गव्हानकुंड हे गाव अमरावती जिल्ह्यातील वरुड या तालुक्यामध्ये ८ कि. मी. अंतरावर आहे. हे गाव "सुखी" नदीच्या काठी वसलेले आहे. गव्हानकुंड येथे वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात त्यामध्ये हिंदू, मुस्लीम तसेच आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. या गावाची लोकसंख्या ६००० च्या वर आहे आणि जवळ जवळ ३५० घरे आहेत. गव्हानकुंड चे वैशिट्य म्हणजे या गावाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. येथे कपिलेश्वर महारा
जांचे देवस्थान आहे त्याला "कुंड" या नावाने ओळखले जातात. याचे वैशिट्य म्हणजे येथे एकाच रांगेत आणि खूप खोल असे सात कुंड आहे आणि वीशेष म्हणजे या कुंडाचे पानी कधीच कमी होत नाही. आणि येथे दर श्रावण महिन्यामध्ये मोठी जत्रा होते. त्यामुळे येथे दुरून दुरून लोक येतात. यामुळे हे गाव एक पर्यटन स्थळ बनलेले आहे. गव्हानकुंड येथून ४ कि. मी. अंतरावर "शेकदरी" नावाचे धरण आहे. या धरणाचे पानी शेती आणि गावासाठी वापरले जाते. येथे पाण्याची मुबलक प्रमाणामध्ये सोय असल्यामुळे येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. येथे मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाणारे पिक म्हणजे संत्री. येथील संत्री नागपूर च्या बाजारपेठेत विकली जातात. तसेच येथे कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी चे पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. येथील लोक खूप धार्मिक प्रवृत्तीचे आहे म्हणून येथे म्हणून येथे वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्या जाते. गव्हानकुंड च्या जवळ टेंभुर्खेडा, जरुड , बेनोडा, इसंबरी, भेमडी, बहादा इत्यादी गावे आहेत.