दत्त माझा सखा

दत्त माझा सखा श्री संत सखाराम महाराज भक्तमंडळ . जालना यर्म धर्म उभा जोडोनियां हस्त देवही वंदिती चरणधूळी. माधवाश्रमासी नवसा पावला दत्त प्रगटला लोणी ग्रामी

श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🏻🔱
22/04/2024

श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🏻🔱

भाव असावा आपुले मनी । पूजा करावी श्रीगुरुचरणी ।जी जी वासना ज्याचे मनी । त्वरित होय परियेसा ॥८१॥ ह्रदयशूळ गंडमाळ । अपस्मा...
17/12/2021

भाव असावा आपुले मनी । पूजा करावी श्रीगुरुचरणी ।
जी जी वासना ज्याचे मनी । त्वरित होय परियेसा ॥८१॥

ह्रदयशूळ गंडमाळ । अपस्मार रोग सकळ ।
परिहरती तात्काळ । श्रीगुरुपादुका अर्चिता ॥८२॥
🔱🔱

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवुनिया मनदत्तात्रेया सद्गुरूवर्या भावार्थेकरून ।।धृ ।।धरणीवर नर पीडित झाले भवरोगें सर्वकाम...
11/12/2020

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवुनिया मन
दत्तात्रेया सद्गुरूवर्या भावार्थेकरून ।।धृ ।।
धरणीवर नर पीडित झाले भवरोगें सर्व
कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापूनि सगर्व
योग याग तप दान नेणति असतांहि अपूर्व
सुलभपणें निजभजनें त्यासी उद्धरी जो शर्व ।।१।।
अत्रिमुनींच्या सदनीं तिन्ही देव भुके येती
भिक्षुक होऊनी अनसूयेप्रति बोलती त्रयमूर्ती
नग्न होऊनि आम्हांप्रती द्या अन्न असें वदती
परिसुनि होऊनि नग्न अन्न दे तंव ते शिशु होती ।।२।।
दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रमथेंद्र
ब्रह्मदेव तो जाहला चंद्र जाहला तो उपेंद्र
दत्तात्रेय जो वितनिद्र तो तारक योगेंद्र
वासुदेव यच्चरण चिंतूनि हो नित्यातंद्र ।।३

परीस लागतां लोहासी I सुवर्ण होय परियेसीं I दर्शन होतां श्रीगुरूसी I व्याधि कैंची सांग मज II उदय जाहलिया दिनकरासी I संहार...
12/09/2020

परीस लागतां लोहासी I सुवर्ण होय परियेसीं I
दर्शन होतां श्रीगुरूसी I व्याधि कैंची सांग मज II
उदय जाहलिया दिनकरासी I संहार होतो अंधकारासी I
श्रीगुरुकृपा होय ज्यासी I दैन्य कैंचे तया घरीं II

आज फार दिवसांनी एका थोर दत्त भक्तांची भेट झाली . सहज विषय सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर निघाला तेव्हा ते म्हणाले अहो आच...
10/09/2020

आज फार दिवसांनी एका थोर दत्त भक्तांची भेट झाली . सहज विषय सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर निघाला तेव्हा ते म्हणाले अहो आचार्य ,ज्याला जे काही करायचे ते करू द्या, ते प्रत्येकाचे प्रारब्ध आहे मात्र प्रत्येक घटनेवरून दत्त माहात्म्य किंवा गुरुचरित्रात आलेल्या लीलेचे स्मरण झाले पाहिजे . हे कसे शक्य आहे या प्रश्नार्थक मुद्रेने पाहत असता ते म्हणाले ,

काही एक नावाचा वारंवार होणारा उल्लेख पाहता त्याचा अर्थ आहे कंकण ,यावर दत्त माहात्म्यात एकांतात ध्यान घडते हे समजावताना हि गोष्ट आली आहे .

एका घरी एक कन्या विवाहायोग्य झाली होती . तिला वरावें या करिता काही विद्वान ब्राह्मण आले होते पण त्यापूर्वी तिच्या घरातील सर्व मंडळी काही कामानिमित्त परगावी गेली होती , घरी धेनु होती तेव्हा तिच्या सोबत कोणीतरी असले पाहिजे म्हणून या कन्येला मागे ठेवून सर्व गावी गेले होते . विद्वान ब्राह्मणांना पाहून तिने त्यांना आसन दिले आणि क्षेमकुशल विचारून त्यांच्या माध्यान्हाच्या तयारीस लागली . साळी कांडताना तिच्या हातात असलेल्या बांगड्यांचा आवाज होऊ लागला . तेव्हा तिला वाईट वाटले . ह्या आवाजाने आपल्या पूर्वजाना दूषण येईल असा तिने मनात विचार केला. म्हणून तिने केवळ दोन दोन बांगड्या हातात ठेवल्या तरी त्यांचा आवाज होऊ लागला . कंकण विरहित हात ठेवणे शास्त्रात निषिद्ध आहे तेव्हा याचा विचार करून तिने केवळ एकेक बांगडी हातात ठेवली . यामुळे आवाजही झाला नाही आणि शास्त्राज्ञेचे पालनही झाले . या गोष्टीचा आधार घेऊन महाराज म्हणतात ,बहू जमता होई भांडण l दोघांचेही होई भाषण l एक असता ध्यान घडे ll

बहू जमता होई भांडण --- हे अगदी खरे आहे . स्व स्व पक्ष सिद्ध करताना किंवा आपले मत मांडताना आपण आपल्या आवाजाची पातळी ,समोरच्याची योग्यता ,मार्दव ,नम्रता सर्व विसरून बोलत राहतो . दोघे मित्रही असलो तरी विषयांना तोटा नसतो मात्र एक असताना ध्यान घडू शकते . शकते अशाकरिता म्हणतो आहे कि विषय चिंतनाची सवय असल्याने हे सहज शक्य होत नाही . दत्त महाराज हे सर्वांचे आचार्य तेव्हा त्यांनी ह्या विषयांपासून अभय द्यावे हि प्रार्थना करीत आहे .

अहो आचार्य नित्य काही घडू द्या तो निसर्गनियम आहे पण त्याचा उपयोग आपण दत्त महाराजांच्या लीला कुठे आणि कशा वर्णन केल्या त्याच्या स्मरणाकरता केला पाहिजे --- श्री गुरुदेव दत्त !!! अभय आचार्य

अनन्यभावें भजतां अनन्य । लभ्य प्रभू जो नच होयि अन्य ।सन्यस्त सर्वेषण तारणार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ।।८।। 🙏🏻🙏🏻🌺🌺
05/07/2020

अनन्यभावें भजतां अनन्य । लभ्य प्रभू जो नच होयि अन्य ।
सन्यस्त सर्वेषण तारणार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ।।८।।
🙏🏻🙏🏻🌺🌺

ऐसा श्रीगुरु कृपासिंधु । भक्तजनां सदा वरदु । अखिल सौख्य श्रियानंदु । देता होय शिष्यवर्गा ॥
02/06/2020

ऐसा श्रीगुरु कृपासिंधु । भक्तजनां सदा वरदु ।
अखिल सौख्य श्रियानंदु । देता होय शिष्यवर्गा ॥

ज्याचे कर्म चांगले आहे, तो कधी संपत नसतो...सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात, या उलट जो दुस...
29/05/2020

ज्याचे कर्म चांगले आहे, तो कधी संपत नसतो...
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात, या उलट जो दुसाऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.

फक्त परमेश्वरावर म्हणजे स्वामींवर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा,
योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही.

*🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏🌹*

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे । नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १०॥ ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे ...
16/04/2020

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे ।
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १०॥
ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले ।
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ११॥
अवधूतसदानन्दपरब्रह्मस्वरूपिणे ।
विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १२॥

गुरुचरित्रात कलियुगाचे भयावह वर्णन केले आहे. सर्वत्र अनाचार ,स्वैराचार ,भ्रष्टाचार ,पिळवणूक ,आदी गोष्टींनी कायम मनुष्य ग...
14/04/2020

गुरुचरित्रात कलियुगाचे भयावह वर्णन केले आहे. सर्वत्र अनाचार ,स्वैराचार ,भ्रष्टाचार ,पिळवणूक ,आदी गोष्टींनी कायम मनुष्य गांजलेला ,या सर्वांच्या ओझ्याने थकलेला .अशी एखादी गोष्ट आहे का कि ज्यामुळे या कलियुगात जन्म झाल्याचा आनंद होईल .
एक गोष्ट गुरुचरित्रकार आवर्जून चांगली म्हणतात --- कोणती ? तर स्वल्पायुष्य मनुष्यपण l करिता जप तप अनुष्ठान l सीघ्र पावती परमार्था ll (शीघ्र ) कलियुगात आयुष्य कमी आहे हि गोष्ट फार चांगली आहे . यामुळे देवता शीघ्र फलप्रद होतात .
दत्त माहात्म्यात कार्तवीर्याने चौऱ्याऐशी हजार वर्षे राज्य केल्याचा उल्लेख आहे . आयु राजाने शंभर वर्षे दत्त महाराजांची सेवा केल्याचा उल्लेख आहे . इतके आयुष्य कलियुगात असत नाही . एकूण शंभर वर्षे त्यातही शंभरी पार करणे किंवा शंभरापर्यंत पोहोचणे दुर्लभच . या अल्पायुष्यामुळे दत्त महाराज यात केलेल्या अल्पसेवेने प्रसन्न होतात .
कलियुगात आधीच दत्त भक्ती दुर्लभ ,त्यात सेवा घडू लागलीच तर या अल्पायुष्याच्या सेवा मार्गात दत्त महाराजांनी परीक्षा म्हणून अदृश्य पापपुण्याची सापशिडी ठेवलेली आहे . कधी प्रलोभनाचे साप ,कधी वासनांचे साप ,कधी अहंकाराचे साप गिळून पुन्हा खाली ढकलत असतात तर कधी आकस्मिक पुण्याच्या छोट्या छोट्या शिड्या वर ढकलत असतात . शेवटी दत्त स्वरूपाला जाऊन मिळणे फार थोडक्या लोकांना साध्य होते . कारण पूर्वकर्माचे फासे कसे पडत आहेत यावर हे अवलंबून असते .
या ठिकाणी मात्र दत्त महाराजांना प्रार्थना करून या घोर कलियुगापासून आम्हाला आपल्या कृपेचे कवच धारण करू द्या आणि या षड्रिपूंच्या वणव्यातून सुरक्षित बाहेर काढा असे म्हणावेसे वाटते . त्यांना काय अशक्य आहे ? श्रीगुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य

 #जटाधरं  #पाण्डुरंगं  #शूलहस्तं  #कृपानिधिम् |  #सर्वरोगहरं  #देवं  #दत्तात्रेयमहं  #भजे ||जटाधारी, गौरवर्ण, हातात त्रि...
10/04/2020

#जटाधरं #पाण्डुरंगं #शूलहस्तं #कृपानिधिम् | #सर्वरोगहरं #देवं #दत्तात्रेयमहं #भजे ||
जटाधारी, गौरवर्ण, हातात त्रिशूल धारण करणाऱ्या. दयानिधी अर्थात कृपा करणारा, सर्वरोग नाहीसे करणाऱ्या श्रीदत्तात्रेयदेवांना मी भजतो. (सर्व रोगात भवरोगाची व्यथा फार भयंकर असते आणि त्यातून सुटका होणे कठिण मात्र याही रोगाचे निराकरण दत्त महाराज करतात.) गौरवर्ण आणि कर्पूर गौर या दोन रंगात फरक आहे. केवळ गौरवर्ण अर्थात गोरा आणि कापरासारखा गोरा असा इथे भेद आहे . ह्या श्लोकाला ध्यानमंत्र म्हटले जाते. दत्त महाराजांच्या रूपाची कल्पना ध्यानासाठी कशी करावी तर किंचित जटा, गोरेपान, हातात त्रिशूल धरलेले, आणि सर्व रोगांचा परिहार करणारे.

शुभ प्रभात 🙏 अवधूत चिंतन श्रीं गुरुदेव दत्त.🙏 🙏
09/04/2020

शुभ प्रभात 🙏
अवधूत चिंतन श्रीं गुरुदेव दत्त.🙏 🙏

Address

महाराष्ट्र
Jalna

Telephone

+918208036428

Alerts

Be the first to know and let us send you an email when दत्त माझा सखा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to दत्त माझा सखा:

Share