आम्ही मांडवेकर

आम्ही मांडवेकर आम्ही मांडवेकर
मु पो-मांडवे
ता-खटाव
जि-सातारा
पिन कोड-415506 आपल्या मांडवेकरांसाठी बनवलेले हक्कांचे फेसबुक पेज..

18/01/2022

महाराष्ट्रात आजपासून 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43 सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.
तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.
महाराष्ट्र सरकारची वेबसाईट

www.aaplesarkar.maharashtra.gov.in

वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली.

या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...
महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.
या सेवांचा आहे समावेश....

• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
• मिळकतीचे प्रमाणपत्र
• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
• पत दाखला
• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
• भूमिहीन प्रमाणपत्र
• शेतकरी असल्याचा दाखला
• सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
• जन्म नोंद दाखला
• मृत्यु नोंद दाखला
• विवाह नोंदणी दाखला
• रहिवाशी प्रमाणपत्र
• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
• हयातीचा दाखला
• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
• निराधार असल्याचा दाखला
• शौचालयाचा दाखला
• विधवा असल्याचा दाखला
• दुकाने आणि अस्थापना नोंदणी
• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
• सेवानियोजकाची नोंदणी
• शोध उपलब्ध करणे
• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा..तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड
'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.
सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.

*कृपया जास्तीत जास्त शेअर करा*

आपले सरकार मुंबई वाई-फाइ

08/01/2018
✌
01/10/2017

29/09/2017
जगाचा पोशिंदा पहिल्यादांच संपावर चालला आहे त्याला साथ द्या मित्रांनो
31/05/2017

जगाचा पोशिंदा पहिल्यादांच संपावर चालला आहे त्याला साथ द्या मित्रांनो

25/05/2017

मांडवे गाव हे सातारा जिल्ह्यात एकमेव असे गाव आहे ज्या गावात चुकीचे SpeedBreaker लावले असल्याने २०+ अपघात व ४ पेक्षा जास्त महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे..आणि विशेष म्हणजे सदर SpeedBreaker बेकायदेशीर आहेत असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जातेय...ज्यांना हा SpeedBreaker लावन्याचा आणि गावाच भल करण्याची काळजी होती त्यांनी याचा विचार करावा की त्या महिला गेल्यावर त्याच्या घराची काय अवस्था झाली असेल ? त्यांची चूक नसतानाही त्यांना जीव गमवावा लागला आहे..एक तर ज्यांनी तो टाकला आहे त्यांनी तो काढावा अथवा ग्रामपंचायत यांनी त्याकडे लक्ष द्यावे. नाहीतर याच पाप गावाला फेडायला लागायच..उद्या मांडवे गावातील कोणासोबतही असे होवू शकते 😔

स्वगतोत्सुक - आम्ही मांडवेकर फेसबुक संचालक team व समस्त मांडवेकर ग्रामस्त....!Team Member -Sachin DholeAjay S. Khade
10/04/2017

स्वगतोत्सुक - आम्ही मांडवेकर फेसबुक संचालक team व समस्त मांडवेकर ग्रामस्त....!

Team Member -
Sachin Dhole
Ajay S. Khade

05/12/2016

111 likes thanq guys
Keep supporting

Congratulations Pruthviraj Arjun Patil for winning Bronze Medal in74 Kg State Level School wrestling championship, we al...
19/10/2016

Congratulations Pruthviraj Arjun Patil for winning Bronze Medal in74 Kg State Level School wrestling championship, we all are proud of you. Best luck for your journey.. This is just start . I am confident you will achieve more height in coming future..💐💐💐💐💐💐💐💐💐💐

उरी मधील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याने हि गमावला एक तारामाण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र अन लष्करातील लान्स नायक चंद्रक...
19/09/2016

उरी मधील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याने हि गमावला एक तारा

माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र
अन लष्करातील लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे
काश्मीर खोऱ्यात शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

उरीमध्ये रविवारी भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सतरा जवान शहीद झाले.
त्यात महाराष्ट्राचे तीन जवान असल्याची माहिती रात्री उशीरा समजली.
माण तालुक्यातील जाशी येथील चंद्रकांत शंकर गलांडे हेही शहीद झाल्याची बातमी गावात पोहोचली,
तेव्हा साऱ्यांचीच पावले त्यांच्या घराकडे वळाली.

शहीद चंद्रकांत यांचे इतर दोन भाऊ मंज्या बापू अन केशव हेही लष्करातच सेवेला आहेत.
गावालगतच्या शेतात त्यांची स्वतंत्र वस्ती असून तिथे पत्नी अन दोन मुलांसह कुटुंब राहते.
माण तालुक्यातील अधिकारी अन पदाधिकारी गावात पोहोचले असून पार्थिव पुण्याहून तालुक्यात आणले जाणार आहे.

Address

Vaduj/Dhaiwadi Road
Mandve
415506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही मांडवेकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category