संताजीभक्त शुभम जाधव

संताजीभक्त शुभम जाधव जय संताजी...-संताजीभक्त शुभम जाधव.{कार्याध्यक्ष युवक तैलिक महासभा दिंडोरी तालुका}

🙏🏻तुम्ही तेली आहात मग आपल्या समाज्यासाठी ५ मि. नक्की द्या 🙏🏻विठोबाचा लेक तो ,तेली चराचा राजा होता ,झुकला नाही कोनासमोर त...
22/11/2016

🙏🏻तुम्ही तेली आहात मग आपल्या समाज्यासाठी ५ मि. नक्की द्या 🙏🏻
विठोबाचा लेक तो ,तेली चराचा राजा होता ,
झुकला नाही कोनासमोर तो कर्मठ लोकांचा बाप होता ,
जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा ,
जो नडत असेल त्याला राज्याचा इतिहास सांगा
मित्रानो समाज्यामधे वावरत असताना आपल्या सभोवतालचि काही लोक मला विचारतात तू तुझ्या नवाआधी संताजीभक्त का लावतो?आणि तेव्हा तेव्हा त्याना मला माझ्या राज्याचा इतिहास सांगावा वाटतो ...माझ्या राज्याच् नाव संत संताजी महाराज जन्म पुण्याजवळील मावळ तालुक्यातील चाकनजवळ ..एका वारकरी संप्रदायी असलेल्या विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई यांना सन् 1545 मधे पुत्ररत्न झाले ......महाराज्यांचे वडील विठोबा यांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता आणि त्याच बरोबर शेती पण ...महाराज 10 वर्ष्याचे झाले आणि वडील विठोबा यानि त्यांना तेलधंद्याचा परिचय करुण द्यायला सुरवात केलि..शिक्षण तस फारस नवते लिहिता वाचता येईल व्यवसायतील हिशोब ठेवण एवढच होते..त्या वेळच्या रितिरिवजप्रमाने त्याचं लग्न वयाच्या १० व्या वर्षी यमुना बाईसोबत झाल...महाराजांना कथा कीर्तनची खुप आवड होती...आणि अश्याच दिनक्रमात 16 वर्ष निघुन गेले...एके दिवशी तुकाराम महाराज्यांच्या कीर्तनचि बातमी वाड़या वाड़यात् पोहचली...आणि संताजी महाराज्यानी वडिलांकडे तुकाराम महाराज्यांच् कीर्तन ऐकण्याचा हट्ट धरला.. संताजी महाराज तुकाराम महाराज्यांच्या कीर्तनात खुप तल्लीन झाले...आणि त्यानी तुकाराम महाराज्यांचा बोट धरून सोबत चालण्याचा निर्णय घेतला पण विठोबा ना हा निर्णय मान्य नव्हता कारण प्रश्र संताजी महाराज्यांच्या संसारचा होता ..मग तिथे संताजी महाराज्यानि तुकाराम महाराज्याणा वचन दिले की मी कधीच संसाराकड़ दुर्लक्ष करणार नाही पण मला तुमच्या छत्रछायेखाली घ्या..तुकाराम महाराज्यांच्या १४ टाळ कऱ्यांपैकी संताजी महाराज प्रमुख होते...नंतर तुकाराम महाराज्यांची अभंगवानी लिहून ठेवण्याच् ठरवले ..ही दैनिन्दिनी प्रत्येक वेळेस चालू होती ..आणि वयाच्या 45 व्या वर्षी तुकाराम महाराज्यानी देहत्याग केला..आणि तुकोबा वैकुंठा च्या दिशेने गेले..तुकोबा आणि संताजी न च्या वयात 15 ते 18 वर्ष्याचा फरक होता असे जानकरांनी सांगितले..तुकाराम महाराज्यांच्या जान्यानंतर संताजी महाराज आपल्या पीढ़ीजात व्यवसायबरोबर तुकाराम महाराज्यांच्या अभंग ओव्या त्यानी जपुन ठेव्ल्या होत्या आणि ते त्याची पूजा अर्चा करू लागले..पुढे काही दिवसांनी संताजी महाराज्यांच्या पत्नी यमुना बाई बाळातपनासाठी माहेरी गेली होती..त्यांचे वडील संताजी च्या वयाच्या 21 व्या वर्षी स्वर्गवाशी झाले..आई मथुबाई वृद्धापकळात आपल्या माहेरी सदुम्बरे येथे गेली होती...वाड़यात संताजी महाराज एकटेच् होते चाकन च्या भुईकोट किल्ल्याला शाहिश्तेखानाच्या फौझेनी वेढा दिला..त्यानी संताजी महाराज्यांच्या घरावर कब्ज़ा केला सोन नान सर्व लुटले तेव्हा महाराज्यानी त्यांच्या तावडीतून सुटुन स्वताच्या जीवाची पर्वा न करता आपल्या चानाक्ष बुद्दीन लिखित स्वरूपामधे गाथा अभंग सोबत घेऊन आपल्या मामा च्या गावी सदुम्बरे येथे आले .....तिथे त्याना आपल्याला पुत्र रत्न झाल्याची बातमी कळाली काही दिवसांनी त्यांच्या आईचे पण आजारपनामुळे निधन झाले...अश्या परिस्थित महाराज खचुन न जाता ...तुकाराम महाराज्यांच्या विचारांची परंपरा चालू ठेवली आणि कीर्तन करू लागले आणि तुकाराम महाराज्यांच्या अभंग ओव्या न चे प्रचारण करू लागले...आणि आपले काम निस्वार्थी पने चालू ठेवले आणि वयाच्या 70 व्या वर्षी आजारपनामुळे त्यांचे निधन आपल्या मामाच्या गावी सदुम्बरे येथे झाले ..जनसागर लोटला... गांव दुःखात गेले..सगळयानी मूठमाती देऊन पण महाराज्यांच्या चेहरा भूजला जात नव्हता .. कारन तुकाराम महाराज्यनी मुठमाती दिल्यावर वैकुण्ठ वासी प्रस्थान करणार असे वचन तुकाराम महाराज्यनि दिले होते...आणि साक्षात् चमत्कार झाला..स्वयं तुकाराम महाराज तिथे प्रकट झाले आणि त्यानी संताजी महाराज्यना मुठ माती दिली आणि त्यांचा चेहरा भुजला..आणि त्याच ठिकाणी सदुंबरे येथे त्यांचं देऊळ आहे..आणि 300 वर्ष्यापासून तिथे कीर्तन आणि हरिपाठ होत असतो ....अश्या माझ्या राज्याला माझ्या देवाला सतश: प्रणाम(माझ नाव संताजीभक्त शुभम जाधव ..ही सम्पूर्ण महितीचे लेखन मी केले असून ही माहिती मी सोशल मिडिया व् इंटरनेट च्या माध्यमातून संघटीत केली आहे ..सर्व समाज बांधवांपर्यंत आपल्या देवाची माहिती पोहचवण्याचा दृष्टिकोण आहे...तरी ही माहिती सर्व ग्रुप वर येणाऱ्या जयंती आणि पूण्यतिथीच्या आधी पाठवा जेने करुण सर्वाना आपल्या देवाचा इतिहास समजेल...... गर्वाने म्हणा ..."मी तेली आहे"
🙏🏻 जय संताजी🙏🏻मो.9623054096🙏🏻

माझ्या बांधवांनो आपल्या करिता..... माझ्या समाज  बांधवानों  तुम्हीं  एकत्रित  नाही आले तरी चालेल.. पण एकटे मात्र  राहु नक...
24/05/2016

माझ्या बांधवांनो
आपल्या करिता.....

माझ्या समाज बांधवानों तुम्हीं एकत्रित नाही आले तरी चालेल..
पण एकटे मात्र राहु नका।
आम्हाला नाही दिली साथ तरी चालेल..
पण हात मात्र सोडू नका।
कुणाला नाही हरवले तरी चालेल..
पण रडवून मात्र पाठवू नका।
समाजात कुणाला नाही दिला आधार तरी चालेल..
पण अपमानित मात्र करू नका।
समाजाबद्दल नाही वाटली आपुलकी तरी चालेल..
समाजाला मात्र सोडून जाऊ नका।
आपल्या बांधवा बद्दल नाही वाटले प्रेम तरी चालेल..
पण त्यांना शिव्या मात्र देवू नका।
त्यांना चांगल्या कार्यात मदत नाहीं केली तरी चालेल..
पण त्यांच्या कार्यात अडथळे मात्र आणु नका।
आम्हाला नाहीं ओळखले तरी चालेल..
पण मी तेली नाहीं असे म्हणु नका।
समाजात नाहीं राहिले तरी चालेल ..
पण समाजाला मात्र विसरू नका।

सर्व समाज बांधवांना
।। जय संताजी।। .आपला -संताजीभक्त शुभम जाधव

काल मंगळवार दि.17मे रोजी महाराषट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खा.श्री रामदासजी तडस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वश...
18/05/2016

काल मंगळवार दि.17मे रोजी महाराषट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खा.श्री रामदासजी तडस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वश्री..

अशोककाका व्यवहारे,
हिरालालकाका चौधरी,
डाॅ.भूषणजी कर्डिले,
गजूनाना शेलार,संजीव शेलार,विजूभाऊ चौधरी,
आरटी अण्णा,सुनिल चौधरी,
इ.प्रांतिक पदाधिकार्यांसह प्रांतिकची कार्यकारिणी सभा संपन्न झाली.त्यात वर्धा येथे मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब व मा.मुख्यमंत्री यांचेसह मार्च 17 मधे राज्यव्यापी मेळावा घेण्याचे तसेच संपूर्ण महाराषट्रात संघटनात्मक दोन ते तीन सत्रात विभागवार दौरे करण्याचेही निश्चित झाले व त्याची सुरूवात मुंबई येथून करण्याचे ठरले.

त्यानंतर,दुपारी मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणविस साहेब व मा.ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांची भेट घेण्यात आली.सदर भेटीमधे मुंबईत समाज भवनासाठी जागेकरीता मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी सकारात्मक आश्वासन देवून प्रस्तावित करण्यास सांगितले..

जय संताजी..!..आपला-संताजीभक्त शुभम जाधव...

आपणा सर्व समाज बांधवांचे समाज्यावरील व् संताजी महाराज्यांवर अपरंपार प्रेम श्रद्धा आहेच ..पण किती बांधवाना महाराज्यांचा इ...
07/01/2016

आपणा सर्व समाज बांधवांचे समाज्यावरील व् संताजी महाराज्यांवर अपरंपार प्रेम श्रद्धा आहेच ..पण किती बांधवाना महाराज्यांचा इतिहास माहित आहे ...खुप थोड़े ...मित्रानो उदया आपल्या महाराज्यांची पुण्यतिथी चे औचित्य साधुन आपल्याला महाराज्यांचा इतिहास फ़ोटो च्या स्वरुपात माहिती पाठवतो ...जय संताजी...आपला -संताजीभक्त शुभम जाधव...

जय संताजी ...                   तेली वधु -वर मेळावा खुप सुंदर साजरा झाला...आमचे मार्गदर्शक आणि तेली समाज्याचे प्रखर नेतृ...
25/12/2015

जय संताजी ...
तेली वधु -वर मेळावा खुप सुंदर साजरा झाला...आमचे मार्गदर्शक आणि तेली समाज्याचे प्रखर नेतृत्व ...मा.गजानन नाना शेलार यांच्या व् समस्त तेली वधु वर व् पालक यांच्या सहकार्यने पार पडला...तमाम समाज बांधवाना खुप खुप शुभेच्या...जय संताजी ...आपला -संताजीभक्त शुभम जाधव...

संताजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन संताजी युवक प्रतिष्ठान आयोजित प्रतिमा पूजन ...  प्रतिमा पूजन करताना तेली समाज खेड़गांव...
08/12/2015

संताजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन संताजी युवक प्रतिष्ठान आयोजित प्रतिमा पूजन ... प्रतिमा पूजन करताना तेली समाज खेड़गांव अध्य्क्ष सुरेशशेठ पांडुरंगशेठ सोनवणे...समवेत त्यांच्या पत्नी सौ. सुजाता ताई सोनवणे (नवनिर्वाचित ग्रा.सदस्या,खेड़गांव)...आणि संताजी युवक प्रतिष्ठान चे तरुण तड़फदार कार्यकर्ते....जय संताजी..तमाम समाज बांधवाना जयंतीच्या लाख लाख सुभेच्या...आपला-संताजीभक्त शुभम जाधव...

जय संताजी ...       आज आपल्या दैवतांचा दिवस ...संताजी  महाराज्यांची जयंती ...माझ्या लाडक्या   तमाम समाज बांधवांना संत शि...
07/12/2015

जय संताजी ...
आज आपल्या दैवतांचा दिवस ...संताजी महाराज्यांची जयंती ...माझ्या लाडक्या तमाम समाज बांधवांना संत शिरोमणी जागनाड़े महाराज जयंतीच्या लाख लाख शुभेच्या ...आपला -संताजीभक्त शुभम जाधव(संताजी युवक प्रतिष्ठान ,नाशिक जिल्हा) तो तलवार 🔪होवून गेला,
अन्याया विरुध्द प्रहार ⚡
होवून गेला.

होता तो एक साधा मानुस🏡
पण या जगाचा कोहीनुर 💎 होवून गेला.

जग🌍 खुप रडवित😔 होते त्याला
पण तोच या जगाला 🌍 घडवून गेला,

अरे ह्या मुर्खांना 👥 अजून कळत कस नाही.
वर्गाच्या बाहेर बसुन सुद्धा,तो या संतांची संतवाणी 📖✒ लिहुन गेला.

आणी त्याच दाम💰 पण नाही घेवून गेला.
असा माझा संताजी👆होवून गेला, पण तोच या जगाचा 🌍 माय 👵 बाप 👴 होवून गेला.

आणि तोच एक खरा तेल्यांचा "राजा" होवून गेला.....

👏👏👏👏👏👏👏👏


🚩 जय संताजी🚩🙏🙏

संत शिरोमणी संताजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम👏👏👏👏👏👏
आपला-संताजीभक्त शुभम जाधव

किती लाइक चा मुजरा दयाल आपल्या दैवत संताजी महाराज्याना.......अप्रतिम रांगोली.....ओढ़ तुमच्या सेवेची ...समाज संघटण्याचि......
05/12/2015

किती लाइक चा मुजरा दयाल आपल्या दैवत संताजी महाराज्याना.......अप्रतिम रांगोली.....ओढ़ तुमच्या सेवेची ...समाज संघटण्याचि....आपला-संताजीभक्त शुभम जाधव

जय संताजी  !!तुम्ही तेली आहात ..मग नक्की वाचा...     संताना जात नसते. संताचे कार्य मानव जातीसाठी असते. संत संताजी महाराज...
30/11/2015

जय संताजी !!तुम्ही तेली आहात ..मग नक्की वाचा...

संताना जात नसते. संताचे कार्य मानव जातीसाठी असते. संत संताजी महाराज हे एक महान संत होऊन गेले समाज सुधारणेचे काम ही त्यांनी त्याचप्रमाणे केले हे सर्व आपणास माहितच आहे.

संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावुन सर्व कार्य त्यांनी केले. व महाराष्ट्रातील तेली समाज घडविला.

santaji maharaj jagnade

संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये झाला. आजोबा भिवाशेठ जगनाडे, वडील विठोबाशेठ व आई सुंदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई. संताजीचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीला कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजीला तेल धंद्याचा परिचय करूण दिला. व लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील, यमुनाबाई बरोबर झाले. यमुना वयाने फारच लहान होती. संसार म्हणजे काय ? याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबाच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. तो दिडदोन वर्षातच वारला. रखमाबाई सुद्धा दम्याच्या दिर्घ आजाराने वारल्या. संताजीला किर्तनात पहाताच तुकारामाना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्या कारणाने. त्यांना संताजी बद्दल प्रेम, आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे महाराजांनी संताजीला आपल्या सानिध्यात ठेवले.

तुकाराम महाराजांचे लेखक म्हणुन संताजी महाराजचें लेख व भजने आढळुन येतात. वास्तवीक पहाता तुकाराम महाराजांना अशा प्रकारच्या लेखनिकाची गरज होती असे नव्हते ते स्वत: उत्तम प्रकारे लिहु व वाचु शकत होते परंतु किर्तन प्रसंगी त्याच्‍या तोंडुन निघणारे शिघ्रकाव्य व नविन अभंग संताजी लिहुन ठेवत असत.

संताजीने तुकाराम महाराजांना गुरूस्थानी मानले होते. आणि त्यांच्यामुळेच तुकाराम महाराजांचा अनमोल साहित्याचा साठा आज आपल्याला मिळाला आहे. संताजीचे अक्षर फारच संदर होते. तुकारामाचे नविन नविन अभंग ते आपल्या वहित लिहुन ठेवत असे. हजारो अभंग त्यांनी संग्रहीत करूण ठेवले आहेत. तुकाराम महाराजांचा महिमा लोकांना केवळ संताजी महाराजांमुळेच समजला त्याला इतिहास साक्ष आहे. त्यांची स्मरण शक्ती खरोखरच वाखणण्यासारखी होती. त्यांनी स्वत: रचलेले घाण्याचे अभंग आजही बर्‍याच ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागातुनएैकावयास मिळतात. अगदी तरूण असतानाच संताजी महाराजांना तुकारात महाराजांचे किर्तन एैकण्यास मिळाले. आणि तेव्हापासुन त्यांना किर्तनाची ओढ निर्माण झाली व त्यातुनच ते तुकाराम महाराजांकडे आकर्रूीत झाले जसे काही तुकाराम महाराजांशी त्यांचे पुर्वजन्मीचे नातेच होते.

तुकारामची गाथा संताजी महाराजांच्या कठोर परिश्रमामुळे जिवंत राहु शकली . तुकाराम महाराजांचा नियमीत सहवास व मार्ग दर्शनामुळे संताजीची जडण घडण व्यवस्थित झाली विशेष करूण मोगली आक्रमणाच्या वेळेला तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या व किर्तनाच्या आणि कवितांच्या वह्यांचे रक्षण संताजी महाराजांनी जिवाची पर्वा न करता केले.

चाकणच्या किर्तनानंतर संताजी नेहमी सतत तुकाराम महाराजांच्या सहवासात राहू लागले तुकारामाचा सहवास सतत मिळत गेल्यामुळे तुकारामांच्या अभंगाचे लेखन रोज हो| लागले. महाराजांच्या सहवासाचा किर्तनाचा संताजीच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. व घराकडे आणि संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. रोज होणार्‍या किर्तनातुन आणि अभंगातनू सामान्य माणसांच्या समस्येचे निवारण होत होते समस्येचे निवारण करण्यासाठी कोणी ब्राह्मणाकडे जात नव्हते. त्यामुळे ब्राह्मणांचे नुकसान होऊ लागले. त्यांना दक्षिणा मिळणे बंद झाले आणि त्याचा सर्व राग तुकाराम महाराजांवर निघाला तुकाराम महाराजांच्या विरोधात धर्मसभा घेऊन धार्मीक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. व त्या ठिकाणी रामेश्वर भट स्वत: न्यायधीश म्हणुन काम पहात होते आणि त्यानी निर्णय दिला तो असा. तुकारामाला गाथा लिहण्याचा अधिकार नाही. कारण तो शुद्र आहे. किर्तन सांगणे व पाया पडुन घेण्याचा अधिकार नाही. त्याची संपत्ती जप्त करून गावातुन हाकलून द्या. आणि त्याच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाका. अशा प्रकारचा निकाल स्वत: रामेश्वर भटाने दिला. तुकारा महाराजांना बर्‍याच वेळा मारहाण झाली. त्याचे संताजी महाराज साक्षीदार आहेत. त्यांनी तुकाराम महाराजांना एकटे कधी सोडले नाही. संताजी महाराजांना सुद्धा बर्‍याच वेळा धमक्या देण्यात येत होत्या त्यांचेवर अनेक वेळ हल्लेही झालेले आहेत. त्या तुक्याची सांगत सोउतो की नाही ? नाहीतर तु जिवंत रहाणार नाही. आणी तुझा तो तुक्याही ! तरीपण संताजी महाराज घाबरले नाहीत. रामेश्वर भटाने तुकोबारायांच्या गाथा इंद्रायणीत बुडविण्याचा निकाल तर दिलाच होताच. आयुष्यभर कष्ट करून अभंगाचे लिखाण केलेल्या सर्व वह्या धार्मीक दबावामुळे पाण्यात बुडविण्यात आल्या.

संताजी महाराजांची पुढील तेरा दिवसात तहान - भुक हरपुन आपल्या प्रबह स्मरणशक्तीच्या जोरावर पुन्हा अभंग लिहायला सुरूवात केली. सर्व अभंग, किर्तन पुन्हा जसेच्या तसे लिहुन काढले, गाथा इंद्रायणी नदीतुन कोरड्या वर आल्या पांडुरंग प्रसन्न झाला चमत्कार झाला अशा प्रकारचा प्रचार सर्वज्ञ करण्यात आला. परंतु स्थानीक लोकांना हे सर्व माहित होते. तुकाराम महाराजांच्या गाथेचे रक्षण संताजी महाराजांनी केल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना फार कौतुक वाटले, आणि त्यांच्या विषयी आदर, प्रेम, श्रद्धा निर्माण झाली. संताजी महाराजांनी दिलेले योगदान हे आपल्या समाजासाठी फार कौतुकास्पद आहे. त्यांचे मार्गदर्शन अभंगाच्या माध्यमातुन केलेले उपदेश आजही आपल्याला त्यांची आठवण करून दिल्या शिवाय रहात नाही.

ते सांगायचे किर्ती शिल्लक राहिल असे काम करा. त्यासाठी आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे. त्याचा उपयोग करा ! सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यांनो मृत्यु अटळ आहे. तो कोणत्याही क्षणी येईल. त्याला समोरे जा ! या जिवनाचा सदउपयोग करा. एकदा मनुष्य जन्म संपला की तो पुन्हा येणार नाही असा विचार संताजी महाराजांनी मांडला.

त्यानंतर वयाच्या ७६ व्या वर्षी मार्गशिर्ष वद्य १३ ला संताजी महाराजांचे निधन झाले. निधनानंतरच्या निघालेल्या अंत्ययात्रेत भजनांच्या दिंड्या चालत होत्या. त्यांच्या देहावर हार, फुले, गुलाल, व पैशाची उधळण होत होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात त्यांना निरोप देण्यात येत होता. स्थळाची शुद्धी करूण खड्डा खणुन त्यामध्ये बेलपत्रे, तुळशीपत्रे चंदन घालुन त्यावर मीठ घातले लाकडी पाटावर संताजी महाराजांचा मृतदेह बसविला नवे वस्त्र अंगावर घालुन पुजेचे साहित्य ठेवून गळ्यापर्यंतचा त्यांचा देह मिठाने झाकला. व आलेल्या सर्व भाविकांनी हरिनामाच्या गजरात त्यांच्यावर मुठमाती टाकली अशी बरीच माती टाकली तरी त्यंाचा चेहरा न बुझता उलट तेजस्वी दिसु लागला. परंतु बर्‍याच वेळाने काही लोकांच्या लक्षात आले की तुकाराम महाराजांनी संताजी महाराजांना वचन दिले होते की तुझ्या अंत्यसमयी तुला शेवटचे दर्शन देण्याकरिता व तुला माझ्या हस्ते मुठमाती देण्यासाठी मी जरूर येईल. अशा प्रकारचे बोलणे आठवल्यानंतर माती टाकणे बंद केले. पहाटे पहाटे प्रकाशाचा एक मोठा किरण चमकला आणि काही क्षणातच तुकाराम महाराज प्रगट झाले. आणि पांडुरंगाचा जयघोष करीत ते संताजी महाराजांच्या देहापाशी गेले. संताजी महाराजांच्या देहावर तीन मुठी माती टाकली आणि काय चमत्कार संताजी महाराजांचे शिरकमल पुर्ण झाकले गेले. पांडुरंग पांडुरंग म्हणत तुकाराम महाराज अदृश्य झाले पण जाते वेळेस त्यांनी संताजी महाराजांनबद्दल म्हंटले की.

चारीता गोधन | माझे गंतले वचन ॥
आम्हा येणे झाले | एका तेलीया कारणे ॥
तीन मुष्ठी मृतितका देख | तेव्हा लोपविले मुख ॥
आलो म्हणे तुका | संतु न्याव्या विष्णु लोका ॥

संताजी महाराज समाधिस्त झाल्यापासन चाकण, खेड, कडुस, पुणे शहर व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन मार्गशिर्ष वद्य १३ ला. अनेक भावीक तेथे जातात. व सर्व ग्रामस्थांच्या मदतीने उत्सव साजरा करतात. त्यावेळी भजन किर्तन व प्रसादाच्या माध्यमातुन भोजनाचा कार्यक्रम ठेवला जातो.

तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकर्‍यांपैकी संताजी महाराज हे एक असले तरी तुकारामाच्या खांद्याला खांदा लावुन बरेच कार्य संताजी महाराजांनी केलेले आहे. अनेक प्रकारच्या अभंगाची रचना त्यांनी केलेली आहे. संताजी हे भक्तीमार्गी होते हे यावरून सिद्ध होते.

संताजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या सानिध्यात सतत रहात असल्यामुळे त्यांनाही पांडुरंगाचा साक्षात्कार झाला होता. आपल्या निस्मीम भक्तीमुळे त्यांच्या अंत्यसमई वैकुठवासी झालेल्या तुकाराम महाराजांना मृत्युलोकी परत यावे लागले हे सर्व साक्षी सत्याच आहे.

त्याचे कार्य सर्व समाज बंधु-भगिनींनी असेच पुढे नेहुन जय संताजी फक्त ओठातुन न बोलता ते पोटातुन निघावे एवढीच श्री संताजी चरणी प्रार्थना !!!
आपला-संताजीभक्त शुभम जाधव...
🚩🚩🙏🏻॥ जय संताजी ॥🙏🏻🚩🚩

जय संताजी ...                    मित्रानो,आपल्या सर्वांचे दैवत श्री संत संताजी महाराज यांची जयंती व् पुण्यतिथि जवळ येत आ...
22/11/2015

जय संताजी ...
मित्रानो,आपल्या सर्वांचे दैवत श्री संत संताजी महाराज यांची जयंती व् पुण्यतिथि जवळ येत आहे....तसेच वधु वर मेळावा पण जवळ येत आहे ...या दृष्टीने सर्वानी समाज्यातिल लोकानां एकत्र आणून माहाराज्यांची पुण्यतिथी 8 जानेवारी ला सर्वत्र साजरी करावी ..व् समाज संघटित करावा महाराज्यांच्या अशिर्वादाने व् आपल्या सहकार्याने आपण 200 च्या वर समाज बांधंवाना एकत्र आणले आहे ..व् अजुन समज्यातिल तरुणांना एकत्र आणण्यासाठी आपण संताजी युवक प्रतिष्टान हे पेज ओपन करुण शेयर करा ...जेनेकरुण आपण ज्या समज्याचा भाग आहे....त्याच्या बातम्या सगळ्यांना समजतील ...समाज्यासाठी आपले योगदान द्या...संघटित व्हा ...समाज्याची ताकत वाढवा जय संताजी......आपला संताजीभक्त शुभम जाधव...

तयारी पुण्यतिथिची .....ओढ तुमच्या सेवेची....मेहनत समाज एकवटन्याची.....आवड़ समाज कार्याची....जय संताजी...फ़क्त महाराज अणि त...
19/11/2015

तयारी पुण्यतिथिची .....ओढ तुमच्या सेवेची....मेहनत समाज एकवटन्याची.....आवड़ समाज कार्याची....जय संताजी...फ़क्त महाराज अणि त्यांचे सर्व संताजीभक्त.......

..Jay santaji...
04/11/2015

..Jay santaji...

Address

Dindori
422205

Telephone

9623054096

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संताजीभक्त शुभम जाधव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category