संजीवन अजानवृक्ष - श्री क्षेत्र : कासणे, जि. ठाणे

  • Home
  • India
  • Bhiwandi
  • संजीवन अजानवृक्ष - श्री क्षेत्र : कासणे, जि. ठाणे

संजीवन अजानवृक्ष - श्री क्षेत्र : कासणे, जि. ठाणे संजीवन अजानवृक्ष दर्शन व संत दर्शन.

निष्ठावान महिना वारकरी : गुरुवर्य हभप.  #भिमदादा_वारकरी यांच्या सान्निध्यात ...  #श्रीक्षेत्र_पंढरीच्या_आळंदीच्या_वारीच्...
01/06/2023

निष्ठावान महिना वारकरी : गुरुवर्य हभप. #भिमदादा_वारकरी यांच्या सान्निध्यात ... #श्रीक्षेत्र_पंढरीच्या_आळंदीच्या_वारीच्या_वाटेवर 🙏🚩

राम कृष्ण हरी 🙏🚩
महाराज ज्ञानेश्वर माऊली 🙏🚩
आम्ही निष्ठावान महिना वारकरी 🙏🚩

20/05/2023

🙏🚩🌸ज्ञानेश्वरी चिंतन🌸🙏🚩

#ग्रंथराज_ज्ञानेश्वरी_अध्याय_पहिला 🌹🙏🚩

ो_ज्ञानेश्वरा 🙏🚩

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्‌।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता॥१-३॥

अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा.🙏🚩

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

मग द्रोणापासीं आला।तयांतें म्हणे हा देखिला।
कैसा दळभारू उचलला।पांडवांचा॥९३॥

नंतर दुर्योधनाजवळ येऊन त्यांना म्हणाला पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा.🙏🚩

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

गिरिदुर्ग जैसे चालते।तैसे विविध व्यूह सभंवते।
रचिले आथी बुद्धिमंतें।द्रुपदकुमरें॥९४॥

हुशार अशा द्रुपदपुत्र धृष्ट्यद्युम्नाने सैन्याचे हे नानाप्रकारचे व्यूह सभोवार रचलेले आहेत. जसे काय डोंगरी किल्लेच.🙏🚩

#महाराज_ज्ञानेश्वर_माऊली 🙏🚩

© संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे

20/05/2023

🙏🚩🌸ज्ञानेश्वरी चिंतन🌸🙏🚩

#ग्रंथराज_ज्ञानेश्वरी_अध्याय_पहिला 🌹🙏🚩

ो_ज्ञानेश्वरा 🙏🚩

जे बळें प्रौढी पौरुषें।भीमार्जुनांसारिखे।
ते सांगेन कौतुकें।प्रसंगेची॥९७॥

जे शक्तीने, मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो.🙏🚩

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

एथ युयुधानु सुभटु।आला असे विराटु।
महारथी श्रेष्ठु।द्रुपद वीरु॥९८॥

येथे लढवय्या सात्यकी, विराट, महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत.🙏🚩

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

धृष्टकेतुश्‍चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्‌।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः॥१-५॥

धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुंतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी 🙏🚩

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्‌।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः॥१-६॥

युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत.🙏🚩

#महाराज_ज्ञानेश्वर_माऊली 🙏🚩

© संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे

17/05/2023

🙏🚩🌸ज्ञानेश्वरी चिंतन🌸🙏🚩

#ग्रंथराज_ज्ञानेश्वरी_अध्याय_पहिला 🌹🙏🚩

ो_ज्ञानेश्वरा 🙏🚩

नातरी वडवानळु सादुकला।प्रळयवातें पोखला।
सागरु शोषूनि उधवला।अंबरासी॥९०॥

अथवा वडवानल (समुद्राच्या पोटातील अग्नी) एकदा पेटला अशात त्याला वार्‍याने हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो . 🙏🚩

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

तैसें दळ दुर्धर।नानाव्यूहीं परीकर।
अवगमलें भयासुर।तिये काळीं॥९१॥

त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले.🙏🚩

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

तें देखोनियां दुर्योधनें।अव्हेरिलें कवणें मानें।
जैसे न गणिजे पंचाननें।गजघटांतें॥९२॥

ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही.🙏🚩

#महाराज_ज्ञानेश्वर_माऊली 🙏🚩

© संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे

17/05/2023
16/05/2023

🙏🚩🌸ज्ञानेश्वरी चिंतन🌸🙏🚩

#ग्रंथराज_ज्ञानेश्वरी_अध्याय_पहिला 🌹🙏🚩

ो_ज्ञानेश्वरा 🙏🚩

सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्‌॥१-२॥

संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला.🙏🚩

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

तिये वेळीं तो संजय बोले।म्हणे पांडव सैन्य उचललें।
जैसें महाप्रळयीं पसरलें।कृतांतमुख॥८८॥

त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडवसैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले.

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

तैसें तें घनदाट।उठावलें एकवाट।
जैसें उसळलें काळकूट।धरी कवण॥८९॥

अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला (तेव्हा त्याला कोण आवरणार ?) जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे ? 🙏🙏

#महाराज_ज्ञानेश्वर_माऊली 🙏🚩

© संजीवन अजानवृक्ष सेवक - निष्ठावान महिना वारकरी - श्रीक्षेत्र कासणे, जि.ठाणे

05/02/2023
05/02/2023
05/02/2023
नव्या कार्याची उद्घोषणा!*धर्म संस्कृती संस्कार प्रशिक्षण वर्ग*🚩श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान श्रीक्षेत्र देऊळगाव राजा य...
05/02/2023

नव्या कार्याची उद्घोषणा!
*धर्म संस्कृती संस्कार प्रशिक्षण वर्ग*🚩
श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे परमपूज्य श्रीगुरु मोहननाथमहाराज पैठणकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराममहाराज वारकरी विद्यालयाच्या यशस्वी वर्ष पूर्ती नंतर अनेक पालकांच्या आग्रहास्तव (विशेषतः ज्यांना आपल्या वयक्तिक व्यापामुळे अर्थात उद्योग,व्यवसाय, व इतर कारणांमुळे आपल्याला पाल्यांना कायम निवासी या ठिकाणी शिक्षण देणे शक्य नाही अश्यांसाठी) आपल्या मुलांना धर्माची,संस्कृतीची ओळख व्हावी, मूलभूत ज्ञान मिळावे या हेतूने
*"धर्म संस्कृती संस्कार प्रशिक्षण वर्ग"*
सुरू करण्यात येत आहे.
उन्हाळी सुट्टी (summer vacation) मध्ये हे १६ दिवसांचे अनिवासी प्रशिक्षण वर्ग असेल.
online व प्रत्यक्ष/ऑफलाईन दोन्ही प्रकारे आपल्याला यात सहभागी होता येईल.
दररोज सकाळी ९:३० ते ५ अशी वर्गाची वेळ असेल.
ज्यामध्ये आपल्या पाल्याला (मुलाला,मुलीला) धर्म संस्कृती, ग्रंथ, वांगमाय यांचा परिचय व पत्रकात निर्दिष्ट केलेल्या अभ्यासक्रमाचा समावेश असेल.
हा एक सर्टीफाईड कोर्स(वर्ग) आहे.
या वर्गाच्या अंतिम दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

- संस्कार प्रशिक्षण वर्गाचे शुल्क (fees),
- अभ्यासक्रम,
- प्रवेश वयोमर्यादा व ईतर नियम/अटी पत्रकात नमूद केलेल्या आहेत..

**मर्यादित प्रवेश (limited addmissions)**

आजच आपले रजिष्ट्रेशन करून आपला प्रवेश निश्चित करा..

- अधिक माहितीसाठी संपर्क
*हरिभक्तिपरायण वेदविभूषण*
*श्री.उदबोध मोहननाथमहाराज पैठणकर.*
*9730366021/*
*8551832832*

राम कृष्ण हरी..🚩
जय हिंद..🚩
जयतु हिंदू राष्ट्रम्..🚩

Address

Shree Kshetra :Kasane
Bhiwandi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संजीवन अजानवृक्ष - श्री क्षेत्र : कासणे, जि. ठाणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to संजीवन अजानवृक्ष - श्री क्षेत्र : कासणे, जि. ठाणे:

Share