Datta Mandir Narmadapuram

Datta Mandir Narmadapuram होशंगाबाद में दत्‍त मंदिर की स्‍थापना श्री सीताराम महाराज द्वारा वसंत पंचमी 1926 को की गई थी ।

देणगी साठी ट्रस्‍ट चा बैंक अकाउंट व QR CodeSeeta Ram Datt mandir KharraghatAccount no 99999000002174IFSC code HDFC000687...
12/01/2026

देणगी साठी ट्रस्‍ट चा बैंक अकाउंट व QR Code

Seeta Ram Datt mandir Kharraghat
Account no 99999000002174
IFSC code HDFC0006878
Branch Itwara bazar Narmada puram MP

श्री दत्‍त जयंती निमित्‍त अखंड दत्‍त नावाने व दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरूदेव दत्‍तच्‍या गजरात सीताराम वाडी खर्राघ...
07/12/2025

श्री दत्‍त जयंती निमित्‍त अखंड दत्‍त नावाने व दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरूदेव दत्‍तच्‍या गजरात सीताराम वाडी खर्राघाट नर्मदापुरम येथे नर्मदा तीरावर भक्‍तीमय वातावरणात दिनांक 4/12/2025 गुरूवार रोजी सायंकाळी 6 वाजता दत्‍जन्‍मकाळ सोहळा मोठ्या उत्‍साहात संपन्‍न झाला। मार्गशीर्ष गुरूवार आणि दत्‍त जयंतीचा दुग्‍धशर्करा योग एकाच दिवशी असल्‍याने दर्शनांसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती।
दत्‍त जयंती निमित्‍त श्री दत्‍त मंदिरात अनेक धार्मिक आयोजन करण्‍यात आले होते । दिनांक 4/12/2025 गुरूवार रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत वेदमूर्ति श्री कार्लेकर गुरूजींच्‍या पौरोहित्‍यात श्रींचा पंचामृत अभिषेक, परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्‍वती टेम्‍बे स्‍वामी व परमहंस पारिव्राजकाचार्य श्री सीताराम महाराजांच्‍या पादुकांचे अभिषेक संपन्‍न झाले. संध्‍याकाळी 4.30 वाजे पासून नासिकच्‍या कीर्तनकार सौ मीनाक्षी कळमकर यांच्‍या कीर्तनानंतर श्री दत्‍तजन्‍मकाळ सोहळा संपन्‍न झाला.
जन्‍मकाळासाठी पाळणा विविध फुलांनी आकर्षक सजवण्‍यात आला होता. उपस्थित भाविकांनी सजवलेल्‍या पाळण्‍यावर अबीर गुलाल व फुलांचे मुक्‍तहस्‍ताने उधळण केली। जन्‍मकाळानंतर मंदिरात पारंपरिक पाळणा गीते व आरत्‍या म्‍हणण्‍यात आल्‍या व प्रसाद वाटप करण्‍यात आला। रात्रि 7 वाजता पालखी सोहळा संपन्‍न झाला ।
दिनांक 5/12/2025 शुक्रवार रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत श्रींचा पंचामृत अभिषेक, परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्‍वती टेम्‍बे स्‍वामी व परमहंस पारिव्राजकाचार्य श्री सीताराम महाराजांच्‍या पादुकांचे अभिषेक व श्रीसत्‍यदत्‍त पूजा संपन्‍न झाले । दुपारी 1 वाजता महाआरती नंतर महाप्रसादचा भाविकांनी आनंद घेतला ।

18/11/2025
दिनांक 16 नोव्‍हेंबर 2025 रोजी श्री एकमुखी दत्‍त मंदिर येथे परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरूजी ह्यांच्या प्र...
18/11/2025

दिनांक 16 नोव्‍हेंबर 2025 रोजी श्री एकमुखी दत्‍त मंदिर येथे परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरूजी ह्यांच्या प्रेरणेने दत्तावतारी प.प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज विरचित श्री नर्मदा व दत्त स्तोत्रांचे सामूहिक पठण व हवन कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले ।

दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी परम पूज्य श्री सच्चिनानंद ब्रह्मचारी स्वामी महाराज बडोदा यांच्या आशीर्वादाने सौ. सुलोचना ब...
15/11/2025

दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी परम पूज्य श्री सच्चिनानंद ब्रह्मचारी स्वामी महाराज बडोदा यांच्या आशीर्वादाने सौ. सुलोचना बिनीवाले बडोदा आणि त्यांच्या अनुयायांनी एकमुखी दत्त मंदिरात दत्त महाराजांचा अभिषेक व सत्य दत्त पूजा यशस्वीरीत्या संपन्न केली.

दत्‍त मंदिर श्री सीताराम वाडी नर्मदापुरम येथे दिनांक 26 जून 2025 रोजी परमहंस परिव्राजिकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती ट...
27/06/2025

दत्‍त मंदिर श्री सीताराम वाडी नर्मदापुरम येथे दिनांक 26 जून 2025 रोजी परमहंस परिव्राजिकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांंची 111वीं पुण्‍यतिथि समाराधना दिवस म्‍हणून साजरी केली गेली.

26 फेब्रुवरी 2025 महाशिवरात्रीच्‍या दिवशी दत्त मंदिर खरा घाट येथे सकाळी आठ वाजता सद्गुरु श्री हरी ओम तीर्थ स्वामी महाराज...
28/02/2025

26 फेब्रुवरी 2025 महाशिवरात्रीच्‍या दिवशी दत्त मंदिर खरा घाट येथे सकाळी आठ वाजता सद्गुरु श्री हरी ओम तीर्थ स्वामी महाराजांच्या सानिध्यात लघु रुद्र कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

नर्मदापुरम येथे दिनांक 14 डिसेम्‍बर रोजी ‘दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’ श्री.स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ...
16/12/2024

नर्मदापुरम येथे दिनांक 14 डिसेम्‍बर रोजी ‘दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’ श्री.स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, दत्त गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी ,दत्ता दिगंबरा या ओ, स्वामी मला भेट द्या ओ च्या अखंड जयघोषात व भाविकांच्या उत्साहात श्रीसीताराम वाडी नर्मदापुरम येथील श्री दत्‍त मंदिरात शनिवारी दत्तजयंती भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या भव्य सोहळ्यासाठी मंदिर परिसरात आकर्षक पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
शनिवारी सकाळी नित्यपूजा, अभिषेक, प.पू. श्री टेम्‍बे स्‍वामी व प.पू. श्री सीताराम महाराजांच्‍या पादुकांचे पूजन संपन्न झाले. संध्याकाळी सहा वाजता ‘श्रीं’ च्या पाळण्यावर भाविकांनी अबीर-गुलाल व फुलांची उधळण केली.त्‍या नंतर दत्त जन्म सोहळा, पालखी, भजन आदी कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.
रवीवारी सकाळी सकाळी नित्यपूजा, अभिषेक, प.पू. श्री टेम्‍बे स्‍वामी व प.पू. श्री सीताराम महाराजांच्‍या पादुकांचे पूजन व सत्‍यदत्‍त पूजा संपन्न झाले. दुपारी महाआरती व दुपारी १ वा.महाप्रसाद चे आयोजन संपन्‍न झाले. ह्या वर्षीचा महाप्रसाद जडये परिवार मुंबई कडून हेता. कार्यक्रमाकरीता प.पू. श्री टेम्‍बे स्‍मामींच्‍या भगिनी रूक्मिणीबाई जडये ह्यांच्‍या नातसून सौ शिल्‍पा जडये उपस्थित होत्‍या.

14 डिसेंबर ला दत्‍त जयंती आहे ... आपण सर्वानी कार्यक्रमात उपस्थित राहावे, हीच विनंती.
09/12/2024

14 डिसेंबर ला दत्‍त जयंती आहे ... आपण सर्वानी कार्यक्रमात उपस्थित राहावे, हीच विनंती.

21/07/2024

गु तो अंधार अज्ञानाचा रू ज्ञानाचा प्रकाश।
गुरूदत्ता तूचि रवी चंद्र तू अथांग आकाश।।
*श्री विष्णवे नमः*
*ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय।*

सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

आर्ष गुरूकुल के पास, पॉवर स्‍टेशन के आगे, सीताराम वाडी, नर्मदापुरम
Hoshangabad
461001

Opening Hours

Monday 6:30am - 7pm
Tuesday 6:30am - 7pm
Wednesday 6:30am - 7pm
Thursday 6:30am - 7pm
Friday 6:30am - 7pm
Saturday 6:30am - 7pm
Sunday 6:30am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Datta Mandir Narmadapuram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share