Shree Swami Samarth Seva Kedra Ram Nagar Buldana - Dindori Pranit

  • Home
  • India
  • Buldana
  • Shree Swami Samarth Seva Kedra Ram Nagar Buldana - Dindori Pranit

Shree Swami Samarth Seva Kedra Ram Nagar Buldana - Dindori Pranit Work: Shree Swami Samrtha Sevekari
Studied at Akhil Bhartiay Shree Swami Samrtha Guru Pith, Thrambakeshwar. Kendra no.9. Page Manager : Vijaya Khirodkar

||Shree Swami Samarth||

Shree Swami Samarth Maharaj also known as Akkalkot Swami Maharaj of Akkalkot was an Indian Guru of the Dattatreya tradition, widely respected in Maharashtra. His followers list is long and it includes Shree Sai baba of Shirdi and Shree Gajanan Maharaj of Shegaon. The Divine fame of supreme Yogi Shree Swami Samarth Maharaj has spread all over the world. Yet, there are many

people who don't know about divine life and work of Shree Swami Samarth Maharaj. Thus, to spread the messages and teachings of Shree Swami Samarth Maharaj, our "Shree Swami Samarth Seva Kendra-Dindori Pranit, Buldana" has been formed. The spiriting aim is to spread message and preaching’s of Shree Swami Samarth. This is to be done by first bringing together all swami bhakts. So kindly join Shree Shree Swami Samarth Seva Kendra-Dindori Pranit, Buldana.

12/05/2026
कुणीकुणीही नसते सोबत तेव्हा नक्की असतोडोळ्यांना दिसणारच नाही...दत्त मनाला दिसतोअतर्क्य गोष्टी, अगम्य दुनिया, असंख्य प्रश...
08/12/2022

कुणीकुणीही नसते सोबत तेव्हा नक्की असतो
डोळ्यांना दिसणारच नाही...दत्त मनाला दिसतो

अतर्क्य गोष्टी, अगम्य दुनिया, असंख्य प्रश्नांकाठी
गर्द सुखांच्या आड उभी दुःखांची दाटीवाटी
मऊ चांदणे पांघरून फिरतो फसवा काळोख...
पुढे पुढे जाणारे पाडस भिऊन फिरते पाठी
रात्र रात्र तेव्हा शेजारी नुसता बसून असतो
डोळ्यांना दिसणारच नाही...दत्त मनाला दिसतो

गुणगुणायचे वेड लागता सूर शोधते जगणे
वाटेवरती अगदी नकळत जडते उगाच दुखणे
गलबलून यायला लागते उभ्याउभ्या नुसतेच...
फुलायच्या आधीच शिकवते परिस्थिती हिरमुसणे
तुमच्यासाठी तुमच्याआधी स्वतःच कंबर कसतो
डोळ्यांना दिसणारच नाही...दत्त मनाला दिसतो

बहर ठेवतो एके दिवशी अवचित तळहातावर
डोळ्यांदेखत वणवण सरते जग होते स्थिरस्थावर
चणचण सरते, अवघडलेपण ओसरते निमिषात...
पायरवावाचून उगवतो थेट कृपेचा वावर
मूर्तीपाशी गेलो की ओळख असल्यागत हसतो
डोळ्यांना दिसणारच नाही...दत्त मनाला दिसतो

महाराजांचा Birthday 🙏
या जगाच्या वाट्याला आलेला Most Amazing दिवस !

13/07/2021

नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाच्या लेखमालेमधे तुमचे स्वागत आहे. स्वामी समर्थांच्या लेखमा.....

20/09/2020
29/11/2019

🚩॥ श्री स्वामी समर्थ ॥🚩
सर्व सेवेकरी व भक्तांना आवाहन ....🙏🙏🙏

श्री दत्तजयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात आपण सर्वांनी सहभाग घेऊन खारीचा वाटा उचलावा.

#श्रीगुरुचरित्राचे_अद्भूत_सामर्थ्य :
श्रीगुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्धमंत्ररूप, महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे.
श्रीगुरुचरित्राचे पारायण करण्याने कार्यसिद्धी होऊन साधक संकटातून पार पडतो.
श्रीगुरुचरित्राचे सर्व अध्याय सिद्धमंत्ररूप व महाप्रासादिक असल्यामुळे साधकाच्या मनात कमीअधिक सामर्थ्याचा संचार होऊन त्या त्या अध्यायाच्या अधिक पारायणांनी अधिक पुण्य लाभते. परमेश्वर अधिक कृपा करतो.साधकाच्या देहामध्येत्या त्या मनोरथसिद्धीशक्तीचे कंप किंवा लहरी वेहवेगळ्या तत्वाच्या उत्पन्न होऊन ती ती इच्छा लवकर पूर्ण होते. सृष्टीतील त्या त्या इष्ट शक्तीला व इष्ट द्रव्याला ती लोहचुंबकाप्रमाने आकर्षित करते असा जगमान्य मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. या दृष्टीने श्रीगुरुचरित्राच्या या ग्रंथाचे अपार महत्व आहे.
शेवटी श्रीगुरुचरित्रातश्रीगुरुंनी स्वत: सांगितल्याप्रमाणे:

श्रीगुरुचरित्राचे वाचनाने;
आमुचे चरित्र जो पठनकरी |
त्यासी लाभती पुरुषार्थ चारी |
सिद्धी सर्वही त्याचे द्वारी |
दासीपरी तिष्ठतील|
त्यासी नाही यमाचे भय |
त्यास लाभ लाभे निश्चय |
पुत्रपौत्रांसहितअष्टेश्वर्य |
पावून निर्भय पावे मुक्ती||

ही सेवा करायला मिळणे म्हणजे #भाग्यच......
स्वामी महाराज ३६५ दिवस "आपली" सेवा करतात पण आपल्याला त्यांची परतफेड करण्यसाठी कदाचित हेच "सात दिवस" देत असतील .......
जे परब्रम्ह आहेत..जे सर्वांचा निर्माणकर्ता आहेत....जे या युगाचे चालक...मालक आणि पालक आहे अशा "स्वामी महाराजांची ही सेवा " आपल्या सारख्या सामान्य माणसाला करायला मिळते ........
तर मित्रानो.....चला......आगामी सप्ताहातील ७ दिवस "परब्रम्हाची ही सेवा" करूया.......

आणि स्वामी महाराज ...ब्र.प.पु.मोरेदादा......प.पु.गुरुमाऊली यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली त्या सर्वांचे ऋणी होवुया.......

🔶 #परमपुज्य_गुरुमाऊली व
#श्री_ स्वामी_ समर्थ महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करावी आणिआपले जीवन #मंगलमय,
#आनंददायी आणि
#स्वामीमय
करू घ्यावे.
⚫ तसेच आपल्या जवळच्या #केंद्रात व परिचित
व्यक्तींपर्यंत हा #संदेश_पोचवावा ही #नम्र_विनंती...
॥ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पणमस्तू॥
॥तेजोनिधि सदगुरू प. पू. मोरेदादा की जय॥
॥ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली कि जय ॥

Address

Ram Nagar
Buldana
443001

Telephone

+91 98222 96806

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Seva Kedra Ram Nagar Buldana - Dindori Pranit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share