श्री दत्तमाउली आश्रम, माहुलगांव, चेंबूर, मुंबई

  • Home
  • India
  • Mumbai
  • श्री दत्तमाउली आश्रम, माहुलगांव, चेंबूर, मुंबई

श्री दत्तमाउली आश्रम, माहुलगांव, चेंबूर, मुंबई राष्ट्रसंत धर्मभास्कर प. पू. श्री सदगुरू पाचलेगांवकर महाराज प्रणित " श्री दत्तमाउली आश्रम" माहुलगांव, चेंबूर, मुंबई

राष्ट्रसंत धर्माभास्कर प. पू. श्री सद्गुरू पाचलेगांवकर महाराज प्रणित " श्री दत्तमाउली आश्रम" माहुलगांव, चेंबूर, मुंबई हे महाराजांचे उपासना केंद्र आहे. येथे दर गुरुवारी सामुदायिक उपासना होते आणि वर्षभर विविध उत्सव आणि कार्यक्रम साजरे होतात.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻दिनांक २३/०८/२०२६ रोजी श्री दत्तमाउली आश्रम, माहुलगांव, चेंबूर, मुंबई येथे राष्ट्रसं...
28/08/2026

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻

दिनांक २३/०८/२०२६ रोजी श्री दत्तमाउली आश्रम, माहुलगांव, चेंबूर, मुंबई
येथे राष्ट्रसंत धर्मभास्कर प. पू. श्री सदगुरु पाचलेगांवकर महाराज ह्यांची ३९ पुण्यतिथी साजरी केली. श्रींच्या मूर्तीवर आणि पादुकांवर लघुरुद्र अभिषेक करण्यात आले.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻राष्ट्रसंत धर्मभास्कर प. पू. श्री सदगुरु पाचलेगांवकर महाराज की जय 🙏🏻🙏🏻
21/08/2026

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻

राष्ट्रसंत धर्मभास्कर प. पू. श्री सदगुरु पाचलेगांवकर महाराज की जय 🙏🏻🙏🏻

नागपंचमी सण जो आला कृष्णाई करी नागपूजेला नाग मातीचा त्यासासी वंदन बालकास कै रुचेल पूजन संचारेश्वर गुरू माऊली नागराज तो घ...
17/08/2026

नागपंचमी सण जो आला
कृष्णाई करी नागपूजेला
नाग मातीचा त्यासासी वंदन
बालकास कै रुचेल पूजन

संचारेश्वर गुरू माऊली
नागराज तो घेऊनी आली
पूजनी पाहुनी जिवंत नागा
विस्मित होती साऱ्या शुभगा

कृष्णाई बहू पुण्य तू केले
रत्न असे हे भूवरी आले
महिमा त्यांचा किती सांगणे
काळ जयाचे असे खेळणे

हे अतिशय महत्वाचे दुर्मिळ छायाचित्र असून - सन् १९५८ साली धर्मभास्कर श्री संत पाचलेगांवकर महाराज आणि भारताचे पहिले पंतप्र...
12/08/2026

हे अतिशय महत्वाचे दुर्मिळ छायाचित्र असून - सन् १९५८ साली धर्मभास्कर श्री संत पाचलेगांवकर महाराज आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नवी दिल्ली येथील " तीन मूर्ती भवन " या निवासस्थानी घडलेल्या भेटीदरम्यान, दि. ११ नोव्हेंबर १९५८ रोजी - तत्कालिन भारत सरकारच्या जनसंपर्क विभागाकडून काढलेले आहे. आज दिल्ली येथील भारत सरकारच्या पुरातत्त्व छायाचित्रे विभागात जंग जंग पछाडूनही मूळ छायाचित्र उपलब्ध झाले नाही. म्हणून हे छायाचित्र, हाफकिन इन्स्टिट्यूटचे सहसंचालक डॉ. पुरूषोत्तम जयकृष्ण देवरस यांनी लिहून प्रकाशित केलेल्या *Snakes of India* या जगप्रसिद्ध पुस्तकातून घेतले आहे. { पू. महाराज त्याकाळी केलेल्या हिमालय यात्रेवरून परतीच्या प्रवासात नवी दिल्ली मुक्कामी असताना पं. नेहरू यांच्या भेटीचे आयोजन केले होते }.
असे कळले की पू. महाराजांचा मूळ एकमेव असा त्यांच्या जीवनातील बहुमोल छायाचित्रांचा अल्बम दादर, मुंबईतील एका गृहस्थाला काही कारणास्तव देण्यात आला. परंतु २००६ सालच्या मुंबईच्या पावसात तो दुर्देवाने वाहून गेला आणि त्यासोबतच महाराजांच्या जीवनातील सर्व मूळ छायाचित्रे पाण्यात वाहून गेली. ती बहुसंख्य कृष्णधवल होती.

https://youtu.be/Yi3lzA0ZTI4?si=rwgSwD2YplLjUDpa
04/08/2026

https://youtu.be/Yi3lzA0ZTI4?si=rwgSwD2YplLjUDpa

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक २९/०७/२०२६ रोजी गुरु पौर्णिमा निम...

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक २९/०७/२०२६ रोजी गुरु पौर्णिमा निमित्त श्री दत्त माऊली  आश्रम ( माहुल गाव ,चेंबूर ) येथ...
03/08/2026

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक २९/०७/२०२६ रोजी गुरु पौर्णिमा निमित्त श्री दत्त माऊली आश्रम ( माहुल गाव ,चेंबूर ) येथे श्री भगवान गुरुदेव दत्तात्रय आणि राष्ट्रसंत धर्मभास्कर प.पू श्री सदगुरू पाचलेगावकर महाराजांचे व श्री सदगुरू दत्तानंद स्वामी ह्यांचे पाद्य पूजन व अभिषेक त्याचे काही छायाचित्र..🕉️🌷📿🚩

🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🚩 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्रसंत" ही उपाधी परमपूज्य सद्गुरु पाचलेगावकर महाराजांना बहाल केल...
30/07/2026

🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺

🚩 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्रसंत" ही उपाधी परमपूज्य सद्गुरु पाचलेगावकर महाराजांना बहाल केली, तो ऐतिहासिक क्षण... आणि त्यांच्या मानसपुत्र परमपूज्य श्री दत्तानंद स्वामी महाराज यांच्यासोबत झालेली ही अविस्मरणीय भेट, आता आपल्या भेटीला! ✨

Link: https://youtu.be/YqRh32Lbe1Y

📺 हा प्रेरणादायी आणि आध्यात्मिक पॉडकास्ट नक्की पाहा.

👍 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया Like करा.
🔄 आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा.
🔔 Swami Bhakti Kendra चॅनेलला Subscribe करा.
💬 आपला अभिप्राय Comment मध्ये नक्की कळवा.

🕉️ श्री स्वामी समर्थ! 🙏

— कुणाल शिंदे
🌼 संस्थापक – स्वामी भक्ती केंद्र

राष्ट्रसंत श्री सद्गुरू पाचलेगावकर महाराज यांच्या मार्गदर्शनात देशा...

23/07/2026

🙏🏻श्री गुरूदेव दत्त 🙏🏻

आपणांस कळविण्यात येत आहे की, दरवर्षीप्रमाणे श्री दत्तमाउली आश्रम, श्री क्षेत्र माहुलगांव, चेंबूर, मुंबई येथे " गुरुपौर्णिमा उत्सव " *बुधवार* दिनांक *२९/०७/२०२६* रोजी साजरा करण्यात येणार आहे.

उत्सवाची कार्यक्रम पत्रिका खालील प्रमाणे असेल

सकाळी- ०७ :००वाजता -प. पू.राष्ट्रसंत धर्मभास्कर
पाचलेगांवकर महाराजांच्या सगुण पादुकांचा अभिषेक

सकाळी - १०:०० वाजता - श्री सत्यनारायणाची व्यासपूजा

सकाळी - ११:०० वाजता - श्री सद्गुरू दत्तानंद स्वामी यांचा पादयपुजन सोहळा

दुपारी - १२: ०० वाजता ( अनुग्रह सोहळा )
टीप :- ज्या भाविकांना आणि दत्तउपासकांना अनुग्रह घ्यावयाचा असेल त्यांनी दुपारी ११:३० वाजता आश्रमामध्ये उपस्थित रहावे.
अनुग्रह साठी लागणारी सामग्री :-१ हार, वस्त्र, फळ, १ श्रीफळ

दुपारी - ०१:०० वाजता - महाप्रसाद

दुपारी - ०४:०० वाजता - सामुदायिक उपासना

सायंकाळी - ०५:०० वाजता - प. पू. श्री सद्गुरू दत्तानंद स्वामी यांची सद्गुरूवाणी

सायंकाळी - ०६:०० वाजता- आर्यादुर्गा प्रासादिक मंडळ आणि श्री मोहन कामतेकर यांचे सुश्राव्य भजन सेवा

सायंकाळी - ०७:०० वाजता- आरती

पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.

तरी आपण सर्व भाविकांनी आणि दत्त उपासकांनी जास्तीत जास्त संख्येने सोहळ्याला उपस्थित राहावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा

आपले : श्री मुक्तेश्वर जनसेवा मंडळ, माहुल गांव, श्री दत्तमाउली आश्रम, माहुलगांव, चेंबूर, मुंबई

02/07/2026

सदगुरुवाणी

ठिकाण : श्री क्षेत्र खामगांव

धर्मभास्कर राष्ट्रसंत प. पू.श्री. सदगुरु संचारेश्वर महाराज की जय 🙏🏻🙏🏻

01/05/2026

शाहीर नंदेश उमप यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त श्री क्षेत्र माहुल गांव, चेंबूर, मुंबई येथे महाराष्ट्र गीत सादर केले

Address

श्री दत्तमाउली आश्रम, 503, चांगदेव निवास, माहुलगांव, चेंबूर
Mumbai
400075

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री दत्तमाउली आश्रम, माहुलगांव, चेंबूर, मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category