सम्यक संबोधी बुद्ध विहार,चेतना नगर, सुंदरखेड, बुलडाणा

  • Home
  • India
  • Buldana
  • सम्यक संबोधी बुद्ध विहार,चेतना नगर, सुंदरखेड, बुलडाणा

सम्यक संबोधी बुद्ध विहार,चेतना नगर, सुंदरखेड, बुलडाणा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सम्यक संबोधी बुद्ध विहार,चेतना नगर, सुंदरखेड, बुलडाणा, Religious Center, Buldana.

*🌹धम्म सकाळ🌹**त्रिसरण व पंचशिल गाथेचे  बौध्द धम्मातील ऐतिहासिक महत्त्व*जगाच्या पाठीवर जे जे बौध्द राष्ट्र आहेत, व तेथील ...
24/10/2022

*🌹धम्म सकाळ🌹*

*त्रिसरण व पंचशिल गाथेचे बौध्द धम्मातील ऐतिहासिक महत्त्व*

जगाच्या पाठीवर जे जे बौध्द राष्ट्र आहेत, व तेथील बौद्ध अनुयायी आहेत,त्यांच्या कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमात त्रिसरण व पंचशील या गाथेस अनन्यसाधारण असे महत्व आहे.बौध्द कुटुंबातील जन्म, नामकरण,विवाह, म्रुत्यू किंवा इतर अनेक कार्यक्रम ,सोहळे,उत्सव या प्रसंगी त्रिसरण व पंचशील गाथेचे अग्रक्रमाने पठण केले जाते. ती गाथा प्रथम म्हटली जाते, त्याचा दुहेरी हेतू असतो तो म्हणजे पठण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे सातत्याने स्मरण रहावे व आपल्या जीवनात त्याने त्याचा कसोशीने अंगीकार करावा.त्रिसरण व पंचशील या गाथेचे दुसरे महत्त्व म्हणजे या गाथेचा उगम प्रथमतः तथागताच्या पवित्र वाणीतून झाला आहे. तथागतांनी प्रथमतः सारनाथ येथील मिगदाय वनात पंचवर्गीय भिक्खूंना धम्माचा उपदेश केला त्यास धम्मचक्रप्रवर्तन असे म्हटले जाते.धम्मचक्रप्रवर्तन हे केवळ बुध्दच करतात. त्यानंतर तथागतांनी प्रथम वर्षावास हा सारनाथ येथील म्रुगदाय वनातच केला.या वर्षावासात सतत तीन महिने अनेकांना धम्माची दिक्षा दिली व त्यांना धम्मात प्रशिक्षित केले.व ते सर्वजन
६०भिक्खू अर्हत पदास प्राप्त झाले. त्यावेळी जगात भगवान बुध्दासमवेत हे सर्वजन अर्हत भिक्खू होते. त्यावेळी आजूबाजूच्या ठिकाणाहून व लांब अंतरावरुन या भिक्खू समवेत नवनवीन ग्रुहस्थ भिक्खू संघात प्रवर्जीत होण्यासाठी येत असत त्यावेळी भिक्खूंना व प्रवर्जीत होणाऱ्यांना सुध्दा त्रासदायक होत होते ही व्यावहारिक अडचण दूर करण्यासाठी व हे सर्व अर्हत भिक्खू ;धम्मात निष्णात असल्याची खात्री झाल्यानंतर भगवान बुध्दाने अश्विनी पौर्णिमेस या साठ भिक्खूंना सांगितले की,जसा मी अर्हत आहे व सर्व ऐहिक व पारमार्थिक किंवा मानवी व दिव्य पाशातून मुक्त झालो आहे, तसेच तुम्हीसुद्धा माझ्या प्रमाणेच या दोन्ही प्रकारच्या पाशातून किंवा बंधनातून मुक्त झाला आहात.आता या धम्माचा उपदेश करण्यासाठी व माणसाच्या हितासाठी व सुखाकरीता प्रत्येक दिशेला चारीका करा
एका ठिकाणी तुम्ही एकट्यानेच जा! व देसना द्या! असे भगवान बुध्दाने का बरे म्हटले असावे, कारण प्रत्येक भिक्खू हा समर्थ व धम्मात निष्णात व वाकबगार होता हे भगवान बुध्दाने जाणले होते.
कुठल्याही ठिकाणी एखाद्या व्यक्तीला दिक्षित करुन संघात घ्यायचे असेल तर सगळीकडे तथागत एकाचवेळी जाऊ शकणार नाही म्हणून, त्या उध्देशाने ;या साठ अर्हत भिक्खूंना अशी परवानगी दिली की,एखाद्या व्यक्तीस भिक्खू संघात प्रवर्जीत करायचे असेल तर अशा व्यक्तीला प्रथमतः त्याचे डोक्याचे व दाढीचे केस काढले (मुंडण केले )पाहिजे व नंतर त्यास चीवर परिधान करावयास लावणे(कशाय वस्र), एका खांद्यावर चीवरचा भाग टाकावा व त्याने उकीडवे बसावे अशा अवस्थेत त्याच्याकडून तीन वेळा मी बुध्दाला, धम्माला, संघाला शरण (सरण) जातो असे वदवून घ्यावे असे सांगितले. त्रिसरणाचा उदघोष हा प्रथमतः भगवान बुध्दाच्या पवित्र मुखातून झाल्यामुळे त्रिसरणाची व नंतर कालांतराने पंचशील त्या सोबत जोडून एकत्रित म्हणण्याची प्रथा सुरु झाली. ती आजही विद्यमान आहे.ह्या गाथेचा समावेश खुद्दकनिकायाच्या १५ ग्रंथापैकी खुद्दकपाठ या ग्रंथात आहे.
त्रिसरणाच्या सोबत पंचशील यासाठी जोडण्यात आले कारण तथागतांनी प्रथमतः पंचवर्गीय भिक्खूंना देसना देताना त्याचे महत्त्व सांगितले व त्यासोबत दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून आर्यअष्टांगिक मार्ग कथन केला,ते सर्वांसाठी शिलाचरणाचे महत्त्वाचे अंग आहे,म्हणून त्रिसरणासोबत त्याची प्रतिज्ञा घेतली जाते.
समाजात सर्वसामान्य व्यक्ती कडून नेहमीच विचारली जाणारी शंका म्हणजे, जीवनातील निरनिराळ्या प्रसंगी त्रिसरण व पंचशील म्हणण्याची काय भूमिका आहे? याचे उत्तर म्हणजे दुःखमुक्तीसाठी आर्य अष्टांगीक मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग महत्त्वाचा जसा आहे, तसाच त्याची प्राथमिक गरज म्हणजे पंचशीलाचे पालन व बुध्द, धम्म,संघास शरण जाणे किंवा अनुसरण करणे होय.त्रिसरणाशिवाय दुःखमुक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करणे अशक्य आहे. बुध्द,धम्म व संघ हे जगातील अनमोल असे रत्न समजले जाते त्यांची तुलना इतर कुठल्याही गोष्टींसी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना अतुलनीय समजले जाते. कारण असंख्य कल्पानंतर बुध्द निर्माण होत असतात,व तेच धम्म प्रवर्तित करतात किंवा सामान्य जणांना सांगतात व अशा धम्माचे अनुसरण करणारा अर्हतांचा संघ असतो,ज्या संघात भगवान बुध्दाचा समावेश असतो. म्हणून बुध्द,बुध्दाचा धम्म व बुध्दाचा संघ स्रुष्टीत आदर्शवत असतो. म्हणून त्रिसरण व पंचशील हे सर्व गाथांचा पाया समजला जातो यासाठी त्रिसरण व पंचशीलाचे पठण सर्वच प्रसंगी केले जाते.
दुसरे असे की,संघ म्हणजे भगवान बुध्दाच्या काळात त्यांच्या महापरिनिर्वाणसमयी विद्यमान असणारा अर्हतांचा संघ व अशा संघाला सरण जाणे या उध्देशाने संघं शरणं गच्छामि म्हटले जाते.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर१९५६ला दिक्षा घेण्यापूर्वी संघं सरणं गच्छामि मी म्हणणार नाही असे मुद्दाम म्हटले होते,कारण त्यांना इतरांकडून याबद्दल स्पष्टीकरण हवे होते. बोधिसत्वांना ह्या सर्व गोष्टीची माहीती होती पण त्यांचे समाधान त्या काळातील दिक्षेसाठी उपस्थित असलेल्या भिक्खू संघाने केली नाही. सरतेशेवटी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी संघं सरणं गच्छामि याचाही उदघोष केला.कारण त्या संघात भगवान बुध्दाचा सुध्दा समावेश असतो. म्हणून भिक्खू, उपासक,सामान्य ग्रुहस्थ हे सर्वजण त्रिसरण व पंचशील याचे पठण समाजातील निरनिराळ्या प्रसंगी अग्रक्रमाने करतात हे त्याचे अत्यंत महत्व आहे.
सर्वांचे मंगल हो।

अत्त दिप भव ! ( स्वतःच स्वतःचा दिप हो)       अत्त दिप भव ! हे वाक्य किती लहान आहे. पण जेवढे ते लहान आहे तेवढाच त्यातील अ...
23/10/2022

अत्त दिप भव ! ( स्वतःच स्वतःचा दिप हो)

अत्त दिप भव ! हे वाक्य किती लहान आहे. पण जेवढे ते लहान आहे तेवढाच त्यातील अर्थ संदर्भ महान आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे तो सार आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आधारभूत मुख्य विचार आहे.
कारण सुख दुःख यश अपयशाचे मुळ मन आहे व ते चुकीच्या संस्कारामुळे, सवयीमुळे मलीन बनले आहे. ते मन प्रत्येकाचे त्याचे स्वतःचे आहे. त्या मनावर इतरांचे नियंत्रण नसते. यामुळे ते मन शुध्द करायचे व सुखी व्हायचे तर ज्याचे त्यालाच प्रयत्न करावे लागतील.

एकाचे मन दुसरा शुद्ध करू शकत नाही. प्रत्येकाने स्वतःच विपस्सनेद्वारा (समाधी) मन शुद्ध केले पाहीजे. स्वतःच सत्य जाणून अज्ञानाचा अंधकार दूर केला पाहीजे. स्वतःचा दिप होऊन जीवनाचा मार्ग प्रकाशित केला पाहीजे. या विधानाचे महत्त्व फार श्रेष्ठ आहे. हे विधानच बुद्ध धम्माला इतर सर्व धर्म, संप्रदायापासून वेगळे करते.

बहुतेक धर्म व्यक्तीला हे सांगतात की विश्वाचा निर्माता कुणीतरी देव आहे. देवाच्या पुजारींना दलाली द्यावी (दक्षिणा) म्हणजेच देव पावतो व तुम्हाला सुखी करतो.

याउलट बुद्ध म्हणतात "अत्त दिप भव" स्वतःच स्वतःचा दिप हो! स्वतःच स्वतःचा प्रकाश हो! जीवनात सुख शांती, समाधान यश प्रतिष्ठा, मान, सन्मान, धन संप्पत्ती, आरोग्य जे काही हवे आहे. ते स्वतःच तुम्हाला स्वकष्टाने, स्वप्रयत्नाने मिळवायचे आहे.

दुःखी आहेस, संकटात आहेस, अपयशाने खचला आहेस, चिंताग्रस्त आहेस, भयभीत आहेस, व्यथित आहेस, विवंचनेत आहेस, संभ्रमात आहेस, व्याकूळ आहेस, तर तुला दुसरे बाहेर काढतील व सुखी करतील हे शक्य नाही. जे काही करायचे आहे ते तुला स्वतःलाच करायचे आहे. ज्याचे दुःख त्यालाच दूर करायचे आहे. ज्याचे अपयश त्यालाच यशात रूपांतरित करायचे आहे. जो अशांत आहे. त्यालाच स्वतः प्रयत्न करून शांती मिळवायची आहे. जो निर्धन आहे. त्यालाच योग्य प्रामाणिक प्रयत्न करून सधन व्हायचे आहे.

यावरून आपला उद्धार आपल्यालाच केला पाहीजे. आपल्या जीवनात असलेल्या अज्ञानाचा अंधार आपणच दूर सारला पाहीजे. ते देव- दैवत येऊन दूर करू शकणार नाहीत. आपल्याला विशिष्ट ठिकाणी जायचे आहे, तर चालावे तुम्हालाच लागणार.

बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाले. सुखाचा मार्ग कळला. तो त्या महाकारूणिकाने जगाला सांगितला, वाट दाखवली. वाट चालायचे हे आपले काम आहे. दुःख मुक्तीसाठी प्रयत्न करायचे ते आपल्यालाच.

बुद्ध म्हणतात...
१. आर्य अष्टांगिक मार्गाने जीवन जगा *यात पंचशीलाचा समावेश आहे)
२. दहा पारमितांचे, गुणांचे संवर्धन करा, याकडे दुर्लक्ष करू नका या मार्गानुसार आपण जीवन जगतात, मार्ग चालू लागलात, आचरण करू लागतात तर दुःख मुक्त व्हाल, सुखी व्हाल.

- महाराष्ट्र: बुद्ध धम्माचा इतिहास.

03/09/2022

*🌹🌹श्रद्धावान बौध्द उपासक व उपासिकांनी वर्षावासाच्या मंगल कालावधीत अधिकाधिक पुण्यकर्म संचित करण्याचा प्रयत्न करावा...*
सध्या वर्षावास सुरू आहे. वर्षावासाचा हा कालखंड बौध्दांकरिता अतिश्य पवित्र व मंगल असा कालखंड आहे. या कालावधीत बौध्दांनी स्वतःच्या व समाजाच्या हितार्थ जे काही कुशल कार्य आहेत ते करण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा.
*समाज एकत्रित यावा या उदात्त भावनेने या काळात श्रद्धावान धम्मबांधवांनी आपापल्या परिसरात वेळोवेळी परियत्त देसनेच्या कार्यक्रमाचे,धम्मसंस्कार शिबीरांचे आयोजन करावे.यातुन,समाजाला वर्षावास बौध्दांकरिता किती महत्वाचा आहे हे लक्षात येईल.*
विशेष म्हणजे या कालावधीत बौध्दांनी अष्टशील उपोसथाचे पालन करावे व घरात धार्मिक वातावरण ठेवावे.
*मांसाहार तर अजिबात करू नये.*
*या वर्षावासात आपल्या सर्वांकडुन कुशलचं कुशल कर्म घडावेत हिचं मंगलकामना.*
*🙏नमो बुध्दाय जयभीम🙏*

05/07/2022

*वर्षावास*

तथागत भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवन चारिकाप्रधान होते. तथागत बुद्धांना वर्षा ऋतूमध्ये ( पावसाळा ) या कालावधीत अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांनी आपल्या भिक्खू संघासाठी एका नियमाची निर्मिती केली .
आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालखंडात भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा पवित्र भिक्षु संघ वर्षाकालीन ( पावसाळा ) या वेळेत एका ठिकाणी थांबून अनेक प्रकारची धम्म चर्चा, धम्म देसना, प्रचार - प्रसार, विनय दुःख मार्ग आणि दुःख मुक्ती मार्ग यावर धार्मिक -सांस्कृतिक विषयांवर चर्चा करीत तीच परंपरा भिक्षु संघ पाळत आला आहे. धम्म समजून घेण्यासाठी वर्षावास हा बौद्ध धम्मात अतिशय पवित्र मानला जातो.

भगवान बुद्धांनी त्यांच्या 80 वर्षांच्या आयुष्यात बुद्धत्व प्राप्तीनंतर 46 वर्षावास पूर्ण केले.आणि आजही बौद्ध देशांमध्ये हि परंपरा सर्व देशभर उत्सवपूर्ण वातावरणात पाहायला मिळते.

*सब्बदान धम्मदान जिनाती* । *सब्बरस धम्मरस जिनाती* ।।
*सब्बरती धम्मरती जिनाती* । *तण्हखयो सब्ब दुःख जिनाती* ।।

*अर्थ -*
*' धम्माचे दान ' करणे म्हंणजे धम्म दुसऱ्याला समजावून सांगणे, त्याचा प्रचार करणे हे सर्व प्रकारच्या दानात श्रेष्ठ आहे. धम्मकार्यात रत म्हणजे व्यस्त असणे हे सर्व प्रकारच्या व्यस्ततेपेक्षा श्रेष्ठ आहे. जगात जे काही रस असतील त्या सर्वात धम्माचा रस श्रेष्ठ आहे व तृष्णेचा त्याग करणे किंव्हा नष्ट करणे हे सर्व दुःख नष्ट करण्यासारखे आहे.*

*वर्षावास या कालावधीत बौद्ध उपासक व उपसिकांनी काय केले पाहिजे.*

1) आषाढ पौर्णिमा या दिवशी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत बुद्धविहारामध्ये किंव्हा आपल्या घरामध्ये त्रिसरण पंचशील , भीम स्मरण आणि भीमस्तुती घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या पवित्र अशा धम्म ग्रंथ ( बुद्ध आणि त्यांचा धम्म ) सुरुवातीचे पान वाचून वर्षावासाची सुरुवात करावी.

2) दररोज आपल्या घरी किंवा बुद्धविहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्म ग्रंथाचे वाचन करणे गरजेचे आहे.

3) अधिकाधिक धम्म समजून घेण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करणे.

4) नियमित किंवा दर रविवारी बुद्ध विहारात गेलेच पाहिजे.

5) या कालावधीत सर्व महापुरुषांचे वाचन करणे, आणि धम्मप्रबोधन आयोजित करणे..

*आरती विरती पापा मन्न पानाचा संयमो* ।
*अप्पमादोय धम्मेसु ए त मंगलमुत्तमं* ।।
*अर्थ* -
*काया, वाचा, मनाने कोणतेही पाप कर्म न करणे, मद्यपान न करणे, धम्मकार्यात तत्पर राहणे, धम्मकार्य केल्याने मन प्रसन्न होते. जनमनात आदराचे स्थान मिळते. आपला आदर सत्कार होतो. जीवन सद्गुणी होते हे उत्तम मंगल आहे .......*
*तथागत भगवान बुध्द*

मी बालपणापासून बौद्ध धम्माने प्रभावित झालो आहे. बौद्धधर्म हा असा धर्म आहे जो तीन सिद्धांताची शिकवण देतो प्रज्ञा , समता आणि करुणा बौद्ध धर्मच जगातील शोषण थांबवू शकतो माझा असा विश्वास आहे की, एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतातच नव्हे तर सर्व जग बौद्ध धर्माचा स्वीकार करेल..
*बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

भवतु ।। सब्ब ।। मंगलं

जय भीम, नमो बुद्धाय, जय प्रबुद्ध भारत

✍🏻 आपला बौद्धाचार्य आयु. रितेश गांगुर्डे

*आज सम्यक संबोधी बौद्ध विहार चेतना नगर सुंदखेड येथे चेतना नगरवासी यांच्या वतीने, आयु साबळे साहेब यांचे चि, स्वप्नील साबळ...
05/07/2022

*आज सम्यक संबोधी बौद्ध विहार चेतना नगर सुंदखेड येथे चेतना नगरवासी यांच्या वतीने, आयु साबळे साहेब यांचे चि, स्वप्नील साबळे यांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षा मध्ये यश संपादन करून नायब तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून यश मिळविल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, सत्कार समारंभ च्या कार्यक्रमाला आयु सभाकरणजी घेवंन्दे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आयु अमर इंगळे हे होते, उपस्थित उपासक उपासिका यांनी चि, स्वप्नील यांचा शाल, पुष्पगुछ देऊन सत्कार केला, आयु अनिल डोंगरदिवे, आयु पी बी सपकाळ, आयु, अमर इंगळे , आयु साबळे साहेब यांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केले.

स्वप्नील साबळे यांनी सत्काराला उत्तर देताना, आपल्या आई वडिलांचे आभार व्यक्त केले, व आपल्या यशा चे सम्पूर्ण श्रेय आपल्या आई वडिलांना देऊन मिळालेले यश हे बाबासाहेब आंबेडकर यांची चरणी समर्पित केले, व आपण सदैव समाजाशी बांधील राहू अशी ग्वाही दिली, त्या नंतर आयु सभाकरणजी घेवंदे साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात चि स्वप्नील चे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु, खरात सर यांनी केले, सरणय गाथेने शेवट केला,*

*वन परिक्षेत्र अधिकारी पदी स्वप्नील वसंत साबळे यांची निवड*झाल्या बद्दल साबळे परिवाराचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐👏👏👏👏 शुभेच्छ...
26/06/2022

*वन परिक्षेत्र अधिकारी पदी स्वप्नील वसंत साबळे यांची निवड*झाल्या बद्दल साबळे परिवाराचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐👏👏👏👏 शुभेच्छुक सर्व बौद्ध उपासक/ उपासिका
चेतना नगर सुंदरखेड बुलडाणा

26/06/2022

आज दिनांक २६/६/२०२२ रोजी आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी चेतना नगर येथील बुद्ध विहारात कार्यक्रम.

26/06/2022

BUDDHA VIHAR

Address

Buldana
443001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सम्यक संबोधी बुद्ध विहार,चेतना नगर, सुंदरखेड, बुलडाणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share