22/07/2024
भदंत डॉ भदंत आनंद कौसल्यायन बुद्ध विहार शिऊर ट्रस्टच्या वतीने आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून कुशिनारा बौद्ध स्मशनभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आले..
गुरू पौर्णिमेच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून आज 'कुशिनारा बौद्ध स्मशानभूमी ' येथे समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने भदंत डॉ आनंद कौसल्यायन बुद्ध विहार ट्रस्ट कडून वृक्षरोपण करण्यात आले. उन्हाळ्यात अंत्यविधी वेळी उन्हामुळे होणारी अडचण आणि स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या दृष्टीने हे वृक्ष्रोपण करण्यात आले. बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीने स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी उचित पाऊले उचलली जाणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष संजय पगारे यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित जेष्ठ कार्यकर्ते तथा बौद्धचार्य लक्ष्मणराव धनेश्वर, जेष्ठ कार्यकर्ते तथा ट्रस्टचे सचिव अशोकराव पगारे, ट्रस्टचे अध्यक्ष संजय पगारे, उपाध्यक्ष बाबासाहेब के पगारे, कोषाध्यक्ष सिद्धार्थ पगारे, सहसचिव गौतम पेंटर पगारे, सर्व सदस्य- माजी ग्रामपंचायत सदस्य चेतन दिवेकर, दीपक धनेश्वर, बुद्धिस्ट सोसायटीचे विलास पगारे, भीम आर्मीचे अभिषेक पगारे, दौलत धनेश्वर, ग्रामीण पोलीस गणेश दिवेकर, मुंबई पोलीस आकाश पगारे, अण्णाभाऊ पगारे, किरण पगारे, बबन पगारे, प्रल्हाद बोर्ड, सुनील पगारे, सौरभ भैय्या दिवेकर यांनी वृक्षारोपण केले. वृक्ष संगोपणाचे पालकत्व आयु. लक्ष्मण धनेश्वर, विलास पगारे, दीपक धनेश्वर, आकाश पगारे, अभिषेक पगारे, गणेश दिवेकर, किरण पगारे, सौरभ दिवेकर, दौलतराव धनेश्वर यांनी स्वीकारले.