02/04/2025
#भावपूर्ण_श्रद्धांजली_अण्णा 💐🙏🏻 बृहन्मुंबई मुर्तिकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ मूर्तिकार #श्री_गजानन_देऊ_तोंडवळकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे... मुंबईची शान असणारा गणेशगल्ली येथे बसणारा #मुंबईचा_राजा अनेक वर्षे अण्णांनी साकारला होता. अण्णांनी काही वर्षे लोअर परळच्या कुलस्वामिनी चे नवीन रूप साकारले होते. अण्णा वेलिंग मास्तरांचे शिष्य होते, त्यांच्या अप्रतिम मूर्तिकलेतून वेलिंग मास्तरांची मूर्तिकला झळकत असे. अण्णांनी अनेक दिग्गज मूर्तिकार घडवले...
अण्णांची #अंत्ययात्रा दिनांक ३ एप्रिल गुरुवारी सकाळी ८.०० वाजता त्यांच्या नायगाव, दादर पूर्व येथील निवासस्थानाहून निघेल याची नोंद घ्यावी 🙏🏻
लोअर परळची कुलस्वामिनी, आदित्य सेवा मंडळाच्या वतीने अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻