Dahagaon

Dahagaon Dahagaon is a village located in near Mandangad District-Ratnagiri...

08/05/2026

*लाल बहादूर शास्त्री हायस्कूल, दहागांव येथील एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२६ मध्ये शाळेचा १००% निकाल लागल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षकवृंद व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन..!*

07/07/2025

महत्वाचं...

आपल्या दहागाव चा सुपुत्र कु. कौस्तुभ भरत मोरे हा राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. आपल्या सर्वांसाठीच ही गर्...
13/05/2025

आपल्या दहागाव चा सुपुत्र कु. कौस्तुभ भरत मोरे हा राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

आपल्या सर्वांसाठीच ही गर्वाचीच बाब आहे. त्याचे व पालकांचे खूप खूप अभिनंदन. त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

13/05/2025

*!! अभिनंदन... अभिनंदन... अभिनंदन !!*

शैक्षणिक जीवनातील आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे दहावी (SSC) परीक्षा. आज विभागातील दहावीच्या (SSC) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा... 💐💐

तुम्ही मिळविलेले टक्के हे पुढील शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे तर आहेतच, पण आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत, तुमचे शिक्षकवर्ग, खासगी क्लासमधील शिक्षक यांनी तुमच्या यशासाठी घेतलेली मेहनत आज सफल झाल्याचे समाधान त्यांना तर असणार पण तुमच्या आईवडिलांची त्यांच्या पालकत्वाच्या जबाबदारीतील एक महत्वाचा टप्पा तुम्ही पार करून त्यांना समाधान मिळवून दिलात ही फारच अभिमानाची बाब आहे म्हणून तुमच्या बरोबर तुमच्या आईवडिलांचे प्रथम मनपूर्वक अभिनंदन... 💐💐
आजच्या ह्या आनंदाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन... 🙏
तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि तुमच्यासाठी आईवडिलांच्या पुढील धडपडीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा... 💐💐💐

*मित्रांनो,*आपणास कळविण्यास अभिमान वाटतो की,  *एस एस सी बोर्ड परिक्षा २०२५*- या आज निकाल जाहीर झालेल्या परिक्षेत लाल बहा...
13/05/2025

*मित्रांनो,*
आपणास कळविण्यास अभिमान वाटतो की,
*एस एस सी बोर्ड परिक्षा २०२५*- या आज निकाल जाहीर झालेल्या परिक्षेत लाल बहादूर शास्त्री हायस्कूल - दहागावचा ९७/९५ टक्के निकाल लागला आहे.
या उत्तीर्ण विद्यार्थ्यामध्ये तीन मुलींनी टाॅपर्स मध्ये बाजी मारली आहे.
***** प्रथम-*****
*कु. वंशिका दिपक कांबळे -९२%*
*********** *द्वितीय-**********
कु. *सानिया रोहिदास चव्हाण -९०.६०%*
************ *तृतीय-* *********
*कु. ईश्वरी गजानन तांबुटकर ८४.८०%*

वरील टाॅपर्सचे तसेच उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींचे *एलबीएसएच मंचातर्फे मनपूर्वक अभिनंदन तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी भरभरून हार्दिक शुभेच्छा*. 💐💐💐👏👏👏🙏🙏🙏

आग्रहाचे आमंत्रण... 🙏🏼
12/05/2025

आग्रहाचे आमंत्रण... 🙏🏼

"चव्हाटा " आज ही आपल्या गावची जाणती माणसं गावच्या चालीरीती जपून, गावचं गावपण टिकवून ठेवत आहेत. पोस्ट साभार : रंजन दळवी ग...
02/04/2025

"चव्हाटा "

आज ही आपल्या गावची जाणती माणसं गावच्या चालीरीती जपून, गावचं गावपण टिकवून ठेवत आहेत.

पोस्ट साभार : रंजन दळवी गुरुजी 🙏🏼

आपल्या आजूबाजुला पण लक्ष ठेवा...  पैशासाठी कोकण परस्पर विकून पण टाकतील...
05/03/2025

आपल्या आजूबाजुला पण लक्ष ठेवा... पैशासाठी कोकण परस्पर विकून पण टाकतील...

गावात घर नसताना परप्रांतीय व्यक्तीला घरपत्रक उतारा मिळालाच कसा ?
गोळवण गावात एका परप्रांतीय व्यक्तीला दिलेल्या घर पत्रक उताराच्या विषयावरून वातावरण तापले आहे. गुरुवारी सर्वपक्षीय ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालवर धडक देत तक्रार दाखल केली आहे. यां प्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर तसेच संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

दरम्यान तहसीलदार वर्षा झालटे यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीवर संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात येईल त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांनी गोळवण ग्रामपंचायतच्या कारभारावरही अनेक सवाल उपस्थित केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी तहसीलदारांची भेट घेत गोळवण ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. जर चुकीच्या
पद्धतीने परप्रांतीय व्यक्तींना घरपत्रक उत्तारा आणि आश्रय देण्यात येत असेल तर संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका सामंत यांनी मांडली. यावेळी ग्रामस्थांनी सामंत यांच्या भूमिकेला समर्थन देत कडक कारवाई करण्याची मागणी केली. सकल हिंदू समाजाच्यावतीने

गोळवण ग्रामस्थांना पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनात सहभाग घेण्यात आला होता. यावेळी भाऊ सामंत, विलास हडकर, अवी सामंत, अनिकेत फाटक, बाबी जोगी, प्रसाद आडवणकर, दिपक पाटकर, भाऊ मोरर्जे, हरेश फडते, महेश जुवाटकर तसेच इतरही उपस्थित

होते. परप्रांतीय व्यक्तीला दिलेले रेशन कार्ड कशाप्रकारे देण्यात आले. यासाठी दाखल केलेली कागदपत्रे कोणी कोणी बनवून दिली. कोणती कागदपत्रे योग्य आहेत. कोणती कागदपत्रे बोगस बनवण्यात आली. याची शहानिशा करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रकरण सादर करण्यात येईल आणि अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे यावेळी तहसीलदारानी स्पष्ट केले.

गोळवण गावातील परप्रांतीय व्यक्तीकडे रेशन कार्ड आणि त्याला धान्य मिळू लागल्याची माहिती मिळताच लोकांकडून झालेल्या उठावामुळे परप्रांतीय व्यक्तीने जबरदस्तीने ताबा घेतलेल्या घरातला ताबा पुन्हा घरमालकाने घेतला आहे. तसेच सध्या तो पळून गेला आहे. परप्रांतीय व्यक्तीचा शोध घेऊन त्याचे मोबाईल लोकेशन चेक करून त्याच्यावर बोगस कागदपत्रे निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांनां शिवमय शुभेच्छा. श्री उत्तरेश्वराची कृपा तूम्हा सर्वांवर सदैव राहो 🙏🏼हर हर महादेव.
26/02/2025

महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांनां शिवमय शुभेच्छा.

श्री उत्तरेश्वराची कृपा तूम्हा सर्वांवर सदैव राहो 🙏🏼

हर हर महादेव.

13/02/2025

मराठी बांधव का बरं एकाकी होत असावा?
कोकणात
हापुस आंब्याच्या बागांमध्ये एक लाख नेपाळी काम करतात !
मच्छीमार बांधवांच्या बोटींवर हजारो
ओरिसा छत्तीसगड मधील तरुण काम करतात !

पर्यटन उद्योजकांच्या हॉटेल रिसॉर्टवर हजारो गढवाली तरुण काम करतात !

बांधकाम उद्योगांमध्ये बीड मराठवाडा कर्नाटक मधील तरुण काम करतात !

बेकरी व्यवसाय, पायनापल रबराची शेती केरळ मधील लोक करतात.!

5000 कोटीचा हापूस आंबा कोकणा बाहेरील दलाल विक्री करतात !

15000 कोटीचे कोकणातील मासे उत्तर भारतीय विक्री व्यवस्था सांभाळतात !

काजूची प्रक्रिया चंदगड आणि भुदरगड पश्चिम महाराष्ट्रात होते !

शासकीय इमारती पूल रस्ते दक्षिण भारतातील कॉन्ट्रॅक्टर बांधतात !

स्वीट मार्ट दुकाने, आईस्क्रीम चे दुकाने, बिल्डिंग मटेरियल चे मोठमोठे मॉल्स गुजराती आणि मारवाडी येऊन उभे करतात !

हे लोक आपल्या राज्यातून येऊन आपल्या मुलांना मराठी माध्यमांमध्ये शाळेत शिकवतात, इथल्या मातीशी एकरूप होतात आणि त्या मातीतून रोजगार निर्माण करतात ! त्यांना मुलांचे चांगले शिक्षण व्हावे म्हणून कोकणातील गाव सोडावे वाटत नाही.
खेड्यात रोजगार नाही म्हणून नागपूर मुंबई पुण्यात चाललो असे ते म्हणत नाहीत.
कुही (तालुका )या छोट्या शहरात मारवाडी व गुजराती कुटुंब आहेत सगळे व्यवसायात आहेत
त्यांचे मुल नातवंडं यांची लग्न इथेच होतात आणि त्यांची मुलं मुली आनंदाने ग्रामीण जीवन स्वीकारतात.

त्यांना शिव्या देणं सोप आहे. पण त्यांचे अनुकरण करणे कठीण आहे.

दुसरीकडे स्थिती काय ?

आम्ही म्हणतोय चांगल्या शाळा नाही मुलांचे चांगले शिक्षण व्हावे म्हणून आम्ही शहरात जातो.
गावात रोजगार आणि उद्योग नाहीत म्हणून आम्ही शहरात जातो. शहरासारख्या सुविधा गावात नाहीत म्हणून आम्ही शहरात जातो.
इथे चांगली हॉस्पिटल नाहीत म्हणून आम्ही शहरात जातो.

शहरात जाऊन राहतो कुठे घाटकोपर भांडुप कळवा दिव्याच्या डोंगरावर. आणि झोपडपट्ट्यांमध्ये. 20 टक्के कोकणवासीय चांगले आयुष्य जगत आहेत अन्यथा 80 टक्के कोकणातील तरुण बारा हजार पंधरा हजार वीस हजार रुपयांच्या नोकऱ्या मुंबईत करून किडा मुंग्यांसारखे बदलापूर ते सीएसटी आणि विरार ते चर्चगेट असा रोज प्रवास करतात .
सकाळी रेल्वेने ऑफिसला येणे आणि संध्याकाळी परत जाणे यात जेवढे परिश्रम पडतात इतकी मेहनत कोकणात आपल्या गावात घेतली तर पंधरा ते वीस हजार रुपये मिळू शकतात.
ज्यांना चांगले पगार आहेत, मोठ्या नोकरी आहेत मुंबईत चांगली घरे आहेत त्यांनी मुंबईत राहावे पण.
दहा बारा पंधरा वीस हजार च्या नोकऱ्यांसाठी आपण मुंबईत राहण्याचा चाकरमानी होण्याचा अट्टाहास कशासाठी.
कोकणातल्या नव्या पिढीला चाकरमानी नवरे हवेत आणि कळव्याच्या डोंगरावर दहा बाय दहाची खोली हवी कशासाठी ?

चाकरमानी मानसिकता यावर खूप काम करावे लागणार आहे.

लाखो परप्रांतीयांना कोकणात रोजगार मिळतो व्यवसाय मिळतो उद्योग मिळतात पण आम्हाला मिळत नाहीत. आमची गावे रिकामी झाली आमच्या शाळा रिकाम्या झाल्या गावात रहायला तरुण नाहीत ,गावांचे वृद्धाश्रम झाले मित्रांनो कुठेतरी काहीतरी चुकतंय.

आपल्या नियोजनात आपल्या विकासाच्या संकल्पनांमध्ये काहीतरी गडबड आहे. गावा गावातील आणि तालुक्यातील विकासपुरुष कार्यसम्राट यांचा सुद्धा काहीतरी चुकतंय.

हो यावरच काम करायला हवं मानसिकता बदल हा सगळ्यात मोठा विषय आहे.

©Redit साठी कृपया msg करावा

Address

Mandangad/dapoli Road
Mandangad
415203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dahagaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share