01/10/2022
*जय हनुमान मित्र मंडळा तर्फे या वर्षी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा ९ दिवस ९ सत्कार*
*दिवस पाचवा*:- आपल्या बोरिवली विभागात प्रसिद्ध असणारे ,आपल्या वकृत्वाच्या जोरावर तरुणांच्या मनावर घर करून बसलेले बोरिवली ची शान *शिवव्याख्याते मा.श्री.गौरवजी भांदिर्गे* यांचा त्यांनी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
गुळा सारखी गोड वाणी मुखात|
अती आदरे लोक ही मानतात||
अशांच्या हाती नित्य भगवा असावा|
जगी हिंदू अष्टावधाणी असावा ||
साक्षात सूर्यासारखे तेजस्वी ,ओजस्वी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर आपल्या अमोघ वाणीने मांडणारे *शिवव्याख्याते मा. श्री. गौरवजी भांदिर्गे साहेबांनी* आज आपल्या मंडळाला भेट दिली.
त्यांनी कमी वयात अथांग प्रगती केली आहे.आपल्या वकृत्वाच्या जोरावर लढनारा एक शांत आणि प्रेमळ स्वभाव अशी त्याची ओळख आहे.
विशेषतः सांगायला गेलो तर महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्र बाहेर गौरवजी भांदिर्गे यांनी शेकडो व्याख्यानाच्या माध्यमातून शिवचरित्र कथन व सामाजिक प्रश्नावर परखड वक्तव्य केलेला आहे.अनेक वृत्तपत्रातून त्यांनी गडकोट या विषयावर लेखन केलेले आहे.तसेच संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी आपल्या काही समविचारी लोकांना सोबत घेवून त्यांनी मरणोत्तर अवयव दान केले.तसेच महाराष्ट्रात मद्यसेवन व मद्यविक्री दुकाने , बिअर बार, पान मसाला यावर छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजामाता , छत्रपती संभाजी महाराज यांची नावे नसावी या साठी महाराष्ट्राभर त्यांनी चळवळ सुरू केली.
कार्यक्रमादरम्यान गौरवजीनी आम्हा सर्वांना अतिशय मोलाचे मागदर्शनही केले.
या कार्यक्रमाला त्यांच्या सोबत त्यांचे बंधू *मा.श्री.प्रतीक भांदिर्गे साहेब* आणि *ॲडवोकेट मा. श्री. सुशील सावंत देखील उपस्थित होते.
शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याचा जो वसा आपण घेतलेला आहे तो पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच आई कुलस्वामिनीचरणी प्रार्थना.आपण असेच अविरत कार्यरत रहावे हीच आई कुलस्वामिनी चरणी इच्छा...🙏
Gaurav Bhandirge