राजयोगी संत श्री सद्गुरु महिपतीनाथ महाराज, ढोली बुआ,ग्वाल्हेर

  • Home
  • India
  • Gwalior
  • राजयोगी संत श्री सद्गुरु महिपतीनाथ महाराज, ढोली बुआ,ग्वाल्हेर
Directions

राजयोगी संत श्री सद्गुरु महिपतीनाथ महाराज, ढोली बुआ,ग्वाल्हेर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राजयोगी संत श्री सद्गुरु महिपतीनाथ महाराज, ढोली बुआ,ग्वाल्हेर, Religious Center, Gwalior.

दिनांक 23 तारखे पासुन सद्गुरु श्री नरहरी नाथ महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सुरू होत आहे..संत श्री नरहरी नाथ महाराज हे सद्...
22/02/2022

दिनांक 23 तारखे पासुन सद्गुरु श्री नरहरी नाथ महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सुरू होत आहे..
संत श्री नरहरी नाथ महाराज हे सद्गुरु महिपती नाथ महाराज यांचे सद्गुरु होते..
त्यांच्या आणि गुरु महाराज यांच्या पुण्याईने आज ही थोर परंपरा अनुभवण्यास मिळत आहे..
नरहरी नाथ महाराज यांच्या मार्गर्शनाखाली गुरु महाराज यांनी योगाभ्यास आणि किर्तन सेवा करण्यास सुरुवात केली..
गुरु महाराज यांच्या प्रेमापोटी त्यांनी दिक्षा पण त्यांना मांडीवर बसवून दिली...
धन्य ती माऊली जी लेकरांच्या हितासाठी नेहमीच अमृताचा वर्षाव करत राहीली.. ज्याच्या मुळे गुरु महाराज आपणास लाभले..
नरहरीनाथ महाराज की जय..🙏

मंगलमूर्ती मंगल करिसी सर्वही संकट विलया नेसी ॥ गणाधीश रंगणा येसी गोंधळा याव हो ॥धृ॥ सरस्वती गुण प्रवीणा हाती घेऊनि पुस्त...
23/01/2022

मंगलमूर्ती मंगल करिसी सर्वही संकट विलया नेसी ॥ गणाधीश रंगणा येसी गोंधळा याव हो ॥धृ॥ सरस्वती गुण प्रवीणा हाती घेऊनि पुस्तक विणा नाचत नाचत रंगणा गोंधळा याव हो ॥1॥ आदिमाता तू भवानी तुझी कीर्ती कोण वानी तुळजापुरची कुळस्वामिनी गोंधळा याव हो ॥2॥ माहुरगडची यमाबाई सप्तशृंगी माझे आई ॥ कुरळ केश फिरंगाई गोंधळा याव हो ॥3॥ पाहता दिससी तू भोळी कोपल्या त्रैलोक्याला जाळी कैलासीचीये वेल्हाळी गोंधळा याव हो ॥4॥ सातार्‌याच्या मार्तंडा पाल पेमरी तुझा झेंडा । जेजुरी लिंगा पूर्ण प्रचंडा गोंधळा याव हो ॥5॥ आदी नमु गोरक्ष बाळे निवृत्ती ज्ञान सत्यामळे गैबी गुप्त उद्‌बोध मिळे गोंधळा याव हो ॥6॥ केसरी शिवदिन नरहरी माय लक्ष्मीकांत दाखविल पाय । महिपती तुजला बाहे गोंधळा याव हो ॥7॥
भजन 2
गोड कौतुक अंबेचग साहित्य । कराव याच्या पूजेच ॥धृ॥ लोबाइलो लागीला लो ॥ घरातलो तुझ्या दारातलो ॥ आंकाशीलो तुझ्या पातळीलो ॥ आढाला लो तुझ्या पिठाला लो ॥
भजन
अंबे गांव ग तुळजापूर पुरबाई अराधियाची वारी ग काय ग ॥ अंबे दयाळ आल्याबाई ॥ तुझ्या काय पोटाला शाल जोडी ग ॥1॥ अंबे तुळजापूर कोट । कोट बाई कशाने काळा झाला ग ॥ अंबे दयाळ आल्याबाई ॥ तुझ्या काय होमाची परी जाळीला गं काय ग ॥2॥ अंबे तपकल्याची चोळी । चोळी बाई कशाने ओली झाली ग काय ग ॥ अंबे दयाळ आल्याबाई ॥ अंबे तुझ्या काय जहाजाला बाही दिली ग काय ग ॥3॥ अंबे उन्हाळ्‌या दिवसांमध्ये पाणी काय मिळेल पाखराला ग काय ग ॥ अंबे दयाळ आल्याबाई ॥ अंबे पाझर फोडिल डोंगराला ग काय ग ॥4॥ अंबे तांबोळणिनी माय ॥ पान काय देशील पंचवीस ग काय ग ॥ अंबे दयाळ आल्याबाई॥ विडा काय घेशील कचेरीत ग काय ग ॥5॥ अंबे कोण्याग माउलीने पांचा बोटाने धरम केला ग कायग॥ अंबे दयाळ आल्याबाई॥ अंबे तुझ्या काय मांडव गांवा नेलाग कायग ॥6॥
भजन
भूतळांत असिया स्थळांत यमुना जळांत हिमनग बाळी ॥ हिमनग बाळी ॥ असी भुवनत्रयी कोणची दुजी वेल्हाळी ॥धृ॥ मन सुमन करूनि विषगमन ॥ गणुनि रति रमण ॥ शिवाची राणी शिवाची राणी ॥ हे भजता देई नित्य सुखाची खाणी ॥ इचे चरण धरूनि दृढ शरण , तया भव तरण ॥ अशी शर्वाणी पाववी जना दीनासी पहानिर्वाणी ॥ अति दुःष्ट रोग परिपुष्ट , दूर करि कष्ट बयाची नहाणी । हा महिमा कविजन ऐकल बा कानी॥2॥ क्षण उदो मदुत्तर दुधो पयचि शशि उदो उदो हे वाणी ॥ तनु निक्षित करी कल्होळ तीर्थि चे पाणी ॥चाल ॥ जान्हवी जान्हवी वाहे मुख धारा पडे अखंड ॥ अर्चना जिच्या उपच्यारा करि शिखंड ॥ मातला दैत्य गणसारा करि दुःखंड ॥ पाववी वंश विस्तारा करि अखंड ॥चाल ॥ किती भुते , सरळ बहुते , फिरविती सुते , कुंकुम भाळा , कुंकुम भाळा , कवडाचे साज खेळती पोत झल्लाळा ॥भुतळा ॥
॥ उदयोस्तु ॥
॥ गोड कौतुक अंबेच ग साहित करावं येच्या पूजेच ॥

लक्षुमीकांता मज पाय दाखवी आता॥ अनाथा मज पाय दाखवी आता ॥ बृद हे आपुले सांभाळियरे भगवंता॥धृ॥ त्रिवीध तापे झालो कद्गटी पिडिलो देही॥ भ्रंरातित भुललो मज सुचत नाही कांही॥ फिरता फिरता बहु शि‍णलो दिशादाही॥ जीव तरमळतो विश्रांती कोठे नाही॥1॥ मी एक पापी मज ऐसा नाही कोणी॥ मात पित्यासी छळिलेकी द्रोहे करुनी॥ देव द्विज हे नाहि पुजिले भाव धरुनि॥ आता रडतो सर्वस्वे झाली हानी॥2॥ देह अभिमाने नाडलो रे वासुदेवा॥ तीर्थव्रत हे केले कांहिच नाही सेवा॥ न दिसे पदरी किंचित जव सुकृत ठेवा॥ नाही घडली मज पासुनी सद्‌गुरु सेवा॥3॥ गणगोत आप्त मेळविले असंखय कोटी॥ सुखी मी झालो लागलिसे माया मोठी॥ माझे म्हणुनी म्या कवळुनी धरिले पोटी॥ तेची वैरी लागले रे होउनी पाठी॥4॥ साधु संतासी नमन नाही केले ।अन्नदान इह जन्मी नाही घडले॥ भगवत भजनी मज पासुनि अंतर पडले॥ विषय भोग भोगिता वय हे गेले॥5॥ नरहरीनाथा मी शरण आलो पाई॥ तुज विण त्राता महिपति चा कोणी नाही॥ चरणा पाशी हा ठाव अक्षई देई॥ अभय वर हा कर मस्तकी धर लवलाही॥6॥
अभंग ( 27 )
सखया सद्‌गुरु ने केले रे परदेशी। आता मी कवणासी शरण जाऊं॥ मायेने बाळक टाकिले वनात। पुढे कैसी गत होईल माझी॥ मागे पुढे कोणी नाहिरे भगवंता। कायरे संचिता लिहले आहे॥ काय करु देवा जीव हा जाईना॥ करुणा येर्ईना गुरुरायासी॥ नरहरी नाथा ने मन केले निष्ठुर। महिपति किंकर दुख भोगी॥1॥
चिरंजीव तुम्ही असा सर्वकाळ। बाधा कळिकाळ न करो तुंम्हा॥ गुरु भक्ति सदा राहो तुमच्या घरी। मुक्ति वसो द्वारी अखंडीत॥ संतती संपति लक्षुमी धनेसी। चिरकाळ तुम्हासी असोसदा॥ साधू संतजन निरंतर येतील। प्रसन्न होतील भक्ति भावे॥ नाथ नरहरी आशिर्वाद देती। व्हाल महिपती सत्य सत्य॥27॥
॥ अभंग ॥
आदिअंती नाही कोठे अवसान॥ अवघानारायण सुखरूप॥1॥ डोळा ओळखुनी प्रेमे आलिंगिला॥ भावे साठविला हृदयात॥2॥ कर्मक्रिया नांही उरले दुजेपण॥ काया वाचा मन ओवाळीन॥3॥ केसरी सद्‌गुरूकृपेचे लळित॥ शि‍वदिनासी नित्य हारि विट्ठल॥ 4॥
केशवाचे नाम घ्यावे॥ विघ्न अमंगल जावे॥1॥ सर्व सार्थकसार कळा॥ नारायण गा सकळा॥2॥ माधवाचिया निजग्रामी॥ मायानांही देह ग्रामी॥3॥ निर्विकार इंद्रिय धंदा॥ हरिगोविन्दा परमानंदा॥4॥ शि‍वविष्णू केसरिगुरू॥ शि‍वदिना जीवनतारू॥ 5॥

॥ विडा॥
विडाघ्याहो सद्‌गुरूनाथा सगुण ब्रह्म समर्था॥ निद्गठा भक्ति पर्णज्यासी आले पक्व मुक्ति पंथा॥धृ॥ अहं कठीण ज्ञानाग्नीत गाळुनि चूना केला नीट॥ सोहंशब्द गाळियेला निर्विकारतो अद्‌भूत॥1॥ अंतः करणी आशा गोडी त्याह्या सुपारीच्या फोडी ॥ श्रवण अडकित्यात केल्या॥ भावे सुगंधित जोडी॥2॥ खरतड मन बोध आले॥ प्रपंचात कडू झाले॥ परमार्थाच्या रंगुनिरंगी नाम खजील पावले॥3॥ उत्तम क्रिया निःष्कामाची जायफळे कामाची॥ जायपत्री तद्रुपता॥ शांन्ती वेळाविश्रामाची॥ 4॥ वैराग्याच्या तीक्ष्ण चोख॥ लवंगा आरंभिल्या देख। । केशर कस्तुरि कर्पूर पूर॥ झाले उपचार संपूर्ण॥5॥ शि‍वदिन केसरिनाथा पाई ओवा चिंतन सदा ही॥ अकल कला मेळवीला धयावा शेवट प्रसाद पाही॥ 6॥
॥ शेज आरती ॥
ओवाळीतो भावे देवा द्रोजारती॥ सुखेनिद्रा करा राई ऋक्मिणिच्या पती॥धृ॥ कायावाचा मने करितो अखंड सेवाजी॥ राई ऋक्मिणि सहीत निद्रा करा हो देवाजी॥ हृदय पलंगी अंथरलीम्या गादी चित्ताची॥ मनबुद्धिच्या उषया ठेविल्या रजई सत्वाची॥ 2॥ चंद्र सूर्य दिप समयाजळती प्रकाच्च अद्भुत॥ सत्रावीचे उदके झारी भरली डबडबित ॥ अंतःकरणी तबकी तांबुळ ठेविला पाही॥ नाना परिमळ द्रव्य देवा ध्याहो लवलाही॥4॥ विद्गाययाची पिकदानी देवा मंचका साठी॥ अहंकार हे तस्त मांडिले थुंकाया साठी॥5॥ शांती क्षमा दया उभ्या व्यजने वारिती॥ नरहरिकृपे चरणचोळित बैसे महिपती॥6॥
इतुके मजद्याव॥ मागतसे मी भाव॥धृ॥ सद्‌गुरू वाचुनि दैवत दुसरे॥ मजला न अठवाव॥1॥ भजन पुजन अणि ध्यान सदोदित॥ चरणाच लागाव॥2॥ सर्वाभूती एकचिआत्मा॥ असे निश्चयायाव॥3॥ आत्म स्तुतिपर निंदाद्वेश यापासुनि रक्षाव॥4॥ हे मन चंचल चपल असेकी॥ यासी स्थीर कराव॥5॥ देव द्विज गौची सेवा॥ येथे सादरव्हाव॥6॥ साधूसंत ग्रहा आलिया त्यांचे दास्य घडाव॥7॥ तीर्थव्रत कुलधर्म यात्रा॥ निःष्कामे घडवाव॥8॥ भक्ति ज्ञान वैराग्य सदोदित मजपाशी आसाव ॥9॥ प्रतिवर्षी उत्साह पुण्यतिथि समयी आपण याव॥10॥ तन,मन,धन गुरू चरणि अर्पिले यासी सांभाळाव॥11॥ संतति संपति मुक्ति नलगे॥ कीर्तनि प्रेत असाव॥12॥ गुरूपदि निष्ठा नधरी त्याचे॥ तोंडचि न दाखवाव॥13॥ कंथा टोपी अणि भिक्षेच्या॥ अन्नेपोट भराव॥14॥ संकट पडल्या महिपति लागी॥ नरहरि धावत याव॥ 15॥

चिरंजीव कल्याण सदासुख संपति अरोग्य काया॥ अखंडीत लक्षुमी तुम्हावर करिल कृपेची छाया॥धृ॥ गौब्राह्मण प्रतिपाल करावा भूतदया बहुपोटी॥ मातापिता गुरू सेवा करिता ईश्वर येइल भेटी॥1॥ श्री भगवत गुण कथा पुराण श्रवणे पुण्य राशी॥ घडतिल सकलहि तीर्थेवसती क्षेत्री प्रयाग काशी॥2॥ संतसमागम अर्चन पुजनी निशि‍दिनि भाव असावा॥ निंदा दवेष दुष्ट वासना दुर्जन संगनसावा॥ अतीत अभ्यागती जीव मात्रे अन्नधयाव॥ काळस अनकुळ असल्याद्रव्य सत्‌कर्मी लावाव॥4॥ धर्मयश अणि प्रताप कीर्ती होइल प्रगट जगात॥ गुरू भक्ति ची ध्वजा लाविली साधूगर्जत जात॥5॥ भक्तिज्ञान वैराग्य निराअभिमानी पूर्ण विदेही॥ सुख दुःखादिक पुतळा हा प्रेमाचा संशय नाही॥ 6॥ नरहरिनाथ म्हणे हरिभजनी अळस नका करूं काही॥ होइल वृद्धी संतति संपति महिपति गुरू कृपाही॥7॥
॥ अभंग॥
अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरिच्या दासा॥1॥ तथास्तू॥पा.॥ कल्पनेची बाधा नंहो कोणी काळी॥ ही संत मंडळी सुखी असो ॥2॥ शरीर प्राणाची करीन कुरवंडी॥ क्षण एक न सांडी संग त्याचा॥3॥ कलियुगाचा वारा नलागो राजसा॥ माझिया विष्णुदासा भाविकासी॥4॥ नामाम्हणे तया असावे कल्याण॥ ज्यामुखी निदान पांडुरंग॥5॥
सद्‌गुरू महिपतिनाथ नरहरि शि‍वदिन केसरिनाथ॥

पौष शु. पंचमीआजच्या दिवशी लळीत असतं.यात रात्री जागरण असतं ज्याच्या मध्ये विविध सोंग केले जातात. यात समाजाच्या दृष्टीने स...
23/01/2022

पौष शु. पंचमी
आजच्या दिवशी लळीत असतं.
यात रात्री जागरण असतं ज्याच्या मध्ये विविध सोंग केले जातात. यात समाजाच्या दृष्टीने सुद्धा काही संवाद असतात ज्यातुन विविध प्रश्नांवर भाष्य केलं जातं. सोबतीने भजन ही केले जातात.
आजच्या दिवशी गुरु महाराज यांना शेज केली जात नाही.
लळित चे भजन:
दया करा मज वरती स्वामी दया करा मजवरती..
हीन दीन मतिमंद पतीत मी पावन तु गुरूमुर्ती..
मातपिता आणि बंधु सोयरे सर्व सांडूनी परती..
आस करून मी कास धरीत असे करुणा येऊद्या पूर्ती..
कल्पनेची बाधा अंगी भुते बहु संचरती..
अशनी शयनी भ्रमता भुललो घडी घडी वेडच करती प्रबळ ज्वाला चिंतागनीच्या मज चहू भवता फिरती..
त्राहे त्राहे जीव जाऊ पाहे उडी घालुनी घ्या कडेवरती..
नरहरी नाथ कृपेचे अंजन नयनी कराया भरती..
महिपती होईल येशवंत हा तुझी वाढील अद्भुत किर्ती..
भजन
आला हो आला गुरुराज माझा आला ||धृ|| राजा मनवारु वर चडे धारणेची चवरी उडे नवविध भक्ती निशान पुढे दिवट्या पहा बारा सोहळा||१|| चिन्मया चे छत्री वरी उन्मनी माता छाया करी अनुहात वाधे वाजत वरी मागेेपुढे गजर झाला||२|| सत्रावीचे जीवनामृत कामधेनू सवे चालत रिद्धी सिद्धी सदातिष्ठठत रूमाल शांतीचा केला ||३|| धर्म अर्थ काम मोक्ष सेवक जाणा हे प्रत्यक्ष फौज ज्याची लक्षा अलक्ष हाती द्रीष्टीचा भाला ||४|| नवरंगाचा उगळे गुलााल सुवर्ण पुष्पाचा सुकाळ एकची स्वरूप रानाेेमाळ पार नाही भाग्याला ||५|| पूूर्वी सुकृत होते गाठी सांप्रत नरहरी कृपा मोठी झाली शिवदिनाची भेटी केले महीपती अज मजला||६||

दिवस नऊवा पौष व.  तृतीयाआज  परंपरे अनुसार  गोपाळ काला साजरा केला  जातो.त्यातील  काही निवडक  पद   इथे  समाविष्ट  करत  आहो...
20/01/2022

दिवस नऊवा
पौष व. तृतीया
आज परंपरे अनुसार गोपाळ काला साजरा केला जातो.
त्यातील काही निवडक पद इथे समाविष्ट करत आहोत.

भजन:
हरी रंगणी देखिला तो हा हो बाई || ध||
निर्गुण रूप म्हणती ज्याला श्रुती गाती स्वरूपाला ||
भक्तीसाठी सगुणयी झाला ||१||
बालपणी खेळ केला || गौळणीच्या गृही गेला ||
नेत्री खुणावी गोपीला ||२||
अहं मामा मारियेला द्वैता चा ग्रास केला ||
अर्जुनाला बोधची केला ||३||
पाहू ज्ञाता स्वरूपाला || अवघाची केसरी झाला ||
शिवदीन भोगिती सोहळा || तो हा हो बाई||४||

ओवी:
जो मंगला मंगल पूर्ण॥ जो का गोकुलीकारमण ॥
मोक्षाचे तारू स्वये श्रीकृष्ण ॥ज्याचे बारवेपण अलौकिक ॥१॥
जो साक्षात परब्रह्म॥ करो निघाला चोरीकर्म ॥
धरोनिबाललीला संभ्रम ॥ आवडी परमनवनिताची॥२॥

भोजन भजन:
यशोदे गृहाला चाल मला ग जेवू घाल यशोदे॥धृ॥
आई करून दे लहानसा उंडा॥ जलदीने करून दे मांडा॥ दूर गेला गायीचा झुंडा॥१॥
आई दही दे दही दे दही ॥ मला म्हणशील सांगितलं नाही॥ चाल राखोनि आपुल्या गायी॥२॥
साध्या गावाची पोळी लाटी॥पुरणपोळी करून दे मोठी॥ नाही आळवीत गुळासाठी॥३॥
आई वडी दे वडी दे वडी॥ आत मिळवुनी साखर खडी॥ गुळ पापडी देखुनि रडी॥४॥
तिळ लावूनी भाकर भरी॥ वांगं भाजून भाजुनी भरीत करी॥ मला कांद्याची आवड भारी॥५॥
नामा विनवी केशवासी॥ गायी वळवितो गं हृषीकेशी ॥ ठावं द्यावा कि चरणापाशी॥६॥

गोपाळकाल्यादिवशी होणारे खेळ:

१. झाडणे - कृष्ण छंदे गोपी झाडिती संसार ॥ अविद्येचा केर निरसोनि॥धृ॥
२. सारवणे - कृष्ण छंदे आम्ही हृदय सारवु॥ सर्वदा गौरवू कृष्ण रूप ॥धृ॥
३. पिंगा - घाली पिंगा बाळे, सांडोनि हृदय चाळे॥ नाही समाधान का हालविती मान ॥धृ॥
४. फुगडी - सुंदर घाली फुगडी गं फुगडी गं। वरी वरी पाऊलं रगडी गं रगडी गं। झोके घेती सुरसुग, सुंदर
घाला फुगडी गं ॥धृ॥
५.झम्पा - सयेग साजणी सयेग। झम्पा घालू सद्गुरूच्या पायी गं॥धृ॥
६. चकरी - चकरी घालवितो बोलू नये दिठी॥ बोलू नये माझिया जगाचिया भेटी॥धृ॥
७. लखोटा - लई लई लखोटा लखोटा ॥ मूळ बंदी कासोटा-कासोटा॥ मागे पाही साहीये साहीये॥ हातो हाती
गुंतली॥ जीवपणा मुकली ॥धृ॥

अंबा-
नमूनि गजमुखा देवी गौरीच्या सुना ॥ उचलोनि धनुष्यबाण रामे परणिली सीता ॥१॥
अंबा शिंपी सीताबाळ जनकाची कुमरी॥ शिंपिती तेही दोघे रामसीता सुंदरी॥धृ॥
मांदिड्या रामचंद्रा सीता पाऊल ठेविती॥ सीतेच्या सखयावेरच्या चरणी कुंकू लाविती॥ रामाचे बालमित्र जावळी येऊनि बैसती॥२॥
अंबा हा कल्पवृक्ष येथे कोणी लाविला॥ तीच माय पतिव्रता अंबा पिकू लागली॥३॥

घुसळण -
डेरा हो डेरा मांडिला अंगणी॥ ब्रह्मरस ओतिला भितरीं॥ अर्ध ऊर्ध्व मांजरे बहू परी॥ ज्ञान तत्व हो ज्ञान तत्व घुसळते गौळणी॥१॥
मन पट घुसळिते गौळणी ॥ तिचा पदर हो तिचा पदर लोळतो धरणी॥ मन पट घुसळिते गौळणी॥धृ॥

दिवस सहावापौष शु. पौर्णिमा संत श्री गोविंदनाथ महाराज पुण्यतिथी त्यांच्याबद्दल थोडेसे विवेचन:गोविंदनाथ महाराज हे गंगाधर न...
17/01/2022

दिवस सहावा
पौष शु. पौर्णिमा
संत श्री गोविंदनाथ महाराज पुण्यतिथी
त्यांच्याबद्दल थोडेसे विवेचन:
गोविंदनाथ महाराज हे गंगाधर नाथ महाराजांचे चिरंजीव व् गंगाधरनाथ महाराज यांचे स्थुलातले सदगुरू हाेते.

गोविंद गोविंद मुखी वदावे॥ गोविंद चरणांबुज नित्य ध्यावे॥ गोविंद पावे प्रिय भक्त काजा॥ गोविंदनाथ चरणी प्रणिपात माझा ॥
गोविंदनाथ महाराज बहू प्रतापी॥ प्रेमे सदा महिपति चरणामृता पी॥ ठेवा तुम्हीं हृदयि ही मुखिनाम माला॥ मोक्ष स्वये वरूनि घालिल कठिंमाळा॥

आरती श्रीगोविन्दनाथ महाराज
गंगाधर गुरूचरणी दृढ भक्ति ज्याची॥ भजनी अर्चने पुजनी संतत रतित्याची॥ कीर्तन रंगे रंगुनि डोलत तनुसाची॥ महिवर पुनि अवतरला ज्ञानेच्च्वर हाची॥ 1॥ जयदेव जयदेव जय गोविन्दनाथा॥ आरती आर्तहरणा तवपदिरत माथा॥धृ॥ विरतप्रपंची संतत परमार्थिनिरत॥ द्याडरिपु दमन करूनि मन आनंदे भरित॥ ज्याच्या नामस्मरणे भवसागर तरत ।व्यापुनि भुवनञय जो दच्चांगुले उरत॥2॥ ध्यानी मनी सेवा महिपति रायाची॥ बाळकृद्गण प्रभू काच्चीनाथाची॥ दत्तात्रय रंगनाथ वर मागत हाची॥ माधव गोपालात्मज रूचि गुरूभक्तिची॥3॥
कटिबंध श्रीगोविंदनाथ महाराज
गो नामे पृथ्वी सम सहन शक्ति जया अंगी । गौ ब्राह्मण प्रति पालनकर्ता सज्जन सत्संगी । गोरक्षासम श्री गुरुभक्ती असे जया लागी । गोपीचंद प्रिय भजनामध्ये आनंदे रंगी ॥1॥ मन पंचाक्षरी जप सदा करी गोविंदनाथ । भवसागर अधि चुकेल जन्म मरणाची साथ ॥धृ॥ विंश वरूषे सर्वा अपसम अवलोकित माय । विश्वास धरि राम कृष्ण अति फार वदु काय । विचारू निघे पौष पौर्णिमे महिपती गुरुराय । विष्णु रथी बैसुनि आनंदे वैकुंठी जाय ॥2॥ दमन करूनी तेजे इंद्रिय गण सर्वहि शमवीले ॥ दर्शन घेण्या करिता साधू संत जमा झाले । दसरा दिपावळी हुनी अधिक महापर्व आले । दंड प्रणाम करून शेवटी चरणतीर्थी न्हाले ॥3॥ नारद वायु पुत्रा सम ज्या नामाचा छंद । नारायण प्रल्हादे स्मरता तुटला भवबंद । नारीनर बाळकासि वाटे अक्षयी आनन्द । नातुलीला अवलोकन करण्या अवतरला नंद ॥4॥ थकला आकाशासम पाहुनी सद्‌गुरु चे रूप । थकले चार सहा अठरा ही वदती अनूप । थकला वासुदेव वर्णिता झाला तदरूप । थकला दत्तनाथ सच्चिद आनंदरुप ॥5॥

संत  श्रीदत्तात्रयनाथ महाराज पुण्यतिथी(समाधी) पौष शुद्ध चतुर्दशी , निर्वाणस्थान ग्वालियरनमस्कारसुवर्णरेखा तटि जो विराजे ...
16/01/2022

संत श्रीदत्तात्रयनाथ महाराज पुण्यतिथी(समाधी) पौष शुद्ध चतुर्दशी ,
निर्वाणस्थान ग्वालियर
नमस्कार
सुवर्णरेखा तटि जो विराजे ॥ जया वंदीती थोर जीवाजी राजे ॥
करि पुण्यतिथी आनंदे स्वभावे ॥ गुरूदत्तनाथा नमितो स्व भावे ॥
गुरूसेवनालागि जन्मासि आला॥ गुरूभक्तिहा जीवना हेतझाला॥ सदाआठवी जो गुरू महाराजा॥ नमस्कार श्री दत्तनाथासि माझा॥
श्रीदत्तनाथ महाराज स्वयंभु योगी॥ चैतन्य दीप उजळोनि तुर्येसि भोगी॥ ब्रह्मस्वरूप चिद्रुप गोविंद झाला॥ साद्गटांग मी नमितसे त्यांचा पदाला॥
आरती श्रीदत्तात्रयनाथ महाराज
जयदेव जयदेव जय दत्तनाथा॥ पंचारती तुझला ओवाळु आता॥धृ। दर्च्चन मूर्ती आपुली अद्भुत। दवडुनी भ्रम हा सकळा लावी भजनात॥ दत्तात्रय नाम हे केले सार्थक॥ दर्च्चन मात्रे ज्याचा भवसागर तरत॥ 1॥ तारूनी भक्तजनासी बसती निवांत॥ तरती पापी ज्याच्या नाम स्मरणात॥ तनुही सोडुनी मिळवी ब्रह्मस्वरूपात॥ तव स्वरूपाचा महिमा आहे अगणीत॥2॥ नाना याती येवुनी वंदीती चरणा॥ नाचत गाती कीर्तन गजरी हे जाणा॥ नारायण नामी दृढभक्ति भजना॥ नाही दुःख जनासी देता दर्च्चना॥3॥ थरथर कापती पातके मुखी घेता नाम॥ थारा नाही कोठे दे चरणी धाम॥ थकले चारी वेद वर्णिता ज्याचे गुणगान॥ थरथर नाचत अनंत करि साद्गटांग नमन॥4॥
कटिबंध श्रीदत्तात्रयनाथ महाराज
दर्शन घेता नाम जयाचे होतो आनंद । दमन करूनि षड्‌रिपूस जो राहे अभेद । दशदिशा व्यापुनिया वसती अखंड सृष्टित । दान देऊनी विप्र जनाते तोषवी अद्‌भुत ॥1॥ दत्तनाथ चतुराक्षरी मंत्र जपता हा नित्य । भवसागर तरुनिया नर जाई स्वर्गात ॥धृ॥ तारक मंत्र जनासी देउनी लावी भजनात । त्याग वृत्तिने राहुन सद्‌गुरु चरणाते ध्यात । तान राग जाणुनिया करिति कीर्तन रंगात । तरती पापी नाम घेता श्री सद्‌गुरू समर्थ ॥2॥ नाम घेउनी देह ठेविला सद्‌गुरु चे चरणा । नामस्मरणी तरुनि जाती सकळ ही जाणा । नादाने हे अंबर भरले समूळ ही जाणा । नाही नाही त्या जन्म-मरण हे भवतरुनि जाणा ॥3॥ थरथर कापती विघ्ने सकळ नाम हे समर्थ । थकला दत्तनाथ हाती धरी रंगनाथ । थकली जिव्हा नाम घेता श्री दत्तनाथ । स्थीर करोनी अनंत चरणी ठेवीतसे माथ ॥4॥

संत श्रीमहिपतिनाथ महाराजतिथी (समाधी) पौष शुद्ध त्रयोदशी , समाधी-स्थळ ग्वाल्हेरनमस्कारकिर्ती प्रताप गुणयशे अगणित ज्याची॥ ...
15/01/2022

संत श्रीमहिपतिनाथ महाराज
तिथी (समाधी) पौष शुद्ध त्रयोदशी , समाधी-स्थळ ग्वाल्हेर
नमस्कार
किर्ती प्रताप गुणयशे अगणित ज्याची॥ ब्रह्मस्वरूप दुढवृत्ती अखंड त्याची॥ अज्ञान मूढ दिन उद्धरि योगीराजा॥ नमस्कार श्रीमहिपतिनाथासि माझा ॥
आरती
ममता त्यागी भोगी ब्रम्हपदीवास॥ मनसंकल्पे करूनी विचरति दशदीश॥ मदमत्सर ज्या अंगी नसे कि लवलेश॥ मन उन्मन होउनिया लावी भजनास॥1॥ जयदेव जयदेव जय महिपति गुरूराया॥ वंदी तव पादांबुज भवभय निवटाया॥धृ॥ हिंडुनिया महिवरी कीर्ती वाढविली॥ हीन दीन अध अधमे भजने तारियली॥ स्वहीत तितुके दाउनि अनुहत छेदियली॥ हिमनग शि‍खरी जाउनी ध्वजा उभारियली॥ 2॥ पदकमळी नरहरिच्या धरूनी विश्वास॥ पतीत पावन भजनी अखंड निजध्यास॥ परमार्थी अभिमान धरूनी चित्तास॥ परपरती परवस्तु लक्षी अलक्षास॥ 3॥ तीर्थे अवधे करूनि यति तू झालासी॥ तीर्थ प्रेमा धरूनी रंगुनि रंगलासी॥ तिमिराचा नाशक तु महिपति म्हणवीसी॥ तीर्थ चरण सेवे आपा दिन नीशी॥4॥
कटिबंध
मन चंचल अति स्थिर करूनि मुखी घेताची नाम ॥ मदमत्सर रिपु नाश करूनिया देतो विश्राम । मत्स्यकवत लक्षातन येई विषयिक जो काम । महिमा वेद पुराणे गर्जती सद्‌गुरु निजधाम ॥धृ॥ महिपतीनाथ षडाक्षरी मंत्र षडविकार नाशी । अशनी शयनी जपता तारक मोक्षपुरी काशी ॥धृ॥ हीनदीन मतिमंद पतीत महादोषी जे कांही । ही नौका भवसिंधू तारक मार्ग दुजा नाही । हितकर दृढतर जयाचा मुक्तचिया देही । हिमनग शिखरी वास करूनिया अचल पदी राही ॥2॥ परम प्रतापी दिनमणी जैसा स्वयं प्रकाश रूप । पद्‌मासन घालोनी खेचरी ओढितसे चाप। पर परती पर वस्तु विलोकुनि झाला चित्‌ स्वरूप । पद सद्‌गुरूचे हृदयी आणुनी उजळे ज्ञानदीप ॥3॥ तीव्र तपे सदभक्तिसी अर्पुनी केवल गुरूमूर्ति । तीन मुखी भागीरथी वाहे यमुना सरस्वती । ती गती योगी जाणती इतरा न कळे कल्पांती । तिळ तांदुळ बेल फुले अर्पुनी घ्या स्वयं भज्योती ॥4॥ नाश करूनि व्दैता अव्दैता निरखित से नयना । नानारंग विलोकुनि निश्चळ स्थित मूंर्ध्नि स्थाना । नाही नाही म्हणउनी परतल्या श्रुति धरूनि मौना । नादे अनुहत वाद्ये वाजती आनंदमय भुवना ॥5॥ थक्कित काशीनाथ पदावर लोळे भावार्थ । थरकत संसारासी विसरुनी मागे परमार्थ । थबकत वत्स विलोकित जाणुनि हृद्‌गदीत अर्थ । थय थय नाचत प्रेमा लिंगुनी वचने सनाथ ॥6॥
अष्टक
सत्राशे नृप शालिवाहन द्राके पंन्नास पांचा उणे॥स्रष्टुवत्सर नाम तो जयपहा पौषा समा मंत्रणे॥ नक्षत्रः शशि‍ वाहन तिथि त्रयोदशी॥ यामार्ध आला रवी॥ 1॥ साधोनी पर योग महिपति गुरू काया पुरी गौरवी॥धृ॥ पाहोनी युग धर्म कर्म निरूते जाणोनि केलीसिमा॥ रोधोनी मन वृत्ती स्फूर्ती करूनी साधी चतुर्थाश्रमा॥ लक्षूनी बरवी तिथि हरिदिनी संन्यस्थता गौरवी॥ 2॥ भोगोनी त्रयरात्र आश्रम बरा योगासि आरंभिती॥ साधू संत महंत सिद्ध अवघे सामर्थ्यता पाहती॥ एैकोनी कपिलार्थ सार्थ भगवत गीता हृदयि साठवी॥3॥ निद्रा योग कुयोग टाकुनि त्वरे पद्मासनी बैसले॥ अवरोनी दशवायु शीघ्र वरूते उर्ध्वासनी चालिले॥ पाहे ते निज कन्यका अणिद्विजा भिवराभ वार्तानवी॥4॥ टाकुनि सकळासिया महिवरी गेले कसे धामी हो ॥ वर्णू काय गुणादया परिघना अवतारता कामि हो॥ मीळाले नरनारि बाळ अबला अश्रूभरे श्राववी॥5॥ हृदयात किति दुःख सेवक जना गंगा कश्या लोचनी ॥ पाहाती परित्यात उत्सव कसा स्वामी विमानासनी॥ बैसोनी गजरे वरी सुरवरे ग्रीवेसि या डोलवी॥6॥ नाना वाजति वाद्यनाद बहुदा स्वर्गीअणी या जगी॥ वाजी अश्व सुरश्व बैसुनि रथी आले समाधी सुगी ॥ निर्मीला अजिठाव तो दुहितया बागेंत केली भुंमी॥7॥ तेव्हाते नदीनाम पूर्ण एैका सुवर्ण रेखा बरी॥ येवोनी निकटी म्हणे तिरतटी राहोनि पातक हरी॥ एैकोनी गुरू वाक्यता अतित्वरे येवोनिया तोषवी॥8॥ आनंदे महिफार साचि अवधे पोटातकी साठवू॥ तेव्हां सांग करोनि पूजन विधि मूर्ती गुरू आठवू॥ म्हणती संत गुणी ऋीषीवर मुनी येथोनि वार्ता नवी॥9॥ सांगोनि निज गूजकर्ण कमळी आपास ठेवा दिला॥ त्याचीये चरणी सदारत कसा प्रसाद द्यावा मला॥ आनंदे म्हणुनी कृपांमृत वदे उत्साह संतोषवी॥10॥ चवदावे दिवशी समाप्त करूनी उत्साहतो सांग की॥ काला कीर्तन शांति भोजन द्धि‍जा संन्यास श्री मान्यकी॥ भक्ति प्रेम पढेल नित्य वदनी त्यांचे गुरू चालवी॥ 11॥ साधोनी परयोग महिपति गुरू कायापुरी गौरवी॥

संत श्रीमहिपतिनाथ महाराजतिथी (समाधी) पौष शुद्ध त्रयोदशी , समाधी-स्थळ ग्वाल्हेरनमस्कारकिर्ती प्रताप गुणयशे अगणित ज्याची॥ ...
12/01/2022

संत श्रीमहिपतिनाथ महाराज
तिथी (समाधी) पौष शुद्ध त्रयोदशी , समाधी-स्थळ ग्वाल्हेर
नमस्कार
किर्ती प्रताप गुणयशे अगणित ज्याची॥ ब्रह्मस्वरूप दुढवृत्ती अखंड त्याची॥ अज्ञान मूढ दिन उद्धरि योगीराजा॥ नमस्कार श्रीमहिपतिनाथासि माझा ॥
ज्याच्या कृपे महिपति अजि धन्य होय॥ चरणामृत पिउनि ब्रह्मपदासि जाय॥ ही मालिका तुम्हि वदा करितो विनंती॥ चुकतील जन्म मरणादिक सप्तपंग्ती॥
पदेसर्वतीर्थे जयाच्या रहाती॥ अपादाजिभोळा अमर सेविताती॥ ॥ नारायण निर्मळ दौलत शि‍ष्यज्याला ॥ पुढे चालवी काशीनाथ तयाला ॥
आर्या
महिपतीनाथ गुरुचे जो नर वाचे अखंड गुण गाय ॥ रिद्धी सिद्धी त्यांच्या घरीं नांदती त्या जगी उणे काय ॥
प्रार्थना
स्वामी गुरूराया गुरूराया। करी मज वरती दया ॥ धृ॥ मजला सन्मार्गी लावाव निजरूप दाखवाव। अमृत दृष्टीने मज पाहाव अंतरलीन व्हाव॥ 1॥ भक्ति ज्ञान मला नकळेची नाही गत योगाची। वाट समजेना कर्माची चंचल वृत्ति मनाची॥ 2॥ मी तव भोळा रे दातारा वेगी पार उतारा । जन्म मरणाच्या येरझारा चुकवुनि पदि दे थारा ॥ 3॥ आता त्रासलो बहुपरी उद्धरि रे लवकरी । चरणी ठावदे नरहरी महिपती अर्जी करी ॥ 4॥
॥धावा॥
अशामधे पावरे नरहरी। धावत ये लवकरी॥धृ॥ अजवर सृष्टिसी पाळियले। अता ची कां दुर धरिले। पतीत पावन हे ब्रिद आपुले। सोडुनिया कसे दिधले। नोहे उचित हे मनी विचारी। धावत ये लवकरी॥1॥ निष्ठुर होउ नको दातारा। करि रे जगदोद्धारा। दुर्घट संकट हे संहारा। विश्व जनासी तारा। आले विध्नचि टाळी झडकरी। धावत ये लवकरी॥ 2॥ नाही धीर जिवा कोण मला। रक्षी दीन दयाळा। करूणा येऊ दे कनवाळा। प्राणचि उरला डोळा। काय पाहतोसी कृपा करी। धावत ये लवकरी॥3॥ मागे बहुतासी तारियले। अजि का मौन धरिले। हतिचे द्रास्त्रतुवा हरि ढेवियले। कुठे सुदर्शन गेले। सखया अडघालिबा पण करी। धावत ये लवकरी॥4॥ बाळक प्रल्हाद रक्षीसी। स्तंभी प्रकट होसी। हिरण्यकश्पुचा वध करिसी। आज का विसरलासी। निद्रा सांडुनिया बा कैवारी। धावत ये लवकरी॥5॥ दुष्टे द्रौपदीसी गांजीता। पाठी होसी अनंता। तुजला श्रम झाले गुणवंता। वस्त्रे काढुनि देता। तशी अज उडीघालीबा श्रीहरी। धावत ये लवकरी॥6॥ कढैमाजी मंडुक बाळ। पडताची तात्काळ। तुजला स्मरतासी वेल्हाळ। त्वा केले शीतळ। पाहतो वाट तुझी बा मुरारी। धावत ये लवकरी॥7॥ पार्थेपण केला पुत्रासी। मारिन जयन्द्रथासी। त्वा बा लपविले सूर्यासी। पण नेला सिद्धिसी। किती तुज अळवावे परोपरी। धावत ये लवकरी॥8॥ पाहता कलयुगी नवल। भिंती चालविली। नामा शि‍प्याच्या भक्तिमुळे। बसोनी भोजन केले। हुंडी महेत्याची करी भरी। धावत ये लवकरी ॥9॥ जनीच्या संगे तू शि‍णलासी। दळण दळाया जासी। चोखामेळ्‌याचे दहि खाशी। खिचडीच भुकेलासी। कर्माबाईची नवलपरी। धावत ये लवकरी ॥10॥ शेत राखीले बोधल्याचे। ढिग करिसी धान्याचे। पाणी वाहता बा नाथाचे। श्रम तुज झाले साचे। म्हणवुनि बसलासी कुठेतरी। धावत ये लवकरी ॥11॥ कुंभाराचे बा तान्हुले। झडकरी त्वा उठविले। भानूदासासी सुळी दिधले। तयासी पल्लव फुटले। अज कुठे गेलासी कौंसारी। धावत ये लवकरी॥12॥ बसवेश्वराचे कीर्तनी। नाचसि रात्रंदिनी। कबीरा मागे कसा बैसोनी। वस्त्रे विणवी सुखानी। माझे गुणदोष न विचारी। धावत ये लवकरी॥13॥ रोहिदास तुला विनवीता। कंकण देसी अनंता। यवने दामाजी गांजिता। पोते घेसी माथा। न कळे पार तुझा गा पुतनारी। धावत ये लवकरी॥14॥ तुकया वाण्याचे कागद। तारियले प्रसिद्ध। नरहरी सोनार मतिमंद। कांचन करूनी शुद्ध। वस्ता घडविसी बा परोपरी। धावत ये लवकरी॥15॥ जनिजसवंताचे संकष्टी। पावलासी जगजेठी। प्राशन विष केले संतुष्टि। कसे मिराई साठी। कोमल हृदय तुझे बा गिरधारी। धावत ये लवकरी॥16॥ प्रेमळ भक्ति पहा न्हाव्याची। स्मश्रु करिसी नृपाची। सखुला अवड बहु भेटीची। इच्छा पुरवुनि तीची। बांधुनी घेतले कसे तरी। धावत ये लवकरी॥17॥ सावता माळ्‌याच्या पोटात। लपालासी विखयात। लोलिंबराज वदे अद्‌भूत। अवसीचीपुनव होत। तूवा भक्त जनांचा सहाकारी। धावत ये लवकरी॥18॥ भक्ति पुडंलिके गोविले। उभे विटेवरी केले। पंढरपूर देह चांगले। सहज हातासी आले। करूणा परिसोनी त्वरा करी। धावत ये लवकरी॥19॥ अपार संत तुवा हरि रक्षियले । काय तुझे म्या केले। चिंता नळदेही जाळियले। बसुनी पहासी उगले। सखया वेळ कच्ची ही पहा बरी । धावत ये लवकरी ।20॥ शि‍वदिन केसरीच्या कृपाबळे। नरहरी उघडी डोळे। महिपती करि धावा पळोपळे। अभय गुरूने दिधले। आलो आलो बा धीर धरी। धावत ये लवकरी॥21॥
अखंड पूजा
अखंड पूजा करितो भावे गुरूच्या चरणाची॥ साधन नेणे काही याविण अंतः करणाची॥ धृ॥ सर्वहि तीर्थे वसती पायी हेच मानीतो॥ सप्रेमाचे जीवन प्रीती पूर्वक न्हाणीतो॥ शुद्धश्वेत सद्‌वासना सुवास चंदन॥ निर्मळ मलया गिरिच्या मिश्रित केसरी वर्ण॥ भक्तिच्या अक्षतावाहे जोडुनि कर कमळ॥ नरहरिनाथा महिपति तुझा बाळक लडीबाळ॥ 1॥ नाना परिमळ पुष्पंमाळा कंठी घालावी॥ यथान शक्ति पूजामाझी फळास आणावी॥ मन हे सुमन पायी वाहिले यासि हलवु नका॥ चंचल स्वभाव याचा स्वामी अवधा दृढ राखा॥ जाई जुई कल्पना चंपक अहंकार जाणा॥ मोगरा, द्रोवंती, बकुळी, वृत्तीया नाना॥ भाव तुळसी पत्र मस्तकी वहातसे तुजला॥ नरहरि स्वरूप पाहता महिपति मनिच्या मनि रिझला॥2॥ धूप अंगीकारी देवा पंढरीराया, सद्‌गुरू राया॥ कर जोडुन विनवितो तुमच्या लागतो पाया॥ सोज्वळ ज्ञानाग्नी वर चुरूनी वासना बीज॥ दश देहांगुल दशांग अर्पण करितो महाराज॥ अनूहाते घंटा निशब्द शब्दे गर्जती॥ अहं जळाल्या सोहं भावे घ्याहो धूपार्ती ॥ नेणे अर्चन विधि नमीतो हीनमती पाही। अवघा नरहरिनाथ भरला महिपति हा नाही॥3॥ दीप एका अर्तीचरणी पंढरीराया, सद्‌गुरूराया ॥ दाखवीतो भावे अंगीकारी समर्था॥ मागे पुढे तूचि अवघा तेजाची राशी॥ पाहता न पुरे दृष्टी आता करूनी गत कैसी॥ गोघृत पूर्ण भिजल्या अखंड त्रिगुण तिन वाती॥ तुर्येचा प्रकाश पसरला उजळल्या ज्योति॥ मीपण तू पण उरले नांही नरहरि रूप सारा॥ महिपति मिथ्या अवघा लटिका मायिक पसारा॥ 4॥ सायं नैवेद्य उपाहार कराहो देवाजी, कराहो नाथाजी॥ मायबापा मजला शेष प्रसाद ठेवाजी॥ कामधेनू सत्रावीचे दुध हे सुंदर॥ ज्ञानाग्नीने पक्वचि झाले सुरस मधुर॥ आकाशाचे पात्र भरले गुरूवाक्य गेही॥ शुद्धश्वेत साखर गोडी मेळविली पाही॥ आत्मज्ञान मेवा घ्याहो स्वामी विनवितो, समर्थानाथा विनवितो॥ नरहरिनाथा महिपति शेष प्रसाद मागतो॥ 5॥

12/01/2022

नमस्कार,
आज पौष शुद्ध दशमी आहे.
आजपासुन गुरु महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सुरू होत आहे. पारंपरिक पद्धती मध्ये पुजा, अर्चना होत असते ती इथे लिहित आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
गुरु महाराज यांना वंदन करून त्यांच्या चरणी ही वाळूच्या कणा येवढी सेवा🙏

Address

Gwalior
474008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजयोगी संत श्री सद्गुरु महिपतीनाथ महाराज, ढोली बुआ,ग्वाल्हेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share