23/08/2026
#गेल्या_१८_वर्षापासुन_बीड_येथे_राष्ट्रसंत_भगवानबाबा_यांचा_जन्मोत्सव_डॉ_राजेंद्र_भाऊ_सानप हे दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करतात याहीवर्षी १ सप्टेंबरला जन्मोत्सव साजरा होत आहे.आपण उपस्थित राहावे किर्तन व महाप्रसाद याचा लाभ घ्यावा•
-बघता-बघता १८ वर्ष हि परंपरा डॉ राजेंद्र भाऊ सानप सारख्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट (सध्याचा भगवान भक्तिगड) येथील बाबांच्या कुळात जन्म घेतलेल्या कुठलीही राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील डॉ राजेंद्र भाऊ सारख्या सामान्य माणसाला विना वर्गणी हा राष्ट्रसंत भगवानबाबा यांचा जन्मोत्सव (जयंती) नियमित १८ वर्ष साजरा करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. हे निश्चित भगवानबाबांचे आशीर्वाद व कृपा मी मानतो. दरवर्षी या जन्मोत्सव निमित्त श्रावण सुरू होताच पहिल्या दिवसापासून रोज नियमित धार्मिक ग्रंथ वाचन होते. विविध वाचक व सुचक आपल्या रसाळ वाणीतून रोज ग्रंथाचा भावार्थ समजून सांगतात.*'श्रावण वद्य पंचमी दिनी भगवानबाबा यांच्या जन्मोत्सव दिनी ग्रंथाची सांगता होते'.मुर्ती अभिषेक व ११ ते १ यावेळेत बाबांच्या चरित्र पर किर्तनाचे आयोजन असते.किर्तना नंतर दिड ते दोन हजार भाविक भक्तांना महाप्रसाद लापशी (शिरा), कढी, भात यांची दिवसभर पंगत असते. प्रचंड आनंददायक वातावरणात हा उपक्रम१८वर्षापासुन कुठलीही वर्गणी, देणगी न घेता डॉ राजेंद्र भाऊ यांच्या कडुन बाबा करून घेतात.हे आशीर्वादाचे श्रध्देचे वरदान त्यांना प्राप्त झाले आहे.याची अनुभुती त्यांना निश्चित आली आहे.* या कार्यक्रमा बरोबर १५ वर्षापूर्वी श्रीसंत भगवानबाबा व श्रीसंत वामनभाऊ प्रतिष्ठान इंद्रप्रस्थ कॉलनी बीड याची विना वर्गणी उभारणी झाली.यामध्ये संत भगवानबाबा,संत वामनभाऊ महाराज,संत तुकाराम, विठ्ठल -रूक्मिणी यांचे सुंदर असे मंदिर उभारून व मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराच्या परिसरात दोन सभागृहे उभी राहिली हे सर्व श्रीसंत वामनभाऊ व श्रीसंत भगवानबाबा यांच्या कृपेने व आशिर्वादाने त्यांना शक्य झाले.हे ते करू शकले असे मला वाटत नाही.पण हे फक्त संतांच्या कृपा आशिर्वादाने शक्य आहे. म्हणून हे सत्य मान्य करावे लागते.मंदीरा पुढे शक्तीची देवता हनुमान यांचे मंदिर व मुर्ती त्यांच्या मातोश्री श्रीमती जनाबाई मुरलीधर सानप यांनी भाऊंचे वडिल स्व मुरलीधरराव उत्तमराव सानप यांच्या स्मरणार्थ त्यांनी स्व खर्चाने सुंदर असे मंदिर बांधले.हनुमानजींची सुंदर मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून प्रतिष्ठानच्या वैभवात भर घातली.हे सर्व करण्यासाठी भगवानबाबा व वामनभाऊ यांनी त्यांना आशिर्वाद देवुन बळ आणि बुद्धी दिली. प्रतिष्ठान स्थापन झाल्यापासून व संत व देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्या पासुनआजपर्यंत गेली१५वर्ष दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीयअखंड हरिनाम सोहळा( सप्ताह)व दरवर्षी राष्ट्रसंत भगवानबाबा यांचा जन्मोत्सव व संत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी, तुकारामबीज,हनुमान जयंती,व वद्य एकादशी महिनावारीला किर्तन आतापर्यंत ३१६ किर्तन या प्रतिष्ठानवर पार पडले." दि.१ सप्टेंबर रोजी संत भगवानबाबा जन्मोत्सव वेळीचे ३१७ वे किर्तन आहे". आपणास विनंती आहे आपण १ सप्टेंबर वर्ष १८ व्या वार्षिक राष्ट्रसंत भगवान बाबा जन्मोत्सव कार्यक्रमा निम्मित आयोजित केलेल्या सकाळी ११ ते १ यावेळेतील ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे यांच्या बाबांच्या चरित्र पर किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ भावीक भक्तांनी व बीड शहरातील व परिसरातील नागरिकांनी घ्यावा हि नम्र विनंती मी करतो.* त्यांना या कार्यासाठी काही जेष्ठ मंडळी, वारकरी,परिसरातील भाविक भक्त यांचे सतत सहकार्य लाभते कोणा एकाचे नाव घेऊन मी बाकीच्यांना कमी लेखु शकत नाही.हे सर्व मंडळी या प्रतिष्ठानच्या परिवारातील सदस्य आहेत.त्यांच्या सहकार्याबद्दलआभार व्यक्त करणे म्हणजे परकेपणा होईल. प्रतिष्ठानवरचे सर्व नियमित कार्यक्रम,सेवा उपक्रम विना वर्गणी कुठले हि पावती पुस्तका वीना करण्याचे परम भाग्य त्यांना व माझ्या कुटुंबाला मिळाले आहे.हे ईश्वरी वरदान व आशिर्वाद मला संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांनी व पांडुरंग परमेश्वर व हनुमान देवता यांनी दिले यातच डॉ राजेंद्र भाऊ सानप यांच्या जन्माचे सार्थक झाले असे मी मानतो.या दि.१ सप्टेंबरच्या राष्ट्रसंत भगवानबाबा जन्मोत्सव कार्यक्रमासआपली उपस्थिती मोठ्या संख्येने अपेक्षित आहे.!
- इंजि.धनंजय राजेंद्र (भाऊ) सानप
विश्वस्त:- श्रीसंत भगवानबाबा व श्रीसंत वामनभाऊ प्रतिष्ठान इंद्रप्रस्थ कॉलनी बीड