29/10/2016
वार्ताहार,चारकोप
मुंबई.दि
२8 ,ओक्टम्बर.
कांदिवलीच्या चारकोप विभागात सेक्टर १ मध्ये गेली ९ वर्ष दिवाळीत सुवर्ण राज मित्र मंडळाच्या वतीने दिपोउस्सव नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो.हया कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे .सर्व संणापेक्षा वेगळया स्वरूपांनी हा कार्यक्रम विषेश लक्षात रहातो. या ही वर्षी अत्यंत आनंदीआणि जोशपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम साजरा होत आहे.गेल्या दोन दिवसात ईथे महिलां साठी पाककृती,होम मिनिस्टर आणि संगीत खुर्ची हया स्पर्धा अगदी दिमागदार रीत्या पार पडल्या.आणखी ३१ ओक्टम्बर पर्यन्त हा सोहळा चालू रहाणार आहे.या मध्ये मुले ,मुली,महिला,पुरुष या सर्वान् साठी विविध स्पर्धाचं आयोजन केल जात.तसेच विविध हिन्दी मराठी कलाकारांचा ओर्केस्ट्रा ,सत्य नारायणाचि महापूजा आणि या दिपोउस्सवाचा समारोप डीजे च्या तालावर रास गरबा आणि बक्षिस समारंभाने होतो.आमच्या प्रतिनिधिने तेथील स्थानिक लोकांना विचारले असता.त्यांनी सांगितले की या दीपोउस्सावाची आम्ही दिवाळीत आतुरतेने वाट पाहत असतो.खरी दिवाळि कशी असते.हे जर तुम्हाला अनुभवायचे असेल तर तुम्ही सुवर्ण राज मित्र मंडळाचा दिपोउस्सव कार्यक्रम एकदा पहा .
मंडळाच्या कार्यकरत्यांशी आणि कमिटीशी बोलत असताना ते म्हणाले की आजकालची तरुण पीढ़ी स्मार्ट फोन,वाट्स अप.फेसबुक यांच्या पूर्णपणे आहारी गेली असून त्यांच्या साठी दुरची माणसे जरी जवळ झाली असली तरी जवळची माणसे मात्र दुरावली आहेत.आणि दुरावलेली माणसे एकत्र येऊन आपुलकि वाढवण्याचे काम या दिपोउस्सावाच्या निमित्ताने आपण साधु शकतो.