30/07/2024
माजी विद्यार्थ्यांना नम्र निवेदन!
सरस्वती मंदिरच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आमच्या शाळेला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या विशेष प्रसंगी शाळेतर्फे अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उत्सवात सर्व माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यासाठी एक विशेष Telegram चॅनल तयार करण्यात आले आहे.
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चैनल जॉईन करू शकता.
https://t.me/shardotsav2024
या चॅनलमध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजनासंबंधी सर्व सूचना दिल्या जातील. आपण सर्वांनी ग्रुपमध्ये सामील होण्याची विनंती आहे, जेणेकरून आपणास कार्यक्रमांच्या सर्व ताज्या घडामोडींची माहिती मिळेल आणि आपण त्यात सहभागी होऊ शकाल.
तसेच, आपण जर कुठल्याही माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असाल तर कृपया हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून अधिकाधिक माजी विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होऊ शकतील.
धन्यवाद 🙏🏾💐