02/04/2025
श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव सोमवार दि.३१/०३/२०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.गणेशभाऊ कवडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
सकाळी ८ वा.भुपाळी आरती व अभिषेक,स. १०.३० वा.नैवेद्य आरती,दु.२.०० ते ३.०० स्वामी याग,होम हवन,दु. ३.०० ते ४.०० हळदी कुंकू,सायं.४ ते ६ पालखी सोहळा श्री विघ्नहर नगर प्रदक्षिणा,सायं ७.०० वा.महाआरती, सायं ८ वा.संगीत भजन व महाप्रसादाचे आयोजन श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.
अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते.व हे अन्नदानाचे पवित्र कार्य श्री.आत्माराम गाढवे, सौ.सायली श्रीराम बेनके, श्री.पांडुरंग डुंबरे,श्री.शंकर दाते व श्री.बबन बोडके यांच्या द्वारे करण्यात आले.या सर्व अन्नदात्यांचा श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अगदी सकाळपासून स्वामींच्या दर्शनासाठी स्वामी भक्तांनी गर्दी केली होती.
या कार्यक्रमास श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.सत्यशिलदादा शेरकर,भाजपा नेत्या सौ.आशाताई बुचके, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.संतोषनाना खैरे, पंचायत समितीचे गटनेते श्री.दिलीप गांजाळे, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष श्री.तुषार कवडे, सचिव श्री.सुनिल घेगडे, विश्वस्त श्री.सुर्यकांतजी रवळे, विश्वस्त श्री.संतोष कवडे, विश्वस्त श्री.दत्तात्रय कवडे,विश्वस्त मंगेश पोखरकर विश्वस्त सौ.शिल्पाताई जगदाळे, मा,विश्वस्त श्री.आनंदराव मांडे,दशरथ मांडे आनंदराव मांडे श्रीराम पंडित ओझर नवीन च्या सरपंच सौं.तारामतीताई उपसरपंच जयश्री कवडे ओझर नंबर एक सरपंच मथुराताई कवडे, ग्रामपंचायत सदस्य रवी मांडे संगीता टेंभेकर नयना मांडे स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट चे सहखजिनदार श्री.गणेशसर कवडे, विश्वस्त श्री.शिवाजीकवडे, विश्वस्त श्री.संपत वायकर, विश्वस्त श्री.भास्कर मांडे,विश्वस्त सौं.रुपाली कवडे, व आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त श्री.सुभाष दळवी व आभार विश्वस्त गुरुवर्य श्री.अरुण महाराज कुलवडे यांनी मानले.
या सर्व मान्यवरांचा सत्कार श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.
तसेच श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ व स्वामी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व आयोजित कार्यक्रम वेळेत व उत्साहात पार पडले.