16/03/2026
मी (म्हणजे डॉ. क्लार्क ह्यांनी) अनेक वर्षांपासून इस्लामचा अभ्यास केला आहे आणि इस्लामिक धर्मशास्त्र आणि इतिहास शिकवत आलो आहे. गेल्या काही वर्षांपासून माझे संशोधनाचे लक्ष ख्रिश्चन (पेंटेकोस्टल) धर्मशास्त्राकडे (थिऑलॉजीकडे) वळले असले तरी, इराणसोबतच्या सध्याच्या संघर्षाबद्दल बातम्या आणि राजकीय भाष्य ऐकताना मला एक विशिष्ट निराशा जाणवतेच.
ही पोस्ट युद्ध बरोबर आहे की चूक यावर वाद घालण्याबद्दल नाही. तर हे लिखाण एका गहन समस्येबद्दल आहे: पश्चिमेकडील देश नेहमीच ते ज्या वैचारीक दुनियेसोबत युद्धात दोन हात करतात, त्याच वैचारीक ठेवणीबाबत त्यांना मनात गैरसमज किंवा त्याबाबतची अर्धवट जाणीव असते.
सध्याच्या संघर्षात, अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र आधुनिक राष्ट्र-राज्याच्या श्रेणींच्या माध्यमांतूनच विचार करतात - जसे की, भूप्रदेश, प्रतिबंध लावणे, लष्करी क्षमता, राजवटीचा दबाव आणि अखेर शरणागती. त्या वैचारीक चौकटीत, राष्ट्राची ताकद प्रामुख्याने लष्करी शक्ती आणि प्रतिस्पर्ध्यावर धोरणात्मक खर्च लादण्याच्या क्षमतेद्वारे मोजली जाते.
परंतु इराणची सत्ताधारी व्यवस्था स्वतःला केवळ त्या चौकटीत कार्यरत असलेले दुसरे धर्मनिरपेक्ष राष्ट्र-राज्य म्हणून पाहत नाही.
इस्लामिक रिपब्लिक हे धार्मिक-राजकीय सिद्धांतावर बांधले गेले आहे ज्याला वेलायत-ए-फकीह (velayat-e faqih) म्हणतात - "कायद्याचे पालकत्व" (“guardianship of the jurist”)- ज्यामध्ये शी”या एस्कॅटोलॉजीप्रमाणे, परलोकशास्त्राप्रमाणे लपवलेल्या इमामच्या (Hidden Imam - Muhammad al-Mahdi) परतण्यापर्यंत धार्मिक कारभाराच्या स्वरूपात धर्मगुरूंच्या अधिकारानुसार ते राज्याची देखरेख करतात. ह्या इमामला इस ८७४ मध्ये देवाने लपवले होते आणि तो जगातील अन्याय नाहीसे करण्यासाठी व वैश्विक शांती प्रस्थापित करण्यासाठी मेहदीच्या रुपात पुन्हा येणार आहे असे विश्वास ठेवतात. याच इमामला हा अल-महदी, अल-क्वाईम, साहीब अल-झमान, अल-घाईब, हुज्जत अल्लाह अशी देखील नावे आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ही व्यवस्था एकाच वेळी आपल्या आत्मपरीचयात राजकीय आहे, धार्मिक आहे आणि ऐतिहासिक देखिल आहे.
आणि हाच अतिशय महत्त्वाचा फरक आहे.
जेव्हा पाश्चात्य जगातील पुढारी "शस्त्रे टाकून द्या आणि पुर्ण शरणागती पत्करा” असे म्हणतात, तेव्हा ते पारंपारिक युद्धाच्या व्याकरणाच्या भाषेत बोलत असतात. परंतु धार्मिक क्रांती, पवित्र स्मृती, हौतात्म्य परंपरा आणि परलोकशास्त्रीय आशेने आकार घेतलेल्या राजवटींमध्ये हेच शब्द मात्र पूर्णपणे निराळ्या भाषेत ऐकले जातात . पाश्चात्य लोकांच्या दृष्टीने ज्या मागण्या धोरणात्मक वाटतात त्याच गोष्टींचा अर्थ पवित्र युद्ध (होली वॉर) सोडून देणे, सन्मानाचा त्याग करणे किंवा एखाद्या कथित सभ्यतेच्या ध्येयाचा विश्वासघात करणे असे आवाहन केले जाऊ शकते.
आणखी एक स्पष्टीकरण देखील महत्त्वाचे आहे: इराण हे राष्ट्र खलिफाद्वारे शासित नाही. तेखील शिया विचारधारा “लपवण्यात आलेल्या १२व्या इमाम”च्या प्रतिक्षेत काळजीवाहू यंत्रणेद्वारे कारभार चालवतात. त्यांच्या मते इतर कोणीही त्याची जागा घेवू शकत नाही. खलिफाची संकल्पना प्रामुख्याने सुन्नी राजकीय इतिहासाशी संबंधित आहे. इराणचे राजकीय धर्मशास्त्र शिया ‘च्या क्रांतिकारी विचारसरणीतून, धर्मगुरूंचे अधिकारशाहीतून, महदी अपेक्षा आणि ज्याला ते "प्रतिकाराचे अक्ष” (अॅक्सिस ऑफ रेझिसस्टंस) असे म्हणतात. या श्रेणींना चुकीचे लेबल लावल्याने संभाषण सुरू होण्यापूर्वीच विश्लेषणात्मक गोंधळ निर्माण होतो.
जिहाद या शब्दाबाबतही हाच गैरसमज अनेकदा दिसून येतो. इस्लामी विचारसरणीत, जिहादचा अर्थ फक्त "पवित्र युद्ध" असा होत नाही. हा शब्द व्यापकपणे प्रयत्न किंवा संघर्षाचा संदर्भ देतो आणि अल-जिहाद अल-अकबर हा वाक्यांश पारंपारिकपणे पाप आणि नैतिक कमकुवतपणाविरुद्धच्या मोठ्या अंतर्गत संघर्षाशी संबंधित आहे. सशस्त्र संघर्ष हा जिहादचा एक अर्थ असू शकतो, परंतु तो एकमेव अर्थ नाही. जेव्हा पाश्चात्य भाष्य जिहादच्या प्रत्येक संदर्भाला लष्करी युद्धासारखे मानते, तेव्हा ते वैचारिक अचूकतेचा अभाव दर्शवते.
अगदी अंतिम सर्वनाशाची (अॅपोकॅलिप्टीक) भाषा देखील काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे. इस्लामिक परंपरेत आढळणारी महान अंतकालीन लढाई, मल्हमा सारख्या संकल्पना मुस्लिम प्रवचनात मोठ्या प्रमाणात प्रसारित होतात. पण इराणी शिया मध्ये'संदर्भात, “महदीवाद—लपवलेल्या इमामच्या परत येण्याची अपेक्षा—” ही माध्यमांच्या चर्चेत अनेकदा सादर केल्या जाणाऱ्या सरलीकृत "खलिफा विरुद्ध पश्चिम" कथेपेक्षा अधिक मध्यवर्ती धार्मिक चौकट आहे.
हे सर्व महत्त्वाचे आहे कारण वैचारिक चौकटीचा गैरसमज केल्याने चुकीचे प्रश्न विचारले जातात.
पश्चिमेकडे अनेकदा विचारले जाते: "किती दबाव त्यांना शरण जाण्यास भाग पाडेल?"
पण सखोल प्रश्न असा असू शकतो: "ही राजवट दुःख, त्याग, सहनशीलता आणि इतिहासाचे कसे अर्थ लावते?"
जर एक बाजू संघर्षाला प्रामुख्याने सत्तेची धोरणात्मक स्पर्धा म्हणून पाहत असेल तर दुसरी बाजू पवित्र नियती, हौतात्म्य, प्रतिकार आणि परलोकीय आशेद्वारे त्याचे वर्णन करत असेल, तर केवळ लष्करी दबावामुळे शरणागती पत्करता येणार नाही. खरं तर, ते प्रतिकार टिकवून ठेवणाऱ्या विश्वदृष्टीलाच बळकटी देऊ शकते.
इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे की जेव्हा पाश्चात्य शक्ती त्यांच्या विरोधकांचे वैचारिक व्याकरण समजू शकत नाहीत तेव्हा ते संकल्प आणि प्रतिक्रिया दोन्ही चुकीच्या पद्धतीने समजतात. ते गृहीत धरतात की जबरदस्त शक्ती आत्मसमर्पण निर्माण करेल, परंतु प्रत्यक्षात ती हौतात्म्य कथा, संस्कृतीची मांडणी आणि दीर्घ संघर्ष निर्माण करू शकते.
विचारसरणी समजून घेणे म्हणजे तिच्याशी सहमत होणे नाही.
याचा अर्थ फक्त आंधळेपणाने लढण्यास नकार देणे असा होतो.
कमीतकमी, पाश्चात्य राष्ट्रांना अशा संघर्षांना समजून घेण्यासाठी अधिक सुसंगत चौकट आवश्यक आहे - जी हे ओळखते की युद्धे केवळ शस्त्रे आणि रणनीतीने लढली जात नाहीत तर कल्पना, स्मृती, धर्मशास्त्र आणि अर्थाने देखील लढली जातात.
जोपर्यंत त्या वास्तवाला गांभीर्याने घेतले जात नाही, तोपर्यंत पश्चिमेकडील देश रणनीतीच्या भाषेत बोलत राहतील, तर त्यांचे विरोधक परमपराक्रम आणि नियती या भाषेत प्रतिसाद देतील. डॉ. क्लिफ्टन आर. क्लार्क. (स्वैर अनुवाद अमित आर्यन)
The world's Muslim population is expected to increase by about 35% in the next 20 years, rising from 1.6 billion in 2010 to 2.2 billion by 2030, according to recent population projections by the Pew Research Center's Forum on Religion & Public Life. Alongside this surge in the number of Musl...