श्री निळकंठेश्वर संस्थान निळकंठ

  • Home
  • India
  • Latur
  • श्री निळकंठेश्वर संस्थान निळकंठ

श्री निळकंठेश्वर संस्थान निळकंठ धर्मो रक्षति रक्षित: गावचा विकास हाच आमचा ध्यास

10/08/2025
लातुर तालुक्यातील श्री निळकंठेश्वर देवस्थान,  तीर्थस्थळांस ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकतेच राज्यशासनाकडून...
24/07/2024

लातुर तालुक्यातील श्री निळकंठेश्वर देवस्थान, तीर्थस्थळांस ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकतेच राज्यशासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. तीर्थक्षेत्र विकास झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहिर करण्यात आला आहे. श्री निळकंठेश्वर देवस्थान येथे स्वयंभू शिव व शक्ती दोन पिंड विराजमान आहेत. हे खूप दुर्मिळ आहे.

महाराष्ट्राभरातून भाविकभक्त याठिकाणी श्रद्धेने येत असतात. शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्री क्षेत्र निळकंठेश्वर देवस्थानाला ‘ब’ दर्जा द्यावा यासाठी अनेक वर्षांपासून भाविकांसह परिसरातील नागरीकांची मागणी होती. जिल्ह्याच्यादृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या निळकंठेश्वर देवस्थानाचा विकास तीर्थस्थळाच्या ‘ब’ दर्जामुळे करता येईल.

सदर देवस्थानास ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू होते. आणि त्यास अखेर यश येऊन ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. याकामी, जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन, विधान परिषदेचे आमदार श्री रमेशआप्पा कराड साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांचा ‘ब’ दर्जा प्राप्त होण्यास अत्यंत मोलाचा वाटा व सहभाग आहे, ‘ब’ दर्जा प्राप्त होण्यासाठी आवश्यक ती कागदपत्र पुर्तता करण्यासाठी अदृश्य शक्तीने खूप खूप परिश्रम घेतले आहे. त्यासाठी त्यांचे निळकंठेश्वर देवस्थान व सर्व भाविकांच्या वतीने मी मनापासून खूप खूप आभार मानतो🙏

30/08/2023
आजचे महापूजा
30/08/2023

आजचे महापूजा

श्रीक्षेत्र निळकंठेश्वर संस्थान निळकंठ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बेल वृक्ष उद्यान समारंभामध्ये लातूर जिल्ह्याच...
28/08/2023

श्रीक्षेत्र निळकंठेश्वर संस्थान निळकंठ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बेल वृक्ष उद्यान समारंभामध्ये लातूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाजी ठाकूर-घुगे मॅडम यांनी 111 बेल वृक्षारोपण करून उद्यानाच्या शुभारंभ केला . श्री निळकंठेश्वराची मनोभावे पूजा केली. त्याबद्दल श्री निळकंठेश्वर संस्थान निळकंठ, खूप खूप आभारी आहे🙏

पवित्र श्रावण सोमवार दि.२८ ऑगस्ट रोजीची महापूजा. व बेल वृक्ष उद्यान शुभारंभ लातूरच्या नूतन कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री...
26/08/2023

पवित्र श्रावण सोमवार दि.२८ ऑगस्ट रोजीची महापूजा. व बेल वृक्ष उद्यान शुभारंभ लातूरच्या नूतन कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाजी ठाकूर-घुगे मॅडम हस्ते व्हावी, असा आग्रह मंदिर समितीने व ग्रामस्थांनी केला होता. श्री निळकंठश्वराच्या महापूजेसाठी निमंत्रण दिले . व जिल्हाधिकारी मॅडम कडून निमंत्रणाचा मोठ्या मनान स्वीकार करण्यात आला . त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनमोल सागरजी , उपविभागीय अधिकारी श्रीमती नरे मॅडम, तहसीलदार श्री गणेश सरवदेजी, आधार फाउंडेशन चे अध्यक्ष श्री प्रवीणजी पाटील उपस्थित राहणार आहेत तरी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे ही विनंती🙏 कार्यक्रम स्थळ-निळकंठेश्वर देवस्थान निळकंठ, कार्यक्रमाची वेळ ठीक: 8:15 वाजता

श्री क्षेत्र निळकंठेश्वर देवस्थान  निळकंठ आजची पहिल्या श्रावण सोमवारची श्रींची महापूजा!! नमो पार्वती पतये शिव हर हर हर म...
21/08/2023

श्री क्षेत्र निळकंठेश्वर देवस्थान निळकंठ आजची पहिल्या श्रावण सोमवारची श्रींची महापूजा
!! नमो पार्वती पतये शिव हर हर हर महादेवाय नमो नमः !!

Address

Nilkanth, Latur
Latur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919823853892

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री निळकंठेश्वर संस्थान निळकंठ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category