Varkari Vishwa वारकरी विश्व

  • Home
  • Varkari Vishwa वारकरी विश्व

Varkari Vishwa वारकरी विश्व Dedicated to the promotion and propagation of Varkari Sampradaya . वारकरी साम्?

05/06/2025
06/06/2022

जय जय राम कृष्ण हरि,

सर्व हरिभक्तांना नम्र विनंती आहे कि , आपल्या विश्व #वारकरी सेवा संस्था द्वारा संचालित वारकरी भवन व वारकरी विश्वविद्यालय निधी समर्पण अभियान अंतर्गत आयोजित अभंग वारी या चॅरिटी शो च्या कमीत कमी २ पास खरेदी करून वारकरी विश्वविद्यालयाच्या अनुषंगाने , अध्यात्मिक- शैक्षणिक -सुसंस्कारित भावी पिढी तयार करण्यासाठी हाती घेतलेल्या विद्यादानाच्या या सामाजिक कार्यात खुल्या मनाने सहकार्य करावे हि आपणास कळकळीची विनंती.

एका पास ची निधी #समर्पण राशी फक्त १०००/ ( एक हजार रुपये - प्रथम श्रेणी ) व ५०० /- ( पाचशे रुपये - द्वितीय श्रेणी ) आहे . सदर कार्यक्रमाच्या पासेस श्री स्वामी समर्थ मंदिर बेसा , नागपूर येथे , उपलब्ध आहेत . एका पासवर एका व्यक्तीसच प्रवेश मिळेल याची कृपया नोंद घ्यावी .

आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे .

जय जय राम कृष्ण हरि,सर्व हरिभक्तांना नम्र विनंती आहे कि , विश्व वारकरी सेवा संस्था द्वारा संचालित वारकरी भवन व वारकरी वि...
31/05/2022

जय जय राम कृष्ण हरि,

सर्व हरिभक्तांना नम्र विनंती आहे कि , विश्व वारकरी सेवा संस्था द्वारा संचालित वारकरी भवन व वारकरी विश्वविद्यालय निधी समर्पण अभियान अंतर्गत आयोजित अभंग वारी या चॅरिटी शो च्या कमीत कमी २ पास खरेदी करून वारकरी विश्वविद्यालयाच्या अनुषंगाने , अध्यात्मिक- शैक्षणिक -सुसंस्कारित भावी पिढी तयार करण्यासाठी हाती घेतलेल्या विद्यादानाच्या या सामाजिक कार्यात खुल्या मनाने सहकार्य करावे हि आपणास कळकळीची विनंती.

एका पास ची निधी समर्पण राशी फक्त १०००/ ( एक हजार रुपये ) आहे . सदर कार्यक्रमाच्या पासेस श्री स्वामी समर्थ मंदिर बेसा , नागपूर येथे उपलब्ध आहेत . एका पासवर एका व्यक्तीसच प्रवेश मिळेल याची कृपया नोंद घ्यावी .

आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे .

जय जय राम कृष्ण हरि ! #वारकरी भवन व  #वारकरी विश्वविद्यालय  निधी समर्पण अभियानाअंतर्गत आयोजित संगीतमय  #सुंदरकांड पाठ व ...
01/05/2022

जय जय राम कृष्ण हरि !

#वारकरी भवन व #वारकरी विश्वविद्यालय
निधी समर्पण अभियानाअंतर्गत आयोजित

संगीतमय #सुंदरकांड पाठ व #हनुमानचालीसा पाठ

शनिवार , दिनांक ०७ मे २०२२
वेळ : सायंकाळी ५ ते ८

स्थळ :
प्लॉट नंबर ३३ , वारकरी भवन व वारकरी विश्वविद्यालयाची प्रस्तावित जागा , श्री स्वामी समर्थ मंदिर ( स्वामीधाम ), बेसा परिसर , नागपूर

सुंदरकांड पठणाचे महत्व :
श्रीरामचरितमानस मधे सुंदरकांड एकमेव असा अध्याय आहे ज्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचे परम भक्त श्री हनुमान जी च्या विजयाबद्दल आहे . हनुमान जी लवकर प्रसन्न होणारे देवता असून बल, बुद्धि , प्रदान करणारे देवता आहेत . पौराणिक मान्यतेनुसार सुंदरकांड च्या पठणाने व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतात तसेच सुंदरकांड च्या पठणाने व्यक्तीमध्ये एकाग्रता व आत्मविश्वासाची वृद्धि होते. मान्यतेनुसार शनिदेव स्वतः हनुमानजी चे भक्‍त असल्याने ज्या व्यक्तीच्या जीवनात शनि देवाची ढैय्या अथवा साढ़ेसाती चालू आहे अशा व्यक्तीने सुंदरकांड पाठ केल्यास त्याला शनी देवाचा सुद्धा विशेष आशीर्वाद मिळतो .

तेव्हा आपण सर्वांनी सुद्धा श्री हनुमान जी ची विशेष कृपा आशीर्वाद मिळविण्यासाठी आयोजित सुंदरकांड पाठाचा विशेष लाभ घ्यावा हि विनंती

टीप : सदर सुंदरकांड पाठासाठी पुस्तक सोहळ्याच्या ठिकाणी उपलबध करण्यात येईल

आयोजक : #विश्ववारकरीसेवासंस्था , नागपूर

08/12/2021

#आवाहन - वारकरी विश्वविद्यालय निधी #समर्पण #अभियान

जय हरी ,

आज पर्यंत आपण सर्वानी समाजहितासाठी #कथा , #कीर्तन , सप्ताहांमध्ये तसेच विविध मंदिरांच्या बांधकामांसाठी व #धार्मिक कार्यक्रमांसाठी सढळ हाताने #देणगी देऊन मदत केलेली आहेच परंतु , यावेळी आता आपणा सर्वांना विद्यादानासाठी मदत करायची आहे . असं म्हणतात #विद्यादान हे सर्वात पवित्र असं दान आहे . तेव्हा वारकरी विश्वविद्यालयाच्या अनुषंगाने , अध्यात्मिक- शैक्षणिक -सुसंस्कारित भावी पिढी तयार करण्यासाठी हाती घेतलेल्या विद्यादानाच्या या सामाजिक कार्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याची व देणगी द्वारे समर्पणाची अपेक्षा आहे . आपण दिलेल्या #देणगीरूपी समर्पणाद्वारे विद्यादानाचे हे संकल्पित सामाजिक कार्य नक्कीच उत्तम प्रकारे सुरु होऊन भविष्यात सुद्धा निरंतर सुरु राहील यात तिळमात्र शंका नाही .

तेव्हा #वारकरी विश्वविद्यालयाच्या पुढील यशश्वी वाटचालीसाठी सदर " #वारकरीविश्वविद्यालयनिधीसमर्पण अभियानात सक्रिय सहभाग घेऊन इच्छाशक्ती नुसार देणगीरूपी समर्पणाद्वारे सहकार्य करावे व इतरांनाही प्रेरित करावे ही आपणास आदराची व कळकळीची विनंती

विनीत - विश्वस्त मंडळ , #विश्व #वारकरी #सेवा #संस्था

 #उत्पत्ती  #एकादशी - कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला 'उत्पत्ती एकादशी' ( ) म्हणून देखील ओळखलं जातं. आज (30 नोव्ह...
30/11/2021

#उत्पत्ती #एकादशी - कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला 'उत्पत्ती एकादशी' ( ) म्हणून देखील ओळखलं जातं. आज (30 नोव्हेंबर) दिवशी हिंदू धर्मीय उत्पत्ती एकादशी साजरी करत आहेत. पुराण कथांनुसार, कार्तिकी एकादशीनंतर साजरी केल्या जाणार्‍या उत्पत्ती एकादशीला देवी एकादशी प्रकट झाल्याने त्याचं विशेष महत्त्व आहे. उत्पती एकादशी ही #उत्पन्नाएकादशी म्हणून देखील ओळखली जाते.

'एकादशी' ही एक देवी असून तिचा जन्म भगवान विष्णूमुळे झाला होता अशी मान्यता आहे . ही एकादशी देवी कार्तिक कृष्ण एकादशी या दिवशी प्रकट झाली होती. त्यामुळे तिचे नाव 'उत्पत्ति एकादशी' असे पडले. या दिवसापासून एकादशीचे व्रत ठेवण्याची सुरूवात केली जाते.

सर्व #वारकरी हरी भक्तांना #उत्पत्तिएकादशी च्या मंगलमय शुभेच्छा

जय जय राम कृष्ण हरि

#विश्व #वारकरी #सेवा #संस्था
#वारकरीविश्व

जय हरि,आज नागपुर येथे श्री.ह.भ.प. देवव्रत( राणा)महाराज विवेकानंद वासकर ( #वासकर फड प्रमुख) तसेच राष्ट्रीय अध्यक्ष वा.सां...
18/11/2021

जय हरि,

आज नागपुर येथे श्री.ह.भ.प. देवव्रत( राणा)महाराज विवेकानंद वासकर ( #वासकर फड प्रमुख) तसेच राष्ट्रीय अध्यक्ष वा.सां.पा.संघ, #पंढरपूर यांची भेट घेण्याचा योग आला.

#वारकरीविश्व या #वारकरी सांप्रदायाच्या अॅप व वेबसाईट च्या साठी अधिकृत माहिती संकलित करण्यासाठी महाराजांचे मार्गदर्शन लाभले.

संदीप कोहळे
#विश्ववारकरीसेवासंस्था

जय जय राम कृष्ण हरिमी अविवेकाची काजळी।फेडोनी विवेक दीप उजळी॥ते योगिया पाहे दिवाळी॥निरंतर॥तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला  #...
04/11/2021

जय जय राम कृष्ण हरि

मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेक दीप उजळी॥
ते योगिया पाहे दिवाळी॥
निरंतर॥

तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला #दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभकामना आणि यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, लाभो हिच परमपिता परमेश्वराच्या चरणी प्रार्थना !! 💖
!! #रामकृष्णहरि !!

#विश्व #वारकरी #सेवा #संस्था

Address

67 SHIRDI NAGAR

440024

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varkari Vishwa वारकरी विश्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Varkari Vishwa वारकरी विश्व:

  • Want your place of worship to be the top-listed Place Of Worship?

Share