सोमवार दि. ०४ मार्च १९९१ रोजी श्री भैरीभावानी (ओटव) गोवा महामार्गावरील नांदगाव तीठा या गावापासून ३ कि. मी. आत वसलेल्या मु. पो. ओटव, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे उतखदनातून प्रकटली.
साधक श्री नंदकुमार पाटील, केतकीचा मळा (अलिबाग) हे कुलस्वामिनी श्री मरीआईचे उपासक आहेत. त्यांच्या शुभहस्ते उतखदन केले गेले.
कुलस्वामिनी श्री भैरी भवानी अनेक वर्षापूर्वी कोणी चोरून नेली, जमिनीत लपून ठेवली आशी दंतकथा ह
ोती.
अनेक वर्ष कुलस्वामिनी श्री भैरी भवानी प्राप्तीसाठी गावकर मंडळींनी बरेच प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही.
साधक श्री नंदकुमार पाटील यांनी टांगर येथे श्री गणपती मूर्ती आपल्या दिव्य शक्तीने उतखदनातून काढल्याची बातमी पोलिस टाईम्स या वर्तमान पत्रात वाचण्यात आली, त्यामुळे त्यांचा सम्पर्क झाला.
दि. २५ डिसेंम्बर १९९० साली साधक श्री नंदकुमार पाटील यांचा कडे आमचा प्रश्न मांडला व त्याचे मार्गदर्शन घेतले.
अलिबाग येथे आपल्या मांडावर बसून सिंधुदुर्गातील आमचा ओटव गावात आमच्या ग्रामदेवतेच्या परिसरात श्री भैरी भवानी असल्याचे ठाम पणे सांगितले. इतकेच नवे तर त्याचा तपशीलही त्यांनी विषद केला. आमचा दृष्टीने ते एक आश्चर्यच होते.
साधक श्री नंदकुमार पाटील यांच्या मार्गदर्शना प्रमाणे दि. ०४ मार्च १९९१ रोजी उतखदनासाठी जय्यत तयारी केली. खोदकाम करण्याच्या जागेचा पंचनामा केला. स्थानिक वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींना प्रचाराण केले, मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थही उपस्थित होते.
दुपारी ठीक ३ वा. खोदकाम सुरु करण्यात आले. रात्रो ठीक १०.४० वा. कुलस्वामिनी श्री भैरी भवानीचे भाविकांना दर्शन झाले. सव्वा एकवीस इंच उंचीची, सुमारे ७ किलो वजनाची पंचधातूची सालंकृत कुलस्वामिनीचे दर्शन घेताना जीवन कृताथ झाल्याची भावना उपस्थित भाविकांनी अनुभवली.