Bendre Guruji

Bendre Guruji Shri Bendre Guruji most experienced and Senior Guruji who performs Pooja, Path, Shanti, etc

Shri Bendre Guruji (Marathi Chittpawan Kokanastha) has practical experience in this field for more than 20 years and he is a senior Guruji in this field. His specialisation is in Hindu Funeral rites (including Nakshtra Shanti – Tripad & Panchak) in Mumbai and nearby cities. He has obtained Hindu religion’s spiritual Education needed to become a Hindu Guruji under discipline of his both Gurus Late

Vedmurti Vishwanath Vaishampayan Guruji and Shri Vedmurti Gangadhar Phadake Guruji. Shri Bendre Guruji performs Pooja, Path, Shanti, Marriage, Munj (Upanayana), and other rites such as Shraddha, Mahalay Paksha, Hindu Funeral Rites, (From Day 1st till Day 13th) which is listed in the service section, in Mumbai, Thane, Navi Mumbai, & nearby cities

29/02/2024

आपण आपण दररोज श्री सूक्त आणि महालक्ष्मीला किंवा कुलदेवीला अभिषेक करत असतो परंतु श्री सूक्त चा खरा अर्थ काय आहे हे या लेखात लेखकाने स्पष्टपणे नमूद केलेले आहे.

(या लेखातील लेखन मी केलेला नसून की मला एका व्हाट्सअप वर आलेली पोस्ट आहे अतिशय मार्मिक सद्य परिस्थितीचे वर्णन या लेखात लेखकाने नमूद केलेले आहे.)

आम्हाला वेद शिकवले नाही, आम्हाला उपनिषदे शिकवले नाहीत म्हणून ओरडा करणारे आज सगळं उपलब्ध असताना कितपत वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करतात?
म्हणून आज *जे ७००० वर्षांपूर्वी सांगितलं* ते आज मितीला किती समर्पक आहे हे आपण ऋग्वेदातील श्री सुक्तामधून पाहू.
*ज्यांना यातून आपल्या संस्कृतीचा बोध घ्यायचा ते घेतील आणि आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याचा अभिमान सुद्धा बाळगतील.*

श्री सूक्तामधील फलश्रुती मधील दहाव्या श्लोकात
*ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्* असं म्हंटलेलं आहे. म्हणजे काय तर महालक्ष्म्यै च विद्महे म्हणजे आम्ही महालक्ष्मीला जाणतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर हे कशासाठी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् म्हणजे ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो, सन्मार्गावर चालण्याची बुध्दी देवो आणि अशा प्रकारची लक्ष्मी जाणून घेण्यासाठी श्रीसुक्त हा आधार आहे. आणि म्हणून एका वाक्यात सांगायचं झालं तर सतराव्या श्लोकात म्हणजेच फलश्रुती च्या पहिल्या श्लोकात *तन्मे भजसिं पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्‌॥* म्हणजेच तिला भजल्या नंतर, तिची पूजा केल्यावर, अर्चना केल्यावर आम्हाला काय मिळालं पाहिजे तर येन म्हणजे यामुळे सौख्य, सुख मिळालं पाहिजे पण कोणाला तर अहम् म्हणजे मला. त्यामुळे जे जे सुख देणारं आहे ते सगळं लक्ष्मीमय आहे हे म्हणायला अर्थ आहे आणि तो पुरेसा वाव श्री सुक्ताने आपल्याला दिलेला आहे. आज आपण धन म्हणजे पैसा समजतो परंतु श्रीसूक्ता च्या २१ व्या श्लोकात अतिशय छान सांगितलं आहे की धन कशाला म्हणायचं तर
*धनमाग्नि धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसु*
*धन मिंद्रो बृहस्पतिर्वरुणां धनमस्तु मे॥*
अग्नी, वायू , सूर्य, वरुण म्हणजे जे काही पंचमहाभूत आहेत ज्यामुळे आमचं शरीर बनलं आहे ते सर्व धन आहे, थोडक्यात काय तर संपूर्ण पर्यावरण संरक्षण केलं तर धन संरक्षण केल्याप्रमाणे आहे. आणि हे पर्यावरणप्रेम आपल्या पूर्वजांनी ७००० वर्षांपूर्वी आपल्याला सांगून ठेवलं आहे. पण आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याची इच्छा पण आपल्याला झाली नाही. हे झालं समाजाबद्दल, देशाबद्दल किंवा विश्वाबद्दल. परंतु व्यक्तिगत पातळीवर धन म्हणजे काय हे सुध्दा श्रीसुक्तात अतिशय छान सांगितलेलं आहे...
*पुत्र पौत्र धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथम्‌।* व्यक्तिगत स्वरूपात कशाला धन म्हणायचं तर पुत्र, म्हणजे मुलं (यात मुलं मुली दोन्हीही आलेत) पौत्र म्हणजे नातवंडं, जे असले की कुटुंब व्यवस्था निर्माण होते, आपुलकी असते, एकमेकांना आधार असतो. धान्य जे आपल्याला खाण्यासाठी लागते ते धान्य. त्याचप्रमाणे हत्ती, अश्व, रथ आणि गाय यांना म्हणजे जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी त्याच सोबत रथ म्हणजे दळणवळणाचे साधन हे सर्व म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात धन म्हंटले आहे.
दुसऱ्या श्लोकात म्हटलं आहे
*यस्यां हिरण्यं विन्देयं, गामश्वं पुरूषानहम् ।।* गायी, अश्व त्यांच्या जोडीला सेवक, आप्त स्वकीय, नोकर-चाकर यांना सुद्धा धन म्हंटले आहे. आणि तेच पुन्हा १५ व्या श्लोकात सांगितलेलं आहे...
*यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम्* म्हणजे त्याला सुद्धा किती जास्त महत्व आहे हे आपल्याला समजेल.

आता पुढे अजून धन म्हणजे काय हे सांगताना
*श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते।*
*धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥*
तर काय पाहिजे आम्हाला? तर या इहलोकामधील जे जे पैशाने विकत घेता येते ते सर्व मिळालं. पण त्याचा उपभोग घेण्यासाठी क्षमतावान इंद्रिय हवेत, निरामय आयुष्य हवं ते सुद्धा धन आहे. त्यामुळे केवळ पैसा मिळविणे हे साध्य नाही तर सुख मिळविणे हे साध्य आहे म्हणून मिळवलेला पैसा, संपत्ती, वैभव दीर्घकाळ उपभोगण्यासाठी, वापरण्यासाठी शत संवत्सर निरामय आयुष्य मिळावं हे पण धन आहे. एवढा व्यापक अर्थ त्या लक्ष्मीचा आहे जो आपल्याला श्रीसुक्तमध्ये दिलेला आहे.
पैसा हा वस्तुनिष्ठ आहे. पैसा हा साधन आहे. परंतु सुख आणि शांती हे व्यक्तिनिष्ठ आहे. ते आम्हाला लक्ष्मीकडून मिळणार आहे. त्याची आम्ही प्रार्थना श्री सुक्तातून करतो. यात लक्ष्मीचे वर्णन आहे असं जरी वाटत असलं तरी हे ऋग्वेदातील सुक्त आहे जे स्फुरलेलं आहे रचलेलं नाही. त्यामुळे जे स्फुरते ते अनुभूतीमधून असते.. ठरवून लिहिलेलं नाही. त्यामुळे पैसा ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो त्याला कमी लेखण्याची गरज नाही पण त्यासोबत आपला मानसिक आणि भावनिक संबंध जोडण्याची आवश्यकता आहे. आणि असा संबंध जोडला तर आपल्याला तो संबंध लक्ष्मीमध्ये पाहायला मिळतो.
*न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः*
लक्ष्मी आमच्याकडे आहे हे कशाने जाणवेल तर असा लक्ष्मीवान जो क्रोधाग्नित जळून जाणार नाही, मत्सर ज्याच्या मनाला शिवणार नाही आणि न लोभो म्हणजे लोभ ज्याला सुटणार नाही आणि ज्याला अशुभमती म्हणजे अशुभ बुद्धी होणार नाही असा जो तो लक्ष्मी असल्याचा निदर्शक आहे. म्हणून पूर्वीच्या काळी हे पाठ करून घेत आणि त्याचा अर्थ समजावून सांगत असत, आज आम्ही पाठांतर तर दूरच, अर्थ कुठून समजावून घेणार?
श्री सुक्तमध्ये अजून एक छान शब्द आहे *अलक्ष्मी* म्हणजे आम्हाला लक्ष्मी हवी, परंतु अलक्ष्मी नको. या अलक्ष्मीला लक्ष्मीची मोठी बहीण म्हणून यात संबोधलं आहे आणि त्याचा पण उल्लेख श्री सुक्तमध्ये आहे. आठव्या श्लोकात म्हटलं आहे की,
*क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।* क्षुत म्हणजे भूक, पिपसा म्हणजे तहान यांच्यामुळे मलिन झालेली आहे अशी याचा भावार्थ हा की वखवख, हाव, अतृप्ती, लालसा, खाण्याची तीव्र वासना व्हायला लागल्या किंवा सुखाच्या विकृत अशा सुखेच्छा निर्माण व्हायला लागल्या तर ती अलक्ष्मी आहे आणि तिला दूर करायला हवं.
६ व्या श्लोकात अजून एक उल्लेख आला आहे की,
*मया अन्तरा याश्च बाह्या अलक्ष्मीः*
म्हणजे माया, मोह, अज्ञान, भुल हे बाह्य दारिद्र्य आहे. तसेच इंद्रियांची अक्षमता हे सुध्दा बाह्य दारिद्र्य आहे. त्यामुळे आतून आणि बाहेरून शुद्ध होण्याची गरज आहे.
लक्ष्मी अजून कशी आहे याचं सुरेख वर्णन यात केलेलं आहे *चन्द्रां प्रभासां यशसा* ..केवळ साहित्य किंवा शब्दालंकार म्हणून नाही, तर लक्ष्मी चंद्रासारखी शीतल आणि लक्ष्मीवान चंद्रासारखा शीतल असावा, त्याची प्रभा आपोआप प्रसरणार आहेच त्याला दाखवायची गरज नसावी, आजकाल थोडी पण श्रीमंती आली की दिखाऊपणा सुरू होतो. दहा बोटात दहा अंगठ्या, गळ्यात सोन्याची साखळी आणि प्रदर्शन करण्याची हौस आली म्हणजे समजावे की आपण श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी धडपड करावी लागते.. म्हणजे आलेला पैसा, संपत्ती ही आधी नव्हती आणि पुढे टिकेल की नाही याची शाश्वती नाही. किंवा ती अशा मार्गाने आली की दाखविण्यासाठी हा डोलारा.
*तृप्तां तर्पयन्तीम् ।* म्हणून अशी लक्ष्मी हवी जी तृप्त आहे आणि इतरांना तृप्त करण्यासाठी उपयोगात येईल.
अजून पुढे सांगितलं आहे की लक्ष्मी कशी हवी तर
*गन्धद्वारां दुराधर्षां, नित्यपुष्टां करीषिणीम्।*
दुराधर्षां, म्हणजे कष्टाने साध्य होणारी किंवा कष्टाने मिळवलेली आणि कष्टाने मिळवायची म्हणजे सोपं काम नाही त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी हवी. नित्यपुष्टाम म्हणजे नेहमी पुष्ट असलेली किंवा पुष्ट करणारी, पोषण करणारी अशी लक्ष्मी हवी.
*आर्द्रां पुष्करिणीं यष्टिं* म्हणजे जिच्या मनात प्रेमाचा ओलावा जिव्हाळा आहे अशी लक्ष्मी हवी. आणि पैसा आला त्यानंतर जर का वर सांगितल्याप्रमाणे जो कोणी असेल तो खरा लक्ष्मीवान आणि हे जर नसेल तर केवळ पैसेवाला...
एक अजून छान शब्द आला आहे *लक्ष्मीमनपगामिनीम्।* म्हणजे गैर मार्गाने जाणारी किंवा अप मार्गाने जाणारी नको. म्हणजे कोणत्या व्यसनात, वाम मार्गात, वाईट गोष्टीसाठी, जुगार खेळण्यात, विकृत उपभोगासठी तिचा उपयोग न व्हावा.
*ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम्।*
ज्वलन्तीं म्हणजे तेजःपुंज, लक्ष्मीवान जसा तेजःपुंज असतो तशी, पुष्कळ वेळा पैसा असूनही तेज नसते,
*देवजुष्टाम* हे विशेषण आहे म्हणजे देवाने सुद्धा सेवा करावी अशी लक्ष्मी आणि उदाराम म्हणजे लक्ष्मी असली की उदारता आली पाहिजे, त्याच बरोबर कायम कायम कृतज्ञ भाव असला पाहिजे.
पण मग ही लक्ष्मी कशी असावी तर *अश्वपूर्वां रथमध्यां, हस्तिनादप्रमोदिनीम्।* जिच्या पुढे घोडे आहेत, जी रथात बसून येते आणि जी येण्याचा संकेत हत्तीच्या चित्कार द्वारा कळतो. अशी वाजतगाजत, म्हणजे राजरोसपणे आलेली हवी. टेबलाखालून आलेली, किंवा भ्रष्टाचार करून आलेली नको.
हे सर्व ७००० वर्षांपूर्वी आमच्या ऋषींनी सांगून ठेवलं. पण आम्हाला शिकवलं नाही आणि सांगितलं पण नाही... पण आता *तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्‌॥* म्हणजे लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा दे आणि अशी चांगली लक्ष्मी मिळावी म्हणून प्रत्येकाला सुबुद्धी दे.

*तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्‌॥*

🙏

22/01/2024

*शास्त्रांमध्ये श्राद्धविषयक विधान.*

*जे श्रद्धेने दिले जाते त्याला 'श्राद्ध' म्हणतात. श्रद्धा व मंत्राच्या संयोगाने जो विधी होतो त्याला 'श्राद्ध' म्हणतात. जीवात्म्याचे पुढील जीवन मागील संस्कारांनी बनते. म्हणूनच श्राद्ध वासन अशी भावना केली जाते की त्याचे पुढचे जीवन चांगले व्हावे. ज्या पितरांसाठी आपण कृतज्ञतेने श्राद्ध करतो, ते आपल्याला मदत करतात. वायू पुराणात आत्मज्ञानी सूत मुनी म्हणतात "हे ऋषी-मुनीनो परमेष्ठी ब्रह्मदेवांनी पूर्वकाळी जी आज्ञा दिली आहे ती तुम्ही ऐका. ब्रह्मदेवांनी सांगितले आहे की 'जे मनुष्यलोकाच्या पोषणाच्या दृष्टीने श्राद्ध तर्पण करतील, त्यांना पितृगण सदैव पुष्टी व संतती देतील, श्राद्धकर्मात आपल्या पणजोबांपर्यंतच्या नावांचे व गोत्राचे उच्चारण करून ज्या पितरांना काही दिले जाईल ते पितृगण त्या श्राद्धदानाने अत्यंत संतुष्ट होऊन देणाऱ्याच्या अपत्यांना संतुष्ट ठेवतील, शुभ आशीर्वाद देतील आणि विशेष साहाय्यता करतील.' हे ऋषींनो! त्याच पितरांच्या कृपेने दान, अध्ययन, तपश्चर्या इत्यादींनी सिद्धी मिळते. ते पितृगणच आपणा सर्वांना सत्प्रेरणा प्रदान करणारे आहेत. यात यत्किंचितही शंका नाही. नियमित गुरुपूजा वगैरे सत्कार्यामध्ये निमग्न राहून योगाभ्यासी सर्व पितरांना तृप्त ठेवतात. योगबळाने ते त्या चंद्रालाही तृप्त करतात, ज्याच्यामुळे त्रैलोक्याला जीवन लाभते. म्हणून योगाचा महिमा जाणणाऱ्यांनी सदैव श्राद्ध केले पाहिजे, मनुष्याद्वारे पितरांना श्रद्धापूर्वक दिलेल्या वस्तूंनाच श्राद्ध असे म्हटले जाते. श्राद्धकर्मात जो मनुष्य पितरांची पूजा न करताच एखाद्या अन्य क्रियेचे अनुष्ठान करतो, त्याच्या त्या क्रियेचे फळ राक्षस व दानवांना मिळते. "*

*श्राद्धासाठी योग्य ब्राह्मण*

*वराह पुराणात श्राद्धाच्या विधीचे वर्णन करताना भगवान मार्कंडेय गौरमुख ब्राह्मणाला म्हणतात: "विप्रवर ! षट्वेदांगांना जाणणारे, यज्ञानुष्ठानात तत्पर, तपस्वी ब्राह्मण, भाचा, मुलीचा मुलगा, सासरे, जावई, मामा, पंचाग्नी तापविणारे, शिष्य, नातेवाईक तसेच आपल्या आई-वडिलांच्या आवडत्या ब्राह्मणांना श्राद्धकर्मासाठी नियुक्त केले पाहिजे. " मनुस्मृतीत येते : "जे क्रोध न करणारे, प्रसन्नमुख आणि लोकोपकारात निमग्न आहेत अशा श्रेष्ठ ब्राह्मणांना मुनींनी श्राद्धासाठी देवतुल्य म्हटले आहे. "*

(मनुस्मृती: ३.२१३)

*वायू पुराणात येते : " श्राद्धाच्या वेळी हजारो ब्राह्मणांना जेवू घातल्याने जे फळ मिळते, ते फळ योगात निपुण एकच ब्राह्मण तृप्त होऊन देतो तसेच महाभयापासून (नरकातून) सुटका करतो. एक हजार गृहस्थी, शंभर वानप्रस्थाश्रमी किंवा एक ब्रह्मचारी या सर्वांहून एक योगी श्रेष्ठ आहे. ज्या मृतात्म्याचा मुलगा अथवा नातू ध्यानात निमग्न राहणाऱ्या एखाद्या योगाभ्यासीला श्राद्धाच्या वेळी जेवू घालेल, त्याचे पितृगण असे परम संतुष्ट होतील जसे चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकरी संतुष्ट होतो. श्राद्धाच्या वेळी जर एखादा योगाभ्यासी, ध्यानपरायण भिक्षुक मिळाला नाही तर दोन ब्रह्मचाऱ्यांना जेवू घातले पाहिजे. तेही न मिळाल्यास एखाद्या उदासीन ब्राह्मणाला जेवू घातले पाहिजे. जो पुरुष शंभर वर्षे फक्त एका पायावर उभे राहून, वायूचे सेवन करून राहतो, त्याच्याहूनही ध्यानी व योगी श्रेष्ठ आहेत अशी ब्रह्मदेवांची आज्ञा आहे. मित्रघातकी, विकृत नखांचा, काळ्या दातांचा, कन्यागामी, आग लावणारा, मद्य विकणारा, समाजात निंदनीय, चोर, चहाडखोर, गावचा पुरोहित, पगार घेऊन शिकविणारा, पुनर्विवाहित स्त्रीचा पती, आई वडिलांचा त्याग करणारा, हीन जातीच्या मुलाबाळांचे संगोपन करणारा, शूद्र स्त्रीचा पती तसेच मंदिरात पूजा-पाठ करून पोट भरणारा ब्राह्मण श्राद्धासाठी आमंत्रण देण्याच्या योग्य नाही, असे सांगितले गेले आहे. ज्यांच्या घरी लहान मुलांचे सूतक आहे, जे दीर्घ काळापासून रोगग्रस्त आहेत, मलिन व पतित विचारांचे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे श्राद्धकर्म पाहू देऊ नये. जर या लोकांची दृष्टी श्राद्धाच्या अन्नावर पडली तर ते अन्न हवन करण्याच्या उपयोगाचे राहत नाही. अशा लोकांचा स्पर्श झालेले श्राद्धादी संस्कार अपवित्र होतात. "*

(वायू पुराण: ७८.३९, ४०)

*'ब्रह्महत्या करणारे, कृतघ्न, नास्तिक, गुरुपत्नीगामी, दरोडेखोर, अत्याचारी, आत्मज्ञानापासून वंचित तसेच इतर पापकर्मपरायण मनुष्य श्राद्धकर्मासाठी वर्जित आहेत. विशेषतः देवी-देवता आणि देवर्षीची निंदा करणारे लोकही वर्ज्य आहेत. या लोकांनी श्राद्धकर्म होताना पाहिल्यास ते निष्फळ होते.' "*

(वायू पुराण: ७८.३४, ३५)

*ब्राह्मणास आमंत्रण *

*विचारवान व्यक्तीने संयमी, श्रेष्ठ ब्राह्मणांना श्राद्धाच्या आदल्या दिवशीच आमंत्रण देणे आवश्यक आहे. श्राद्धाच्या दिवशी जर एखादे अनिमंत्रित तपस्वी ब्राह्मण, अतिथी किंवा साधू-संन्यासी घरी आले तर त्यांनाही जेवू घालावे. श्राद्ध करणाऱ्याने घरी आलेल्या ब्राह्मणांचे प्रथम पाय धुवावे. नंतर आपले हात धुऊन त्यांना आचमन द्यावे. त्यानंतर त्यांना आसनावर बसवून जेवू घालावे. पितरांसाठी विषम अर्थात् एक, तीन, पाच, सात इ. संख्येत तसेच देवतांसाठी सम अर्थात् दोन, चार, सहा, आठ इ. संख्येत ब्राह्मणांना जेवू घालण्याची व्यवस्था करावी. देवता व पितरे या दोहोंसाठी प्रत्येकी एका ब्राह्मणास जेवू घालण्याचेही विधान आहे.*

*वायू पुराणात गुरू बृहस्पती आपले पुत्र शंयू यांना म्हणतात : "जितेंद्रिय व पवित्र होऊन पितरांना गंध, फुले, धूप, तूप, आहुती, फळ, मूळ इ. अर्पण करून नमस्कार केला पाहिजे. सर्वप्रथम पितरांना तृप्त करून नंतर आपल्या कुवतीनुसार अन्न-धान्य व दक्षिणा देऊन ब्राह्मणांची पूजा केली पाहिजे. सदैव श्राद्धाच्या वेळी पितृगण वायुरूप धारण करून ब्राह्मणांना पाहून त्यांच्यात प्रविष्ट होतात. म्हणून त्यांना जेवू घालावे असे मी सांगत आहे. अन्न, वस्त्र, विशेष दान, भक्ष्य, पेय, गाय, घोडा, गाव इ. चे दान देऊन श्रेष्ठ ब्राह्मणांची पूजा केली पाहिजे. ब्राह्मणांच्या आदरातिथ्याने पितृगण प्रसन्न होतात."*

(वायू पुराण: ७५.१२-१५)

*श्राद्धाच्या वेळी हवन व आहुती "पुरुषप्रवर ! श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणांना जेवू घालण्यापूर्वी त्यांची आज्ञा घेऊन मीठ न घातलेले (अळणी) अन्न व भाजीचे अग्नीत तीन वेळा हवन करावे. यात 'अग्नये कव्यवाहनाय स्वाहा...' या मंत्राने पहिली आहुती, 'सोमाय पितृमते स्वाहा...' या मंत्राने दुसरी आहुती आणि 'वैवस्वताय स्वाहा...' मंत्राचे उच्चारण करून तिसरी आहुती देण्याचे विधान आहे. मग हवन केल्यानंतर उरलेले अन्न थोडे-थोडे सर्व ब्राह्मणांच्या पात्रांमध्ये द्यावे."*

*अभिश्रवण व रक्षक मंत्र*

*श्राद्धविधीत मंत्रांना खूप महत्त्व आहे. श्राद्धात तुम्ही दिलेल्या वस्तू कितीही मौल्यवान असोत, परंतु तुमच्याकडून जर मंत्रांचे योग्य उच्चारण झाले नाही तर सर्व कार्य विस्कळीत होते. मंत्रोच्चारण शुद्ध असावे, ज्यांच्यासाठी श्राद्ध करीत आहात त्यांच्या नावाचे उच्चारणही स्पष्ट असावे. श्राद्धात ब्राह्मणांना जेवू घालताना रक्षक मंत्राचा पाठ करून जमिनीवर तीळ पसरून ठेवावे आणि आपल्या पितृरूपात त्या श्रेष्ठ ब्राह्मणांचेच चिंतन करावे. 'रक्षक मंत्र' पुढीलप्रमाणे :*

यज्ञेश्वरो यज्ञसमस्तनेता भोक्ताऽव्ययात्मा हरिरीश्वरोऽस्तु ।
तत्संनिधानादपयान्तु सद्यो रक्षांस्यशेषाण्यसुराश्च सर्वे ॥

*'येथे हवन केलेल्या सर्व फळांचे भोक्ता यज्ञेश्वर भगवान श्रीहरी विराजमान आहेत. तरी त्यांच्या उपस्थितीमुळे सर्व राक्षस व असुरांनी येथून त्वरित पळून जावे.'*

(वराह पुराण: १४.३२)

*ब्राह्मण जेवत असताना अशी भावना करावी की 'या ब्राह्मणांच्या शरीरात प्रविष्ट झालेले माझे वडील, आजोबा व पणजोबा आज भोजनाने तृप्त व्हावेत. ' जसे येथून पाठविलेले रुपये इंग्लंडमध्ये 'पाऊंड', अमेरिकेत 'डॉलर' व जपानमध्ये 'येन' होऊन मिळतात, अगदी असेच पितरांसाठी केलेल्या श्राद्धाचे अन्न, श्राद्धकर्माचे फळ आपली पितरे जेथे आहेत, जशी आहेत, त्यांच्या अनुरूप होऊन त्यांना मिळते. परंतु यात ज्यांच्यासाठी श्राद्ध केले जात आहे त्यांची नावे, त्यांच्या वडिलांची नावे व गोत्राची नावे यांचे स्पष्ट उच्चारण झाले पाहिजे. विष्णू पुराणात येते :*

श्रद्धासमन्वितैर्दत्तं पितृभ्यो नामगोत्रतः । यदाहारास्तु ते जातास्तदाहारत्वमेति तत् ॥

*'श्रद्धावान व्यक्तींकडून नाव आणि गोत्राचे उच्चारण करून दिलेले अन्न पितृगणांना ते जशा आहारास योग्य असतील तसेच होऊन मिळते. ' श्राद्धात भोजन करविण्याचे विधान*

(विष्णू पुराण: ३.१६.१६)

*शुभ भवंन्तु.*

09/06/2023

कर्म
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ...
मला याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे जाणते अजाणते पणाने आपण ज्या ज्या लोकांना दुखावले त्याची परत फेड दुसऱ्या लोकांकडून आणि अगदी घरातल्या जवळच्या लोकांकडून होते.
हे चक्र असच चालू राहतं किंबहुना तूच जोडिशी तूच तोडिशी. भगवान आपल्यावर काहीच घेत नाही तो फक्त खेळ पहातो.
सगळ कळतय पण वळत नाहीये अशी स्थिती होऊन जाते .
यातून नामस्मरण आपल्याला तारेल अस वाटत, माहीत नाही कितपत ते कामी येईल पण शंका नाही घेऊ शकत कारण बरेच दाखले उपलब्ध आहेत. या आधीची जलमट काढल्या शिवाय किंवा निघाल्या शिवाय पुढचा मार्ग मोकळा होणार नाही .
बहुदा यातच जन्म निघून जाणार आणि ज्या कामासाठी आपण जन्म घेतलाय ते पूर्ण न झाल्याने पुनरपि जनन पुनरपि मरणम चालूच राहणार. आणि तो फक्त हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन मजा पाहणार. श्री राम

श्री राम नवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!जय श्री राम !!!! 🙏🙏🙏
30/03/2023

श्री राम नवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!

जय श्री राम !!!! 🙏🙏🙏

अशोक कलिका
29/03/2023

अशोक कलिका

हे मावळतीला आलेल्या संवत्सरा, तू आम्हाला तुझ्या छत्र छायेत जोपासले त्यासाठी आम्ही तुझे ऋणी आहोत. तुझ्या वाटचालीत तू आम्ह...
22/03/2023

हे मावळतीला आलेल्या संवत्सरा, तू आम्हाला तुझ्या छत्र छायेत जोपासले त्यासाठी आम्ही तुझे ऋणी आहोत. तुझ्या वाटचालीत तू आम्हाला चांगले शिकवलेस, सुखाचे दिवस दाखवलेस हा तुझा प्रसाद म्हणून आम्ही जपू.
तू आम्हाला जे कांही दुःखाचे दिवस दाखवलेस त्यातून आम्हाला बरेच शिकायला मिळाले. हे सर्व आम्ही कर्म भोग म्हणून स्वीकारतो.

येणाऱ्या नवीन संवत्सरात आम्हाला सुकर्म अन् सत्चारित्र्याचं जीवन लाभू दे.
येऊ घातलेल्या नवीन संवत्सरात सकल विश्व आनंदी, शांत अन् समृद्ध होवू दे. उत्तम पर्जन्य, विपुल धान्य या सृष्टिला लाभू दे.
प्रेमभाव वाढू दे, युद्धजन्य परिस्थीती दूर कर. सकल जीव सृष्टी परोपकार भावनेने वाढू दे.

हे मावळत्या संवत्सरा तुझा निरोप घेतांनाच नवीन येणाऱ्या संवत्सराच्या स्वागतासाठी आम्हाला सज्ज होण्याचा आशिर्वाद लाभू दे.

*श्रीराम जय राम जय जय राम* 🙏🏻🙏🏻🙏🏻

21/03/2023
*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 53*8 मार्च 2023, बुधवार   वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.आयु...
08/03/2023

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 53*
8 मार्च 2023, बुधवार
वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871

चैत्यपूज्यध्वजाशस्तच्छायाभस्मतुषाशुचीन्॥३३॥
नाक्रामेच्छर्करालोष्टबलिस्नानभुवो न च।

जसे हा उपक्रम सुरू करताना म्हटले होते की, हे प्रायः हा सामाजिक आचरणाचे नियम आहेत. यातील काही नियम हे आरोग्य, काही नीतिमत्ता, काही सार्वजनिक ठिकाणची वागणूक, काही मानसिक दृष्टिकोन; अशा विविध विषयांशी संबंधित आहेत.

त्याचबरोबर काही नियम हे त्रैकालिक/ सार्वकालिक म्हणजे वाग्भटाच्या काळातही, आजही आणि भविष्यातही लागू होणारे, सुसंगत असणारे, उपयोगी असणारे असे आहेत ...

तर काही नियम, हे तात्कालिक म्हणजे वाग्भटाच्या काळातील, सामाजिक संदर्भांशी, सुसंगत असे आहेत. कदाचित त्या नियमांचे, आज कुठलंच स्थान महत्त्व हे शिल्लक नाही.

चैत्य म्हणजे एक विशिष्ट देवता अधिष्ठान असलेला वृक्ष किंवा बौद्ध स्थान

पूज्य याचा अर्थ पूजनीय व्यक्ती जसे गुरु आई वडील

ध्वज म्हणजे देवाचा किंवा राष्ट्राचा वंदनीय असा झेंडा ध्वज

अशस्त म्हणजे प्रशस्त नसलेलं , अमंगल निषेध्य त्याज्य वर्ज्य हेय निंद्य टाळण्याजोगे

या चार गोष्टींची छाया म्हणजे सावली

भस्म म्हणजे राख रक्षा

तुषार म्हणजे धान्याचं वरचं कवच उफणणी किंवा पाखडणे असे केल्यानंतर , धान्य आपण साठवतो आणि वरचे कवच म्हणजे तुसं टाकून देतो, त्याला तुषा असं नाव आहे.

अशुचि याचा अर्थ स्वच्छ नसलेलं म्हणजे मूत्र पुरीष उघडे गटार कचराकुंडी उकिरडा इत्यादी

शर्करा याचा अर्थ वाळू , निसरडी भूमी , मुरूम

लोष्ट याचा अर्थ ढेकूळ म्हणजे दृढ नसलेली, घसरू शकणारी भूमी जमीन जागा स्थळ स्थान

बली ठेवण्याचे देण्याचे स्थान
स्नान करण्याची जागा

या सर्व गोष्टी ओलांडून जाऊ नयेत म्हणजे त्याच्यावरून उडी मारून पलीकडे जाऊ नये किंवा त्याच्यावरून चालत धावत पळत जाऊ नये.

आता, या नियमातील, चैत्य (पूज्य) तुषा भस्म या गोष्टी सहसा, आपल्या आताच्या व्यवहारात, आपल्याला दिसत नाहीत.

तर ... चैत्य किंवा पूज्य अशा व्यक्तींच्या सावलीला सुद्धा आपले पाय लागणे किंवा त्या सावलीवरून आपण ओलांडून पलीकडे जाणे, हे त्यांची अवमानना आहे, असा हा भावनिक भाग होय.

अशस्त अपवित्र अमंगल अशा गोष्टीची सावली ओलांडून जाणे हे पुन्हा भावनिकच होय.

भस्म याचा अर्थ राख, आता राखे खालचा अग्नी हा पूर्ण विझला आहे की नाही, ते माहीत नाही!!!

समजा , तो अग्नी अजूनही धगधगत असेल आणि वरच्या राखेमुळे तो दिसत नसेल, तर ती राख ओलांडताना किंवा त्यावरून चालत पळत धावत जाताना, त्या अग्नीमुळे आपल्याला भाजणे , व्रण होणे संभवते.
समजा, राखेखालचा अग्नी पूर्णपणे विझलेला असेल, तरी रक्षा/राख ही मऊ असल्याने, त्याच्याखाली किती खोल जागा आहे किंवा त्याच्यावर पाय टाकल्यानंतर आपण घसरून पडू, याचा अंदाज घेणं शक्य नसतं.

तीच गोष्ट तुषा कारण धान्याची तुसं कव्हर्स कवच हे निसरडे सरकणारे असतात, त्यावरून ओलांडताना चालताना पडण्याची शक्यता असते.

अशुची याचा अर्थ मूत्र पुरीष कचरा याच्यावरून चालताना तो भाग ओलसर असेल तर त्यावरून घसरणे पडणे

शर्करा म्हणजे वाळू. वाळूवरून माणूस चालताना किंवा टू व्हीलर सरकणे, हे आपण अनेक वेळा पाहिलेले आहे. वाळूच्याच निमित्ताने मुरूम किंवा ज्याच्यावरून सरकू शकेल, अशी जमीन हेही धोकादायक असते, असे यातून जाणावे.

लोष्ट याचा अर्थ ढेकूळ. ढेकूळ असलेली जमीन ही ओबडधोबड असते. त्यावरून चालताना पडणं सरकणं होऊ शकतं.

बली हा पुन्हा तत्कालीन भाग आहे. आजही काही लोक तीन किंवा चार रस्ते एकत्र येतात, अशा ठिकाणी मधोमध किंवा बाजूला तरी भाताचे पिंड नारळ किंवा तत्सम गोष्टी ठेवतात. मनाने दुर्बल असणारी, भित्रट माणसं त्याला पाहून घाबरून बिचकून बिथरून पळापळ केली तर, त्यांचा तोल जाऊन ती पडण्याची शक्यता असू शकते.
स्नानभूमी ही नेहमीच ओलसर असते, त्याच्यावरून चालताना ओलांडताना सरकणे घसरणे पडणे संभवते.

असा, हा या श्लोकाचा बराचसा तत्कालीन आणि जरासा आजच्या काळात लागू होणारा संदर्भ आहे

Have a Great Day Ahead !!!

आपल्या संयम व सहकार्य आणि प्रतिसादाबद्दल निरंतर हार्दिक आभारी आहे 🙏🏼

आपल्या शंका सूचना प्रश्न अभिप्राय यांचे स्वागत आहे

त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।

तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।

श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।

🙏🏼
वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
आत्यंतिक आभारी बेंद्रे गुरुजी मालाड

08/03/2023

श्रीविष्णुसहत्रनाम स्तोत्राचा महिमा.....

विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र मध्ये आपल्या जीवनात उपयोगी येणारे काही मंत्र दडलेले आहेत ते आज आपणा समोर सादर केले आहेत. सदरचे मंत्र आपल्या रोजच्या जीवनात किती उपयोगी आहेत त्याचा उपयोग आपण करावा.

टाईप केलेले शब्द हे संस्कृत मध्ये आहे ते टाईप करताना काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून घेऊन नंतर त्याचे पाठ करावेत.

01) पोटाचे विकार दुर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.
|| भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः||
|| अनघो विजयो जेता विश्वयोनि: पुनर्वसु: ||१६

02) मानसिक विकार दुर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..
|| वैद्यो वैद्य: सदायोगी वीरहा माधवो मधु:||
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल:||१८

03) स्मरणशक्ती वाढण्यासाठी खालील मंत्र म्हणावा
|| महाबुद्धिर्महावीर्यो महा शक्तीर्महाद्युति: ||
अनिर्देश्यवपु: श्रीमान् अमेयात्मा महाद्रिधृक ||१९

04)इच्छापुर्ण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..
|| अससङ्ख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्ट: शिष्टकृच्छुचि: ||
सिद्धार्थ:सिद्धसङ्कल्प: सिद्धिद: सिद्धिसाधन: ||२७

05) रोग देशाकरिता खालील मंत्र म्हणावा ..
|| अमृतांशूद्भवो भानु:शशबिन्दु: सुरेश्वर:||
औषधं जगत: सेतु: सत्यधर्मपराक्रम: ||३१

06) कार्यात यश मिळण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..
|| भूतभव्यभवन्नाथ: पवन: पावनऽनल: ||
|| कामहा कामकृत्कान्त: काम: कामप्रद: प्रभु:||३२

07) विजय मिळविण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...
|| युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः||
|| अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित ||३३

08) नोकरीत व व्यवसायात वाढ होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...
|| व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः||
परर्द्धि:परमस्पष्टस्तुष्ट:पुष्ट: शुभेक्षण:||४२

10) साधनेतील बाधा कमी होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..
|| वैकुण्ठ: पुरुष: प्राण: प्राणद: प्रणव: पृथु:||
हिरण्यगर्भ: शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षज:||४४

10) संकटात रक्षण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..
|| ऋतु:सुदर्शन: काल: परमेष्ठी परिग्रह:||
उग्र: संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिण:||४५

11) अर्थ प्राप्तीसाठी आपण खालील मंत्र म्हणावा..

||विस्तारः स्थावरस्थाणुः प्रमाण बीजमव्ययम् ||
||अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महधनः||-४६!

12) कल्याण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..
||अनिवर्ती निवृत्तामा सङ.क्षेप्ता क्षेमकृच्छिवः||
||श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमंतांवरः||-६४

13) देवाची कृपा होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

||श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः||
||श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमाॅंल्लोकत्रयाश्रयः||६५

14) विवाह योग्य
येण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...
||कामदेवः कामपालः कामी कान्तः कृतागमः||
||अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनंतो धनञ्जयः||७०

15) ज्ञान होण्यासाठी
खालील मंत्र म्हणावा..
||ब्रह्मण्यो ब्रह्मकृद् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः||
||ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः||७१

16) मोक्षाकरिता
खालील मंत्र म्हणावा...
||सद्गगतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः||
||शुरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः||७५

17) वासनांचा नाश करण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

||भूतावासो वासुदेवः सर्वासुनिलयोऽ नलः||
||दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोथाऽपराजितः||७६

18) शत्रूची पीडा कमी होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

||सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः||
||न्यग्रोधोदुम्बरोऽ श्वत्थश्चाणूरान्ध्रनिषूदनः||८८

19) चिंता दुर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...
||सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधाः सप्तवाहनः||
||अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः||८९

20) वाईटस्वप्नाचा नाश होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...
||उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनः||
||वीरहा रक्षणः सन्तो जीवन
पर्यवस्थितः||९९

#माझा संस्कृत या विषयाचा अभ्यास फार कमी आहे त्यामूळे टाईप करताना अनेक चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून आपल्या जवळच्या गुरूजी कडून समजून घेऊन याचे पाठ करावेत ही नम्र विनंती.

01/03/2023

नमस्कार आज १ मार्च २०२३ लवकरच प्रत्येक धार्मिक कार्याची माहिती प्रसारित करणार आहे

नमस्कार मंडळी, 🙏हे आमचे  Facebook Business Page आहे. आमच्या सर्व Services ची माहिती आपणास येथे मिळेल. आमच्याशी संपर्क सा...
01/03/2023

नमस्कार मंडळी, 🙏

हे आमचे Facebook Business Page आहे. आमच्या सर्व Services ची माहिती आपणास येथे मिळेल.

आमच्याशी संपर्क साधण्यासाठी WhatsApp Button वर क्लिक करा.

तसेच आपणास अधिकची माहिती हवी असल्यास आमच्या Website ला Visit करू शकता. खालील लिंक वर क्लिक केल्यास आपणास आमची वेबसाइट बघता येईल.

👇
https://bendreguruji.in

आमच्या सर्विसेस तुम्ही या आधी कधी घेतल्या असतील तर आम्हाला जरूर review द्यावा ही विनंती. (Your Feedback is valuable to us.)

Google Review Link:
https://g.page/r/CWO3M8eaz1EIEBM/review

आपणास येथे नवीन माहिती येणाऱ्या काळात मिळत जाईल. त्या मुळे ह्या page ला Like आणि Follow जरूर करा.

Regards,

श्री बेंद्रे गुरुजी Bendre Guruji

Address

301/303, Laxmi Smruti CHS, Turel Pakhadi Road, Opp. Janhavi Hospital, Malad West
Mumbai
400064

Opening Hours

Wednesday 10am - 11pm
Friday 10am - 11pm

Telephone

+919920049281

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bendre Guruji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Bendre Guruji:

Share