15/04/2021
किल्ले सिंहगड
🙏🚩🚩
नरवीर तानाजी मालुसरे...🙏🚩🚩
आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर!...🙏🚩🚩
सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे.
छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले.
तानाजी मालुसरे हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती.
महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजी अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.
कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते. स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती.
त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.
सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता.
कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
"गड आला पण सिंह गेला, आधी लगीन कोंढण्याचे मग माझ्या रायबाचे"
म्हणत हिंदवी स्वराजाच्या रक्षणार्थ शत्रूवर तुटून पडणारे, असीम शौर्य गाजवणारे, प्राणांची आहुती देणाऱ्या
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा ⚔️🔥
Pc Credit 📸
#मराठी_संस्कृती #संस्कृती_महाराष्ट्राची