Shree satyasai vidya mandir school Narsala Nagpur

Shree satyasai vidya mandir school Narsala Nagpur ISO (International Standard Organisation) Certified scl. It is a step build up Nation By our students

18/05/2026
28/02/2026

Our Prayogam Reading Room Near Dighori Nagpur

शाळेतील परसबागेत आलेला हा ताजातवाना भाजीपाला किती आतुर झालाय,भरभर वाढून येण्यासाठी.. मायेची उब देणारे हात जिव्हाळा निर्म...
24/01/2026

शाळेतील परसबागेत आलेला हा ताजातवाना भाजीपाला किती आतुर झालाय,भरभर वाढून येण्यासाठी.. मायेची उब देणारे हात जिव्हाळा निर्माण होतो. झाडांना तरारून वर येण्यास बाध्य करतात. अंतर्बाह्य फुलवितात. छोट्या छोट्या मुलांचे निरागस हातांनी या झाडांचा लडिवाळ करतांना झाडं किती सुखावत असेल.एका अनामिक ओढीने अगतिक होऊन फुलारून येत असेल....
शाळेत
हे हिरवं वैभव निर्माण करण्यासाठी सर्वार्थाने मदत करणारे वैभव जाधव,
या झाडांशी प्रीत जुळवणाऱ्या प्रीती क्षीरसागर
या झाडांच्या अवकाशात हिरवा रंग भरणारे आकाश टाले ,
उबदार हात झालेले संजय खंडार,अंकुश कडू,
मायेनं सांभाळ करणाऱ्या पानसे ताई, धुर्वे ताई, स्वाती ताई, आशा ताई,
श्रमाची सारी कष्ट उपसून सोनं पिकाविणारे जगदीश नागपुरे, अमित इवनाथे...
आणि हो... झाडांना पाणी टाकलंय ना.. बघा सुकवटलीत, खत दयावं लागेल वगैरे असं आस्थेने चौकशी करणारे जणू झाडांचे डॉक्टर झालेले भूषण जाधव...या बागेनं आज शाळेत चैतन्य पेरलंय , सृजनाचा आनंद दिलाय..
आज या झाडांना आलेला भाजीपाला आम्ही विक्रीसाठी ठेवला. आणि 15 मिनटात हा भाजीपाला विकला गेला.

या सृजनसाठी
सबको दिलसे Thank You❤️

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत  शाळेचा जिल्ह्यात पहिला क्रमांक.. जिल्हा परिषद नागपूरचे सीईओ विनायक मह...
19/01/2026

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळेचा जिल्ह्यात पहिला क्रमांक..
जिल्हा परिषद नागपूरचे सीईओ विनायक महामुनी यांच्या हस्ते, शिक्षणाधिकारी निखिल भुयार यांच्या उपस्थितीत शाळेला 11 लाखाचे पारितोषिक प्राप्त.

वाणाचे दिवस आहेत..हळदीकुंकू आणि वानात छोटी छोटी चाटली-बुटली भांडी आणि त्यानिमित्ताने घडून येणारं गेट - टूगेदर...पण ही सं...
15/01/2026

वाणाचे दिवस आहेत..हळदीकुंकू आणि वानात छोटी छोटी चाटली-बुटली भांडी आणि त्यानिमित्ताने घडून येणारं गेट - टूगेदर...
पण ही संक्रात एका नव्या संकल्पाने साजरी करूयात.. या सक्रांतीत कधीही न संपणारे ज्ञानाचे वाण करूयात..शाळेतील मुलांना वाचणासाठी यनिमित्ताने आपण पुस्तकांचे वाण द्या.. आम्ही परतीच्या वानात देऊ तुम्ही दिलेल्या पुस्तकाच्या ज्ञानानं समृद्ध झालेली उद्याची भावी पिढी...
सण तोच, संकल्पना वेगळी..😊☘️

स्नेहांकांक्षी
निलेश सोनटक्के
मुख्याध्यापक
श्री सत्यसाई विद्यामंदिर

Address

Ambika Nagar, Narsala
Nagpur
440034

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree satyasai vidya mandir school Narsala Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share