Shree Uday Ganesh Mandir

Shree Uday Ganesh Mandir Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Uday Ganesh Mandir, Religious organisation, Karve Naka, Karad.

28/03/2020

दिनांक २८/०३/२०२० वार शनिवार
*विनायकी चतुर्थी*
*गणपतीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला हा व्रत केला जातो. याला विनायकी चतुर्थी उपवास देखील म्हटले जाते.*

*अशा प्रकारे करा पूजन विधि*

सकाळी लवकर उठून स्नान आदि कामे लवकर करा.
दुपारच्या वेळी आपल्या इच्छे प्रमाणे सोने, चांदी, तांबे, पीतळ किंवा मातीची गणपतीची मूर्ती स्थापन करा.
संकल्प मंत्रानंतर गणपतीची पूजन-आरती करा.
गणपतीच्या मूर्तीवर सिंन्दूर चढवा.
गणपती मंत्र :-ओम गणपतयै नमः म्हणत २१ दूर्वा दल चढवा. गुळ किंवा बुंदीच्या २१ लाडवांचा नैवेद्य दाखवा.
यामध्ये ५ लाडू मूर्ती जवळ ठेवा आणि ५ ब्राम्हणाला दान करा.
उरलेले लाडू प्रसाद म्हणून वाटा.

*पूजामध्ये*
श्रीगणेश स्त्रोत, अथर्वशीर्ष, संकटनाशक स्त्रोत आदिंचे पाठ करा.
ब्राम्हणांना जेऊ घाला आणि त्याना दक्षिणा प्रदान केल्यानंतर संध्याकाळी स्वतः भोजन करा.
शक्य असेल तर उपवास करा.

या उपवासाचे आस्था आणि श्रध्देने पालन केल्याने गणपतीच्या कृपेने इच्छा पुर्ण होतात आणि जीवनात निरंतर यश मिळते.
🌳🙏🌳🙏🌳🙏🌳🙏

15/03/2020

दिनांंक १५/०३/२०२० वार रविवार हे आपल्यासाठी..
1 .कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचे असते..
*आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात..*
*कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो....पण टिकवून नाही ठेवू शकत...*

2 .जगाचा मालक सोबत असतांना सीता मातेला मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला .आणि रावणाची अख्खी लंका सोन्याची असतांना माञ अशोक वनात प्रभू रामाची किंमत सोन्या पेक्षा मोठी आहे हे कळले ..*
*त्यामूळे आपल्या जवळ जे आहेत त्यांची किंमत करायला शिका ते सोन्यापेक्षा कमी नाही.जे आहे त्यात आनंद घ्या,जे नाही त्याचा मोह टाळा*
3.कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते..

4.कधी चुक झाल्यास माफ करा पण , कधी माणुसकी कमी करु नका . . !*
*चूक ही आयुष्याचं एक पान आहे , पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे . गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका .*
*पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका .*

.5...जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च धेय आणि अंगी नम्रता,*
*या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाने असतात आणि सर्वच जुळून आल्या तर *वज्रमुठ तयार होते.*
*आणि याच वज्रमुठीची ताकत माणसाला यशाकडे घेऊन जाते.* 🌳🙏🌳🙏🌳🙏🌳🙏

10/03/2020

दिनांंक १०/०३/२०२० वार मंगळवार मंदिरात दर्शनाला जात असाल तर हे लक्षात ठेवा.......

पहिल्या प्रथम दर्शनाला जायचा नियम आहे म्हणुन जाऊ नका. तुमच्या अंतर्मनाला दर्शन घ्यायची इच्छा असावी. मनाने व शरीराने नम्र होऊन मंदिरात प्रवेश करा. कासवाला किंवा नंदीला पाया पडुन पैशाचा, ज्ञानाचा व ताकदीचा गर्व तिथेच सोडा.
घंटा वाजवुन काही सेकंद ध्वनीलहरी ऐका. ज्यामुळे तुमच्या शरीरातील चक्रे संतुलीत होतील. मुख्य मुर्तीसमोर काही क्षण उभारुन मुर्तीपासुन निघणारी कंपने, किरणे आशिर्वाद म्हणुन ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. प्रदक्षिणा घालताना कंपने मिळवण्याचा प्रयत्न करा. गर्भगृह(गाभारयात) मोठी वैश्वीक व सात्विक शक्ती असते. तिथे प्रवेशाच्या वेळेस तुमचे विचार पवित्र पाहिजेत. ते विचलीत होऊ नयेत म्हणुन त्या देवदेवतेचा मंत्रोचार करत रहा. ज्यामुळे सात्विकता येईल. अश्या वेळेस बीज मंत्र म्हणणे जास्त योग्य. ते माहिती करुन घ्या.
मंदिरातील तीर्थप्रसाद आवर्जुन ग्रहण करा. साष्टांग नमस्कार किंवा डोक टेकवुन पाया पडा. जेणेकरुन तुमच्या सहस्त्रार चक्रातुन सात्विक व सकारात्मक उर्जा आत शिरेल. जी तुमचे मानसिक व शारिरीक दोष कमी करायला मदत करेल. मंदिरातुन बाहेर पडताना पाठ करु नका. दरवाज्यातुन बाहेर पडताना परत एकदा मुळ मुर्तीला पाया पडा.
हे विश्व कंपनलहरींवर आधारीत आहे. आपण कंपनलहरींच जड स्वरुप आहोत. कंपने संतुलीत करायची असतील तर मंदिरात जाण गरजेच आहे...... 🌳🙏🌳🙏🌳🙏🌳🙏

09/03/2020

श्री होळी सणा बद्दल सविस्तर माहिती

आज दिनांक ०९/०३/२०२० रोजी सोमवारी फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमा होळी हा सण साजरा करण्यात येणार आहे

होळी सण माहिती

होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उस्तुकता असते.
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. ह्या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते या मागे एक आख्यायिका आहे.

राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हाद ला विश्णु भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयन्त केला , पण प्रळाडणे नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला.
शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहिण होळीका ची मदत घेतली. होळीकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला. परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळीका भस्म झाली.
या कथेमधून हा संकेत मिळतो कि वाईटावर चांगल्याच विजय होतोच. आजतागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. हा एक रंगाचा सण आहे.

या सणाची लहान मुलेआतुरतेने वाट पहात असतात. या सणामुळे घरात अतिशय आनंदाचे वातावरण असते.

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.
होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.
“होळी रे होळी पुरणाची पोळी” ..
किंवा
“होळीला गवऱ्या पाच पाच….. डोक्यावर नाच नाच”…
लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी. मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे.

07/03/2020

शनी प्रदोषाच्या व्रताबद्दल नेहमी सांगतो आणि त्याचा अनुभव देखील लोकांना येतो..असे हे व्रत आहे...

दि. ७ मार्च २०२०, शनिवार त्रयोदशी असून शनी प्रदोष आहे. प्रदोष पुजेस अनन्य साधारण महत्त्व आहे आणि मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आहे. शनीप्रदोष हे वर्षातून साधारण ३ किंवा ४ वेळेस असते. सर्व प्रदोष पूजनात शनीप्रदोष व्रत अतिशय फलदायी असून राहू दोष, शनीपिडा, तसेच संकटात मुक्ती देणारे हे व्रत आहे. श्रद्धेने हे पूजन केल्यास त्याची फलश्रुती ही निश्चितच मिळते. याचे महत्त्व 'गुरुचरित्र' तसेच 'श्रीपादचरित्रात' देखील असून पिठापुराम येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकावर रुद्र अभिषेक पूजन हे शनिप्रदोषच्या दिवशी होत असते . 🌳🙏🌳🙏🌳🙏🌳🙏

04/03/2020
04/03/2020

दिनांक ०४/०३/२०२० वार बुधवार हे आपल्यासाठी जरा लक्षात ठेवा.......... एखाद्या तुरुंगामध्ये पुष्कळ कैदी असतात. कोणी काही कोणी काही केलेले असते. हे जरी खरे, तरी प्रत्येकाने जे करू नये ते केलेले असते ही गोष्ट निश्चित आहे. हे जसे खरे त्याचप्रमाणे जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागच्या जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित आहे. परंतु त्यामध्ये भगवंतांनी एक मोठी सोय ठेवली आहे. ती ही की, जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. देहाला विसरण्यासाठी भगवंताच्या स्मरणाशिवाय अन्य उपाय नाही. आपण जे दररोज जेवण करतो, ते २४ तासाच्या आत आपल्या शरीराबाहेर निघाले पाहिजे, नाहीतर आपण आजारी पडू शकतो. हवा जिचा आपण श्वास घेतो ती काही सेकंदातच बाहेर निघाली पाहिजे नाहीतर मरण अटळ आहे. परंतु नकारात्मक बाबी, जसं की द्वेष, किळस, राग, इर्षा, गर्व, अहंकार, असुरक्षा इत्यादि ज्यांना आपण वर्षानुवर्ष आपल्या मनात साठवून ठेवतो, या सर्व नकारात्मक विचारांना आपण बाहेर काढून नाही फेकले तर निश्चितच आपणास मानसिक रोग जडल्याशिवाय राहणार नाही. निर्णय आपला-जीवन आपले.
एक गोष्ट दत्त महाराज ही माऊली आहे...ती परीक्षा पाहिलं त्रासही होईल पण प्रेमाने अश्रू पुसून तुमची झोळी भरून टाकून तुम्हाला चिंतामुक्त करतील आवश्यकता आहे तुमच्या विश्वास व श्रद्धेची... लक्षात ठेवा.गुरुकृपा ही केवलं ! ---------------------------------------- 🌳🙏🌳🙏🌳🙏🌳🙏
*उपाध्य श्री श्रीकांत जोशी गुरुजी *

02/03/2020

दिनांक०२/०३/२०२० वार सोमवार
अडचणींवर मात करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तरीही आपण आपल्यावर आलेल्या अडचणींना दूर करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडतो. सध्याच्या काळात मनुष्याला सर्वात मोठी अडचण भासत असेल तर, ती आहे पैशाची. मनुष्य आयुष्यभर पैसा गोळा करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो तरीही त्याला पैसा कमी पडतो, शिवपुराणात धन संपत्ती प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत, त्यातील हा एक उपाय आहे
उपाय -
शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे बेलाच्या झाडाखाली दूध, तूप, भोजन यांचा नेवैद्य दाखून तो नेवैद्य एखाद्या शिवभक्ताला दान करावा. त्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येत नाही. जर हा उपाय श्रावणात केला तर, त्याचे फळ लवकर प्राप्त होते.
उपाय
* गुरुवारी पुष्य नक्षत्रादिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रुमालात ठेवा. हळदीने रंगविलेले तांदूळ, नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवा. हळदीत रंगविलेला एक रुपया त्यामध्ये ठेऊन त्याची पूजा करा. असे दररोज करा. या उपायाने धन-धान्यामध्ये वाढ होते.
* धन प्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि एक लवंग अर्पण करा. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.
* ११ कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगवून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा. त्यामुळे धन येत राहते.
* रात्री दहा नंतर सर्व कामे संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसा. समोर तेलाचे नऊ दिवे लावा. हे दिवे पूजा करतांना विझले नाही पाहिजेत. लाल रंगाचे तांदूळ घ्या. त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा, हा उपाय केल्याने धन लाभ होईल.
*अपत्य प्राप्तीसाठी उपाय
श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी किंवा कोणत्याही सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून, स्वच्छ वस्त्रे परिधान करून शंकराची पूजा करावी. पूजेनंतर गव्हाच्या पीठाच्या कणकेचे ११ शिवलिंग बनवावे. प्रत्येक शिवलिंगासमोर शिवमहिमस्त्रोत म्हणत जलाभिषेक करावा. असा जलाभिषेक सर्व ११ शिवलिंगावर करावा. तो जलाभिषेक प्रसाद रूपात ग्रहन करावा. गर्भाच्या रक्षणासाठी आणि अपत्य प्राप्तीसाठी गौरीहर रूद्राक्ष धारण करावे. हे रूद्राक्ष धारण करताना शुभ मुहूर्त पाहून तो धारण केल्यास त्याचे चांगले फळ मिळते.
हा उपाय केल्यास लवकरच अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होईल. / ---------------------------------------

01/03/2020

दिनांक ०१/०३/२०२० वार रविवार व्यापार वाढी साठी...
१)दर मंगळवारी पावशेर बत्तासे दिवे लागणेचे वेळी वाहत्या पाण्यात सोडून व्यापार वाढण्यासाठी कुलदेवतेला प्रार्थना करावी.*
२)पुर्ण महिन्यात* *दोन पक्ष येतातएक शुक्लपक्ष* *व दूसरा* *क्रुष्णपक्ष यातील शुक्लपक्षातील येणाऱ्या सोमवारी मुठभर बासमती तांदूळ वाहत्या पाण्यात सोडावे.*
३)दर मंगळवारी कोणत्याही हनुमान मंदिरात सव्वाकीलो गुळ अर्पण करावा.*
4)दर बुधवारी सकाळी कींवा सायंकाळी पूजेनंतर अर्धी वाटी दुध तुळशीला वहावे.
5.इन्कम वाढ होण्यासाठी :
संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा (उंबरठ्याजवळ व मंदिरात)
यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: | तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम || रोज संध्याकाळी १८ वेळा मोठ्याने म्हणावा.
ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने | प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: || कामाला / ऑफिसला जाण्यापूर्वी ८ वेळा म्हणावा.
सर्व मंगल मांगल्ये …………. नारायणी नमोस्तुते || सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज २८ वेळा म्हणावा.
ॐ –हीं पद्मे स्वाहा | रोज १ तासभर रात्री झोपताना जपावा.

6.विवाह झटपट जमण्यासाठी ...

1.२१ मंगळवार गणपतीला नागवेली च्या २१ पानाचा हार अर्पन करुन गुळ खोबरयाचा नैवद्य दाखवावा* *२१मंगळवार गणपतीला २१दुर्वा व लाल फुल अर्पन करुनथोडी दालचिनी अर्पन करावी*

$ *सिध्द मंगल* स्तोत्राचा रोज पाठ करावा ११ वेळा

*११ संकष्टी* उपवास करुन चंद्रोदया वेळी मातीच्या गणपतीची पुजा करुन दुसरया दिवशी तुळशी मधे ठेवुन विसजित करावा मातीची मुर्ती १/२ इंचाची स्वताला जमेल तशी बनवुन स्वता पुजा करावी दुसरया दिवशी
*तुळशीत किंवा पवित्र झाडाच्या मुळाशी विसजिर्त करावी
याचा चांगला अनुभव येतो*

२१ गुरुवारी गुरुदत्त मंदिर स्थानी प्रसाद फळे द्यावीत शक्यतो केळी द्यावी

$ *५ पोर्णीमेला* कुलदेवीचे दर्शन घ्यावे
जर तुम्हाला सर्व कार्यात यश हवे असेल तर , 11 मंगळवार हनुमान मंदिरात जावून हनुमानाला शेंदूर लावून . ॐ श्री हनुमते नमः मंत्राचा 21 वेळा जप करावा .तुमची कामे नक्कीच पूर्ण होतील . ---------------------------------------
🌳🙏🌳🙏🌳🙏🌳🙏
■ *उपाध्य श्री श्रीकांत जोशी गुरुजी

29/02/2020

दिनांक 29/02/2020 वार शनिवार
आपण जीवनात नक्कीच सकारात्मक फायदे जाणवाल.*

$ *चांदीच्या भांड्यात केशर* घोळून त्याने *कपाळावर तिलक केल्याने सुख- शांती, समृद्धी आणि प्रसिद्धी मिळते.* हा उपाय *गुरुवारी* करणे योग्य ठरेल.

$ *विवाहात अडचणी येत असल्यास किंवा अभ्यासात* समस्या येत असल्यास *पिवळ्या रंगाच्या फुलांचे दोन हार लक्ष्मी-नारायण मंदिर अर्पित करावे, आपलं काम नक्की पार पडेल.* हा उपाय देखील *गुरुवारी करणे योग्य ठरेल.* आपण *गुरुवारी संध्याकाळी हा उपाय करावा.*

$ मंदिराच्या बाहेर बसलेल्या *कुमारिकेला बदाम दिल्याने घरातील सर्व आजार दूर होतील.* कुटुंबाचे आरोग्य चांगलं राहील. आपल्याला हा उपाय *बुधवारी करायचा आहे.* आणि बदाम देखील अख्खे असावे.

$ *नोकरीत ट्रांसफर याबद्दल कुठलीही समस्या असल्यास तांब्याच्या लोट्यात लाल मिरचीच्या बिया टाकून सूर्याला अर्घ्य दिल्याने समस्या दूर होते.* आपल्या सतत *21 दिवस सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे.*

$ *दारिद्र्य दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे दक्षिणावर्ती शंख.* जिथे *दक्षिणावर्ती शंख असतो तिथे दारिद्र्य थांबत नाही.*

$ *एकाक्षी नारळच्या शीर्षावर तिनाऐवजी दोन बिंदू असतात.* याची पूजा केल्याने घरात सुख- शांती मिळते आणि *घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो.*

$ गायीला *आपल्या ताटातील पोळी खाऊ घालणारा सदैव सात्त्विक आणि आनंदी राहतो.* तसेच गायीचं दूध सेवन केल्याने बळ आणि बुद्धीचा विकास होतं. *गायचं मूत्र म्हणजे गोमूत्र घरात शिंपडल्याने किंवा घरात ठेवल्याने वाईट दृष्ट तसेच समस्या दूर जातात.*
---------------------------------------
🌳🙏🌳🙏🌳🙏🌳🙏
■ *उपाध्य श्री श्रीकांत जोशी गुरुजी 9922813543

Address

Karve Naka
Karad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Uday Ganesh Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share