11/09/2025
#प्रेरणास्थान
#लोकतीर्थ ऊर्जा, चैतन्य आणि सामर्थ्याचा अखंड स्त्रोत!
लोकतीर्थ- हे केवळ एक स्मारक नाही, तर डॉ. पतंगराव कदम यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाची त्यांच्या संघर्षांची आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाची जिवंत साक्ष आहे.
ही ती भूमी आहे जिथे त्यांनी स्वप्नं पेरली, विचार रुजवले आणि हजारो युवकांच्या जीवनात परिवर्तन घडवलं.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोेकनेत्याचं स्मरण म्हणजेच लोकतीर्थ..!
आजही या पवित्र स्थळी पाऊल टाकलं, की
स्वतःवरचा विश्वास जागा होतो,
नवीन स्वप्नं डोळ्यांपुढे तरळतात,
आणि मन म्हणतं "हो, मीही काहीतरी मोठं करू शकतो!"
लोकतीर्थ स्मृती नाही, तर प्रेरणेतून घडणाऱ्या परिवर्तनाची चळवळ आहे.
Location- https://maps.app.goo.gl/TjbbKBXtC2ELhHxc6h