हिंगोलीचा दसरामहोत्सव-Hingolich dasramotsav

  • Home
  • India
  • Hingoli
  • हिंगोलीचा दसरामहोत्सव-Hingolich dasramotsav

हिंगोलीचा दसरामहोत्सव-Hingolich dasramotsav भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा दसरा, सन १८५५ साली सुरु झाला.

05/10/2022

 #हिंगोलीचादसरामहोत्सवसमस्त हिंगोली वासियांना दसरा महोत्सवाचं आग्रहाचे निमंत्रण, हा उत्सव तुमच्या माझ्या आनंदाचा अन् आपल...
26/09/2022

#हिंगोलीचादसरामहोत्सव

समस्त हिंगोली वासियांना दसरा महोत्सवाचं आग्रहाचे निमंत्रण, हा उत्सव तुमच्या माझ्या आनंदाचा अन् आपल्या परंपरेचा आहे. उत्सव यशस्वी पार पाडणं आपलं कर्तव्य आहे.
हिंगोली शहरात महंत मानदासबाबा यांनी १६७ वर्षांपूर्वी दसरा महोत्सव सुरू केला. दसरा महोत्सवानिमित्त १० दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजनपर तसेच प्रदर्शनी व रावणदहन आदी उपक्रम राबविले जातात. सुमारे १६७ वर्षांची परंपरा लाभलेला मराठवाड्यातील हिंगोली येथील दसरा महोत्सव देशवासियांसाठी आकर्षनाचा विषय आहे. दसरा किंवा विजयादशमी म्हणजे सत्प्रवृत्तीने असत्यावर व सदगुणांनी दुर्गुणांवर मिळवलेला विजय होय. पौराणिक संदर्भानुसार श्रीरामाने रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशभरात विजयादशमी उत्साहाने साजरी केली जाते. कर्नाटकात म्हैसूर येथे वाडियार या राजघराण्याने सुरु केलेला दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. जवळजवळ तितकीच प्रदीर्घ परंपरा हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा महोत्सवाला लाभली आहे.
हिंगोली व म्हैसूरच्या दसरा महोत्सवातील मुख्य फरक म्हणजे म्हैसूरच्या दसऱ्याला राजाश्रय लाभला तर हिंगोलीच्या दसऱ्याला लोकाश्रय. हा लोकाश्रय इतका उदार आहे की म्हैसूरच्या खालोखाल क्रमांक दोनचा दसरा म्हणून हिंगोलीच्या दसऱ्याची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.
फार पूर्वी कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठाच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची परंपरा सुरु झाली, असे शहरातील जुनी-जाणती मंडळी सांगतात. नंतर ही पंरपरा हिंगोलीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. या उत्सवाची व्याप्ती वाढू लागताच मठाची जागा अपुरी पडू लागली आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या रामलीला मैदानावर या महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन होऊ लागले. आता हा महोत्सव हिंगोलीतील समस्त जाती-धर्मांच्या लोकांच्या सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
सन १८५५ पासून परंपरा लाभलेल्या या महोत्सवाचे समस्त हिंगोलीवासियांनी अभिमानाने जतन केले आहे. भाद्रपद पोर्णिमेला बांसापुजन या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. घटस्थापना ते रामराज्याभिषेक असा ९ ते १० दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे हिंगोलीकरांच्या एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण होय.
अशा या एकात्मतेचे प्रतिक असणाऱ्या दसरा महोत्सवात सहभागी होऊन आपण आपली परंपरा अन् आनंद द्विगुणित करूया...!!

पारंपारिक अस्मिता जपन्या साठी एक नवीन उपक्रमसर्वात मोठ्या दीपोत्सवाचे हिंगोली येथे ०८ नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजन. ⛳⛳⛳⛳⛳⛳"...
03/11/2018

पारंपारिक अस्मिता जपन्या साठी एक नवीन उपक्रम
सर्वात मोठ्या दीपोत्सवाचे हिंगोली येथे ०८ नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजन.
⛳⛳⛳⛳⛳⛳
"रुद्र प्रतिष्ठाण परिवारच्या दीपोत्सवात ५१०० पणत्यांनी जलेश्वर मंदिर उजळणार".
🌿🌿🌿🌿🌿🌿
यंदा जलेश्वर मंदिर आणि जलेश्वर तलावात संपन्न होणार दीपोत्सव.
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
सोबत मनमोहक विद्युत रौशनाई,विविध प्रकारचे कारंजे आणि तमाम हिंगोलीकर दीपोत्सवाची शोभा वढवतील.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
महारांगोळी,सजावट केलेले दिवे ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
रुद्र प्रतिष्ठाण या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हिंगोलीतील एकमेव आणि प्रथम क्रमांकाचा "भव्य दीपोत्सव " हिंगोली शहरातील जलेश्वर मंदिर मधे यंदा गुरुवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०१८ रोजी सर्व हिंगोलीवासीयांच्या उस्फुर्त उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावर्षी दीपोत्सवाचे दूसरे वर्ष असल्याने ५१०० दीप प्रकाशमान करण्यात येणार आहेत. एकाचवेळी हजारो दिवे प्रकाशमान केल्याने या दीपोत्सवात जलेश्वर मंदिर न्हाऊन निघेल.
दीपोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाचे उधाण.रात्रीच्या अंधारात प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक समजला जातो.याच प्रकाशाने या देशातील अंधकार दूर व्हावा या हेतूने व संस्कृती जोपासना करण्याच्या दृष्टीकोनातून शहरातील रुद्र प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत दरवर्षी हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो.
पुणे येथील ऎतिहासिक शनिवारवाडा व कोल्हापुर येथील रंकाळा तलाव याठिकाणी आयोजित करण्यात येणा-या दीपोत्सवापाठोपाठ जलेश्वर मंदिर दीपोत्सवाचा क्रमांक लागावा अशे आमचे प्रयत्न आहेत. यंदा दीपोत्सवात गड किल्ले संवर्धनाच्या प्रचारार्थ किल्ल्याची रांगोळि रेखाटण्यात येणार आहे.हि भव्य दिव्य रांगोळी शहरातील काही माता भगिनी आपल्या टिमसह रेखाटणार आहेत.
या दीपोत्सवाच्या उद्घाटना साठी हिंगोली तील संत,महंत,कला,साहित्य,क्रीड़ा,विज्ञान क्षेत्रातील मान्यवर,विविध गणेशउत्सव मंडल,दुर्गोत्सव मंडल तसेच विविध संस्थे चे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या दीपोत्सवासाठी रुद्र प्रतिष्ठाण चे सर्व सदस्य,आदिंसह सर्व मान्यवर विशेष मेहनत घेत आहेत. तिमीरातून तेजाकडे नेणा-या या प्रकाशमयी उपक्रमाला हिंगोलीवासीयांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन रुद्र प्रतिष्ठाण,हिंगोलीच्या वतीने करण्यात येत आहे.

हिंगोली ची पारंपारिक अस्मिता जपन्या साठी एक नवीन उपक्रम
30/10/2018

हिंगोली ची पारंपारिक अस्मिता जपन्या साठी एक नवीन उपक्रम

29/10/2018
जगास कळते केवळ एकच, सामर्थ्याची भाषा कणखर |शक्तीयुक्त राष्ट्रातच वसती, कला ज्ञान विज्ञान निरंतर |संघटनेतून मिळवू शक्ती, ...
18/10/2018

जगास कळते केवळ एकच,
सामर्थ्याची भाषा कणखर |
शक्तीयुक्त राष्ट्रातच वसती,
कला ज्ञान विज्ञान निरंतर |
संघटनेतून मिळवू शक्ती,
याविषयी ना काही संभ्रम ||

'हिंदू' संस्कृती आपली, 'हिंदुत्व' आपली शान, सोनं लुटूनी साजरा करु आणि वाढवू 'हिंदुस्थानाची' शान.
विजयादशमीच्या शुभेछा !!

#विजयादशमी

13/10/2018

हिंगोली दसरामहोत्सवाच नयनरम्य चित्र.

हिंगोली दसरामहोत्सवाच नयनरम्य दृश्य.
13/10/2018

हिंगोली दसरामहोत्सवाच नयनरम्य दृश्य.

13/10/2018

हिंगोली दसरामहोत्सवाच नयनरम्य चित्रफित.

Address

संत श्री मानदासबाबा रामलीला मैदान
Hingoli
431513

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हिंगोलीचा दसरामहोत्सव-Hingolich dasramotsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share