Shri Manik Prabhu Sampraday Mandal Latur

Shri Manik Prabhu Sampraday Mandal Latur This is an official page of Shri Manik Prabhu Sampraday Mandal, Latur.

21/12/2023
देवकीवासुदेवाभ्यां जातो यो गुरुमाणिकः। जघ्ने कंसादिकान् दैत्यास्तस्मै कृष्णाय ते नमः।।श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त श्रीप्...
06/09/2023

देवकीवासुदेवाभ्यां जातो यो गुरुमाणिकः।
जघ्ने कंसादिकान् दैत्यास्तस्मै कृष्णाय ते नमः।।

श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त श्रीप्रभू समाधीस अर्पित अलंकार पूजन. चैतन्यमय हे श्रीप्रभूदर्शन त्रैलोक्याचा आनंद श्री माणिकनगरित एकरूप होतो.

Shri Manik Prabhu Maharaj Atrivarad Pratisthan, Latur - अत्रिवरद प्रतिष्ठान, लातूर

हे पंचभूत मी पंचमुखी शिवराणा,मनप्रवाह चेतवी, न धरी अभिमाना ।।परमकृपाळू श्री प्रभू समाधीस श्रावण सोमवार निमित्त अलंकार पू...
29/07/2022

हे पंचभूत मी पंचमुखी शिवराणा,
मनप्रवाह चेतवी, न धरी अभिमाना ।।

परमकृपाळू श्री प्रभू समाधीस श्रावण सोमवार निमित्त अलंकार पूजन समस्त सृष्टीत चैतन्य प्रदीप्त करणारे दर्शन !

सौजन्य : Shri Manik Prabhu Maharaj

 #महामांगल्यप्रद_दिन जनन ते मरण आणि मरण ते जनन या यात्रेत ज्यांची शुद्ध कृपा वहन करीत मागील पाच पिढ्या पासून समृद्ध झालो...
24/04/2022

#महामांगल्यप्रद_दिन

जनन ते मरण आणि मरण ते जनन या यात्रेत ज्यांची शुद्ध कृपा वहन करीत मागील पाच पिढ्या पासून समृद्ध झालो आहोत त्या श्री प्रभू चे आज लातूर नगरीत व स्वगृही स्वागत करणारी सुवर्ण घटिका करबद्ध आहे!

श्री माणिकप्रभू संस्थान, माणिकनगर चे सहावे पिठाधिपती परमपूज्य डॉ श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री हनुमंत देवता, श्री विठोबा रुकमाई देवता, श्री नवग्रह देवता प्राणप्रतिष्ठापना व आशिर्वचन सोहळा आयोजित केला आहे.

उद्या दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ठीक १०.३० वा श्री फुलारी फार्म, रिंग रोड, श्री सिद्धेश्वर मंदिर पाठीमागे हा सोहळा व निमित्ताने आशिर्वचन लाभून सिद्ध होण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणास लाभत आहे.

आपण सक्रिय सहभाग नोंदवावा, हीच विनंती!

#श्रीमाणिकपंचरात्रोत्सव #जयगुरुमानिक

तो दत्त ती प्रभू सत्ता, सुख स्वात्मानंदी डुलताप्रख्यात तबला वादक रिंपा सिवा यांनी आज श्रीक्षेत्र माणिकनगर येथे श्रीप्रभू...
31/03/2022

तो दत्त ती प्रभू सत्ता, सुख स्वात्मानंदी डुलता

प्रख्यात तबला वादक रिंपा सिवा यांनी आज श्रीक्षेत्र माणिकनगर येथे श्रीप्रभू दर्शन आणि परमपूज्य श्री जींचे भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

श्री क्षेत्र माणिकनगर भेटीत उभ्या हिंदुस्थानातील प्रत्येक प्रतिभावान संगीत साधकाच्या चेहऱ्यावर आपली संगीत साधना कृतार्थ झाल्याची भावना स्पष्टपणे जाणवते.

परमपूज्य श्री ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या विशेष उपस्थितीत चिरंजीव प्रज्ञानराज प्रभू यांचा उपनयन संस्कार श्रीक्षेत...
08/02/2022

परमपूज्य श्री ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या विशेष उपस्थितीत
चिरंजीव प्रज्ञानराज प्रभू यांचा उपनयन संस्कार श्रीक्षेत्र माणिक नगर येथे वैभवाने संपन्न झाला. श्री माणिक प्रभू संप्रदाय मंडळ लातूर चे अध्यक्ष श्री मन्मथअप्पा लोखंडे जी व लातूर शहरातील सद्भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून समारंभात मनोभावे संमिलीत झाले.

काही क्षणचित्रे

Shri Manik Prabhu Maharaj

श्री माणिक प्रभू संस्थान आणि संगीत साधक हा एक अद्वितीय योग. संगीत साधकास आपली साधना फलद्रूप झाल्याची कृतार्थ भावना संस्थ...
05/01/2022

श्री माणिक प्रभू संस्थान आणि संगीत साधक हा एक अद्वितीय योग. संगीत साधकास आपली साधना फलद्रूप झाल्याची कृतार्थ भावना संस्थान भेटीत होते ही भावना प्रत्येक साधकाच्या संस्थान भेटीत अनुभवयास लाभते.

सुप्रसिद्ध भजन संगीतकार, सिनेसृष्टीतील प्रथितयश गायिका श्रीमती अनुराधा पौडवाल जी यांनी आज सकाळी श्री क्षेत्र माणिकनगर येथे श्री प्रभू दर्शन घेऊन परमपूज्य श्रीजिंचा आशीर्वाद घेतला.

Shri Manik Prabhu Maharaj
Anuradha Paudwal

कदंबवनचारिणीं मुनिकदम्बकादंबिनींनितंबजितभूधरां सुरनितंबिनीसेविताम् |नवाम्बुरुहलोचनां अभिनवांबुदश्यामलांत्रिलोचनकुटुम्बिन...
21/07/2021

कदंबवनचारिणीं मुनिकदम्बकादंबिनीं
नितंबजितभूधरां सुरनितंबिनीसेविताम् |
नवाम्बुरुहलोचनां अभिनवांबुदश्यामलां
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥

जगतजननी श्री वेंकम्मा देवीस कदंब पुष्प अलंकार पूजन!

Shri Manik Prabhu Maharaj

आज विटेवरी नीट विठ्ठल सखा देखियला गे।भाळिं गंध केशरी तिलक कस्तुरी रेखियला गे।।आज आषाढी एकादशी निमित्त श्री प्रभू समाधीस ...
20/07/2021

आज विटेवरी नीट विठ्ठल सखा देखियला गे।
भाळिं गंध केशरी तिलक कस्तुरी रेखियला गे।।

आज आषाढी एकादशी निमित्त श्री प्रभू समाधीस विशेष पूजन संपन्न!

जय गुरू माणिक! जय हरी विठ्ठल!!

Shri Manik Prabhu Maharaj

बोध ज्ञानमार्तंड उगवला, अभेद मति दे जड जीवाला ।जय हो जो प्रभू सकलमताला, चिन्माणिक आम्ही होऊ ।।समस्त सृष्टी सकल मंगल प्रद...
10/01/2021

बोध ज्ञानमार्तंड उगवला, अभेद मति दे जड जीवाला ।
जय हो जो प्रभू सकलमताला, चिन्माणिक आम्ही होऊ ।।

समस्त सृष्टी सकल मंगल प्रदायक सद्गुरू श्री मार्तंड माणिकप्रभु महाराज चरणी जयंती निमित्त कोटी कोटी वंदन!

Shri Manik Prabhu Maharaj

Address

MANIK NAGAR
Homnabad
585353

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Manik Prabhu Sampraday Mandal Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share