13/12/2023
प्रभु बोले संदेष्टास माझा कुठे निवास ॥
सेवक दावीद ह्यास सांग बांधावयास निवास ॥
दावीद निघाला घेवूनी वचन
नच बांधिता आले भवन ॥
मुलास केले आर्शिवादीत
बांधण्यास घेतले निवास ॥
जो करितो पश्चताप जाईल त्याचा शाप करुणियां प्रार्थना समर्पण केले भवन ॥
कोष देवाचा भवन याच्या उपस्थितीचा
पुत्राने केले स्वच्छ सुंदर म्हणुनी
माझ्या पित्याचे निवास ना की गुहां लुटांची ॥
पाठविले १२ / ७२ देऊनी आर्शिवाद ॥
जग जिंकले घेऊनी ब्रिद
करूनी चमत्कार घेऊणि पवित्रआत्मा बांधूनी माणसे
ख्रिस्त आरोळी मारीली जगाने ॥
करूनी नाश शापाचा बांधिले मंदिर देवून नाव शिष्यांचे ॥
निस्वार्थ , धिट , घेवूनी हाती मशाल जिंकण्याची ॥
आले देशो माझ्या भारत वर्षा देवुनी आहुती केले काम स्वर्गियाचे ॥
संत बार्णबा नामे बांधिली मंदीर विश्वासणाऱ्यांचे ॥
दिला वारसा पुढे सरसावला केला मोठा विस्तार १९५२ ला ॥
नमन त्या सेवकांना विश्वासणा ऱ्यांना साजरा करू विस्तार दिन संत बार्णबाचा ॥
आनंद उत्सव देवो करुनी पुर्ण ब्रिद व ईच्छा परेशाची ॥
कवी रेव्ह फिलीप पि.वी