गणपती बाप्पा मोरया!! उंदीर मामा कि जय!! हे म्हणत आपण अनेक वर्ष गणेशोत्सव सण साजरा करत आहोत. ही कल्पना स्व. लोकमान्य टिळकांची होती. त्यांनी समाज एकत्रित करण्याकरता गणपती बसवण्याची प्रथा सुरु केली. ही प्रथा सन १८९३ साली सुरु झाली. लोकमान्य टिळकांनी घरच्या गणपतीला सार्वजनिक सण म्हणून रूप दिले आणि समाज एकत्रित करायचा एक प्रयत्न केला. त्यांचे हे योगदान आपण नेहमीच कोणत्या न कोणत्या स्वरुपात लोकांसमोर ठेवत असतो. असाच एक प्रयत्न आम्ही या संकेतस्थळाद्वारे करतो आहोत.
ह्या प्रथेच्या सुरुवाती नंतर अनेक वर्ष हा सण आपले पूर्वज आणि आता आपण साजरा करत आहोत. आपण हा सण गणपतीची आरती, वेगवेगळे कार्यक्रम, स्पर्धा आणि इतर सामाजिक गोष्टी ने साजरा करत आहोत. समाजात स्पर्धा वाढली, प्रगती झाली आणि सगळ्या गोष्टी आता कट्ट्यावरून सोशल नेटवर्किंग साईट्स वर यायला लागल्या. नाक्या वर उभे राहून गप्पा मारणारे मित्र आता chat window वर गप्पा मारू लागले आहेत.
लोकांची गरज लक्षात घेता आम्ही हि वेबसाईट आपल्या समोर आणली आहे जेणे करून आपण या ऑनलाईनचा राजा म्हणजेच बाप्पा मोरया.कॉम मंडळामध्ये सामील होऊन त्याच जोशात आणि त्याच उत्साहाने कार्यक्रम पाहू शकता व वेगवेगळ्या स्वरुपात ह्या सणामध्ये सहभागी होऊ शकता. आम्ही गणरायाच्या आशिर्वादाने आणि लोकमान्य टिळकांनी चालू केलेला उपक्रम टिकून राहावा म्हणून ह्या उत्सवाला एक हायटेक इमेज देतो आहोत व ऑनलाईन गणेश उत्सवाची सुरवात करत आहोत. तरी साऱ्या गणेश भक्तांच्या पाठिंब्याची अपेक्षा ठेवतो.
ऑनलाईनचा राज्याचे वैशिष्ठ म्हणजे आपण आमच्या मंडळात म्हणजेच आमच्या वेबसाईट वर २४० तास कार्यक्रम पाहू शकता. हा पूर्णतः इको फ्रेंडली उत्सव असणार आहे. म्हणजे थर्माकॉल, प्लास्टिक ह्यासारख्या प्रदूषण करणाऱ्या वस्तूंचा कुठेही उपयोग नाही. मग गणेश भक्तांनो, बघताय काय? सामील व्हा..!!