि सत्ता किंवा सरकार हे पर्शेप्शनवर चालत असते. तेव्हा विज्ञान काय सांगते, आजपर्यंत जे जे संशोधन झालेले आहे, ते काय सांगते त्याच्याकडे जरा डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. वैज्ञानिक तथ्य जर समजून घेतले तर भीतीचे वातावरणही निवळेल आणि जगण्याचा सुंदर मार्गही सापडेल.

स्वातंत्र्याच्या वातावरणात मुक्तपणे श्वास घेण्याचे सामर्थ्य निर्माण करणाऱ्या श्रद्धेला आपण जागे करूया. प्रेमाने प्रस्फुरीतच,प्रफुल्लित झालेले आणि ज्ञानाने दिग्दर्शित केलेले विवेकी जीवन आपण जगूया. हे भीतीचे वातावरण(डर का माहोल)योग्य नाही. तो वैज्ञानिक नाही. सत्यावर आधारित नाही. तो एक बाजारू फंडा आहे. सरकार काय सांगते आणि विज्ञान काय सांगते याचा विचार व्हायला हवा.

माणसे का मरताहेत?

कोरोना एक कॉमन कोल्ड आहे, तर इतकी माणसे का मरताहेत? असा स्वाभाविक प्रश्न विचारला जातोय.

त्याचे उत्तर असे की माणसे नेहमीच मरत असतात. ती जगभर मरतात. कोरोनाच्या नावावर जेवढी मरणे खपवली त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या आजाराने मरताहेत. संपूर्ण जगातील आकडा इतर रोगांच्या मानाने फारच कमी आहे.
ज्या इटलीमध्ये जास्त माणसे मेली कारण इटलीत वृद्ध माणसांची संख्या जास्त आहे. म्हातारी माणसे काहीतरी निमित्त होऊन मरतातच.
सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे माणसे उपचाराच्या पद्धतीमुळे जास्त मरताहेत! कोरोना झालेल्या माणसांवर जे प्रोटोकॉलनुसार उपचार केले जाताहेत त्यामुळे माणसे जास्त मरताहेत. कारण त्याच्यावर नको त्या औषधांचा मारा केला जातोय. त्यामुळे जीवनशक्ती अगदी कमकुवत होऊन जाते आणि मग शरीर साथ द्यायची सोडून देते. म्हणजे इथे रोगापेक्षा उपाय भयंकर आहे.
गेल्या वर्षी इटलीमध्ये नुसत्या मलेरियाने दोन लाख लोक मेले होते. मात्र त्याच्या अशा बातम्या दाखवल्या नाहीत. त्याच्या ब्रेकिंग न्यूज आल्या नाहीत. म्हणून ते लोकांना माहीत नाही. ईश्वर ना करो, पण इटलीमध्ये अजून मरणाचा आकडा वाढू शकतो. कारण प्रत्येक वर्षी तिथे तेवढे लोक इन्फेक्शनने मरतातच. आय. एल. आय. म्हणजे इन्फ्लुएंझा लाईड इलनेस या आजाराने 20 हजारांहून लोक मेले होते.

निसर्गाची व्यवस्था

साथी येतात-जातात, दुष्काळ, महापूर, भूकंप इ. नैसर्गिक गोष्टी घडणे हा एक नैसर्गिक भाग आहे. महामारी हे एक निसर्गाची बॅलन्सिंग व्यवस्था आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो, अनेक गोष्टींमध्ये विषमता निर्माण होते, सृष्टीचक्रामध्ये काही वेगळ्या गोष्टी घडू लागतात, तेव्हा अशा घटना घडतात आणि त्याचे बॅलंसिंग साधले जाते. ही व्यवस्थासुद्धा नैसर्गिक नियमाचाच एक भाग आहे.

जन्म-मरण हे चक्र सातत्याने सुरूच आहे. निसर्ग काही आपल्या हातातील गोष्ट नाही. तो सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्यापुढे निर्माण करीत असतो. त्या परिस्थितीला आपण सामोरे कसे जातो किंवा तिचा मुकाबला कसा करतो, तिला प्रतिसाद कसा व काय देतो, याच्यावर आपले जीवन, जगणे आणि त्याचे परिणाम अवलंबून असतात.

आपण व्हायरसला मारू शकत नाही

व्हायरस हे जिवंत व्यक्तिमत्त्व नाही. त्यामुळे त्याला मारू शकत नाही. तो शरीरात गेल्यानंतरच जैविक लक्षणे दाखवतो. आपण व्हायरसपासून पळून जाऊ शकत नाही. घरात कोंढून घेतले तरी आपल्या घरात आपल्या आसपास हजारो-लाखो व्हायरस वावरत असतात! खरे तर व्हायरस हा आपला निसर्गातील एक सोबती आहे, सहचारी आहे.

मग आपण काय करायचे? आपण जसे पडणाऱ्या पावसाला थोपवून धरू शकत नाही. तसे व्हायरसला थोपवू शकत नाही. मग पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय करतो? आपण छत्रीचा वापर करतो.

नेहमीसाठी घर बांधून ठेवतो. जेव्हा लढायी सुरू असते तेव्हा आपल्यावर वार होऊ नये म्हणून आपण काय करतो? आपण ढालीचा वापर करतो आणि आलेला वार त्याच्यावर झेलतो. तसेच व्हायरसचा मार झेलण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती नावाची जी ढाल आहे, तिचा वापर करणे हाच याचा प्रथम आणि शेवटचा सर्वोत्तम उपाय आहे.

हा उपाय कोण सांगू शकते? जनमानसापर्यंत कोण घेऊन जाऊ शकते? हे काम डब्ल्यू. एच. ओ. करणार नाही. हे काम इंडियन मेडिकल असोशिएशन करणार नाही. हे काम फक्त आयुष मंत्रालय करू शकते. आता फक्त एकच आशा भारतातील आयुष मंत्रालयावर आहे.

Corona Is Conspiracy (करोना एक कट कारस्थान,एक षडयंत्रच)

फरिदाबाद निवासी डॉ. विश्वरूपराय चौधरी यांनी जानेवारीमध्येच सांगितले होते, की कोरोना ही एक काँन्स्पीरसी,कुटील कारस्थान आहे. आता तर निकारूग्वा, ब्राझील आणि मॅक्सिकोचे अध्यक्षही जाहीरपणे म्हणताहेत की, कोरोना हि काँन्स्पीरसी आहे. ते एक षडयंत्र आहे!

कोरोना एक हॉरर पिक्चर

तुम्ही कधी भुताचा हॉरर सिनेमा पाहिलाय का? आपल्याला माहीत असते की पडद्यावरचे भूत येऊन आपल्याला काहीही करणार नाही. तरीही आपण घाबरलेले असतो. हृदयाचे ठोके वाढलेले असतात. तसे आपल्या घरातल्या टी.व्ही.वर हा कोरोनाचा हॉरर पिक्चर सुरू आहे. घरातल्या छोट्या पडद्यावर आता त्याचा क्लायमॅक्स होत आलाय. काही दिवसांतच त्याचा दी एन्ड होईल! कोरोना हा एक हॉरर पिक्चरसारखाच भाग निर्माण केलाय. लक्षात ठेवा, कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. तो 80 टक्के लोकांना झालेला माहीतही होत नाही. साधा आजार आहे. भिऊ नका. दक्षता घ्या.

जीवन आणि दक्षता

फक्त कोरोनासाठीच नव्हे तर जीवनात नेहमीच दक्षता बाळगावी लागते. पदोपदी दक्ष राहावे लागते. थोडेसे लक्ष दुसरीकडे गेले तरी ठेच लागते किंवा खड्यात पाय जाऊ शकतो. दुर्लक्ष झाले तर अपघात होऊ शकतो. दक्षता ही जीवनभर नेहमीसाठी घेण्याची गोष्ट आहे. तशीच दक्षता घ्या. भीती नको. तुम्ही जर भीती बाळगली तर भीतीमुळे जीवनशक्ती म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते आणि नको तो आजार चिकटतो. त्यामुळे भीती सोडा आणि दक्ष व्हा!

औषधाने आजार बरा होत नाही

कुठलाही आजार हा औषधाने बरा होत नाही. कारण आपण औषधे खात नाही, म्हणून आजार होत नाही, तर आजाराची कारणे अन्यत्र असतात. शरीर स्वतःहूनच आजार बरा करीत असते. त्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करीत असते. तिला बलवान बनवणे हे आपल्या हातात आहे. जर युद्ध जिंकायचे असेल तर सैनिकीशक्ती बलवान करावी लागते. तिला योग्य ती हत्यारे व रसद पुरवावी लागते. तसेच शरीराचे आहे. शरीरातील सैनिकी शक्ती बलवान बनवा.

प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री

प्रतिकारशक्ती बलवान बनवण्यासाठी तीन सूत्री कार्यक्रमाचा अवलंब केला तर ती सबळ होऊ शकते.

प्राकृतिक आहार – यामध्ये शरीरातील पेशीला 40 प्रकारचे अन्नघटक लागतात. त्या सर्व घटकांची पूर्ती करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश असावा. शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करणारे जंक फुड, फास्ट फुड खाऊ नये. प्राकृतिक मौसमी फळे, भाज्या आणि धान्ये यांचा आहारात समावेश असावा. रोज पोट भरून फळे व भाज्या प्राकृतिक स्वरूपात म्हणजे कच्या स्वरूपात खावीत. नंतर तुम्हाला जे हवे ते खा. अन्न, पाणी आणि हवा याच्यावर आपले जीवन अवलंबून आहे.
योग्य तो व्यायाम – व्यायामामध्ये दम लागेपर्यंत चालणे, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम (श्वासाचा व्यायाम) हा नित्य नियमाने व्हावा. प्राणायाम हा रोगनिवारणाचे कार्य करीत असतो. हवा ही एक दवा आहे.
पुरेसा विश्राम – शांत आणि गाढ झोप घ्यावी. अति आवाज, गोंधळ, यांने स्नायू तानलेल्या स्वरूपात राहातात त्यामुळे शरीराला विश्रांतीच मिळत नाही. शरीरातील पेशी-पेशींला विश्रांती मिळाली पाहिजे. ती रोज झोपेत मिळते. पण शांत झोपच लागत नाही. त्यासाठी योगनिद्रेचा अभ्यास करावा किंवा रोज न चुकता जेव्हा जिथे वेळ मिळेल तिथे ध्यान करावे. तुमचे जे आताचे वय आहे, तुम्हास जेवढी वर्षे झालीत तेवढे मिनिटे रोज ध्यान व्हायला हवे. ध्यान करण्यासाठी न हालता स्थिर बसणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाकडे तटस्थपणे पाहात राहाणे एवढे जरी केले तरी पुष्कळ आहे.
मित्रांनो! आपण माणूस आहोत. माणसाने वेळोवेळी अनेक संकटाशी मुकाबला करीत स्वतःचे अस्तित्व इथंपर्यंत आणलेले आहे. आताही आपण एकोप्याने, एकदिलाने वागून एकमेकाला मदत करीत जगूया. माणसासी माणसाप्रमाणे जगणे आणि निसर्गाची होणारी लूट थांबवणे, एवढे जरी झाले तरी कोरोनाने शिकवलेला तो एक धडा आहे असे म्हणावे लागेल.

स्वस्थ रहो! मस्त रहो!! व्यस्त रहो!!!
युट्युब वरून याच्यापेक्षा रोज वेगळे मी काहीच ऐकत नव्हतो आणि हे मी माझ्या मित्रांना पदोपदी सांगण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे तरी आपण वरील लेख समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण जर केले तर आपणास कोणत्याही रोगाला बळी न पडण्याची क्षमता आपल्याकडे असेलअतिशय सुंदर लेख असून आपण सर्वांना पाठवावाविनंती आणि प्रत्येक मित्राने आपल्या मित्रांना पाठवावा…

हा लेख सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे..माननीय अविनाश धर्माधिकारी यांच्या नावे फिरत आहे. पत्यक्षात त्यानी लिहिला आहे की नाही याबाबत स्पष्ट माहिती नाही.

-अविनाश धर्माधिकारी

19/07/2020

तमाम हिंदू समाज जागे व्हा हिच वेळ आहे ती.. 🙏🙏🙏

15/07/2020

🙏🙏🙏

19/06/2020

*सॅनीटायझर लावू तरी कुठे-कुठे*?

मुलं पेन, पेन्सिल तोंडात घालतात. अंगठा चोखतात. एवढेच काय कपडेसुद्धा तोंडात घालतात...

म्हणून म्हणते सॅनिटायझर लावू तरी कुठे-कुठे अन किती वेळा ?

शंभर मुलात एकच मुतारी.
चार पाण्याचे ग्लास, त्याची वडा वडी. एकमेकांच्या अंगावर उड्या मारणारी पोरं, आनंदाने एकमेकाला टाळ्या देणारी मुलं, एकमेकांच्या कानात बोलणारी ,
मिळून मिसळून राहणारी मुलं...
पेन्सिल,पेन,वही,पुस्तकं,पट्टी, पाण्याचा ग्लास, पाणी बॉटल, कंपास पेटी,एक ना अनेक गोष्टींची देवाण-घेवाण सातत्याने करणारी मुलं...

म्हणून म्हणते सॅनिटायझर लावू तरी कुठे कुठे आणि दिवसातून किती वेळा ?
हाच प्रश्न सतत सतावतोय...भेडसावतोय.
वाटतंय भारताची भावी पिढी आपण शाळेत बोलावुन मृत्यूच्या दाढेत तर देत नाही नां ?

खूप विचार केल्यानंतर वाटतं-
अरे, चिमुकली कोवळी, निरागस
लेकरं चार भिंतीच्या आत कोंडून कोरोना सारख्या महाभयंकर राक्षसाच्या दाढेत देण्यापेक्षा ती दोन-तीन महिने आपल्या घरात सुरक्षित राहीली तर जिंदगीभर आनंदात सुखात राहतील.

देशाच्या भवितव्याचा विचार करता आज तरी मला असं वाटतं की इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची छोटी छोटी मुले आपापल्या घरी सुरक्षित राहिली तरच देशाचे भविष्य उज्ज्वल आहे आणि म्हणून मुलांचं जगणं महत्त्वाचं आहे...

आज उत्तर सोलापूर तालुक्यातील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली. शाळा बंद असूनही अशा घटना घडत आहेत.
उद्या शाळा चालू झाल्यावर एक काय शेकडो शिक्षक आणि हजारो विद्यार्थ्यांना कोरोना नावाचा महाभयंकर राक्षस कवेत घेईल,याची मनाला खूप भीती वाटते आणि पुन्हा वाटते खरंच शाळा सुरू करण्याची गरज आहे का ?

तेव्हा माझं मन म्हणतं *नाही* .
अरे शाळा सुरू करण्याची अजिबात गडबड करू नये.

*ही वेळ शाळा शिकवण्याची नसून, विद्यार्थ्यांना जिवंत कसे रहावे हे शिकवण्याची आहे*

कालपर्यंत आठ-दहा माणसांना जमावबंदीचा आदेश देणारं शासन आज शेकडो विद्यार्थ्यांना एकत्र का बोलवतंय हेच कळत नाही...
🤨🤨🤨🤨🤨🤨
हे लोक शाळा सुरू करतील .
भरमसाठ पैसे गोळा करतील आणि पुन्हा कोरोना वाढला म्हणून सुट्टी देतील.
मध काढला की पोळी फेकून देतील यात शंका नाही...

आपले महाराष्ट्र राज्य आज देशामध्ये कोरोनाच्या बाबतीत आघाडीवर आहे शाळा सुरू नसल्या तरीही.पण त्या सुरु केल्यावर मुलां इतकाच शिक्षकांचाही जीव महत्त्वाचा आहे...

*मुलं वाचवा...देशाचं भविष्‍य वाचवा...*.

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मि गवळ्याचं पोर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share