Shri Swami Samarth

Shri Swami Samarth let us join together to experience the divine bliss of Shri Swami Samarth and make use of our inher

“सत्गुरूचरण सेवूंसदा सत्गुरूचरण सेवूंतनु मन धन अर्पूनी गुरूपदीआत्मस्वरूप पाहूंमुक्तिललना भोगुनी नित्यसत्गुरूगुण गाऊंदत्त...
27/08/2026

“सत्गुरूचरण सेवूं

सदा सत्गुरूचरण सेवूं

तनु मन धन अर्पूनी गुरूपदी

आत्मस्वरूप पाहूं

मुक्तिललना भोगुनी नित्य

सत्गुरूगुण गाऊं

दत्तपदरजी लोळलोळुनी

प्रेमामृते न्हाऊं”

(श्रीपंत महाराज, बाळेकुंद्री)

ॐ श्री स्वामी समर्थ

“स्वप्नासहित निद्रा संपतामनुष्य उरतो आपण आपल्यापुरतातैसे सारे अज्ञान नष्ट होतासहज उरे मी एकटात्यासी माझ्याशिवाय पाहीदुसर...
26/08/2026

“स्वप्नासहित निद्रा संपता

मनुष्य उरतो आपण आपल्यापुरता

तैसे सारे अज्ञान नष्ट होता

सहज उरे मी एकटा

त्यासी माझ्याशिवाय पाही

दुसरे भिन्न उरेना काही

सोऽहम् बोधे माझ्या स्वरूपी राही

अनन्य होऊन

आपलेपणाचा भेद त्यागून

माझे एकत्व घेणे जाणून

तेच वास्तविक मज शरण

येणे असे”

(सुलभ श्रीज्ञानेश्वरी)

ॐ श्री स्वामी समर्थ

“स्वामी नामा बळे महादोष जातीआणि पुण्यप्राप्ति होईल तीम्हणोनीया जिने भजनी जपावेजरी तुम्हा व्हावे तेचि सुखनामासि अंतर करू ...
25/08/2026

“स्वामी नामा बळे महादोष जाती

आणि पुण्यप्राप्ति होईल ती

म्हणोनीया जिने भजनी जपावे

जरी तुम्हा व्हावे तेचि सुख

नामासि अंतर करू नका जन

स्वामीचे दर्शन नित्य घ्यावे

स्वामीसुत म्हणे नामाच्या प्रतापे

जळुनीया पापे पुण्य जोडे”

(स्वामीसुत अभंग गाथा)

ॐ श्री स्वामी समर्थ

“मीच स्वामिराय साक्षात भगवंतउमाकांत परमेश्वर जो मी परमेश्वर सदाशिवतोचि समर्थ स्वामी देवाधिदेवप्रत्यक्ष कलियुगीं अभिन्न भ...
24/08/2026

“मीच स्वामिराय साक्षात भगवंत

उमाकांत परमेश्वर

जो मी परमेश्वर सदाशिव

तोचि समर्थ स्वामी देवाधिदेव

प्रत्यक्ष कलियुगीं अभिन्न भाव

आहे निश्चित असंशय”

{सार्थ श्री गुरूलीलामृत}

ॐ श्री स्वामी समर्थ

“नामा ऐसे नाही त्रिभुवनीनाम संजीवनी साधकांसीनामें भक्ति जोडे नामें कीर्ती वाढेनामें सदा चढे मोक्ष हातां”(संत नामदेव महार...
23/08/2026

“नामा ऐसे नाही त्रिभुवनी

नाम संजीवनी साधकांसी

नामें भक्ति जोडे नामें कीर्ती वाढे

नामें सदा चढे मोक्ष हातां”

(संत नामदेव महाराज)

ॐ श्री स्वामी समर्थ

“स्वामीनाम मनोहर नित्यशांतिसरोवर चैतन्याचा नीलगाभा स्वामीनाम ब्रम्हशोभा सुखानंद मूळपेठ स्वामीनामी रसभेटब्रम्हविद्येची आर...
22/08/2026

“स्वामीनाम मनोहर

नित्यशांतिसरोवर

चैतन्याचा नीलगाभा

स्वामीनाम ब्रम्हशोभा

सुखानंद मूळपेठ

स्वामीनामी रसभेट

ब्रम्हविद्येची आरास

स्वामीनाम महावेस

अमृतेसी घरा आले

स्वामीनाम तारू भले”

( प.पू. शिरीषदादा कवडे)

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

“भावे करा जयजयकारहोईल कुळाचा उद्धार पाप, ताप, दैन्य हरेसहज चुकती गर्भफेरेनिजानंदी खूण जाणतेथे होईल समाधानमुक्ती लोळती चर...
21/08/2026

“भावे करा जयजयकार

होईल कुळाचा उद्धार

पाप, ताप, दैन्य हरे

सहज चुकती गर्भफेरे

निजानंदी खूण जाण

तेथे होईल समाधान

मुक्ती लोळती चरणी

करिता जयजयकार ध्वनी

आनंद म्हणे स्वामी नाम

प्रेमे तारक उत्तम”

(श्रीआनंदनाथ महाराज)

ॐ श्री स्वामी समर्थ

“मीठ उदकी पडता केवळ राहील उदकत्वतैसा तू मजशी शरण एकरूपत्वमग आत्मत्वाने करून घेता मज प्राप्तमी सर्व बंधनातून तुज मुक्त कर...
19/08/2026

“मीठ उदकी पडता केवळ राहील उदकत्व

तैसा तू मजशी शरण एकरूपत्व

मग आत्मत्वाने करून घेता मज प्राप्त

मी सर्व बंधनातून तुज मुक्त करी”

(सुलभ श्रीज्ञानेश्वरी)

ॐ श्री स्वामी समर्थ

“राजेराय प्रसिध्द जहागीरदारनाम शंकरराजे जयांचेते एकेकाली महायात्रेस गेले श्रीक्षेत्र वाराणशीसकुटुंबभृत्यादिसह अत्युल्हास...
18/08/2026

“राजेराय प्रसिध्द जहागीरदार

नाम शंकरराजे जयांचे

ते एकेकाली महायात्रेस

गेले श्रीक्षेत्र वाराणशीस

कुटुंबभृत्यादिसह अत्युल्हास

पूर्वक काशीस पातले

प्रेमे करूनि भागीरथीचे स्नान

श्रीविश्वेश्वराचे प्रथम दर्शन पूजन

करावयासि उभे ठेले श्रीमान

काशीविश्वेश्वराचे देवालयी

त्या काली रायराजे रावशंकर

झालेले विश्वेश्वर देवदर्शनातुर

पाहती तव महादेव विश्वेश्वर

पिंडीसह लिंग दिसेना

आणि त्या शिवलिंगस्थानी

देदीप्यमान मनोहर पुरूषशिरोमणी

सुंदर यतिवेषधारी महामुनी

सुप्रसन्न विराजित”

(हैद्राबादचे जहागीरधार शंकर रायराजे यांना स्वामींनी काशी विश्वेश्वरस्थानी दर्शन दिले ती लीला)

{सार्थ श्री गुरूलीलामृत}

ॐ श्री स्वामी समर्थ

“स्वामीनाम घेता नाही भय,चिंतादूर होय व्यथा नाम गातानाम हे तारक पार करी एकनामाविण देख अन्य नकोकलियुगी थोर नामाचा उच्चारस्...
15/08/2026

“स्वामीनाम घेता नाही भय,चिंता

दूर होय व्यथा नाम गाता

नाम हे तारक पार करी एक

नामाविण देख अन्य नको

कलियुगी थोर नामाचा उच्चार

स्वामीचा निर्धार तारावया

आणिकाची गती न चाले सर्वथा

शरण सत्गुरूनाथा जाय वेगी

आनंद म्हणे आधी जोडा जोडा सोय

सांगतो उपाय स्वामी नाम”

(श्रीआनंदनाथ महाराज)

ॐ श्री स्वामी समर्थ

Address

Shri Swami Samarth Math
Mumbai
400053

Telephone

+918879060587

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Swami Samarth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Swami Samarth:

Shortcuts

Share