सार्व. संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु.

  • Home
  • India
  • Mohari
  • सार्व. संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु.

सार्व. संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु. दुर्गा उत्सवातून सामाजिक चळवळ

"एक गाव - एक दुर्गा" संकल्पनेतून गावाचा सामूहिक सहभागनिलज बु. येथील नवरात्रोत्सवाचे चौथ्या वर्षात पदार्पण; धार्मिकतेसोबत...
01/10/2025

"एक गाव - एक दुर्गा" संकल्पनेतून गावाचा सामूहिक सहभाग

निलज बु. येथील नवरात्रोत्सवाचे चौथ्या वर्षात पदार्पण; धार्मिकतेसोबत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोड

भंडारा : मोहाडी तालुक्यातील निलज बु. गावात सार्वजनिक संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळाकडून यंदा चौथ्या वर्षी नवरात्र उत्सव साजरा होत आहे. यंदा मंडळाने किल्ल्याचा देखावा साकारला आहे. या नवरात्रोत्सवात गावात उत्साहाचे, श्रद्धेचे आणि एकोप्याचे वातावरण दिसून येत आहे.

सकाळ-संध्याकाळ देवीची आरती, भजन आणि दांडिया-गरबा यात लहानांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत सर्व जण सामील होत आहेत. गावकऱ्यांनी “एक गाव – एक दुर्गा” या उपक्रमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले आहे. त्यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवता संपूर्ण गाव उत्सवात सामील होत आहे.

या उत्सवातून महिलांना स्वतःची कला आणि क्षमता दाखवण्यासाठी मंच मिळाला आहे. महिला भजन, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. यामुळे महिलांना गावाच्या कार्यक्रमांत सक्रिय भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे.

युवकांचा पुढाकार

सार्वजनिक संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून गावातील युवकांनी नियोजन, आयोजन आणि कार्यक्रमांच्या व्यवस्थापनात मोठा वाटा उचलला आहे. सजावट, पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर, स्वच्छता याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले जात आहे.

सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम

मंडळाने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा, आनंद मेला, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या गेल्या. अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञानाधारित विचारसरणी यावर, कीर्तन, जादूच्या कार्यक्रमातून मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमांत गावकऱ्यांचा सहभाग दिसून येत आहे.

मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाची सांगता दरवर्षी पारंपरिक पद्धतीने केली जाते. देवीचे विसर्जन गावकरी सामूहिकरित्या पारंपरिक पद्धतीने भजन करत, मंगल वातावरणात पार पाडतात. या वेळी महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. तबला, पेटी व टाळ्यांच्या गजरात, “जय माता दी”च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून निघते. श्रद्धा आणि संस्कृती जपतानाच गावाच्या एकोप्याचा हा क्षण सर्वांना भावतो. यंदाही हीच परंपरा कायम ठेवत उत्सवाची सांगता भजन-कीर्तनाच्या वातावरणात होणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
000

दुर्गात्सव : भजन, आरती के साथ सांस्कृतिक कार्यक्रमों की मची धूमनिलज बु. में 'एक गांव एक दुर्गा' के तहत समाज को एकजुट करन...
01/10/2025

दुर्गात्सव : भजन, आरती के साथ सांस्कृतिक कार्यक्रमों की मची धूम

निलज बु. में 'एक गांव एक दुर्गा' के तहत समाज को एकजुट करने का प्रयास

मोहाड़ी तहसील के ग्राम निलज बु. में सार्वजनिक संस्कृति नवदुर्गा उत्सव मंडल द्वारा लगातार चौथे वर्ष में नवरात्रि उत्सव बड़े जोरशोर से मनाया जा रहा है। इस वर्ष मंडल ने दुर्गा प्रतिमा के लिए किले जैसा दृश्य बनाया है। इस नवरात्रि उत्सव के दौरान गांव में उत्साह, आस्था और एकता का माहौल है।

गांव में सुबह-शाम देवी की आरती, भजन और डांडिया-गरबा में बच्चों से लेकर बुजुगों तक सभी शामिल हो रहे हैं। ग्रामीणों ने 'एक गांव एक दुर्गा' पहल के जरिए समाज के सभी वर्गों को एक साथ लाया है। जिससे पूरा गांव उत्सव में शामिल हो रहा है। इस उत्सव ने महिलाओं को अपनी कला और प्रतिभा दिखाने का मंच प्रदान किया है। भजन, नृत्य और सांस्कृतिक कार्यक्रमों में महिलाएं बड़ी संख्या में हिस्सा ले रही हैं। इससे महिलाओं को गांव के कार्यक्रमों में सक्रिय भूमिका निभाने का अवसर मिला है। मंडल द्वारा धार्मिक कार्यक्रमों के साथ-साथ सामाजिक और शैक्षणिक गतिविधियों का भी आयोजन किया जा रहा है। विद्यार्थियों के लिए वाद-विवाद प्रतियोगिताएं, आनंद मेला और सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए गए। कीर्तन और और जादू जादू के कार्यक्रमों के माध्यम से अंधविश्वास निर्मूलन और विज्ञान आधारित सोच पर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित किए गए।

'एक गाव एक दुर्गा' संकल्पनेतून निलज गावाचा सामूहिक सहभागदुर्गोत्सवाचे चौथे वर्ष; सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोडकर...
01/10/2025

'एक गाव एक दुर्गा' संकल्पनेतून निलज गावाचा सामूहिक सहभाग

दुर्गोत्सवाचे चौथे वर्ष; सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोड

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील निलज बु सार्वजनिक गावात संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळाकडून यंदा चौथ्या किल्ल्याचा देखावा साकारला आहे. या नवरात्रोत्सवात गावात उत्साहाचे, श्रद्धेचे आणि एकोप्याचे वातावरण दिसून येत आहे.

सकाळ-संध्याकाळ देवीची आरती, भजन आणि दांडिया-गरबा यात लहानांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत सर्व जण सहभागी होत आहेत. गावकऱ्यांनी 'एक गाव एक दुर्गा' या उपक्रमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले आहे. त्यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवता संपूर्ण गाव उत्सवात सहभागी होत आहे.

या उत्सवातून महिलांना स्वतःची कला आणि क्षमता दाखवण्यासाठी मंच मिळाला आहे. महिला भजन, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. यामुळे महिलांना गावाच्या कार्यक्रमांत सक्रिय भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे.

युवकांचा पुढाकार

सार्वजनिक संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून गावातील युवकांनी नियोजन, आयोजन आणि कार्यक्रमांच्या व्यवस्थापनात मोठा वाटा उचलला आहे. सजावट, पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर, स्वच्छता याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले जात आहे.

यंदाही परंपरा कायम

मंडळाच्यावतीने नवरात्र उत्सवाची सांगता दरवर्षी पारंपरिक पद्धतीने केली जाते. देवीचे विसर्जन गावकरी सामूहिकरीत्या पारंपरिक पद्धतीने भजन करत, मंगल वातावरणात पार पाडतात. यावेळी महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. तबला, पेटी व टाळ्यांच्या गजरात, 'जय माता दी'च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून निघते. श्रद्धा आणि संस्कृती जपतानाच गावाच्या एकोप्याचा हा क्षण सर्वांना भावतो. उत्सवाची सांगता भजन-कीर्तनाच्या वातावरणात होणार आहे.

नऊ दिवस विविध उपक्रमांची होतेय रेलचेल

मंडळाने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा, आनंद मेला, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या गेल्या. अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञानाधारित विचारसरणी यावर, कीर्तन, जादूच्या कार्यक्रमातून मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमांत गावकऱ्यांचा सहभाग दिसून येत आहे.

"एक गाव - एक दुर्गा" संकल्पनेतून गावाचा सामूहिक सहभागनिलज बु. येथील नवरात्रोत्सवाचे चौथ्या वर्षात पदार्पण; धार्मिकतेसोबत...
01/10/2025

"एक गाव - एक दुर्गा" संकल्पनेतून गावाचा सामूहिक सहभाग

निलज बु. येथील नवरात्रोत्सवाचे चौथ्या वर्षात पदार्पण; धार्मिकतेसोबत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोड

भंडारा : मोहाडी तालुक्यातील निलज बु. गावात सार्वजनिक संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळाकडून यंदा चौथ्या वर्षी नवरात्र उत्सव साजरा होत आहे. यंदा मंडळाने किल्ल्याचा देखावा साकारला आहे. या नवरात्रोत्सवात गावात उत्साहाचे, श्रद्धेचे आणि एकोप्याचे वातावरण दिसून येत आहे.

सकाळ-संध्याकाळ देवीची आरती, भजन आणि दांडिया-गरबा यात लहानांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत सर्व जण सामील होत आहेत. गावकऱ्यांनी “एक गाव – एक दुर्गा” या उपक्रमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले आहे. त्यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवता संपूर्ण गाव उत्सवात सामील होत आहे.

या उत्सवातून महिलांना स्वतःची कला आणि क्षमता दाखवण्यासाठी मंच मिळाला आहे. महिला भजन, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. यामुळे महिलांना गावाच्या कार्यक्रमांत सक्रिय भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे.

युवकांचा पुढाकार

सार्वजनिक संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून गावातील युवकांनी नियोजन, आयोजन आणि कार्यक्रमांच्या व्यवस्थापनात मोठा वाटा उचलला आहे. सजावट, पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर, स्वच्छता याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले जात आहे.

सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम

मंडळाने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा, आनंद मेला, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या गेल्या. अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञानाधारित विचारसरणी यावर, कीर्तन, जादूच्या कार्यक्रमातून मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमांत गावकऱ्यांचा सहभाग दिसून येत आहे.

मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाची सांगता दरवर्षी पारंपरिक पद्धतीने केली जाते. देवीचे विसर्जन गावकरी सामूहिकरित्या पारंपरिक पद्धतीने भजन करत, मंगल वातावरणात पार पाडतात. या वेळी महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. तबला, पेटी व टाळ्यांच्या गजरात, “जय माता दी”च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून निघते. श्रद्धा आणि संस्कृती जपतानाच गावाच्या एकोप्याचा हा क्षण सर्वांना भावतो. यंदाही हीच परंपरा कायम ठेवत उत्सवाची सांगता भजन-कीर्तनाच्या वातावरणात होणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
000

सार्व. संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु.
24/10/2023

सार्व. संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु.

सार्व. संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु. च्या वतीने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
21/10/2023

सार्व. संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु. च्या वतीने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सार्व. संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु. - २०२३ कार्यक्रमांचे नियोजन
16/10/2023

सार्व. संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु. - २०२३ कार्यक्रमांचे नियोजन

आई दुर्गेची आगमन व स्थापना सोहळा संपन्न आज, १५ ऑक्टोबर २०२३ रोजी, भाविक भक्तांच्या उपस्थितीत आई दुर्गेची स्थापना करण्यात...
15/10/2023

आई दुर्गेची आगमन व स्थापना सोहळा संपन्न

आज, १५ ऑक्टोबर २०२३ रोजी, भाविक भक्तांच्या उपस्थितीत आई दुर्गेची स्थापना करण्यात आली. या सोहळ्याला सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

आज सायंकाळी, आईच्या मंडपात विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर, आई दुर्गेची मूर्ती मंडपात घट (ज्योती कलश) स्थापित करण्यात आले.

या सोहळ्यानिमित्त, आम्हा सर्वांनी आई दुर्गेच्या चरणी प्रार्थना केली की, ती आम्हा सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्रदान करो.

आई दुर्गे, आम्हाला तुमच्या कृपेने आशीर्वाद दे.🙏

तरुणांनी जोपासली पायी वारीची परंपरा१० तरुणांनी शनिवारी घेतले  जागृत चांदपूरच्या हनुमंतांचे दर्शनमोहाडी : आजच्या तंत्रज्ञ...
10/10/2022

तरुणांनी जोपासली पायी वारीची परंपरा

१० तरुणांनी शनिवारी घेतले जागृत चांदपूरच्या हनुमंतांचे दर्शन

मोहाडी : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पायी चालणे म्हटले की, सर्वांच्या नाकीनऊ येतात. मुलगा मोठा झाली की , दुचाकीच्या किल्ल्या त्याच्या हातात पडतात. अशात ३५-४० किलोमीटरचे अंतर सलग चालून पार करणे म्हणजेच जुनाट समजले जाणे. परंतु मोहाडी तालुक्यातील निलज बु येथील १० युवकांनी गावापासून चांदपूरच्या हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी पायी वारी करून जुनी परंपरा जोपासली.

भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रातील खानदेशापासून ते मध्यप्रदेश व छत्तीसगड पर्यंत पसरलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चांदपूर टेकड्यांवर चांदपूर देवस्थान हनुमंताच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराला जवळ जवळ चारशे वर्षांचा इतिहास सांगितले जाते. सातपुडा पर्वत रांगेच्या नैसर्गिक वातावरणात हे मंदिर स्थित आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा गावापासून १०-१२ किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. येथे ठिकाणी हनुमंताची गरुडस्वरूपात असलेली मूर्ती आहे. ही मूर्ती दक्षिण रुपी आहे. या हनुमंताचे दर्शन घेण्याकरिता भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्या सोबतच शेजारी असलेल्या मध्यप्रदेश तसेच छत्तीसगड राज्यातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. परंतु सर्व भक्त दुचाकी, चारचाकी, बसने इथपर्यंत पोहचतात. आजच्या काळात पायी चालणे कोणालाही आवडत नाही. तालुक्यातील ग्रामीण भागातील वयोवृद्ध हनुमंताचे भक्त चांदपूर पर्यंत पायी चालत जाऊन हनुमंताचे दर्शन घ्यायचे; परंतु ही परंपरा आज मोडलेली आहे. आज आपल्या सभोवती पाहिले तर तरुण मोबाईल फोन मध्ये गुंग झालेले दिसतात. त्यांचा सहसा धार्मिक परंपरांवर विश्वास नसतो. स्थानिक परंपरेला राखत नवीन पालवितील १० युवकांनी पायी चालत हनुमंताचे दर्शन घेतले. यासाठी त्यांना सलग ८ तास पायी प्रवास करावा लागला. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सर्व तरुण पाठीवर कपड्यांची भरलेली बॅग, पाण्याची बाटली, छत्री व हातात विजेरी घेऊन निलज बु येथून तुमसर तालुक्यातील चांदपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. निलज बु., देव्हाडा, माडगी, बाम्हणी, कोष्टी, बोरी, उमरवाडा, सीतेपार, मोहगाव (ख), हरदोली, सिहोरा, टेमनी या मार्गाने ३५ किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून सकाळी साडेसहा वाजता चांदपूरात पोहचले. सकाळी तलावाच्या काठावर अंघोळ करून पूजेचे साहित्य खरेदी केले व हनुमंताच्या सकाळच्या सात वाजताच्या आरतीत सहभागी झाले.

वृद्ध व्यति सांगतात की, प्रभू श्रीराम वनवासात असताना रामटेक कडे जाताना चांदपूर येथून गेले होते. सातपुडा पर्वतावर चढतांना पर्वताच्या मध्यभागी हे मंदिर स्थित आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी हनुमान देवस्थान चांदपूर यांच्यावतीने दुरुस्ती करण्यात आलेले तलाव आहे. या तलावामुळे परिसराचे सौंदर्य अधिकच उठून दिसते. परिसरातील भाविक शनिवारी तसेच मंगळवारी हनुमंताचे दर्शन घेण्याकरिता येत असतात. सामान्य भाविकांसोबतच महानायक अभिताभ बच्चन ही या ठिकाणी आले आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल या ठिकाणी येत असतात. मागील काही वर्षे आधी या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावात ग्रीन व्हॅली चांदपूर हा पर्यटन विषयक प्रकल्प तयार करण्यात आला होता. या अंतर्गत येथे विविध पर्यटनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. जसे बोटिंग, खानावळी, विश्राम गृह इत्यादी सोयी सुविधा करण्यात होत्या. सर्व सोयी सुविधांमुळे चांदपुर देवस्थानाला महाराष्ट्र शासनाचा पर्यटन स्थळाचा 'क' श्रेणीचा दर्जा प्राप्त झालेला आहे. चांदपुर देवस्थान हे परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या ठिकाणी परिसरातील नागरिक व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. येथील छोट्या व्यावसायिकांना हनुमान देवस्थान चांदपुर यांच्यामार्फत पक्के गाळे तयार करून देण्यात आले आहेत. हे व्यावसायिक मंदिर परिसरात पूजेच्या वस्तू, खेळणी, प्रसादे, नाश्ता, जेवण, इत्यादी वस्तू विकून स्वतःचा चरितार्थ करत असतात. पहाडावर असलेल्या मंदिरावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत; पण वृद्धांना चढण्यासाठी अडचण होत असल्याने त्यांच्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून मंदिरापर्यंत जाणारा उतरत्या स्वरूपाचा मार्ग तयार करण्यात आला आहे.

३५-४० किलोमीटरचे अंतर पायी चालून पार करतांना तरुणांना अनेक शारीरिक अडचणी आल्या; परंतु अडचणींना न जुमानता त्यांनी हनुमंताचे दर्शन घेतलेच. या आधी सर्वप्रथम निलज बु येथील हभप धनराज गाढवे महाराज यांनी चांदपूरच्या पायी वारीला सुरुवात केली व नंतर अनेकांनी हनुमंताची पायी वारी केली आहे. कोणी म्हणतात, शनिवारी हनुमंताची पायी वारी केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील; परंतु तरुणांशी या बाबतीत विचारनाकेली असता असे काहीही जाणवले नाही. फक्त मानसिक शांती व समाधान यासाठी त्यांनी ही पायी वारी केली. या तरुणांमध्ये चंद्रशेखर डोळस, अक्षय माटे, अरविंद कांबळे, निशार ईश्वरकर, रामेश्वर बोंदरे, भूषण गाढवे, आशिष आंजनकार, शुभम ईश्वरकर, आयुष माटे अन्य तरुणांचा सहभाग होता. यांनंतरही अन्य तरुण व ग्रामस्थ या पायी वारीसाठी परावृत्त होतील, अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली.
000

Address

Nilaj Bk Post Navegaon Subdistrict Mohadi District Bhandara
Mohari
441905

Telephone

+917498261643

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सार्व. संस्कृती नवदुर्गा उत्सव मंडळ, निलज बु. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share