17/03/2026
व्यावसायिक श्री. मयुरेश गद्रे
यांच्या कडून डोंबिवलीकरांना मोठ्या प्रमाणात स्वागत यात्रेत सहभागी होण्याचे केले आवाहन !
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा – २०२६ (२८ वे वर्ष)
कार्यक्रम पत्रिका |
सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा २८ वे वर्ष साजरे होत आहे. यंदाची स्वागत यात्रा ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षाच्या विशेष संकल्पनेवर आधारित असून विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्वागत यात्रेत छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन, सामूहिक स्तोत्र पठण, विविध स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, भव्य स्वागत यात्रा तसेच श्रीराम नाम जप यांसारखे अनेक उपक्रम होणार आहेत. डोंबिवलीतील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.
📌 मुख्य कार्यक्रमांचा आढावा:
▪️ १८ मार्च २०२६ – छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन व “संपूर्ण वंदे मातरम्” कार्यक्रम
▪️ १९ मार्च २०२६ (गुढीपाडवा) – श्री गणेश महापूजा, पंचांग वाचन, गुढी उभारणी व भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
▪️ ७ मार्च २०२६ – विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे सामूहिक वंदे मातरम् पठण
▪️ १५ मार्च २०२६ – अथर्वशीर्ष पठण, गायन-वादन-नृत्य स्पर्धा व बाइक-स्कूटर रॅली
▪️ १७ मार्च २०२६ – सामूहिक श्रीसूक्त पठण व दीपोत्सव
▪️ १९ ते २६ मार्च २०२६ – श्रीराम नाम जपयज्ञ
▪️ २१ मार्च – श्री रामरक्षा सामुदायिक पठण
▪️ २६ मार्च (श्रीराम नवमी) – श्री रामनाम जपयज्ञ सांगता
या सर्व कार्यक्रमांद्वारे संस्कार, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सर्व डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगलमय सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🇮🇳🙏