20/02/2020
स्वामी ऊँ !
स्वामीभक्त दरवर्षी ज्याची अतुरतेने प्रतिक्षा करत असतात तो म्हणजे स्वामी महाराजांचा पालखी रथ सोहळा .
स्वामी महाराजांच्या शिकवणीचा प्रसार व्हावा , तरणोपाय असणार्या स्वामीनामाचा गंध सर्वदूर दरवळावा , गावोगावी असणार्या भाविकांना स्वामींच्या मनोहर रुपाचे मनसोक्त दर्शन घेता यावे , स्वामींच्या प्रासादिक पादुकांचा सहवास लाभावा तसेच याद्वारे धार्मिक -सामाजिक प्रबोधन , मार्गदर्शन व्हावे या हेतुने प्रतिष्ठान प्रतिवर्षी श्री स्वामी समर्थ महाराज पालखी रथ सोहळा आयोजित करते.
श्री क्षेत्र अक्कलकोट येथून सोमवार दि. 16.03.2020 रोजी प्रस्थान करून श्रींचा रथ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी म्हणजेच गुरुवार दि. 26.03.2020 रोजी श्री क्षेत्र कोल्हापूर येथे पोहचेल.
या सोहळ्या दरम्यान श्रींचा रथ वळसंग , सोलापूर, कोंडी ,मोहोळ , पेणूर ,पंढरपूर , खर्डी , सांगेला , कमलापूर , जुनोनी , कवठे महांकाळ , भोसे , मिरज , खोतवाडी , इचलकरंजी , रूकडी , उचगाव ,कोल्हापूर या गावांतून परीक्रमा करेल.
अनेक स्वामीभक्त दरवर्षी रथसोहळ्यात स्वामीकृपेचा लाभ घेतात. आयुष्यभर पुरणार्या अनुभवांची शिदोरी मिळवतात , स्वामींच्या वात्सल्याची प्रचिती घेतात.
आपणासही या स्वामीकार्यात सहभागी व्हायचे असल्यास जरूर संपर्क करा. पालखी - रथ सोहळा 11 दिवस चालतो. सहभागी वारकर्यांकडून कसलेही शुल्क आकारण्यात येत नाही. *श्रध्दा हेच मूल्य व आनंद हीच प्राप्ती.*
या सोहळ्यासाठी तसेच अकरा दिवसांमधील अन्नदानासाठी आर्थिक वा वस्तू रूपात मदत व सेवा स्विकारली जाते. आपणास मदत किंवा सेवा करण्याची इच्छा असल्यास संपर्क करा . देणगी बँक खात्यावरही जमा करू शकता .
संपर्क क्र.-
कोल्हापूर - 8623996578 , 9049718833.
पुणे - 9766422122 , 9225632345
मुंबई - 9221700432
पंढरपूर - 8805974725
इचलकरंजी - 9763595983.
Bank Account -
Bhaktigandh Seva Pratisthan
Bank of India , Ambabai Mandir Kolhapur Branch
Currant Acc No -
090220110000320
IFSC Code - BKID 0000902