Mahikavati Mandir

Mahikavati Mandir Mahikavati Devi Mandir is one of the oldest temple in Palghar district. But Hanuman saved their life by killing Ahiravan and his army. Vibhishana says, "Alas!

In the Krittivasi Ramayan, Ahiravan (Ahiravan or Mahiravan), brother of Ravana, was a rakshasa who secretly carried away Rama and his brother Lakshmana to the nether-world, consulted his friends and decided to sacrifice the life of the two divine brothers at the altar of his chosen deity, goddess Mahikvati. In the Ramayana, during the battle between Rama and Ravana, when Ravana’s son Indrajit is k

illed, Ravana calls his brother Ahiravana for help. Ahiravana, the king of Patala (the Underworld), promises to help. Vibhishana somehow manages to hear about the plot and warns Rama about it. Hanuman is put on guard and told not to let anyone into the room where Rama and Lakshmana are. Ahiravana makes many attempts at entering the room but all of them are thwarted by Hanuman. Finally, Ahiravana takes the form of Vibhishana and Hanuman lets him enter. Ahiravana quickly enters and takes the “sleeping Rama and Lakshmana” away. When Hanuman realizes what has happened, he goes to Vibhishana. They have been abducted by Ahiravana. If Hanuman does not rescue them fairly quickly, Ahiravana will sacrifice both Rama and Lakshman to Chandi." Hanuman goes to Patala, the door to which is guarded by a creature, who is half Vanara and half reptile. Hanuman asks who he is and the creature says, "I am Makardhwaja, your son!" Hanuman is confused since he did not have any child, being an adept Brahmachari. The creature explains, "While you were jumping over the ocean, a drop of your semen (veeriya) fell to the ocean and into the mouth of a mighty crocodile. This is the origin of my birth." After defeating his son, Hanuman enters Patala and encounters Ahiravana and Mahiravana. They have a strong army and Hanuman is told by Chandrasena that the only way to vanquish them is by blowing out five different candles located in five different directions, all at the same time in return for a promise to be Lord Rama's consort. Hanuman assumes his five-headed form (Panchmukhi Hanuman) and he quickly blows out the 5 different candles and thus kills Ahiravana and Mahiravana. Throughout the saga, both Rama and Lakshmana are rendered unconscious by a spell by the demons.

दिवस ७ , रंग लाल 🔴
12/10/2021

दिवस ७ , रंग लाल 🔴

03/11/2018

Celebrate the magic and joys of Diwali

23/10/2015
19/10/2015

नवरात्री निमित्त विशेष... नक्की वाचा...

श्री महालक्ष्मी अष्टकाची कथा

पूर्वीच्या काळी भल्या पहाटे म्हणजे पंचपंचउषःकाली सर्व योगी, तपस्वी व ऋषीमुनी पृथ्वीवरून देवलोकात महाविष्णूंच्या दर्शनासाठी जात असत.

असेच एकदा, साक्षात शिवअवतार असलेले व अत्रि अनुसयेचे पुत्र श्री दुर्वास महर्षी देवलोकात निघाले होते. महर्षी दुर्वास म्हणजे साक्षात महादेव असून अत्यंत कोपिष्ट होते. ते देवलोकात महाविष्णूंच्या दर्शनासाठी पोहोचले. आपला भक्त आल्याचे पाहून श्रीविष्णूंना अत्यानंद झाला व आनंदाने त्यांनी स्वतःच्या गळ्यातील वैजयंती माला महर्षी दुर्वासांच्या गळ्यात घातली. महालक्ष्मींना आश्चर्य वाटले. माझे पती, मला कधी ती वैजयंती माला दिली नाही आणि आज महर्षी दुर्वासांना दिली. असो. दर्शन घेऊन महर्षी दुर्वास परतीच्या प्रवासाला लागले. महर्षी दुर्वास हे महातपस्वी व साक्षात भगवान शिवशंकरच असल्याने ते पूर्णपणे विरक्त वृत्तीचे होते. त्यांनी ती माळ कोणाला तरी देण्याचे ठरवले. त्या हेतूने ते पहात चालले असता वाटेत त्यांना देवराज इंद्र देवलोकी महाविष्णूंच्या दर्शनाला जात असलेले आढळले. त्यांनी स्वतःच्या गळ्यातील ती वैजयंती माला इंद्रदेवांना दिली व ते निघून गेले. इंद्रदेवांनी विचार केला की, 'अगोदरच आपल्या खजिन्यात इतक्या किमती माळा धूळ खात पडल्या आहेत; त्यात हीची भर कशाला?' असा विचार करून त्यांनी ती माळ आपल्या ऐरावताच्या गळ्यात घातली.
हे सर्व महालक्ष्मी पहात होत्या. आपल्या पतिच्या गळ्यातील वैजयंती माला इंद्रदेवांनी ऐरावताच्या गळ्यात घातली हे पाहून महालक्ष्मी इंद्रदेवांवर प्रचंड संतापल्या व त्यांनी रागाने तोंड फिरवले. कारण पतीचा अपमान पत्नीला कधी सहन होत नाही.

साक्षात महालक्ष्मीच रागावल्यामुळे इंद्राचे सारे वैभव एका क्षणात नाहीसे झाले. इंद्र घाबरला. तो श्री विष्णूंकडे क्षमायाचना करू लागला. विष्णू म्हणाले की तू महालक्ष्मीची क्षमा माग. तेव्हा इंद्र म्हणाला की मला देवींची भिती वाटते. देवींच्या हातात तलवार आहे, शंख, चक्र, गदा आहे. मला फार भिती वाटते. तेव्हा भगवान महाविष्णू म्हणाले, सिंहीणीच्या पिल्लाना सिंहीणीची भिती कधीच वाटत नाही. मुलाने खोडसाळ पण केला तर आई रागावणे सहाजिक आहे. पण माफी मागणे हा त्यावरील उपाय आहे. माफी मागतेवेळी जर मुलाने आईच्या गळ्याला लाडीकपणे जरी मिठी मारली तरी आई त्याचे हात झटकून टाकेल, आईच्या कमरेला मिठी घातली तरी आईचा राग फारसा शांत होणार नाही. पण जर कोणत्या मुलाने जाऊन आईचे पाय धरले तर जगात अशी एकही आई नाही जी त्याला लाथाडेल. महालक्ष्मी तर जगत्जननी आहेत, अखिल विश्वाची ती आई आहे. म्हणून तू जाऊन तिच्या पायाला मिठी मार. त्याप्रमाणे इंद्रदेवांनी आई महालक्ष्मींच्या पायाला मिठी मारली आणि नतमस्तक झाले. तत्क्षणी जगत्जननी जगदंबा महालक्ष्मींच्या डोळ्यातून खळ्ळकन् अश्रू ओघळले. कारण कितीही झालं तरी शेवटी ती आईच आहे. त्यातील दोन अश्रू देवराज इंद्रांच्या मस्तकी पडले. महालक्ष्मींनी इंद्रदेवांना क्षमा केली. तेव्हा इंद्रदेवांना स्फुरलेलं 'श्री महालक्ष्मी अष्टक' जे आज घराघरात म्हटलं जातं.

महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत प्रभावी असून भक्तावरील सर्व प्रकारची संकटे दूर करून संकटांचा सर्वनाश करण्याची शक्ती या स्तोत्रात आहे. हे स्तोत्र अनन्य भावाने म्हटले असता आई जगदंबा प्रसन्न झाल्यावाचून राहणार नाही.

॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥

श्री गणेशाय नमः

नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥

नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥

सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।
मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥

आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥

स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।
महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥

पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥

श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।
जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥

महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः ॥

__//\\____//\\____//\\____//\\__

स्रोत : राशीचक्रकार श्री. शरद उपाध्ये यांच्या 'भविष्यावर बोलू काही' या कार्यक्रमातील एका भागातून

NAVRATRI DAY-2 THIS DAY OF NAVRATRI IS DEDICATED TO GODDESS "BRAMACHARINI"
14/10/2015

NAVRATRI DAY-2
THIS DAY OF NAVRATRI IS DEDICATED TO GODDESS "BRAMACHARINI"

13/10/2015

दुर्गेची नऊ रुपे
🌹🌹🌹
दुर्गेचे पहिले रूप ' शैलपुत्री' या नावाने ओळखले
जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे.
पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म
घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा
आणि आराधना केली जाते. या पहिल्याच
दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला
'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या
दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात
होते.

या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि
डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या
पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची
कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे
नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी
झाला होता.
एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या
यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित
केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले
नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे
समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र
इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ
प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की
प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर
नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना
यज्ञासाठी बोलावले आहे.

परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही.
अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य
वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले
तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा
यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना
भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते.
तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी
जाण्याची परवानगी दिली.

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे
स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची
वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी
देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण
तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते.
नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत
राग आला. तिथे शंकराच्या प्रती
तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून
आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक
शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने
संतप्त झाली आणि शंकरानसांगितले तेच योग्य
होते, असे तिला वाटले
आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची
जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न
झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून
घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर
त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून
प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने
पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या
कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती
'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली.
पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री'
देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला
होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती
शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून
नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि
शक्ती अनंत आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🀊 नवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप
आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे.
ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी.
नवरात्राच्या दुसर्या दिवशी या मातेची
पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन
'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते. या चक्रात
मन स्थिर करणार्याला तिची कृपा आणि
भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे
आणि भव्य आहे.
तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि
डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात
हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला
त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती
म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या
करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या
देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी
असे म्हणतात.
एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या
केली. उपवास काळात तिला ऊन आणि
पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला
होता. या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत
केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस
काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून
दिल्यामुळे तिला 'अपर्णा' हे एक नाव पडले.

अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर
क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून
तिची आई मेना खूप दु:खी झाली होती. तिने
तिला या कठीण तपस्येपासून मुक्त
करण्यासाठी 'उमा' अगं! नको ग नको! अशी
हाक दिली. तेव्हापासून देवी
ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे 'उमा' हे एक नाव
पडले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात
हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या
तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने
तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून
सांगितले, की 'हे देवी! आजपर्यंत इतकी कठोर
तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या
तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी
मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर
तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू
तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती
तुला घ्यायला येतील.' असा वर त्यांनी
दिला.
ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे.
तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप,
त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते.
देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि
सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे
रूप आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दुर्गेच्या तिसर्या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे.
नवरात्रीच्या तिसर्या दिवशी या देवीची
पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी
देखील या दिवशी पूजा केली जाते. या
दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट
होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन
होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा
विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला
येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान
राहण्यासाठी असतात. देवीचे हे रूप परम
शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या
मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे
तीला 'चंद्रघंटा देवी' असे म्हटले जाते.
शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे.
या देवीला दहा हात आहेत. या दहा
हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत.
तीचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी
तयार असते.
माँ चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि
संकट दूर केले जाते. माँ भक्तांच्या संकटाचे
निवारण लगेच करते. तीचा उपासक
सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो.
तीच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे
रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती
पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँ
देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या
देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता
बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण
शरीरात कांती-गुणांची वाढ होते.
आवाजात मधुरता येते. माँ चंद्राघंटाचे भक्त
आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना
पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात.
आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची
उपासना करण्यासाठी तयार व्हा. तीची
उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन
मुक्ती मिळते. आपण नेहमी तीची उपासना
करण्यासाठी अग्रेसर असावे. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ' कुष्मांडा' आहे.
आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न
केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले
जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे
म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक
प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा
म्हणून ओळखले जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची
पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन
'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या
दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने
कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना
केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या
देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची
रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची
आद्यशक्ती आहे.
या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे
निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच
आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे.
तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून
निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि
प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच
आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी
अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे.
तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण,
कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे.
आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन
सिंह आहे.
कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा
होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि
आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न
करण्यासाठी फार काही करावे लागत नाही.
मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला
शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.
कुष्मांडाची उपासना मनु्ष्याला रोगापासून
मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे
घेऊन जाणारी ही देवी आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दुर्गेचे पाचवे रूप ' स्कंदमाता' या नावाने ओळखले
जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची
पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन
'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते. भगवान
स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.
भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही
ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे
सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार
आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला
आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या
या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.
स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या
उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर
उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे.
डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच
खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे
त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग
पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर
विराजमान असते. यामुळे या देवीला
पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह
आहे.

नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात
विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात
स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप
पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन
पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते.
यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने
उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र
होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे.
स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण
होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि
सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी
मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या
उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल
होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी
असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज
प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून
मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून
मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा
चांगला पर्याय दुसरा नाही.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने
ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी
या देवीची उपासना केली जाते. या दिवशी
साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते.
योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान
आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक
कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून
देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्या भक्ताला
देवी सहजपणे दर्शन देते.
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक
कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते.
त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या
कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी
कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष
भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने
त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची
इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या
प्रार्थनेचा स्वीकार केला.

काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा
अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा,
विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या
तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या
विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले.
महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम
पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी
असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी
या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म
घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे
तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी
पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने
महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा
पुराणात आहे
कात्यायनी अमाप फलदायक आहे.
कालिंदीच्या यमुना किनारी भगवान
कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज
गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही
देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात
प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत
तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा
उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा
आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे.
डावीकडील वरच्या हातात तलवार आणि
खालच्या हातात कमळाचे फूल
आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म,
काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने
प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला
अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो
व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो
रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो.
सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला
शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.
🌹🌹🌹🌹🌹
दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने
प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी
कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी
साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते.
यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे
दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर
झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या
रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या
साक्षात्कारापासून मिळणार्या पुण्याचा
तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण
पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य
लोकांची प्राप्ती होते.
या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस
विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी
माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही
डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार
आहेत.
कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून
अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे
कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या
उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान
करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा
आहे. तर डावीकडील वरच्या हातात
लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात
खड्ग (कट्यार) आहे.
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी
आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे
तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने
भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी
कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे.
राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून
जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी
आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात.
कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे
पूर्ण पालन केले पाहिजे.
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती
शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने
होणार्या शुभ कामांची गणना केली जाऊ
शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा
केली पाहिजे.
, या नावाने
प्रसिद्ध आहे.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी
कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी
साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते.
यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे
दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर
झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या
रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या
साक्षात्कारापासून मिळणार्या पुण्याचा
तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण
पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य
लोकांची प्राप्ती होते.
या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस
विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी
माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही
डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार
आहेत.
कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून
अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे
कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या
उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान
करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा
आहे. तर डावीकडील वरच्या हातात
लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात
खड्ग (कट्यार) आहे.
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी
आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे
तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने
भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी
कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे.
राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून
जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी
आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात.
कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे
पूर्ण पालन केले पाहिजे.
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती
शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने
होणार्या शुभ कामांची गणना केली जाऊ
शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा
केली
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय.
दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची
पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने
सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप,
दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व
प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा
अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा
आहे. या गोर्यापराची उपमा शंख, चंद्र आणि
कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय
आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।'
तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची
आहेत.
महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन
आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा
आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे.
वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील
डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी
अत्यंत शांत स्वभावाची आहे.

आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला
पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या
केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या
अनुसार तिने भगवान शंकराला पती
करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-
जन्म कोटि लगि रगर हमारी।
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।
या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते.
तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान
शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ
घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली.
तेव्हापासून तिला महागौरी या नावाने
संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा
भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे.
आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या
कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते.
महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या
उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण
जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला
पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात
वर्णिला आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे
सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची
सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या
नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते.
या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने
करणार्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी
प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय
मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते.
अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती,
प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ
सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत.
देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या
भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे.
भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी
प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे
शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे
त्यांना लोक 'अर्धनारीनटेश्वर' या नावाने
ओळखतात.
देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे
वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फूलावरही
विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या
बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे.
देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त
करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले
पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो
सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला
मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी
सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची
उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व
मनोकामना पूर्ण होतात.
🌹🌹🌹🌹🌹🌹

नवरात्री दिवस १
ऑक्टोबर १३, (मंगळवार)
आज नवरात्रीच्या रंग -
लाल

नवरात्री दिवस २
ऑक्टोबर १४, (बुधवार)
आज नवरात्रीच्या रंग -
गहन निळा

नवरात्री दिवस ३
ऑक्टोबर १५, (गुरुवार)
आज नवरात्रीच्या रंग -
पिवळा

नवरात्री दिवस ४
ऑक्टोबर १६, (शुक्रवार)
आज नवरात्रीच्या रंग -
हिरवा

नवरात्री दिवस ५
ऑक्टोबर १७, (शनिवार)
आज नवरात्रीच्या रंग -
करडा

नवरात्री दिवस ६
ऑक्टोबर १८, (रविवार)
आज नवरात्रीच्या रंग -
नारिंगी

नवरात्री दिवस ७
ऑक्टोबर १९, (सोमवार)
आज नवरात्रीच्या रंग -
पांढरा

नवरात्री दिवस ८
ऑक्टोबर २०, (मंगळवार)
आज नवरात्रीच्या रंग -
गुलाबी

नवरात्री दिवस ९
ऑक्टोबर

🚩।। शिवशाही प्रतिष्ठाण,आळंदी देवाची ।।🚩

Mahikavati Mandir wishes everyone a Happy Navratri.
13/10/2015

Mahikavati Mandir wishes everyone a Happy Navratri.

Historic map of the Mumbai-Thane region.
07/10/2015

Historic map of the Mumbai-Thane region.

07/10/2015

Quick history:

Bhimdev II or Raja Bhimdev also known as Raja Bimba was an 11th-century king who had his capital in Mahikawati(Named after Mahikavti devi), the present-day Mahim.

The credit of foundation of Bombay goes to Raja Bhimdeva, who belonged to Solanki alias Chalukya clan. He came from Gujarat region along with his followers and laid the foundation of city of Mahim then known as Mahikavati. He reigned from 1022 AD to 1064.He was a powerful king, who also conquered Northern Konkan coast from Naiks and established his kingdom as great maritime power.

He may have come from Anahilwada-Patan, Gujarat. While others suggest that he may have come from the dynasty of Seuna Yadavas of Devagiri and also known by name of Raja Bimba and established in his kingdom in 13th Century AD.

When he established his kingdom around Mumbai, the aboriginals living here were Kolis and only two temples existed one of Walkeshwar Temple and another of Mumba Devi Temple Bhimdeva was worshiper of Shiva of Somnath from where he came and as such he built Babulnath temple. The deity in this temple is named after the Babool trees which were the main components of a forest covering the low-lying areas of this island. He is said to have built a palace and a court of justice and temple of Prabhadevi.

During his reign he brought his followers, who settled in and around Mumbai are now known as Pathare Prabhus, Pathare Prabhus (Kanchole), Palshi, Pachkalshi, Bhandaris, Vadval, Bhois, Agri and Brahmins to these islands. The Bhandaris were originally toddy trappers; the Vadvals were gardeners. He introduced many fruit-bearing trees, including coconut palms to the island.

In the Krittivasi Ramayan, Ahiravan (Ahiravan or Mahiravan), brother of Ravana, was a rakshasa who secretly carried away...
07/10/2015

In the Krittivasi Ramayan, Ahiravan (Ahiravan or Mahiravan), brother of Ravana, was a rakshasa who secretly carried away Rama and his brother Lakshmana to the nether-world, consulted his friends and decided to sacrifice the life of the two divine brothers at the altar of his chosen deity, goddess Mahikvati. But Hanuman saved their life by killing Ahiravan and his army.

In the Ramayana, during the battle between Rama and Ravana, when Ravana’s son Indrajit is killed, Ravana calls his brother Ahiravana for help. Ahiravana, the king of Patala (the Underworld), promises to help. Vibhishana somehow manages to hear about the plot and warns Rama about it. Hanuman is put on guard and told not to let anyone into the room where Rama and Lakshmana are. Ahiravana makes many attempts at entering the room but all of them are thwarted by Hanuman. Finally, Ahiravana takes the form of Vibhishana and Hanuman lets him enter. Ahiravana quickly enters and takes the “sleeping Rama and Lakshmana” away.

When Hanuman realizes what has happened, he goes to Vibhishana. Vibhishana says, "Alas! They have been abducted by Ahiravana. If Hanuman does not rescue them fairly quickly, Ahiravana will sacrifice both Rama and Lakshman to Chandi." Hanuman goes to Patala, the door to which is guarded by a creature, who is half Vanara and half reptile. Hanuman asks who he is and the creature says, "I am Makardhwaja, your son!" Hanuman is confused since he did not have any child, being an adept Brahmachari. The creature explains, "While you were jumping over the ocean, a drop of your semen (veeriya) fell to the ocean and into the mouth of a mighty crocodile. This is the origin of my birth."

After defeating his son, Hanuman enters Patala and encounters Ahiravana and Mahiravana. They have a strong army and Hanuman is told by Chandrasena that the only way to vanquish them is by blowing out five different candles located in five different directions, all at the same time in return for a promise to be Lord Rama's consort. Hanuman assumes his five-headed form (Panchmukhi Hanuman) and he quickly blows out the 5 different candles and thus kills Ahiravana and Mahiravana. Throughout the saga, both Rama and Lakshmana are rendered unconscious by a spell by the demons.

Address

Mahikavti Mandir
Kelva Mahim
401402

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+919270904094

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahikavati Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Mahikavati Mandir:

Share