Tarkarli.com

Tarkarli.com निसर्गकन्या "तारकर्ली"

महाराष्ट्राचे वरदान असलेल्या प्रचंड लांबीच्या कोंकण किनाऱ्यावर भ्रमंतीचा योग जुळून आल्यास मालवण शहरानजीकच्या तारकर्ली गावाला अवश्य भेट द्या आणि आयुष्यातील निदान एक रात्र निसर्गाच्या व सागराच्या सानिध्यात व्यतीत करा. मालवण पासून साधारण ७ कि.मी.वर असलेल्या नयनरम्य तारकर्ली गावातील निसर्ग पहाताना, स्कुबा डायव्हिंग करताना आणि जिभेचे चोचले पुरवताना मिळणारा आनंद तुमची रात्र नक्कीच स्मरणीय करील.

कोंकण क

िनाऱ्यावर फिरताना तेथील सागर-पुत्र अर्थात कोळी समाजाची जीवन शैली जाणून घेणे हा एक रंजक अनुभव असेल. तारकर्ली, महाराष्ट्रातील एक सुंदर गाव तुम्हाला तो अनुभव देण्यास सुसज्ज आहे. पर्यटकांसाठी तारकर्ली येथे विवीध प्रकारची जेवणा-खाण्याची व राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. येथील अनेक बीच रिसोर्ट, हॉटेल्स, खाजगी पर्यटक निवास, MTDC बीच रिसोर्ट मधून तुमच्या खिशाला परवडणारा निवास तुम्ही निवडू शकता. बरीचशी हॉटेल्स व बीच रिसोर्ट खरोखरच किनाऱ्यावर वसलेली आहेत, पर्यटकांना अगदी २४ तास सागर दर्शन करणारी. विशेष सेवा सुविधा व आराम यांच्या शोधात असल्यास तुम्ही MTDC बीच रिसोर्टच्या झोपड्या (Konkani Huts) निवडू शकता. तारकर्ली येथील समुद्राकडे जाणाऱ्या लांबच लांब रस्त्याच्या दुतर्फा, अगदी घराघरात जेवणाची व्यवस्था होऊ शकते, चक्क घरगुती जेवण कारण इथे अजूनतरी तेवढा व्यावसाईकपणा आलेला नाही.

30/04/2023

गाबीत नौकानयन स्पर्धेचा अनोखा थरार...

आता हवेत उडा IRON MAN सारखं महाराष्ट्रातील पाहिलं आणि एकमेव फ्लाय बोर्ड डेस्टिनेशन...... तारकर्ली मध्ये सुरु
28/12/2022

आता हवेत उडा IRON MAN सारखं

महाराष्ट्रातील पाहिलं आणि एकमेव फ्लाय बोर्ड डेस्टिनेशन...... तारकर्ली मध्ये सुरु

27/09/2022

पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

07/01/2019

#आनंदोत्सव
तारकर्ली ग्रामस्थ वार्षिक स्नेह संमेलन २०१९
#आयोजक - अखिल तारकर्ली ग्रामविकास मंडळ मुंबई

22/10/2018

Address

At Post-Tarkarli, Taluka/Malvan, Dist/Sindhudurg, State/
Malvan
416606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tarkarli.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category