18/02/2026
🔹 सम्राट अशोकांचा धम्म प्रचार.🔹
◾भाग -४◾
• मौर्य साम्राज्याच्या वायव्य प्रातांचे मुख्य ठिकाण तक्षशिला अखंड भारताच्या पाकिस्तानात गेलेल्या भागात आहे.
• या तक्षशिला येथेच स्वाभाविकपणे बौद्धधर्माचे मोठे केंद्र सम्राट अशोक यांच्या काळात होते.
• ह्यु-एन-त्संगने तक्षशिलाच्या परिसरात लाहोर पासून ५५ कि.मी. वरील नरसिंह(आधुनिक रान्शी),तकी(गुजरातच्या नवादा जिल्ह्यातील आधुनिक असरूर),साकल (आधुनिक सियालकोट), सिंहपुरी(पिडदादात खान पासून२५ किलोमीटर अंतरावर असलेले आधुनिक केटस), तक्षशिलेपासून आग्नेय दिशेला ४० किलोमीटरवर असलेले मानिक्यला आणि खुद्द तक्षशिला येथे दोन महाकाय स्तूप पाहिल्याचे त्याने लिहून ठेवले आहे.
• पंजाबमधील सर्व महत्त्वाच्या स्मारकावशेषामध्ये #तक्षशिला येथील धर्मराजिक स्तूप सर्वात महत्त्वाचा आहे.
• अशोकाने हा #स्तुप,त्याने जे तथागतांच्या पवित्र अस्थी धातूंवर बांधलेले सात स्तूप होते ते उघडून, त्यातील धातूंवर आपल्या साम्राज्य क्षेत्रात जे ८१ हजार स्तूप बांधले होते, त्यापैकी एक धर्मराजिक स्तूप असावा,असे वाटते.
• या स्तूपामध्ये दोन धातूपेटिका सापडल्या होत्या.
• पंजाबमधील अंबाला शहराजवळच्या टोपरा या गावात सम्राट अशोकाने स्थापलेला एक #स्तंभ सापडला होता.
• इ.स.पू.२४३ मध्ये स्थापलेल्या या स्तंभावरील लेखांमध्ये अशोकाच्या धम्मविजयासंबंधी ७ राजाज्ञा खोदविलेल्या होत्या,ज्या गांधार प्रांतातील प्रजाजनांसाठी मार्गदर्शक होत्या.
• या सात राज्याज्ञामधील विषय धर्मपालनाबद्दलचा उपदेश,धम्मपालन म्हणजे काय याबद्दल उपदेश, अकुशल कर्माविरुद्ध जागृत राहण्याबद्दल उपदेश, राज्जूकांचे कर्तव्य, प्राणीमात्रांची हत्या आणि दुखापतीला प्रतिबंधककारक उपदेश, धम्मलेख लिहिण्यामागील अशोकाची भूमिका, अशोकाच्या आयुष्यभराच्या कार्याची समीक्षा आदि विषयांचा अंतर्भाव होता.
• अशाप्रकारे अशोकाने पंजाबमधील आपल्या प्रजाजनांमध्ये बुद्धधम्माची रुजवण व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केल्याचे दिसून येते.
• हा शिलास्तंभ इ.स.१३५६ साली फेरोजशाहा तुघलक यांनी टोपरा येथून हालवून तो दिल्ली येथे फिरोजशहा कोटला या ठिकाणी स्थापन केला आहे.
🔹( संदर्भ-भारतातील बुद्धधम्माचा इतिहास, लेखक-मा.शं.मोरे,पान नं.२७०.)🔹