13/05/2026
कल्याण स्टेशन येथील मुख्य पादचारी पूल जो स्टेशन वरील सात प्लॅटफॉर्म आणि पूर्व पश्चिम बाजूला जाण्यासाठी जवळ जवळ ५० फूट रुंद आहे. त्यावर शेकडो प्रवासी आपल्या गाडीची प्रतिक्षा करीत ५ ते ५० मिनिटे उभे राहतात. पत्र्याच्या शेड खाली, दोन्ही बाजूंनी जाहिरातीचे फलक लावून उत्पन्न घेतले जाते परंतु ३८-४० अंश तापमानात ताटकळत उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी एकही पंखा लावण्यात आला नाही. कल्याण स्टेशन व्यवस्थापक, सेन्ट्रल रेल्वे, कल्याण प्रवासी संघटना यांनी कृपया ह्या विषयावर लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी.
#कल्याण स्टेशन #सेंट्रल रेल्वे #भारतीय रेल्वे