18/05/2021
🌹
✍🏻 एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व , सामाजिक भान असलेले , सर्व जाती धर्मासाठी झटणारे, आऊटस्टँडिंग ऑफिसर :डॉ. हर्षदीप कांबळे साहेब
(सचिव, विकास आयुक्त उद्योग, ऊर्जा, कामगार ).
🙏🏻आदरणीय साहेब,
मला माहिती आहे कि तुमची कस्तुती केलेली तुम्हाला कधीच स्तुती आवडत नाही. तुमचा वाढदिवस साजरा करणे तर बिल्कुल च आवडत नाही. तुम्ही जनसामान्यांसाठी, गरजूवंतासाठी केलेले कामे कधीच कोणाला सांगत नाही किंवा सांगितलेले तुम्हाला आवडत पण नाही.
पण मी हा गुन्हा करत आहे, उद्देश एक च आहे कि तुमच्या ह्या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळावी.
आज अधिकारी साडी, माडी व गाडी ह्या ऐषोआरामात गुंतलेले असताना (काही सन्माननीय अपवाद वगळता ) तुम्ही मात्र गोर गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी ह्या करोना सारख्या भयंकर महामारी त सुद्धा हजारो लोकांना अन्न धांन्य वाटप करतांना उभ्या महाराष्ट्राने बघितले. तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील बऱ्याच लोकांनी सुद्धा अन्न धान्य वाटप आपल्यापरीने केले, साहेब आपण एक दानशूर व्यक्तिमत्व आहात, पण तेही कर्मयोगी गाडगेबाबाना अपेक्षित असेच डोळस दानशूर म्हणावे लागेल,
करोना ने नागपूर मध्ये हाहाकार माजवला असता, ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यूतांडव साहेबाना पाहवले गेले नाही व स्वखर्चातून नागपूर च्या शासकीय रुग्णालयास 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दान केले. हि दानपरिमितां पाहून खरंच डोळे पाणावले. साहेब, मॅगी चे प्रकरण असो, हृदयाची स्टेंट प्रकरणात एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो हे पूर्ण महाराष्ट्राने च नव्हे तर उभ्या देशाने बघितले. म्हणूनच करोना सारख्या महाभयंकर महामारीत तुमच्यावर परदेशातून भारतासाठी येणारी मदत गरजू पर्यंत पोहचावी ह्यासाठी शासनाने नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली. हि आपल्या कार्याची पावतीच आहे.🌹 लिहिण्यासारखे भरपूर आहे मात्र इथेच पूर्णविराम.
🙏🏻परंतु सर तुम्हीच आमचे प्रेरणास्रोत आहात आजच्या दिवशी तुमच्या कार्यकर्तृत्वाचा पाईक म्हणून सदैव तुमच्या मार्गदर्शनात राहून तुमच्या प्रेरणेने सामाजिक कार्यात कार्यरत राहील असे तुम्हाला अभिवचन देतो,
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.... तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.. मनात आमच्या एकच इच्छा, आपणास उदंड आयुष्य लाभू दे... 🌹🌹🌹
साहेब यापुढील तुमचं आयुष्य अतिशय आनंददायी ,आरोग्यदायी तसेच समाजउपयोगी जावो हीच माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून आपणास सदिच्छा व्यक्त करतो🙏🏻
आपल्या वाढदिवसा निमित्ताने कोटी
कोटी शुभेच्छा 🎂🎂🧁🌹🌹💐💐🙏🙏प्रा. रविंद्र इंगळे,
डॉ. हर्षदीप कांबळे साहेब फॅन्स क्लब अमरावती.🌹🌹🌹🌹.