Sri Swami Samrth Kendra Kalyan

Sri Swami Samrth Kendra Kalyan परिचय

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच?

21/11/2021
26/10/2018

सर्व भाविकांना कळविण्यात येते कि श्री स्वामी समर्थाच्या पादुकांचे पूजन हे दिनांक २८/१०/२०१८ वार रविवार करण्यात येणार आहे . महाराज्यांच्या पादुकांचे पूजन करण्यासाठी भाग्य लागत . तरी जे सेवेकरी कल्याण ला येऊ शकतात त्यांनी खालील पत्त्यावर यावे .
पत्ता :- श्री स्वामी समर्थ केंद्र ( दिंडोरी प्रणित ) खडकपाडा चौक जवळ बेतुर्कर पद रोड श्री स्वामी समर्थ बिल्डिंग समोर खडकपाडा कल्याण वेस्ट ४२१३०१
वेळ :- दुपारी १ वाजता
स्वामींचे पादुका पालखीतून खडकपाडा चौक ते स्वामी केंद्र मार्गे नेण्यात येईल याची नोंद घ्यावी ........ संपर्क क्रमांक 9653480756

26/12/2017
II श्री स्वामी समर्थ  II ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳बहुतेकांना स्वामींबद्दल खुप माहीती आहे अनुभव आहेत आणि महाराजांनी त्यांना त्य...
20/10/2017

II श्री स्वामी समर्थ II

⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳

बहुतेकांना स्वामींबद्दल खुप माहीती आहे अनुभव आहेत आणि महाराजांनी त्यांना त्यांच्या संकटात खुप मदत केली आहे आणि करत राहणारच कारण स्वामी नेहमी चांगले कर्म करणाऱ्यांच्या पाठी मागे उभे असतात पण ज्यांनी अजुन स्वामी महाराज समजुन घेतले नाही त्यांनी नक्कीच स्वामी महाराज समजुन घ्यायला पाहिजे.

एकदा तरी आपल्या जवळच्या स्वामी केंद्रांत जाऊन स्वामींना शरण जाऊन आपल्यावर असलेले परिवारातील अडीअडचणी,विवाह न होने,कर्ज बाजारी,पति पत्नी मधील भांडण,मुलांची शिक्षण,संतती विषयी,आजारपण,व्यसन,वास्तू दोष,सण कसे साजरे करावे,सेंद्रीय शेती कशी करावी,कॅन्सर सारख्या आजारावर औषध,बालसंस्कार,असे अनेक विषयांवर मार्ग निघुन स्वामी त्यांना अलगद बाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे येणारे आयुष्य चैतन्य मय बनवतील यात तीळ मात्र शंका नाही.

फक्त एकदा स्वामींच्या मार्गात जाऊन त्यांना प्रथम समजुन घेणे महत्वाचे वाटते. कारण स्वामी हे अनंतकोटी ब्रम्हांड नायक आहेत,हे कलियुग आहे. त्यामुळे जो जो स्वामींची सेवा करेल त्याला यश मिळणार म्हणजे मिळणारच. कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. एकदा तरी अनुभव हा घ्यायलाच पाहिजे.

कारण प्रत्येकाला कुठलं तरी दुःख असतंच, आणि कोणाचे दुःख बाजुला सारून त्यांच्या वाटेवर सुख आणले तर त्यापेक्षा जगात कुठलाच आनंद नाही.........

मग याल ना स्वामींच्या दरबारात..!!

अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळावर भेट द्या.
http://dindoripranit.org

|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र
दिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक
पिन कोड नं.-४२२२०२
फोन नंबर - (०२५५७) २२१७१०
इमेल- [email protected]

|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||
श्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर
जिल्हाः नाशिक (महाराष्ट्र)
पिन कोड नं.-४२२२१२
फोन नंबर - (०२५९४) २३३१७०
फॅक्स- (०२५९४) २३४०८३
इमेल- [email protected]

गुरुमाऊली प.पू.आणासाहेब मोरे यांचे पुण्यनगरी मध्ये शुभ अागमन

16/03/2016

॥ श्री गुरुतत्व ॥

दिंडोरी प्रणित मार्गाची परंपरा

श्री स्वामी समर्थ (इ. स. ११४९ ते इ. स. १८७८)

सदगुरू प.पू. पिठले महाराज (इ. स. १८७८ ते इ. स. १९७४)

तेजोनिधी सद्गुरू प.पू. मोरेदादा (इ. स. १९२२ ते इ. स. १९८८)

प. पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

भगवान ब्रह्मा,विष्णू व महेश यांना धर्माचे रक्षण करण्यासाठी व आर्तपिडीत, दुःखी भक्तांचे रक्षण करण्यासाठी तपस्वी, साध्वी अनसुया व महर्षी अत्रिऋषी यांच्या घरी (अनसुयेच्या पतीसेवा बळावर) पुत्ररूपाने भगवान श्री दत्तात्रेय नावाने अवतार धारण करून यावे लागेल. परमात्मा मानवी जीवाच्या कल्याणासाठी अनादिकालापासून यापृथ्वीतलावर अवतार घेत आहे. सांप्रतचा कलियुगातील अवतार हा भगवान दत्त महाराज म्हणजेच भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहे. इ.स.११४९ चैत्र शु. द्वितीया या शुभ दिवशी स्वामी महाराज अष््रटवर्षीय बालक स्वरूपात पंजाब प्रांतातील छेले खेडे या ग्रामी धरणी दुभंगून प्रकट झाले. स्वामी महाराजांनी इ. स. १३७८ ते १५२६ असा श्रीपाद श्रीवल्लभ आविष््रकार धारण केला व इ. स. १५२६ ते इ. स. १६७६ या कालात त्यांनी श्रीनृसिंहसरस्वती या स्वरूपात धर्म संस्थापनाचे कार्य केले. इ. स. १८५६ ते १८७८ अशी या आविष््रकारातील २२ वर्षे अक्कलकोट, जि. सोलापूर येथे वास्तव्य केल्याने आपण त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखतो. परंतु प्रत्यक्षात ते अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. या वस्तुस्थितीचा आपणास विसर पडला आहे.

महाराजांनी इ. स. १८७८ साली अक्कलकोटला लौकिकदृष्रटया समाधी घेवून अवतार संपवला असे भासत असले तरी ते आजही पूर्वीप्रमाणेच या पृथ्वीतलावर आहेत, ही तमाम मानवासाठी भाग्याची घटना आहे. महाराजांनी अक्कलकोटच्या २२ वर्षाच्या वास्तव्यात सर्वसामान्यांच्या इच्छा पूर्ती बरोबरच अनेक संत, सिध्द यांना धर्मकार्यासाठी विविध भागात पाठवले. कालांतराने मानवाच्या स्खलनशील स्वभावामुळे मूळ गुरूतत्वाचा विसर पडला व महाराजांच्या नावाखाली स्वतःचे स्तोम माजवणे व सर्वसामान्यांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन पैसे कमविणे हा धंदा सुरू झाला. यामुळे बहुसंख्य समाज हा धर्माविषयी उदासीन व मूळ वैदिक तत्वज्ञानापासून वंचित झाला. यामुळे कलियुगाचे चालक, मालक, पालक व संचालक असणार्‍या दत्तमहाराज म्हणजेच स्वामी महाराजांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान शाश्वत स्वरूपात सर्व मानवासाठी उपलब्ध व्हावे म्हणून ब्रम्हीभूत पिठले महाराजांचे (इ.स. १८७८ - १९७४) गुरूपद घेऊन त्यांच्याकडून दीर्घ काळ हिमालय, प्रदीर्घ काळ त्र्यंबकेश्वर व नासिक येथे विविध उपासना, तपश्चर्या करून घेतल्या व पुढील कार्य नियोजनासाठी आज्ञा दिली.

ब्रम्हीभूत पिठले महाराजांनी तेजोनिधी सदगुरू मोरेदादा (इ.स. १९२२ - १९८८) यांचे गुरूपद घेऊन स्वामी महाराजांच्या वैश्विक धर्मकार्यासाठी संपूर्ण तयारी करून घेतली. सदगुरू मोरेदादांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान काळानुरूप आवश्यक ते बदल करून सर्वसामान्यापर्यंत पोहचवले ते म्हणजेच दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग होय. गुरूमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणित सेवा कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वृध्दिंगत होत आहे. आज प.पु. गुरूमाऊलाइच्या रूपाने महाराजच कार्यरत आहेत. अशा प्रकारे तेजतत्त्वाची मूळ प्रेरणा लाभलेला श्री स्वामी समर्थ सेवामार्ग तेजातुन तेजाकडेच वाटचाल करत आहे.

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित या नावाने कार्यरत असनारया संस्था ह्या जनहित, राष्ट्रहित, देशहित विज्ञानाला सामोरे जाउन अखंड परंपरा लाभलेल्या विविध पणे कार्य करीत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्ती , ज्ञान , वैराग्य नाम, जप, टाप, यज्ञ सेवा यांच्या अनुशागाने कार्य करीत आहे. मानवास मानव धर्म व मानवी समस्या या बाबींवर मार्गदर्शन हितगुज करून समस्या सोडवतो.

10/03/2016

॥श्री स्वामी समर्थ ॥
नक्कीच वाचा....
आज अनेक सेवेकरी ब-याच वर्षापासून सेवा करत आहेत. काहीजण म्हणतात की आम्ही एवढी सेवा करतो, तरीसुद्धा संकटे अडचणी काही कमी होत नाहीत.
अशासाठी श्रीपादवल्लभ चरित्रातील एक प्रसंग-
पीठापुर मधे एक दत्तभक्त ब्राह्मण होता. स्वयंभू दत्तामंदिरात खुप सेवा करायचा. भिक्षुकी करून उदरनिर्वाह करायचा. पण श्रीपादस्वामींवर त्याचा विश्वास नसतो.
एक दिवस रोजच्या प्रमाणे तो दत्तमंदिरात जातो तर तिथे मूर्तिचि तीनही शीरे त्याला दिसत नाही. त्यामुळे सारा गाव गोळा करतो, पण बाकीच्याना दिसत असतात. लोक वेड्यात काढतात. रागाने घरी जातो, तर बायकोच्या कपाळी कुंकु दिसत नाही. तिच्यावर चिडतो. सर्वांची खात्री होते की याला वेड लागले. म्हणून मांत्रिकाकडे नेतात. तिथे मांत्रिक छडिने मारतो. वेड लागल्याने भिक्षुकी होत नाही, उपासमार होते, घरातील चीज वस्तु विकुन पोट भरावे लागते, कर्ज होते.
त्याची बायको मग श्रीपादांना शरण जाते, ते सांगतात की शेतात नविन घर बांधून राहायला जा. तसे करताच तो सुधारतो.
मग श्रीपाद सांगतात की, तुझ्यावर गंडान्तर आले होते, तुझा अपमृत्यु होणार होता, पण तू दत्त भक्ति केलिस म्हणून मी त्या गंडान्तराचे रूपान्तर अनेक संकटात केले , जेणे करून ते तुला सुसह्य व्हावे.
कदाचित आपल्या बाबतीत स्वामी हेच करत असतील. एकदम 100 किलोचे पोतं उचलन्या पेक्षा स्वामी त्याचीच दहा दहा किलोची बाचकी करत असतील जेणे करून आपल्याला उचलणे सुसह्य व्हावे.
॥श्री स्वामी समर्थ॥

Address

Khadkpada Chowk , Kalyan
Kalyan West
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sri Swami Samrth Kendra Kalyan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share