Rising Star Mitra Mandal

Rising Star Mitra Mandal रायझिंग स्टार मित्र मंडळ

ll अवघ्या कांजूरची शान रायझिंग स्टारचा गणपती दिसतो किती छान ll

महाराष्ट्राच्या राजधानीत ,मराठी माणसाच्या महानगरी मुंबई मध्ये एक छोटेसे उपनगर ,कांजुरमार्ग .याच कांजूरगावात आमचे “रायझिंग स्टार मित्र मंडळ” हे मंडळ .

रायझिंग स्टार मित्र मंडळ, जुने इंदिरा कॉंग्रेस ऑफिसच्या मागे, पोलिस चौकी जवळ, कांजुरमार्ग पूर्वेला कार्यरत असलेले मंडळ आहे. रायझिंग स्टार मित्र मंडळाच्या “माघी गणपती उत्सवाची ” स्थापणा

सन २००९ साली झाली.मध्यमवर्गीय लोकवस्ती असलेल्या एका छोट्याश्या चाळीमधील जागेवर माघी गणेशोत्सव सुरु झाला. आता मंडळला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ह्या माघी जयंती मध्ये गणेशोत्सवाचा मंडप बांधण्यापासून ते गणपती विसर्जन होई पर्यंत जी कामे असतील ती सर्व मंडळाचे सभासदच करतात.फक्त मोजक्या खोल्यांची वर्गणी आणि बाजारपेठ यांच्या जोमावर माघी गणेशोत्सव साजरा होतो.

मंडळाची धुरा पुढे यशस्वीरित्या वाहुन नेण्यासाठी तरुण कार्यकर्त्याची मोठी शक्ती आज मंडळाकडे आहे.आपल्या छोट्याश्या जागे मध्ये गणपती बाप्पाचा सेवेसाठी”माघी गणेशोत्सव ” आणि त्याच बरोबर सत्यनारायणाची पूजा होते.

सत्यनारायणाच्या पूजे मधील बनवलेले “नक्षीदार व सुंदर मकर” हे आमच्या मंडळातील माघी गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे.


आधुनिकतेच्या या जगात आपल्या ही मंडळाची माहिती संगणकाद्वारे सर्वांना मिळावी या संकल्पनेतून,आपल्या हिंदू वर्षातील पहिला दिवस व साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ११ एप्रिल २०१३ रोजी www.risingstarmitramandal.com
ही वेबसाईट सुरु केली. मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री. रोहित आयरे यांच्या संकल्पतेने व प्रयत्नाने ही वेबसाइट तयार झाली. मंडळाची माहिती, मंडळाचे सामाजिक उपक्रम व माघी गणपती उत्सवाचे छायाचित्रे या सर्वा उपक्रमांची माहिती आपल्या मुख्य पानावरील आमचे उपक्रम या विभागातच उपलब्ध आहेत.

आपल्या मंडळाच्या भाविकांसाठी ही वेबसाईट फारच उपयुक्त आहे.



गणरायच्या कृपेने आज मंडळाला अनेक मान्यवर लाभले आहेत.या सर्व प्रवासात ज्यांनी आम्हाला (मग ती कोणत्या हि प्रकारे असो )मदत केली त्यांचे ,सतत आम्हाला मार्गदर्शन करणारे कार्यकर्ते असो ,किंवा विभागातील मंडळी ,या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.असेच प्रेम व अपुलकी सदेव आम्हावर राहूदे हीच परमेश्वराकडे प्राथना .

🌺श्री गणराया गौरी नंदना प्रथम तुला ही करू वंदना..🌺रायझिंग स्टार मित्र मंडळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळा तर्फे तुम्हा स...
22/01/2026

🌺श्री गणराया गौरी नंदना प्रथम तुला ही करू वंदना..🌺
रायझिंग स्टार मित्र मंडळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळा तर्फे तुम्हा सर्वांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..
आमच्या ज्या काही इच्छा असतील ते गणपती राया तुझ्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे पार पडू दे हीच या मंगलदिनी देवा तुझ्या चरणी प्रार्थना.
जय श्री गणेश 🙏

🙏 श्री गणेशाय नमः 🙏आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कीरायझिंग स्टार मित्र मंडळ, कांजूर (पूर्व), मुंबई यांच्या वतीने🌺...
21/01/2026

🙏 श्री गणेशाय नमः 🙏
आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की
रायझिंग स्टार मित्र मंडळ, कांजूर (पूर्व), मुंबई यांच्या वतीने
🌺 सार्वजनिक माघी गणेशोत्सव – २०२६ 🌺
भव्य व भक्तिमय वातावरणात उद्या, गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात येत आहे.
तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री गणरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
🚩 आपले नम्र सेवक 🚩
रायझिंग स्टार मित्र मंडळ

📍काँग्रेस ऑफिसच्या मागे,मेन मार्केट
कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई – ४२

01/02/2025

*रायझिंग स्टार मित्र मंडळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ*
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..🙏🏻
आज माघी जयंती निमित्त आमच्या मंडळामध्ये गणरायाचे आगमन झाले आहे ,तरी आपण सर्वांनी बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही मंडळातर्फे सर्वांना विनंती.

15/02/2024
आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षांची वाट पाहू आम्ही.. गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या...!
14/02/2024

आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षांची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या...!

|| पाहता समाधान होय मना,   काय वर्णू वाचे गणेशाचे नाम ||आग्रहाचे निमंत्रण, रायझिंग स्टार मित्र मंडळा तर्फे तुम्हा सर्वां...
13/02/2024

|| पाहता समाधान होय मना,
काय वर्णू वाचे गणेशाचे नाम ||
आग्रहाचे निमंत्रण,
रायझिंग स्टार मित्र मंडळा तर्फे तुम्हा सर्वांना माघी गणपती निम्मित शुभेच्छा. तसेच मंडळा तर्फे श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा हि सर्वांना विनंती.

|| गणराया ताराया , यावे धावूनी ||आतुरता आगमनाची,माझ्या कांजूरच्या विघ्नहर्त्याची.फक्त ५ दिवस बाकी....
08/02/2024

|| गणराया ताराया , यावे धावूनी ||
आतुरता आगमनाची,माझ्या कांजूरच्या विघ्नहर्त्याची.
फक्त ५ दिवस बाकी....

सुनील भाऊ सोबती तर आम्हाला " नो चिंता,नो भिती."रायझिंग स्टार मित्र मंडळा तर्फे विक्रोळी विधानसभेचे  #लोकप्रिय  #डॅशिंग  ...
20/07/2023

सुनील भाऊ सोबती तर आम्हाला " नो चिंता,नो भिती."
रायझिंग स्टार मित्र मंडळा तर्फे विक्रोळी विधानसभेचे #लोकप्रिय #डॅशिंग #आमदार
#मा. #श्री. #सुनिल ( #भाऊ) #राऊत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

तुम्हा सर्वांना श्री राम नवमीच्या शुभेच्छा.🚩🚩🌺जय श्रीराम🌺
29/03/2023

तुम्हा सर्वांना श्री राम नवमीच्या शुभेच्छा.🚩🚩
🌺जय श्रीराम🌺

रायझिंग स्टार मित्र मंडळा तर्फे तुम्हाला व  तुमच्या परिवारास,गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️✨हे नववर्ष...
22/03/2023

रायझिंग स्टार मित्र मंडळा तर्फे तुम्हाला व तुमच्या परिवारास,गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️✨

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो…🙏🙏🙏

28/01/2023

amoji vlogs आभारी आहोत आपल्या संपूर्ण टीमचे आमच्या मंडळाचा एवढा सुंदर विडिओ बनवल्या बद्दल. https://www.youtube.com/watch?v=534_0y11Nko
Superb Cinematography :-

Address

Mumbai
400042

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rising Star Mitra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Rising Star Mitra Mandal:

Share