13/10/2021
*हातणी (चिखली)*
*“तरुण पिढी धम्माकडे आकर्षित होत आहे.”*
*आयु.अनंता मिसाळ*
*जिल्हा अध्यक्ष*
*भारतीय बौद्ध महासभा*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली आणि माझा हा धम्म रथ पुढे घेऊन जावे असा धम्मादेश दिला. त्यावेळी तरुण पिढी या आदेशाचे पालन करण्यासाठी पुढे आली आणि धम्म कार्य अत्यंत वेगाने करत गेली.त्याचप्रमाणे आता आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे एक तरुण उर्जास्त्रोत्र भारतीय बौद्ध महासभेस लाभल्यामुळे अधिकाधिक तरुण वर्ग धम्म कार्य करण्यासाठी चळवळीत सहभागी होत आहे.तसेच ही नवीन उमदी ताकद समाजाच्या उपयोगी येत आहे.तरुण पिढी धम्माकडे आकर्षित होत आहे आणि हे फार आशादायी चित्र आहे असे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष अनंता मिसाळ यांनी हातणी चिखली बुलडाणा येथे केले.
संपूर्ण चिखली तालुक्यामध्ये तालुका कार्यकारिणी संपर्क अभियान राबवत आहे. उंद्री,अमडापूर ,एकलारा,चिखली,मेरा,कोलारा,हातणी क्षेत्रातील बौद्ध भगिनी बांधव यांच्याशी प्रत्यक्ष भेटी यादरम्यान घेण्यात आल्या असता तरुण तरुणी यांनी प्रत्येक ठिकाणी आश्वासक भूमिका पार पाडली. दि ११/१०/२०२१ रोजी मेरा बुद्रुक,कोलारा आणि दि.१२/१०/२०२१ हातणी या ठिकाणी संपर्क अभियान अंतर्गत स्थानिकांशी संपर्क केला. भ.बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,सावित्रीमाई फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर.मत रमाई यांच्या पूजन माल्यार्पणा ने प्रत्येक ठिकाणी वंदना घेउन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विभागीय अध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा प्रवक्ता निरंजन जाधव,जिल्हा संघटक रणजीत जाधव, गौतम मघाडे, अभिमन्यू पवार,आकाश गवई,दिलीप आराख,कैलास जाधव, तालुका अध्यक्ष प्रितमकुमार मिसाळ,उपाध्यक्ष प्रकाश साळवे,सचिव पंजाबराव गवई,तालुका समन्वयक दशरथ आराख ,प्रकाश पैठणे, तालुका कोषाध्यक्ष सांस्कृतिक प्रमुख रामदास मलवार,तालुका संस्कार प्रमुख बाबुराव घेवंदे,तालुका संपर्क प्रमुख विनोद साळवे,संजय निकाळजे,शाहीर मधुकर इंगळे,क्षीरसागर साहेब यांनी धम्माच्या विविध अंगांवर प्रकाश टाकला. प्रत्येक ठिकाणी धम्म दीक्षा प्रमाणपत्र आणि भारतीय बौद्ध महासभेची उद्देश पत्रिका यांचे वाचन तथा वितरण करण्यात आले.
या दरम्यान मेरा बुद्रुक येथे मायाताई डोंगरदिवे ,साहिल डोंगरदिवे,अजय डोंगरदिवे,अनिकेत डोंगरदिवे, जीवन डोंगरदिवे,विकास डोंगरदिवे,वैभव डोंगरदिवे,शुभम डोंगरदिवे, अमोल वानखडे,पावन डोंगरदिवे,हर्षल डोंगरदिवे,एकनाथ डोंगरदिवे,अश्विन अंभोरे, पोपट पैठणे,मुरलीधर डोंगरदिवे तसेच कोलारा येथे परशराम मघाडे,वामन मघाडे,रुस्तूम गवई,रमेश खंडारे,डीगांबर अंभोरे,गौतम अंभोरे अश्वजीत खंडारे,अमोल मघाडे, विशाल मघाडे, राजरत्न मघाडे,राजरत्न अंभोरे, विद्या गवई,विमल गवई,संगीताताई निकाळजे,लीलाबाई गवई,शांताबाई मघाडे,रंजना गवई, शोभा खंडारे,वंदना खंडारे, संजीवनी खंडारे, साक्षी खंडारे आणि हातणी या ठिकाणी रामेश्वर मोरे, ऍड.सचिन जाधव, पवन मोरे,जगन्नाथ मोरे,निलेश जाधव,गुलाब मोरे,सुखदेव मोरे,रुपेश मोरे,कुणाल लहाने,आकाश मोरे,रवी मोरे यांच्यासह समाज बांधव भगिनी उपस्थित होते.
या अभियानाची सूत्रे प्रितमकुमार मिसाळ, नियोजन रामदास मलवार, प्रकाश साळवे,संजय निकाळजे यांनी सांभाळली.