02/04/2026
भायखळा पोलिस स्टेशन सीनियर पोलिस अधिकारी श्री सोपान काकड ह्या ,नागरिकांबरोबर उद्धट आणि असभ्य भाषेत बोलणाऱ्या पोलीस निरीक्षकाने आज माझगाव च्या डॉकयार्ड रोड स्टेशन जवळ आई गावदेवीच्या वार्षिक पालखी मिरवणुकीसाठी “माझगाव ची मायमाऊली” ह्या डॉकयार्ड च्या नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री अल्पेश पारकर च्या वतीने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाच्या व्यवस्थेवर कठोर कारवाई केली व खोटे गुन्हा नोंदवून त्यांच्या स्वागत समारंभ आयोजन करण्यासाठी आणलेला सामान जप्त केला. अंधारात हजारों लोक पालखी घेऊन तेथून जात असताना , शिवसेना पक्ष उपनेते, मा.अध्यक्ष स्थायी समिती व माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिका, श्री यशवंत जाधव तातडीने पोहोचले व बंदोबस्त करत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्या उद्धट अधिकाऱ्याशी फ़ोन वर बोलण्याचा प्रयत्न केला, उत्सवात बाधा आणून, नागरिकांच्या धार्मिक भावना का दुखावत आहात अस त्यांना विचारले असता , पुन्हा त्यांने श्री जाधव यांच्याशी शाब्दिक वाद केले आणि उत्तेजित करून डाव दाखवण्याचे व त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहण्याचे आव्हान देण्यासारखी भाषा वापरण्यास सुरुवात केली. श्री यशवंत जाधव यांनी तेव्हाच सक्त ताकीद देऊन त्या अधिकाऱ्याने जनतेची माफी मागावी अशी मागणी केली . त्यानंतर ३० मिनिट एकाच ठिकाणी पालखी खांद्यावर पालखी घेऊन भोई उभे राहिले व संपूर्ण मिरवणूक जागच्या जागी थांबली. त्यानंतर थोड्या वेळात त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठांनी मध्यस्ती करून श्री यशवंत जाधव यांना विनंती करीत मिरवणूक पुढे नेण्याचा प्रयत्न करत कोणतेही न्याय व्यवस्था बिघडणारे प्रकार होण्याचे टाळले त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली .
माझगाव ची ग्रामदेवता हे मान असलेल्या आई गावदेवी चे डोंगरावर स्थित मंदिरातून ६६ वर्षांपासून निघणाऱ्या ह्या मिरवणुकीत हजारो च्या संख्येने अनुयायी अगदी जल्लोषात पारंपारिक प्रथा व संस्कृती जोपासत सहभागी होतात व माझगावच्या गल्लो गल्लीत सर्वत्र आई गावदेवी च्या नावाचे गजर गुंजतो . परंतु आज ह्या २०२६ च्या आई गांवदेवी च्या मानाचा पालखी सोहळा साजरा करणारे माझगाव चे उत्साही नागरिक निराश झाले.
महाराष्ट्र शासन व मुंबई पोलीस या अधिकाऱ्यावर कमीत कमी त्याच्या ह्या वागणुकी बाबत कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.