अभ्युदय नगर ची कुलस्वामिनी ..तरुण मित्र नवरात्र उत्सव मंडळ

  • Home
  • India
  • Mumbai
  • अभ्युदय नगर ची कुलस्वामिनी ..तरुण मित्र नवरात्र उत्सव मंडळ

अभ्युदय नगर ची कुलस्वामिनी ..तरुण मित्र नवरात्र उत्सव मंडळ ABHYUDAYA NAGAR CHI SHAAN TU...ABHYUDAYA NAGAR CHA MAAN TU. A DYNAMIC ORGANIZATION "TARUN MITRA NAWRATROSTAW MANDAL." BOL AMBE MATE KI JAY "

FROM ABHYUDAYA NAGAR , KALACHOWKI , PROVING ITS VIRTUES AND REACHING GREAT HEIGHTS IN ITS ON GOING 31 ST YEAR WITH THE IMMENSE BLESSINGS OF OUR GODDESS "अभ्युदय नगर ची कुलस्वामिनी...."

🏵️    सेवा रत्न    🏵️===================अनंत रूपे तुझीतोषवी भक्तांना माऊली ।जनकल्याणा साठी मातेसत्वर तू धावली ॥सावित्री ...
11/10/2024

🏵️ सेवा रत्न 🏵️
===================
अनंत रूपे तुझी
तोषवी भक्तांना माऊली ।
जनकल्याणा साठी माते
सत्वर तू धावली ॥
सावित्री अन् फुले ज्योतिबा
कर्मवीर आले ।
गाडगेबाबा समस्त जनासी
शिकवून गेले ॥
भारत भूच्या कुशीत रत्न
रतन रूपा आली
जे रंजले गांजले
त्यांची सेवा ती केली ॥
उद्यम जगती नाव दुमदुमे
रतन टाटांचे ।
निरलस सेवा व्रती जन्मला
भाग्य या देशाचे ॥
===================
🔶 गीत :- श्री. विश्वास बाबर
🔶 ११ ऑक्टोबर २०२४

🏵️      जागर       🏵️==================गोंधळ मांडला मातेचाजागर त्यो घुमला ।उभा गोंधळी कथाऐकण्या जनसागर जमला ॥डिंबडी वरती...
10/10/2024

🏵️ जागर 🏵️
==================
गोंधळ मांडला मातेचा
जागर त्यो घुमला ।
उभा गोंधळी कथा
ऐकण्या जनसागर जमला ॥
डिंबडी वरती बोटं कडाडली
संबळही कडकडली ।
सूर लागले तुणतुण्यावर
हाताने टाळी ही धरली ॥
उदे गं अंबे उदे
नाद तो त्रिभूवनी घुमला ।
शिवा संगे शक्ती
सोबत गणुबा दुडदुडला ॥
साद घातली दिलं आवातनं
आठवण साऱ्यांची ।
तुळजाई अंबाई वणी रेणूका
लगबग साऱ्यांची ॥
तालावरती नाचती दिवट्या
रात्र ही रंगली ।
भावभक्तीचा जागर पाहुनी
कुलस्वामिनी हर्षली ॥
==================
🔶 गीत :- श्री. विश्वास बाबर
🔶 १० ऑक्टोबर २०२४

🏵️     आवाहन      🏵️=====================प्रपंचातून परमार्थाचीनिरलस सेवा व्हावी ।गोंधळ पुजा अशी निरंतरतुझ्या साक्षीने व्...
09/10/2024

🏵️ आवाहन 🏵️
=====================
प्रपंचातून परमार्थाची
निरलस सेवा व्हावी ।
गोंधळ पुजा अशी निरंतर
तुझ्या साक्षीने व्हावी ॥
रथाधिश गणा - गोंधळा यावे
बुद्धी सागरा - गोंधळा यावे ।
तुळजाई मंगळाई जानाई निनाई
वाघजाई नवलाई - गोंधळा यावे ॥
रेणूका माता - गोंधळा यावे
भवानी अंबा - गोंधळा यावे ।
ज्योतिबा खंडोबा म्हसोबा बिरोबा
नाईकबा भैरुबा - गोंधळा यावे ॥
मोह माया मद द्वेष मत्सर
नि:संग होऊनी जावे ।
आळवितो कुलस्वामिनी
माते गोंधळाला यावे ॥
=====================
🔶 गीत :- श्री. विश्वास बाबर
🔶 ९ ऑक्टोबर २०२४

🏵️        मार्ग         🏵️==================सहस्त्र नामावलीत दडलेमहात्य नाम जपाचे ।कुंकुमार्चन अभिषेकानेपुजन करती अंबेचे...
08/10/2024

🏵️ मार्ग 🏵️
==================
सहस्त्र नामावलीत दडले
महात्य नाम जपाचे ।
कुंकुमार्चन अभिषेकाने
पुजन करती अंबेचे ॥
कुठे गुंजती सुर भजनाचे
कुठे चालते सप्तशती ।
स्तोत्र श्लोकांचे पठनही चाले
मिळे जिवाला मनःशांती ॥
टाळां सोबत रंगे आरती
अबाल वृद्धां संगे ।
नाचात रंगती गोंधळाच्या
कुलस्वामिनी तव संगे ॥
साधनेचे मार्ग ते कितीक
लगबग प्रत्येकाची ।
कृपादृष्टी तव व्हावी आंबे
हिच आस तव भक्तांची ॥
==================
🔶 गीत :- श्री. विश्वास बाबर
🔶 ८ ऑक्टोबर २०२४

🏵️    शिव तेज     🏵️===================दार उघड बय्ये दारगुंजली आर्त साद हृदयाची ।शिवज्योत जन्मली तेजस्वीकृपा त्या कुलस्व...
07/10/2024

🏵️ शिव तेज 🏵️
===================
दार उघड बय्ये दार
गुंजली आर्त साद हृदयाची ।
शिवज्योत जन्मली तेजस्वी
कृपा त्या कुलस्वामिनी ची ॥
अठरा पगड मावळे
शिवबांनी गोळा केले l
भवानी तुझ्या कृपेने
हिंदवी स्वराज्य स्थापियले ॥
अवघा म्लेंच्छ मार्दियेला
कुंठली शत्रुची मती l
महाराष्ट्राचे भाग्य जन्मले
शिवबा छत्रपती ॥
अनुभवला तो दिव्य सोहळा
स्वर ताल झंकारले l
शिवशक्तीचे तेज आज
जणू भूवनी अवतरले ॥
===================
🏵️ गीत :- श्री. विश्वास बाबर
🏵️ ७ ऑक्टोबर २०२४

🏵️    चैतन्य तेज     🏵️===================आदिशक्तीच्या उत्सवाचाउत्साह असा रंगला ।गंध चैतन्य तेजाचादश दिशांना दरवळला ॥चिं...
06/10/2024

🏵️ चैतन्य तेज 🏵️
===================
आदिशक्तीच्या उत्सवाचा
उत्साह असा रंगला ।
गंध चैतन्य तेजाचा
दश दिशांना दरवळला ॥
चिंता क्लेष सारूनी
खुलती उपासनेचे रंग ।
चराचरात भरूनी राहे
भक्तीचा तो रंग ॥
किणकिण मंजिऱ्यांची
नाद निनादे घंटेचा ।
शंखाच्या सुरात गुंजला
जयघोष मम मातेचा ॥
तेजोमय चैतन्याची
प्रचिती दिसे तव ठायी ।
आनंदाने बहू गाती सारे
जय कुलस्वामिनी आई ॥
===================
🔶 गीत :- श्री. विश्वास बाबर
🔶 ६ ऑक्टोबर २०२४

🏵️     मन      🏵️===================मी न तेथे परीखेळे मन माझे ।ठाव नसे मनाचापरी ध्यान रहावे तुझे ।क्षणात बदले मन हेताबा ...
06/10/2024

🏵️ मन 🏵️
===================
मी न तेथे परी
खेळे मन माझे ।
ठाव नसे मनाचा
परी ध्यान रहावे तुझे ।
क्षणात बदले मन हे
ताबा न त्याच्यावरती ।
दे शक्ती मज रहावे ते
तुझ्याच अवती भवती ।
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन हे माझे झुलते ।
कशास चिंता घ्यावी
पाहता आनंद लहरी उठती ।
नव चैतन्याची बहार
दाटे मोद बहू मनी ।
कुलस्वामिनी ही येता घरा
होई हर्ष जनमनी ।
===================
🏵️ गीत :- श्री. विश्वास बाबर
🏵️ ५ ऑक्टोबर २०२४

🏵️     महिमा      🏵️==================तुझ्याच दर्शनासाठीमन हे आसावले ।सुमुख पहाता नयनीचित्त हे सुखावले ॥तोषवी मम आत्म्या...
05/10/2024

🏵️ महिमा 🏵️
==================
तुझ्याच दर्शनासाठी
मन हे आसावले ।
सुमुख पहाता नयनी
चित्त हे सुखावले ॥
तोषवी मम आत्म्याला
कृपा तुझी न्यारी ।
उभा मी नतमस्तक
तुझ्या गं दरबारी ॥
शत सूर्यांचे तेज
पाहता देहभान हरपले ।
शितल शत चंद्रांची ममता
पाहता डोळे पाणावले ॥
महिमा तुझाच न्यारा
किमया ही सारी ।
आशिर्वाद कुलस्वामिनी गे
असो आम्हावर निरंतरी ॥
==================
🔶गीत :- श्री. विश्वास बाबर
🔶४ ऑक्टोबर २०२४

🏵️      द्वंद्व       🏵️===================घडला काही प्रमादउदरी घ्यावा माते ।दोन्ही कर जोडोनीहिच विनवणी तू ते ॥मन चक्षूं...
05/10/2024

🏵️ द्वंद्व 🏵️
===================
घडला काही प्रमाद
उदरी घ्यावा माते ।
दोन्ही कर जोडोनी
हिच विनवणी तू ते ॥
मन चक्षूंनी अनुभवला
सोहळा आनंदाचा ।
मन भावे केला
जयघोष कुलस्वामिनीचा ॥
द्वंद्व मनाचे संपेना
तू तर अंतर्यामी ।
खेळ तुझाच सारा
बालक अबोध मी ॥
कृपावंत तू करूणासिंधू
अंतरू नको तू आता ।
कृपा असु द्या शिरी
जय कुलस्वामिनी माता ॥
===================
🔶गीत :- श्री. विश्वास बाबर
🔶 ३ आक्टोबर २०२४

05/10/2024

🏵️ आनंद सोहळा 🏵️
=================================
अभ्युदय नगरची कुलस्वामिनी वाजत गाजत निघाली ।
आतुरता दर्शनाची ही वर्षाने पूर्ण झाली ॥
दर्शनाला तिच्या जाऊ चला...
डोळे भरून रूप पाहू चला...
माऊली साऱ्या विश्वाची अभ्युदयनगरात अवतरली ॥ धृ०॥

जमला सारा मेळा तिच्या दरबारी ।
आनंद अवनी फुलला त्यांच्या चेहऱ्यावरी ।
विसरूनी सारे देहभान भक्तीत लीन झाले ।
सोहळा पाहुनी मातेचे रोमांचित अंग झाले ।
जागर करूया शक्तीचा तल्लिन होऊ सारे ॥ १ ॥

नवरंग खुलले जगती सुख नयनांचे ।
नवरस पुजन करता लेणे भाग्याचे ।
कनवाळू माते येशी तू भक्तांच्या रक्षणाला ।
निर्दालन असूरांचे त्या सुखवी साऱ्या जगाला ।
कृपा असावी अर्पितो सेवा तव चरणाशी ॥ २ ॥
==============================
🔶गीत :- श्री. विश्वास बाबर
🔶 १ ऑक्टोबर २०२४

02/10/2024
11/09/2024

Address

Kulaswamini Ground, Building No. 10, 11, 11A, MHB Colony, Abhyudaya Nagar, Kalachowki, Mumbai/
Mumbai
400033

Alerts

Be the first to know and let us send you an email when अभ्युदय नगर ची कुलस्वामिनी ..तरुण मित्र नवरात्र उत्सव मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category