स्थापना १९४३ ...
स्वातंत्रपूर्व काळात तरुण पिढीला संघटीत करून स्वातंत्र लढ्यात समाविष्ट करून घेण्याच्या उदेश्याने सन १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशउत्सवाची परंपरा महाराष्ट्रात सुरु केली. 'चले जाव' चळवळीने प्रेरित झालेल्या 'करेंगे या मरेंगे' ह्या निर्धाराने पेटून निघालेल्या विभागीय तरुणांनी कै. तु. भि. कदम मास्तर ह्यांच्या नेतृत्वाखाली सन १९४३ ह्यावर्षी आपल्या गणेशउत्सव मंडळाची मुहूर्तम
ेढ रोवली, तदमिती पासुन आजपर्यंत तीन पिढ्यांनी हा कार्यभार अव्याहतपणे सांभाळुन मंडळाला सुवर्ण मोहोत्सवी वर्षात विराजमान केलेले आहे. मंडळाला स्वातंत्रपूर्व काळ जरी थोड्या अवधीचा मिळालेला असला तरीही ह्या काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरी नेत्रदीपक अशीच होती. म्हणून त्यापैकी अनेकांना 'स्वातंत्र्यसैनिक' म्हणून गौरविण्यात आलेले आहे.
ह्या दिर्घ वाटचालीत मंडळाच्या माध्यमातून अनेक होतकरू कार्यकर्ते उदयाला आले. ह्या पैकी काहींना आमदार, नगरसेवक, महापौर, शिवछत्रपती पुरस्कार, गुणवंत कंकर, वि. का. द. आदी मान सन्मान भूषविण्याचे भाग्यही लाभले, आजही मंडळाकडे सुशिक्षित होतकरू व कार्यक्षम कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच आहे. त्यांच्या परिश्रमामुळेच आजपर्यंत आपण हा उत्सव व उपक्रम यशस्वीपणे राबवीत आलेलो आहोत म्हणूनच सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचे व विभागीय जनतेचे ऋणनिर्देश करणे आमचे कर्त्यव्य आहे.
आपल्या पुढील वाटचालीत आपणांस विभागीयांसाठी प्रगतीची अनेक दालने खुली करावयाची आहेत. विभागातील प्रत्येकाला सुजाण, सुशिक्षित व सुसंस्कृत नागरिक म्हणून घडवायचे आहे. एकमेकांच्या सुखदु:खाशी समरस होऊन ऐक्य, स्नेह, बंधुभावाच्या बांधीकालीने एकत्रित जोडावयाचे आहे. आणि विभागाला संपन्न करून ह्या महानगरात प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे.....