Vastusiddhii

Vastusiddhii With the help of VastuShastra we can enjoy happiness, prosperity and contentment.

We Can shape children's careers, can achieve success in business, can overcome more or less from all the difficulties in life. वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय? त्यामुळे नेमके होते तरी काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण समजा आपले डोळे कानाच्या जागी असते, कानाच्या जागी मान असती, नाक गुडघ्यांवर असते तर काय झाले असते? शरीर विकृत दिसले असते. बरोबर ना. वास्तुशास्त्राचेही तसेच आहे. वस्तूची नेमकी जागा

, तिची लाभदायकता याविषयीचे योग्य मार्गदर्शन वास्तुशास्त्र करते.

हे शास्त्र वैज्ञानिक आहे. मध्ययुगात सुप्तावस्थेत असलेल्या या शास्त्राला आता एकवीसाव्या शतकात चालना मिळाली आहे. एकाएकी याची चर्चा होण्याचे कारण काय? कारण त्याला चालना मिळण्याची ही वेळ ठरली होती. वास्तुच्या बाबतीत हे शास्त्र फार महत्त्वाचे आहे. देशातील अनेक मंदिरे, प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंवर या शास्त्राचा प्रभाव आहे. वास्तूंमधील गुणदोषामुळे अनेक चमत्कारिक बाबी घडत असतात, त्याची कारणेही आपण देऊ शकत नाही. एखाद्या मोडकळीस आलेल्या घरात रहाणारा माणूस कोट्यधीश बनतो आणि कोट्यधीश माणसाचे दिवाळे निघते, असे नेमके का होते, हे आपल्याला कळत नाही. याचे कारण वास्तुशास्त्र आहे.


हे शास्त्र म्हणजे कुठले रहस्य नाही. स्पष्ट शब्दात दिलेली उत्तरे आहेत. वास्तूची निर्मिती योग्य पद्धतीने व्हावी यासाठीचे निकष असणारे हे शास्त्र आहे. कारण जीवनात येणारे उतार-चढाव, सुख दुःख हे सगळे वास्तूवरही अवलंबून असते. ब्रह्मांड असेल, नक्षत्रे असतील, ग्रह असतील तर वास्तुशात्रसुद्धा आहेच.

आपण नेहमी पाहतो, काही घरातील कर्ता पुरूष किंवा स्त्रीचा अचानक मृत्यू होतो. काहींच्या घरात नेहमी आजारणपणे चालत असतात. काहींची वंशवेल खुरटलेली असते. काही घरांत नेहमी पती-पत्नीत भांडणे होतात. काहींची मुले दिवटी निघतात. हे सगळे कशामुळे? याचे कारण वास्तुदोष आहे.

तुम्हाला माहितीये? ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यातील पुरूष साठ वर्षांहून अधिक काळ जगत नाही. हा त्यांच्यातील शारीर दोष नाही. ग्वाल्हेरच्या राजवाड्यात असा कोणता तरी दोष असेल, ज्यामुळे पुरूषाचा मृत्यू लवकर होतो. हा निकष उचलली जीभ लावली टाळ्याला असा नाही. याबाबत वेदात, पुराणातही काही संदर्भ सापडतात. इसवी सन 1480 मध्ये उदयपूरचे राजे कुंभकर्ण यांच्या काळात श्रीमंडन याने वास्तुशास्त्रावर ग्रंथ लिहिला होता. त्यावर 1891 मध्ये राजवल्लभ नावाचे एक पुस्तकही प्रकाशित झाले होते. हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक मानले जाते. पृथ्वीवरील चुंबकीय प्रवाह, दिशा, सूर्याची किरणे, वाऱ्याची दिशा, गुरूत्वाकर्षण या साऱ्यांचा वास्तुशास्त्रात विचार केल्याचे या ग्रंथात म्हटले आहे. राजवल्लभशिवाय मयशिल्पम, शिल्प रत्नाकर, समरांगण सूत्रधार हे दुर्मिळ ग्रंथही वास्तुशास्त्रासंदर्भात महत्त्वाची माहिती देतात. अथर्ववेद, यजुर्वेद, भविष्य पुराण, मत्स्यपुराण, वायूपुराण, पद्मपुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण, गर्ग संहिता, नारद संहिता, सारंगधर संहिता, वृहत संहिता यातही वास्तुशास्त्राविषयी बरीच माहिती मिळते.
वास्तुशास्त्र काय सांगते? तर प्रत्येक वस्तूचे स्थान काय आहे, ती कुठे असायला पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन करते. घरात स्वयंपाकघर दक्षिण पूर्व कोपऱ्यात असावे. पूजेची खोली वा स्थान उत्तर- पूर्व कोपऱ्यात हवे. बेडरूम दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात हवी. पाहुण्यांची खोली व मुलांची खोली उत्तर पश्चिम कोपऱ्यात हवी. पहिल्या खोलीतील बैठक उत्तर-पूर्व बाजूला हवी. झोपताना डोके दक्षिण वा पूर्वेला हवे. याला काही कारणेही आहेत. पूर्वेला सूर्याचे स्थान आहे. तो स्थिर आहे. दिवसभर थकल्यानंतर आपण झोपतो तेव्हा सूर्याची ऊर्जा आपल्या मेंदूला मिळते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काम करण्याची शक्ती आपल्यात उत्पन्न होते. जे डोके उत्तर किंवा पश्चिम दिशेला करून झोपतात ते नेहमी आजारी, रोगी, निराश मनःस्थितीत आढळतात.

वास्तुशास्त्राची काटेकोर अंमलबजावणी नवी वास्तू बांधतानाच होऊ शकते. याचा अर्थ सध्या अस्तित्वात असलेली वास्तू या शास्त्रास अनुकूल करता येत नाही, असे नाही. सुख, समृद्धी, समाधान हवे असल्यास घर, दुकान यात अनुकूल बदल केले पाहिजे. त्याचवेळी वास्तुशास्त्र म्हणजे लॉटरीचे तिकिट नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे. हे तिकिट लागले की जो धनलाभ होतो, तसाच लाभ लगेचच बदल केल्यानंतर मिळतो असे नाही. तो हळूहळू जाणवू लागतो. अनुकूल वास्तूरचना झाल्यानंतर आपल्य मनात सुख, समाधान या भावना वास करू लागतील. आनंद, उत्साह आपल्या आयुष्यात येतील. नवी ऊर्जा मिळेल. कोणतेही काम हाती घेतल्यास यश लाभेल. हे बदल हळूहळू जाणवतील. वास्तुशास्त्र पाळल्यास ही फळे मिळतील.

19/08/2026

उद्या श्रावण महिन्यातील दुसरा पवित्र गुरुवार! 🌺🙏

ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील सर्व स्वामीभक्त, गुरुदेवभक्त आणि नाथपंथीयांसाठी विशेष पर्वणी!

उद्या एकाच दिवसात दोन अत्यंत जागृत स्थानांचे दर्शन घ्या:
1️⃣ मुंब्रा: श्रीपाद श्रीवल्लभ सेवा मंडळ मठातील श्रीदत्त गुरूंच्या मनमोहक बालमूर्तीचे दर्शन.
2️⃣ सानपाडा: मोजे गुरुस्थान समाधी आणि श्री दत्त मंदिरातील पावन पादुकांचे दर्शन.

अशी श्रद्धा आहे की, या गुरुवारी दोन्ही स्थानांचे दर्शन घेतल्यास मनातील सदिच्छा लवकरच पूर्ण होतात. दर्शन घ्या आणि पुढील २१ दिवसांत आलेला अनुभव Comment मध्ये नक्की सांगा!

हा व्हिडिओ नातेवाईक व मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि तुमच्या Story/Status वर ठेवून सेवेत सहभागी व्हा.

अशाच अध्यात्मिक व वास्तू मार्गदर्शनासाठी Follow करा:

👉 Manojkumar Appa Mohite

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

DattaMandir Sanpada Mumbra MumbaiDattabhakt NaviMumbai ShriGuruDevDatta SpiritualGuide Gurutattwa DevotionalReels ShravanMonth

14/08/2026

कुटुंबात जर कोणाचे कमी वयात आकस्मिक निधन झाले असेल तर .....

तर्पण विधी आणि महत्त्व!

आपल्या कुटुंबातील पूर्वजांचे आशीर्वाद आणि शांती ही आपल्या प्रगतीची खरी शक्ती असते. कुटुंबात जर कोणाचे कमी वयात आकस्मिक निधन झाले असेल, तर त्यांच्या आत्म्याच्या पुढील प्रवासाला गती मिळण्यासाठी तर्पण विधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

तर्पण विधीमुळे केवळ पितरांना गती मिळत नाही, तर कुटुंबातील अडकलेली कामे मार्गी लागून सुख, शांती आणि यशाचे मार्ग खुले होतात. स्वतःसाठी नाही, तरी आपल्या कुटुंबाच्या आणि पुढच्या पिढीच्या सुखासाठी येणाऱ्या सर्वपित्री अमावस्येला घरात तर्पण विधी नक्की करा. 🙏✨

अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या.

#तर्पणविधी #सर्वपित्रीअमावस्या #पितृपक्ष #पितृदोष #आध्यात्मिकमार्गदर्शन #भारतीयसंस्कृती #धर्मआणिअध्यात्म #शांतीआणिसुख

13/08/2026

तुमच्या आयुष्यात वाईट का होतंय? | कर्माचे ३ मोठे प्रकार जाणून घ्या.

शेतात जे पेरतो, तेच उगवतो... मग आयुष्यात जे करतो, तेच परत मिळतं ना? 🌾✨

निसर्गाची खातेवही कधीच चुकत नाही! आज चांगल्या विचारांचं आणि चांगल्या कर्माचं बी पेरा, सुखाचं पीक घरात नक्की येईल! ❤️

हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या माणसांपर्यंत नक्की शेअर करा! 👇

13/08/2026

करीअर निवडताना...

शिक्षणाची दिशा भलतीकडेच आणि नोकरी-व्यवसाय मात्र दुसऱ्याच क्षेत्रात...

अशीच अवस्था आज अनेक तरुण-तरुणींची पाहायला मिळते. यामुळे आयुष्यातील अत्यंत मोलाची आणि अमूल्य वर्षे फक्त 'नेमकं काय करायचं?' हे शोधण्यात निघून जातात.

जर वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाले, तर ही वर्षे वाया जाण्यापासून वाचू शकतात. ज्योतिष शास्त्राच्या योग्य सहाय्याने स्वतःच्या क्षमता आणि ग्रहांची साथ ओळखून शिक्षणाची दिशा ठरवा, आणि नोकरी किंवा व्यवसायात उत्तुंग यश संपादन करा! 📈✨

योग्य वेळेत योग्य निर्णय घेण्यासाठी हा संदेश नक्की शेअर करा!

#करीअरमार्गदर्शन #करीअरनिवड #ज्योतिषशास्त्र #मराठीसुविचार #यशाचीगुरुकिल्ली #करिअरसल्ला #सकारात्मकविचार

12/08/2026

१२ ऑगस्ट २०२६ दीप अमावस्या | दीप पूजन मुहूर्त आणि पूजा पद्धत | Deep Amavasya 2026 Muhurat

नमस्कार!

आजच्या व्हिडिओमध्ये आपण १२ ऑगस्ट २०२६ रोजी येणाऱ्या आषाढ अमावस्या म्हणजेच 'दीप अमावस्या' बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✅ दीप पूजनाचा अचूक प्रदोष काळ मुहूर्त (१२ ऑगस्ट २०२६)
✅ दीप अमावस्येचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व
✅ दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत आणि नियम
✅ या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात?

उद्यापासून पवित्र श्रावण महिना सुरू होत असून, या दीप अमावस्येला घरातील समृद्धी आणि आरोग्यासाठी दिव्यांची पूजा नक्की करा!

व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या आप्तेष्टांसोबत Share करा आणि अशाच धार्मिक व ज्योतिषीय माहितीसाठी चॅनेलला Subscribe नक्की करा!

12/08/2026

मुलांचे अभ्यासात मन लागत नाहीये? पालकांसाठी महत्त्वाचा सल्ला! 📚✏️

मुले शाळेत जाण्यास कंटाळा करतात? अभ्यासाला जबरदस्तीने बसवावे लागते?

किंवा खूप अभ्यास करूनही परीक्षेच्या वेळीच सगळं विसरून जातात?

आज बहुतांश पालकांना मुलांच्या शिक्षणाबाबत याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बऱ्याचदा अभ्यासातील ही एकाग्रता न मिळण्यामागे स्टडी रूमची दिशा, वास्तुदोष किंवा मुलांच्या पत्रिकेतील ग्रहांची स्थिती कारणीभूत असू शकते.

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक विकासासाठी वेळेतच ज्योतिष आणि वास्तु तज्ज्ञांचा सल्ला घ्या, जेणेकरून त्यांच्या आयुष्याला योग्य ती दिशा देता येईल! 🌟

मार्गदर्शनासाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या:
👉 https://vastusiddhii.wordpress.com/

#मुलांचेशिक्षण #पालकत्व #अभ्यास #वास्तुशास्त्र #ज्योतिषशास्त्र #एकाग्रता #शिक्षणातीलअडचणी

11/08/2026

संतती सुख आणि पत्रिका वेळेतच तपासण्याचे महत्त्व! 👶✨

मुलं होणे किंवा न होणे हे सर्वस्वी आपल्या नशिबावर आणि जन्मपत्रिकेवर अवलंबून असते. लग्न जुळवताना केवळ गुण जुळवणे पुरेसे नसते; तर जोडप्याच्या पत्रिकेत 'संतती सौख्य' कसे आहे, हे तपासणे अत्यंत आवश्यक असते.

अनेकदा पत्रिकेत काही लहान-मोठे दोष असतात, ज्यावर वेळेतच अचूक ज्योतिषीय उपाय केले तर होणारा आयुष्यभराचा त्रास सहज टाळता येतो.

पत्रिकेत संतती योगाबाबत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि उपाय दडलेले असतात. त्यामुळे लग्नाआधी किंवा वेळेतच योग्य मार्गदर्शन घेऊन मुलांचे भविष्य उज्ज्वल बनवा!

मार्गदर्शनासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या:
👉 https://vastusiddhii.wordpress.com/

#संततीसुख #संततीयोग #पत्रिका #ज्योतिषशास्त्र #विवाहमार्गदर्शन #लग्नपत्रिका #आध्यात्मिकउपाय

10/08/2026

नशिबाचे भोग आणि प्रयत्नांची ताकद! 🌟✨

"काही केल्या नशिबाचे भोग चुकवता येत नाहीत" हे सत्य असले, तरी नशिबात नक्की काय लिहून ठेवले आहे हे जन्मपत्रिकेवरून वेळेतच समजून घेता येते.

यामुळे येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करून योग्य मार्ग काढणे शक्य होते.

आपल्या आराध्य देवावर निशंक विश्वास ठेवा, सत्कर्म करा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. मनुष्य हा जगातील असा एकमेव प्राणी आहे, जो स्वतःच्या आत्मबळावर आणि प्रयत्नांवर आपले नशीब बदलू शकतो.

नेहमी लक्षात ठेवा — "प्रयत्नांती परमेश्वर!" 🙏✨

योग्य मार्गदर्शनासाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या:
👉 https://vastusiddhii.wordpress.com/

#नशीब #प्रयत्नांतीपरमेश्वर #ज्योतिषशास्त्र #मराठीसुविचार #सकारात्मकविचार #आध्यात्मिकमार्गदर्शन #आत्मबळ

10/08/2026

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? जाणून घ्या तुमच्या पत्रिकेचे संकेत! 💍✨

तुमचा विवाह लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज? हे सर्वस्वी तुमच्या नशिबावर आणि जन्मपत्रिकेवर अवलंबून असते.

अनेकदा खूप प्रेम असूनही लग्नात रूपांतर होत नाही किंवा घरचे अरेंज मॅरेज ठरवूनही ते जुळत नाही. कारण तुमच्या पत्रिकेत विवाहाचे योग कसे आहेत, हेच सर्वात महत्त्वाचे ठरते.

तुमच्या नशिबात विवाह कधी, केव्हा आणि कसा लिहून ठेवला आहे, हे योग्य वेळीच जाणून घेतल्यास लग्नातील अनावश्यक अडचणी टाळता येतात.

योग्य मार्गदर्शनासाठी आजच आमच्या ब्लॉगला भेट द्या किंवा संपर्क साधा! हा संदेश नक्की शेअर करा. 🙏✨

#विवाहयोग #लव्हमॅरेज #अरेंजमॅरेज #पत्रिका #ज्योतिषशास्त्र #विवाहमार्गदर्शन #लग्नयोग #मराठीसुविचार

Address

Kalyan
421306

Opening Hours

9am - 9pm

Telephone

+918828053505

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vastusiddhii posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Vastusiddhii:

Shortcuts

Share

Category