24/04/2023
आज पंडिता रमाबाईं यांचा 165 व्या जन्मदिवसा निमित्ताने अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने विनम्र अभिवादन..!
२३ एप्रिल, जागतिक कीर्तीच्या तसेच सर्वच क्षेत्रात अद्वितीय कार्य केलेल्या पंडिता रमाबाई यांचा जन्मदिवस
पंडिता रमाबाईची कारकीर्द -१८५८ ते १९२२
१)पहिली महिला जिला पंडित आणि सरस्वती या पुरस्काराने सन्मानित केले.
२)कैसर-ए-हिंद हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला .
३)सर्व जगामध्ये सर्व प्रथम बायबलचे मराठीत रुपांतर करणारी पहिली महिला.
४) भारतामध्ये स्त्रि डॉक्टरांच्या वैदकीय शिक्षनासाठी प्रोत्साहन देणारी पहिली महिला.
५)आपल्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी असावी हे सुचवणारी पहिली महिला .
६)अंधांसाठी वरदान असनाऱ्या साठी, मराठी ब्रेल टायपिंग मशीनचा शोध लावणारी पहिली महिला .
७)घरोघरी खादी उद्योग सुरु करुन त्याचा वापर करण्यासाठी पुढाकार घेणारी पहिली महिला.
८) दुष्काळामध्ये अनाथ व विधवांसाठी मोठया प्रमाणावर कार्य करणारी पहिली महिला.
९)लहान मुलांच्या शिक्षणाकरिता सर्व प्रथम ‘ बालवाडी ‘ सुरु करणारी प्रथम महिला.
१०) महिलांच्या हक्का करिता प्रशासना विरुद्ध (हंटर कमिशन) आवाज बुलंद करणारी पहिली महिला.