12/01/2026
संस्कारीत व चारीत्र्य संपन्न पिढी घडविण्याची आवश्यकता : अजयजी पारीक
*विहिपचे अखिल भारतीय सेवा प्रमुख यांचे प्रतिपादन
*सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
*मान्यवरांचे हस्ते सेवाव्रतीचा सत्कार
नागपूर : भारतीय संस्कृती,भारतीय परंपरा व भारतीय जिवनमुल्य हे शिक्षणाचा आधार आहेत परंतु शिक्षणासोबतच संस्कारीत व चारीत्र्य संपन्न पिढी घडविण्याची आवश्यकता आहे.असे प्रतिपादन विहीपचे अखिल भारतीय सेवा प्रमुख अजयजी पारीक यांनी केले.हेच कार्य विश्व हिन्दु परिषद १९६७ पासुन सेवा प्रकल्पाच्या माध्यमातुन अविरतपणे करीत आहे.
देशभर ७१५२ सेवाकार्य सुरू आहेत शिक्षणासोबतच संस्कार ही देत आहे. देश व समाज कार्यातूनच आपल्या स्वप्नातील भारत साकार होईल असे पारीक म्हणाले. ते महर्षी व्यास सभागृह डॉ.हेडगेवार स्मारक समिती,रेशिमबाग नागपूर येथे सेवाकुंभ कार्यक्रम प्रसंगी
व्यासपीठावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर जगतगुरु रामानंदचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार (रुक्मिणी पीठ विदर्भ कौंडण्यपूर) , कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अधिवक्ता ॲड.आनंद परचुरे तर उद्योगपती कृष्णनंदू शाह,विहिपचे केंद्रीय सेवा प्रमुख अजयकुमार परीक,विहिप क्षेत्रीय सहमंत्री अनंतजी पांडे,विहिपचे प्रांत अध्यक्ष सुदर्शन शेंडे, हेमंत जांभेकर,गोविंद शेंडे,राम लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत माता व श्रीराम दरबाराचे पुजन, माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्रांत सेवा प्रमुख राम लोखंडे यांनी विहिप द्वारा विदर्भात सुरू असलेले सेवा,संस्कार व समर्पण या सूत्रावर आधारित असलेल्या सेवा कार्याचा लेखाजोखा प्रस्तावातून मांडला.
या कार्यक्रमाला रामानंदचार्य राजेश्वर माऊली सरकारने विहिपच्या सुरू असलेल्या सेवाकार्याचे कौतुक करून देश व धर्म सेवेसाठी आशीर्वाचन दिले.
या प्रसंगी ॲड.आनंद परचुरे, अनंत पांडे यांनी ही मार्गदर्शनात केले.
यानंतर सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान करणा-यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. तसेच प्रकल्पाचे माजी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. या प्रसंगी माजी विद्यार्थी डॉ.श्रीकांत बनकर,अंबर कुळमेथे, रागिणी माळोदे,धवल टेकाम, दीपक शाहू,
लक्ष्मीकान्त कुंबरे यांचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विहिपच्या सेवा प्रकल्पात सामाजिक , धार्मिक,देशभक्ती व शैक्षणिक हे विविध उपक्रम राबविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविण्यासाठी शिक्षकांचे माध्यमातुन संस्काराचे बिज चिमुकल्यावर बाल मनावर रूजविल्या जातात.या प्रसंगी प्रकल्पात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यात नमो नमो भरत नृत्य,छत्तीगडी नृत्य, शिवतांडव, नरसिंह नृत्य, भक्त प्रल्हाद, प्लास्टिक राक्षस, पर्यावरण रक्षण व संवर्धन, ताटी उघडा ज्ञानेश्वरा,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज,गोंधळ, भगवान बिरसामुंडा, जय आदिवासी जय जोहार,आदी.
यात गायत्री बालिकाश्रम अकोला , गुरुकुल आश्रमशाळा उदासा,स्वामी विवेकानंद विद्यार्थी वसतिगृह देवलापार, सरस्वती विद्या मंदिर वर्धा,हिंदू ज्ञान मंदिर ब्रम्हपुरी,
गुरुकुल आश्रमशाळा देवलापार, उत्कर्ष बालिकाश्रम अकोला,स्वामी विवेकानंद विद्यामंदिर नागपूर,
मातृशक्ती कल्याण केंद्र नागपूर,स्वामी विवेकनंद शाळा नागपूर या प्रकल्पाचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल महल्ले,प्राजक्ता हेडाऊ यांनी तर आभार सहसेवा प्रमुख रविकिरण चर्जन यांनी केले. भारत मातेच्या आरतीने सेवाकुंभ कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सर्व प्रकल्प प्रमुखांनी प्रयत्न केले.